नाणेबाजाराचे महत्व काय आहे?

Nane Bazar Importance Marathi – नमस्कार मित्रांनो, तुम्हाला नाणेबाजार माहीत आहे का? नसेल माहीत तर थोडक्यात सांगतो, बघा ज्या ठिकाणी खरेदीदार आणि विक्रेते एकत्र येतात, आणि एखाद्या वस्तू अथवा सेवांची किंमत ठरवून देवाणघेवाण करतात, त्याला आपण बाजार म्हणतो.

तसेच नाणेबाजार असतो, फक्त फरक इतकाच असतो की, या ठिकाणी वस्तू किंवा सेवांची देवाणघेवाण न करता, भांडवलाची देवाणघेवाण केली जाते. अर्थात या बाजारात कर्ज व्यवहाराच्या रुपात देवाणघेवाण करतात.

ज्यांच्याकडे अतिरिक्त पैसा आहे, ते लोक ज्यांना पैश्याची गरज आहे त्यांना कर्ज म्हणून देतात, याबदल्यात त्यांना व्याज मिळते. या बाजाराने देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी प्राप्त होत असते.

या लेखातून आपण देशासाठी नाणेबाजाराचे महत्व (Nane Bazar Importance Marathi) काय आहे, याविषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत.

नाणेबाजार म्हणजे काय?

Nane Bazar Definition In Marathi – नाणेबाजार म्हणजे असा बाजार जेथे भांडवलाची कर्ज व्यवहाराच्या रूपामध्ये देवाणघेवाण होते. उद्योजक, व्यापारी आणि शेतकरी तसेच इतर काहींना वेगवेगळ्या कारणासाठी ठराविक मदतीसाठी कर्जाची आवश्यकता असते.

यांची ही गरज नाणेबाजारात पूर्ण होते. यावरून आपल्याला असे म्हणता येईल की, शेतकरी, उद्योजक, व्यापारी आणि इतरांची ठराविक काळासाठी कर्जाची गरज पूर्ण करणारी यंत्रणा म्हणजे नाणेबाजार होय.

विविध प्रकारच्या जवळजवळ पैशाचे व्यवहार करणारे व्यवसाय संस्था व इतर संस्था यांना एकत्रितपणे नाणेबाजार असे म्हणतात.

– क्राऊथर

आता तुमच्या लक्षात आले असेल, नाणेबाजार कर्ज घेणाऱ्याच्या गरजा भागवतो, आणि अशी कर्ज उपलब्ध करून देणाऱ्याला तरलता प्राप्त करून देतो.

Related – पैसा म्हणजे काय?

नाणेबाजाराचे महत्व काय आहे (Nane Bazar Importance Marathi)

मित्रांनो, सध्या प्रत्येक क्षेत्रात आर्थिक व्यवहारात झपाट्याने वाढ होत आहे, त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील कर्जांच्या गरजा वाढलेल्या आहेत. यामुळे अल्पकालीन, मध्यम कालीन आणि दीर्घकालीन अशा सर्व प्रकारच्या कर्जांची मागणी सातत्याने होत आहे. यापैकी अल्पकालीन कर्जाची गरज पूर्ण करायचे काम नाणेबाजार करतो.

विकसित नाणे बाजार हा देशातल्या शेती, उद्योग, व्यापारी तसेच इतर सर्व क्षेत्रात विकासाच्या बाबतीत महत्वाची भूमिका बजावतो, ते आपण पुढे सविस्तरपणे समजाऊन घेऊ.

शेती, उद्योग व सेवा क्षेत्र

शेतकऱ्यांना शेतातील मजुरांची मजुरी देण्यासाठी, बी बियाणे खरेदी करण्यासाठी खेळत्या भांडवलाची गरज असते. तर उद्योजक आणि व्यापारी यांना वेगवेगळे देणे देण्यासाठी खेळत्या भांडवलाची गरज असते. या सर्वांची कर्जाची गरज नाणेबाजारामार्फत पूर्ण केली जाते.

त्यामुळे उद्योग, शेती आणि सेवा क्षेत्रांच्या अल्पकालीन कर्जाच्या गरजा पूर्ण होऊन या क्षेत्राचा विकास होण्यास मदत होते.

सरकारला कर्जाची उपलब्धता

देशाचे उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसत नाही, तेव्हा सरकारला कर्जाची आवश्यकता पडते. यावेळी त्यांना नाणे बाजारातून अल्प स्वर्गाची कर्ज घ्यावे लागतात. सरकार कोषागार विपत्राची विक्री करून ही कर्ज घेत असतात.

सरकारला मध्यवर्ती बँकेकडून पैसा उपलब्ध होऊ शकतो परंतु असे केल्याने चलनाचा पुरवठा वाढून भाव वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळे सरकार नाणे बाजारातून कर्ज घेतो.

व्यापारी आणि सहकारी बँकांना मदत

व्यापारी आणि सहकारी बँका त्यांच्याकडील उपलब्ध निधी कर्जाऊ देण्यासाठी आणि आवश्यकता असेल तेव्हा कर्ज उभारणीसाठी नाणे बाजाराची मदत घेतात.

