नरसोबाची वाडी माहिती मराठी

Narsobachi wadi information in marathi – नरसोबाची वाडी हे महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्र आहे. हे तीर्थक्षेत्र श्रीनृसिंह सरस्वती यांच्यामुळे ओळखले जाते. श्रीनृसिंह स्वामी या ठिकाणी 12 वर्ष राहिले होते. स्वामींनी या ठिकाणी अनेक चमत्कार केले, अशी मान्यता आहे.

नरसोबाची वाडी किंवा नृसिंहपूर या ठिकाणी श्रीनृसिंह स्वामींनी तपश्चर्या केली होती. नृसिंह सरस्वती यांना श्रीपाद वल्लभ यांच्यानंतरचे दत्तात्रेयांचे दुसरे पूर्णावतार मानले जातात. अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज सर्वांना ठाऊक आहेतच. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती यांचाच अवतार म्हणून श्रीस्वामी समर्थ प्रकट झाले, अशी मान्यता आहे.

दरवर्षी लाखो भाविक अक्कलकोटच्या स्वामी समर्थांना भेट द्यायला येतात, त्याचप्रमाणे श्रीनृसिंह सरस्वती यांनाही भेट देतात. या लेखात आपण नरसोबाची वाडी माहिती मराठी – narsobachi wadi information in marathi जाणून घेणार आहोत.

नरसोबाची वाडी माहिती मराठी (narsobachi wadi information in marathi)

narsobachi wadi information in marathi
narsobachi wadi information in marathi
नावनरसोबाची वाडी
ठिकाणनृसिंहवाडी
कोल्हापूर, महाराष्ट्र
प्रसिद्धनृसिंह सरस्वती मंदिर
संप्रदायदत्त संप्रदाय
स्थानिक भाषामराठी
जवळील पर्यटन स्थळेमहालक्ष्मी मंदिर
ज्योतिबा मंदिर
नरसोबाची वाडी माहिती मराठी

1. कोल्हापूर जिल्ह्यात असणारे तिर्थक्षेत्र नरसोबाची वाडी दत्ताची वाडी म्हणून प्रसिद्ध आहे. नरसोबाची वाडी दत्त मंदिर यासाठी प्रसिद्ध आहे.

2. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कृष्णा व पंचगंगा या नद्यांचा संगम होतो. हा संगम ज्या ठिकाणी आहे त्याच काठवर नृसिंह सरस्वती मंदिर पाचशे ते आठशे वर्षाचे पुरातन मंदिर आहे.

3. महाराष्ट्र राज्य आणि कर्नाटक राज्य या ठिकाणी राहणारे असंख्य भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे.

4. तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात श्री.नरसिंह सरस्वती स्वामी या ठिकाणी राहत होते. स्वामीं श्री दत्ताचा अवतार आहे, अशी मान्यता आहे.

5. देशातून स्वामींचे असंख्य भाविक-भक्त नरसिंहवाडी ला दर्शनासाठी भेट देतात.

6. नरसोबाची वाडी कोल्हापूरपासून 51 किलोमीटर अंतरावर आहे आणि या ठिकाणी कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम झालेला आहे.

7. दत्तात्रेयांचे अवतार श्रीनृसिंह सरस्वतींचे या ठिकाणी 12 वर्ष राहिले.

8. तसेच श्रीनृसिंह सरस्वतींनी याच ठिकाणी तपश्चर्या केली होती, त्यांचे चमत्कार आणि साक्षात्कार याबातीतही ते चर्चेत असतात.

9. जवळच असलेला कुरुंदवाडला नदीवर बांधलेला घाट आहे.

10. कृष्णा नदीवर बांधण्यात आलेल्या घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली एक मंदिर आहे.

11. या मंदिरामध्ये नृसिंह सरस्वती स्वामींनी स्थापन केलेल्या दत्तपादुका पाहायला मिळतात.

