नाणे बाजाराची वैशिष्ट्ये काय आहेत?

Nane Bazar Features Marathi – नमस्कार मित्रांनो, मागील लेखात आपण नाणेबाजार का महत्वाचा आहे? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. आता आपण नाणे बाजाराचा अर्थ आणि बाजाराचे स्वरूप अजून व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी नाणे बाजाराची वैशिष्ट्ये (Nane Bazar Features Marathi) काय आहेत? या विषयावर चर्चा करणार आहोत.

नाणे बाजार काय आहे?

नाणे बाजाराची वैशिष्ट्ये वैशिष्ट्ये पुढे आपण जाणून घेणारच आहोत. पण त्याआधी आपण नाणे बाजार काय आहे याचा थोडा आढावा घेऊ.

नाणे बाजार म्हणजे अशी यंत्रणा आहे, ज्या मार्फत अल्पकालीन कर्ज दिले व घेतली जातात, आणि एखाद्या विशिष्ट देशाच्या किंवा जगाच्या आर्थिक स्वरूपाच्या देवाणघेवाणीचे बरेचसे व्यवहार पूर्ण केले जातात.

– Madden and Nadler

यामध्ये व्यापारी व सहकारी बँका , व इतर आर्थिक संस्था तसेच हुंडीबाजारातील दलाल, वायदे बाजारातील ग्राहक आणि विक्रेते, बँका व सरकार इ. अल्पमुदती भांडवल घेणाऱ्या लोकांचा व संस्थांचा समावेश होतो.

Related – नाणेबाजाराचे महत्व काय आहे?

नाणे बाजाराची वैशिष्ट्ये काय आहेत (Nane Bazar Features Marathi)

कर्जाची देवाण घेवाण

नाणे बाजारात पैशाची खरेदी विक्री होत नाही तर कर्जाची देवाण-घेवाण होत असते. थोडक्यात, ज्यांच्याकडे अतिरिक्त पैसा उपलब्ध आहे आणि कर्जाची आवश्यकता आहे असे दोन गट एकत्र येतात. हे दोघे एकत्र येऊन हा व्यवहार पूर्ण करतात.

अल्पकालीन कर्जाची देवघेव

वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या मुदतीच्या कर्जाची आवश्यकता असते. पण नाणे बाजारात सर्व प्रकारच्या कर्जाची देवाण-घेवाण होत नाही. या बाजारात फक्त अल्पमुदतीच्या कर्जाची देवाणघेवाण होत असते. हा काळ एक महिने ते बारा महिन्यापर्यंत असू शकतो.

पतपत्रांच्या आधारे कर्ज व्यवहार

पतपत्रांच्या तारणावर किंवा त्यांच्या खरेदी विक्रीच्या आधारावर, नाणे बाजारातील अल्पकालीन कर्जाच्या देवाणघेवाणीचे व्यवहार होत असतात. हुंड्या, कोषागार विपत्रे, वचन चिठ्ठ्या आणि सरकारी कर्जरोखे यासारख्या पतपत्रांच्या आधारावर नाणे बाजारातील कर्जाचे व्यवहार होतात.

नाणे बाजाराला ठिकाण नाही

मित्रांनो, जसा भाजीपाला आणि वस्तूंचा एका विशिष्ट ठिकाणी बाजार असतो, तसा नाणे बाजार नसतो. एखाद्या शहराच्या नावाने जरी नाणे बाजार ओळखला जात असला, तरीदेखील या बाजाराला कोणते विशिष्ट ठिकाण नसते.

देशातील अल्पकालीन कर्जाच्या देवाण घेण्याचे व्यवहार ज्या केंद्रातून चालतात त्याला, नाणेबाजार म्हटले जाते. याच केंद्रातून उद्योगपती, व्यापारी आणि शेतकरी कर्ज मिळवत असतात.

अनेक व्यक्ती आणि संस्थांचा सहभाग

नाणे बाजारात होणाऱ्या कर्जाच्या व्यवहारात अनेकांचा सहभाग असतो. कर्ज देणाऱ्या मध्यवर्ती बँक, व्यापारी आणि सहकारी बँका, अल्पकाळासाठी पैसा उपलब्ध करून देणाऱ्या आर्थिक संस्था आणि खाजगी व्यक्तींचा यामध्ये समावेश होतो. तर कर्ज घेणाऱ्यांमध्ये उद्योगपती, व्यापारी, शेतकरी, सरकारी व खासगी बँक, सरकार आणि इतर संस्थांचा समावेश होतो.

उपबाजारांचे अस्तित्व

नाणे बाजारातील कर्ज व्यवहार हे वेगवेगळ्या पतपत्रांच्या आधारावर चालतात. हे सर्व पतपत्र विविध स्वरूपाचे असतात. त्यामुळे या पतपत्रांचे स्वतंत्र असे उपबाजार निर्माण होतात. विशिष्ट पत पत्रांच्या बाजारात त्या त्या पतपत्रांच्या आधारावर कर्ज व्यवहार होत असतात.

मागणी देय, विपत्र बाजार, सरकारी कर्जरोखे बाजार, तारण कर्ज बाजार इत्यादी नाणे बाजाराचे उपबाजार आहेत.

विशेष संस्थांचे अस्तित्व

नाणे बाजारात काय विशेष संस्थेचे अस्तित्व असते. स्वीकृती गृह आणि वटवणूक गृह या संस्था नाणे बाजारात कार्यरत असतात. अशा संस्था भांडवल बाजारात नसतात, त्यामुळे विशेष संस्थांच्या अस्तित्व असणे हे नाणे बाजाराची वैशिष्ट्य म्हणता येते.

सारांश

तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला नाणे बाजाराचे वैशिष्ट्य (Nane Bazar Features Marathi) काय आहेत हे स्पष्ट झाले असेल. जर तुम्हाला नाणे बाजाराबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर आम्हाला विचारू शकता. बाकी बँकिंग आणि फायनान्स संबंधी नवनवीन माहितीसाठी या ब्लॉगला बुक मार्क करायला विसरू नका.

FAQs

पतपत्र म्हणजे काय?

पतपत्र म्हणजे आयातदाराच्या बँकेने, आयातदाराने वस्तू आयात केल्यावर निर्यातदारास व्यवहाराची रक्कम प्रदान केली जाईल याची दिलेली लेखी हमी होय.

भारतीय नाणे बाजाराची भूमिका स्पष्ट करा.

अल्पकालीन कर्जाच्या देवाणघेवाणीचे व्यवहार नाणे बाजारात चालतात. या बाजारातील कर्ज व्यवहार कर्जरोखे, विपत्रे अशा पतपत्रांच्या आधारावर चालतात. विविध पतपत्रांच्या स्वरूपात भिन्नता असल्यामुळे प्रत्येक पतपत्रांचा स्वतंत्र उपबाजार निर्माण झालेला आहे. भारतीय नाणे बाजार संघटित आणि असंघटित अशा दोन पद्धतीने विभागलेला आहे. याविषयी अधिक माहिती आपण पुढील काही लेखांमध्ये घेणार आहोत.