बँकांकडे जमा झालेल्या ठेवींची काही रक्कम बँक स्वतःजवळ ठेवतात, तर काही रक्कम कर्ज देण्यासाठी वापरतात. पण ही रक्कम ठेवीदाराने मागणी करताच, बँकेला परत करावी लागते.

अशाप्रकारे अल्पकाळासाठी उपलब्ध निधी कर्ज म्हणून देण्यासाठी आणि गरज लागली तर कर्ज उभारण्यासाठी नाणे बाजार व्यापारी आणि सहकारी बँकांना फायद्याचा ठरतो.

व्यक्ती आणि संस्थांना गुंतवणुकीच्या संधी

एखादी व्यक्ती, बँका आणि गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या संस्था यांच्याकडे उपलब्ध असलेल्या पैशाची गुंतवणूक करण्याची संधी नाणे बाजारामुळे उपलब्ध होते. या बाजारात अल्पमुदतीसाठी गुंतवणूक करून अतिरिक्त उत्पन्न मिळवता येते.

अल्प मदतीसाठी सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणुकीच्या संधी व्यक्ती, बँक आणि इतर संस्थांना या बाजारामुळे मिळत असते. यातून मिळणाऱ्या पैशाचा उत्पादक कार्यासाठी वापर केला जातो.

मध्यवर्ती बँकेला पत नियंत्रणासाठी मदत

देशाच्या अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा गरजेपेक्षा वाढणार नाही आणि गरजेपेक्षा कमी पडणार नाही, याची काळजी मध्यवर्ती बँकेला घ्यावी लागते. चलनातील नाणी आणि नोटांच्या पुरवठ्यावर मध्यवर्ती बँकेचे नियंत्रण असते.

परंतु व्यापारी बँका पत निर्मिती करून पैशाच्या पुरवठ्यात वाढ करू शकतात, यामुळे भाव वाढ घडवू शकते. तेव्हा मध्यवर्ती बँकेला कमी मुदतीच्या कर्जरोख्यांची विक्री करून पत नियंत्रण करावे लागते. यासाठी मध्यवर्ती बँकेला नाणे बाजाराची गरज असते.

भांडवल बाजाराच्या प्रगतीला हातभार

नाणे बाजारातील कर्जाऊ निधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाला तर, भांडवल बाजारातल्या व्याजदरात घट होते. तसेच नाणे बाजारात कार्यरत असलेल्या संस्थांच्या नफ्यात वाढ झाली, की भांडवल बाजारात वाढ होते. यातून उद्योगाच्या विकासासाठी आवश्यक असलेला दीर्घकालीन वित्त पुरवठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतो.

भांडवल बाजारातील आर्थिक व्यवहार होऊन या बाजारात भरभराट होते. परिणामी उद्योग आणि व्यवसाय वाढीस लागतात. अशाप्रकारे नाणे बाजाराच्या विकासामुळे भांडवल बाजाराच्या प्रगतीला हातभार लागतो.

देशाच्या आर्थिक विकासात सहभाग

देशाचा आर्थिक विकास शेती, व्यापार, उद्योग, वाहतूक आणि दळणवळण अश्या विविध यंत्रणेच्या झालेल्या विकासावर अवलंबून असतो. यातील प्रत्येक क्षेत्राच्या विकासासाठी वित्त पुरवठा पुरवण्याचे काम नाणेबाजार करतो. यामुळे या क्षेत्रातील विकासाला आणि त्यातून देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळून देशाची आर्थिक स्थिती सुधारते.

सारांश

नाणेबाजार व्यक्ती, व्यापारी व सहकारी बँका, आणि इतर आर्थिक संस्थांना अल्पकालीन कर्जाची मदत करतो. तसेच ज्यांच्याकडे अतिरिक्त पैसा आहे, त्यांना या पैशाची फायदेशीर आणि सुरक्षित गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करून देतो.

अशा विविध कारणांमुळे नाणेबाजार हा देशातील प्रत्येक क्षेत्रातील घटकांना आर्थिक विकासात, निधीची उपलब्धता करून मदत करतो. आशा करतो की, तुम्हाला नाणेबाजाराचे महत्व (Nane Bazar Importance Marathi) काय आहे, हे स्पष्ट झाले असेल.

FAQs

नाणे बाजार म्हणजे काय?

नाणे बाजार म्हणजे अल्पमुदतीने भांडवल देणारे आणि घेणारे यांच्यातील व्यवहारांचा बाजार होय.

नाणे बाजारात कोणाचा समावेश होतो?

नाणे बाजारात व्यापारी बँका, देशी पेढ्या व इतर अल्पमुदती भांडवल देणाऱ्या संस्थांचा आणि हुंडीबाजारातील दलाल, वायदेबाजारातील ग्राहक आणि विक्रेते, बँका व सरकार इ. अल्पमुदती भांडवल घेणाऱ्या लोकांचा व संस्थांचा समावेश होतो.

चांदीचा रुपया आणि तांब्याचे दाम ही नाणी कोणी चलनात आणली?

चांदीचा रुपया आणि तांब्याचे दाम ही नाणी दिल्लीचा अफगाण बादशाह शेरशहा सुरीने चलनात आणली.