राष्ट्रीय हातमाग दिवस माहिती मराठी

National Handloom Day Information In Marathi – नमस्कार मित्रांनो, हातमाग म्हणजे हात आणि पायांचा वापर करून चालविता येणारा माग, याचा वापर वस्त्र विणण्यासाठी केला जातो. सुताचे उभे धागे ताणात ठेवून, आडव्या धाग्यांनी विणणे हे याचे काम आहे.

मागाच्या आकारात, आकारमानात आणि यंत्रात प्रदेशानुसार बदल पाहायला मिळतात. पण त्यांचे कार्य एकसारखेच असते. आपल्या महाराष्ट्रातील इचलकरंजी हे शहर हातमाग उद्योगासाठी प्रसिद्ध आहे.

हातमाग आणि हस्तकला क्षेत्राशी संबंधित असलेल्या सर्व कारागिरांना प्रोत्साहन आणि शुभेच्छा देऊन, या उद्योगाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा केला जाऊ लागला.

या लेखातून आपण राष्ट्रीय हातमाग दिवस माहिती मराठी (National Handloom Day Information In Marathi) याविषयीं सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

राष्ट्रीय हातमाग दिवस माहिती मराठी (National Handloom Day Information In Marathi)

National Handloom Day Information In Marathi
नावराष्ट्रीय हातमाग दिवस
प्रकारउद्योग दिनविशेष
केव्हा साजरा करतात?7 ऑगस्ट (दरवर्षी)

मित्रांनो, तुम्ही जर भारताच्या उद्योग आणि व्यापार क्षेत्राचा बारकाईने विचार केला, ते तुमच्या लक्षात येईल की, हातमाग उद्योग भारतातील सर्वात जुन्या उद्योगांपैकी एक आहे.

या उद्योगात हातमागाच्या साहाय्याने विणकाम करून कापड बनविण्याचा उद्योग केला जातो. विणकामाच्या या पद्धतीत ताणा (उभे) व बाणा (आडवे) करून कापड तयार केले जाते.

ताण्याच्या समांतर लांब धाग्यांत त्यांना काटकोनात असलेले बाण्याचे धाग्यात गुतवितात. हे धागे गुंतविण्याचे काम ज्या चौकटींत करतात, त्याला माग असे म्हणतात.

साधारणपणे यंत्रमाग आणि मनुष्यबळ संचलित असे दोन मागांचे प्रकार आहेत. मनुष्यबळ संचलित मागात ओढमाग व हातमाग यांचा समावेश होतो.

भारतातील हातमाग उद्योग व्यवसाय मराठी माहिती (Handloom Business In India Marathi)

Handloom Business In India Marathi

भारतात शेती व्यवसायानंतर सर्वांत जास्त रोजगार निर्माण करणारा उद्योग म्हणजे हातमाग उद्योग होय. आपल्या देशातील औद्योगिक क्षेत्रात कापड उद्योगाला फार महत्त्वाचे स्थान आहे. भारतातील प्राचीन उद्योगांपैकी हा एक महत्वाचा उद्योग मानला जातो.

भारतातून निर्यात होणाऱ्या एकूण उत्पादनांपैकी 30% उत्पादन कापड उद्योगाशी संबंधित असते. तर देशाच्या एकूण औद्योगिक उत्पन्नात हातमाग उद्योगाचा वाटा 14% आहे. यावरून तुम्हाला अंदाज आला असेल, की हातमाग उद्योग किती मोठा आहे.

पूर्वी भारतात विणकाम करणारा स्वतंत्र वर्ग होता. हा वर्ग आजही कमी–अधिक प्रमाणात संपूर्ण भारतात आढळतो.

साधारणपणे हातमाग उद्योग ग्रामीण भागांशी संबंधित आहे. आसाम, मणिपूर व त्रिपुरा या प्रदेशांतील विणकर धार्मिक भावना आणि परंपरा टिकवून ठेवत आजही हातमागाचा व्यवसाय करतात.

पण तंत्रज्ञानाच्या युगात हातमाग उद्योग बंद न होऊ देता, हा उद्योग कसा वाढवता येईल आणि जगभर याची बाजारपेठ कशी बसवता येईल, याचा विचार भारत सरकारने केला आहे. यासाठीच राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा केला जातो.

Related – संयंत्र, व्यवसाय संस्था व उद्योग म्हणजे काय ?