12. या ठिकाणी पादुकांची पूजा अर्चना करण्यात येते. दत्तसंप्रदायात श्री दत्तगुरूंचे दुसरे अवतार म्हणून श्री नृसिंह सरस्वती यांना मानतात.

13. या पादुका पाषाणाच्या असुन त्यांना ‘मनोहर पादुका’ असे नाव आहे.

14. कृष्णा नदीवरचा घाट एकनाथ महाराजांनी बांधला आहे. याच घाटावर वासुदेवानंद सरस्वतींचेही स्मृतिमंदिर देखील पाहायला मिळते.

15. नदीचे पात्र, घाट, देऊळ, त्यामागचा औदुंबरचा पार हे सारे अगदी चित्रमय वाटते आणि परिसरातले शांत, काहीसे पारंपरिक, प्रसन्न वातावरण मनाला भावते.

16. या मंदिराच्या आवारात मोठा गोलाकार मंडप आहे आणि त्याला चारही बाजूंनी विस्तृत असे उंच खांब आहेत.

17. मंदिराच्या आतील भागात श्री गणेशाची भव्य मूर्ती पाहायला मिळते.

नरसोबाची वाडी इतिहास – narsobachi wadi story in marathi

18. नरसोबा वाडीचे हे प्राचीन मंदिर विजापूरच्या आदिलशहाने बांधलेले आहे.

19. याबाबत एक कथा प्रचलित आहे. विजापूरच्या बादशहाच्या मुलीचे डोळे गेल्यामुळे तिला अंधत्व आले. तेव्हा बिदरच्या बादशहाच्या सांगण्यावरून आदिलशहा नृसिंहवाडीस आला.

20. त्याने स्वामींचे दर्शन घेतले आणि नवस केला. पुजार्‍याने जो अंगारा दिला तो बादशहाने त्याच्या मुलीच्या लावला आणि तिला दिसायला लागले.

21. यामुळेच खुश होऊन बादशहाने कृष्णा नदीकाठी असलेली दोन गावे देवस्थानच्या पूजेसाठी दिली.

22. या दोन गावांपैकी एक गाव औरवाड हे पूर्वीचे अमरापूर गाव होय. या गावाचा उल्लेख गुरुचरित्रामध्ये आहे.

23. अमरापूरमध्ये अमरेश्वराचे प्राचीन मंदिर आहे.

24. नरसोबाची वाडीत नृसिंह सरस्वतीच्या यांच्या मंदिराबरोबरच रामचंद्र योगी यांची समाधी पाहायला मिळते.

25. तसेच नारायण स्वामी, काशीकर स्वामी, गोपाल स्वामी, मौनी स्वामी यांच्या समाधी मंदिरे याच परिसरात आहेत.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

नरसोबाची वाडी कुठे आहे ?

नरसोबाची वाडी कोल्हापूर जिल्ह्यात आहे.

नरसोबाच्या वाडी मधला कोणता पदार्थ लोकप्रिय आहे ?

नरसोबाच्या वाडी मधला कुंदा, आणि बासुंदी पदार्थ लोकप्रिय आहे.

नरसोबाची वाडी कोणत्या नदीच्या संगमावर स्थित आहे ?

नरसोबाची वाडी कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर स्थित आहे.

नरसोबाची वाडी कृष्णा आणि कोणत्या नदीच्या संगमावर स्थित आहे ?

नरसोबाची वाडी कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर स्थित आहे.

पंचगंगा नदी कोणत्या जिल्ह्यातून जाते ?

पंचगंगा नदी कोल्हापूर जिल्ह्यातून जाते.

वाडी म्हणजे काय ?

लोकवस्ती असलेलं पण शहरापेक्षा छोटं ठिकाण म्हणजे वाडी होय.

हे देखील वाचा

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण नरसोबाची वाडी माहिती मराठी – narsobachi wadi information in marathi जाणून घेतली.

त्याचबरोबर या लेखात आपण नरसोबाची वाडी माहिती मराठी पाहिली आहे.

नरसोबाची वाडी माहिती मराठी – narsobachi wadi information in marathi तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

Leave a Comment