राष्ट्रीय हातमाग दिवस का साजरा केला जातो (why celebrate national handloom day in marathi)

why celebrate national handloom day in marathi

हातमाग कला, यापासून विणलेल्या सुंदर वस्त्रांचे धागे शोधत गेलो तर आपल्याला इतिहासाशी त्यांची देखणी नाळ जोडलेली दिसते. काळाच्या ओघात नामशेष होतो की काय अशा स्थितीत पोहोचलेल्या या व्यवसायाला अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मार्केटिंगच्या मदतीने पुन्हा एकदा लौकिक प्राप्त झाला आहे.

7 ऑगस्ट 2015 पासून दरवर्षी भारतात राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करण्यात येत आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करण्याची सुरुवात करून दिली.

या दिवसाच्या निमित्ताने हातमाग आणि हस्तकला क्षेत्राशी संबंधित असलेल्या सर्वांना प्रोत्साहन मिळते. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने प्रयत्न हे पाऊल आज अनेक कारागिरांना फायद्याचे ठरत आहे.

यातूनच हातमागची ओळख संपूर्ण जगात होण्यास मदत मिळत आहे. केवळ दिवस साजरा करण्यापुरता हा दिवस मर्यादित न राहता आज हातमागाचे कपडे हे ब्रॅण्डेड म्हणून परदेशातही पोहोचविण्यात यानिमित्ताने हातभार लागला आहे.

अश्या या सरकारी प्रकल्पांमुळे डिझायनर्स, कपडे विकणारे, बुटिक चालवणारे यांना कारागिराशी थेट संपर्क करता येणंही शक्य झालं आहे.

हातमाग व्यवसायाची अजून प्रगती आणि विस्तार होण्यासाठी सर्वागीण प्रयत्न होणे गरजेचे आहे, याची जागृती अणि जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यासाठी, हातमाग उद्योग चालविणाऱ्या कारागिरांना सलाम करण्यासाठी राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा केला जातो.

राष्ट्रीय हातमाग दिवस शुभेच्छा संदेश मराठी (National Handloom Day Quotes In Marathi)

National Handloom Day Quotes In Marathi

हातमागावर एक एक
धागा प्रेमाचा जोडला गेला
विणकर धागे विनत गेला
असा हातमाग व्यवसाय
बहारीस आला
राष्ट्रीय हातमाग दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

चला देशाच्या शाश्वत विकासासाठी
आपल्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी
हातमागावरील वस्तू वापरूया.
राष्ट्रीय आत्मा दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

– national handloom day quotes marathi

आज दिवस आहे
पारंपारिक वस्त्र कलेचा
गौरव करण्याचा
राष्ट्रीय हातमाग दिनाच्या
खूप खूप शुभेच्छा!

चला आज आहे 7 ऑगस्ट
राष्ट्रीय हातमाग दिवस
राष्ट्रीय हातमाग दिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!

हातमागावरील वस्तूंना मिळावी किंमत
हक्काची असावी बाजारपेठ
यासाठी भारत सरकारने घातला आहे घाट
साजरा होत आहे राष्ट्रीय हातमाग दिवस
राष्ट्रीय हातमाग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

हातमाग व्यवसायात राबणाऱ्या
हातांना रोजगार देण्यासाठी
भारत सरकारकडून ७ऑगस्ट
हा दिवस राष्ट्रीय आत्मा दिवस
म्हणून साजरा केला जातो
राष्ट्रीय हातमाग दिनाच्या
सर्व विणकर बांधवांना खूप खूप शुभेच्छा!

एक धागा विणकाराचा
घरात कपडा वापरू हातमागाचा
HAPPY NATIONAL HANDLOOM DAY

🥀🥀चला भारतातील हातमाग
कामगारांच्या वस्तू वापरू या
त्यांच्यासाठी एक पाऊल पुढे येऊया
राष्ट्रीय हातमाग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! 🌹

♦️♦️हातमागावरील वस्त्रे
महिन्यातून एकदा तरी वापरूया
हातमाग व्यवसायाला सावरूया
राष्ट्रीय हातमाग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!♦️

हात से हात मिलाया करो
हातमाग कामगारो के लिए
प्यार का गीत गाया करो
कभी कभी हातमाग पर बने
वस्त्र घर लाया करो..

– National Handloom Day Wishes In Marathi

सारांश

तर मित्रांनो आशा करतो की, तुम्हाला राष्ट्रीय हातमाग दिवस माहिती मराठी (National Handloom Day Information In Marathi) नक्की आवडली असेल. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्कीच शेअर करा.

Leave a Comment