National Pollution Control Day In Marathi – प्रदूषण ही बाब पृथ्वी आणि त्यावर असणारे सर्व सजीवांसाठी धोकादायक आहे. प्रदूषणातून निसर्गात अडचणी निर्माण होतात. यामुळे सर्व जीवसृष्टी, नैसर्गिक संसाधने आणि हवामानावर प्रतिकूल परिणाम होतो.
प्रदूषणामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी लोकांच्या मनात प्रदूषणाच्या दुष्परिणामाविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे. ही जनजागृती घडवण्यासाठी बऱ्याच पर्यावरण संघटना कार्यरत आहेत.
या लेखातून आपण राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस (National Pollution Control Day In Marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस माहिती (National Pollution Control Day In Marathi)

नाव | राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस |
प्रकार | दिनविशेष |
साजरा करणारे | सर्वजण |
उद्देश | प्रदूषण नियंत्रण उपाय आणि औद्योगिक आपत्ती टाळण्यासाठी जनजागृती करणे |
केव्हा साजरा करतात ? | 2 डिसेंबर (दरवर्षी) |
भारतात दरवर्षी 2 डिसेंबर रोजी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस साजरा केला जातो. प्रदूषण नियंत्रणात आणणे आणि औद्योगिक आपत्ती टाळण्यासाठी लोकांत जनजागृती करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
2 डिसेंबर 1984 रोजी भोपाळ गॅस दुर्घटनेत अनेक लोकांनी आपले प्राण गमावले होते. या प्राण गमावलेल्या लोकांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.
भोपाळ गॅस दुर्घटना ही भारताच्या इतिहासातील सर्वात वाईट औद्योगिक पर्यावरणीय आपत्तींपैकी एक मानली जाते.
2 डिसेंबर 1984 रोजी मध्य प्रदेशातील युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेडच्या कीटकनाशक कंपनीतून मिथाइल आयसोसायनेटची गळती झाली. यामुळे 20 हजार हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि 5 लाखांहून अधिक लोक प्राणघातक वायूच्या संपर्कात आले.
2 डिसेंबर हा राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला. या दिवशी औद्योगिक आपत्ती टाळण्यासाठी आणि प्रदूषण नियंत्रित करण्यासाठीच्या उपाययोजनांबद्दल जागरूकता निर्माण केली जाते.
राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस महत्व (Importance Of National Pollution Control Day Marathi)
भारताच्या नॅशनल हेल्थ पोर्टलनुसार, दरवर्षी जगभरात सुमारे 7 दशलक्ष लोक वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांमुळे मरतात. यामुळे हवा, पाणी आणि मातीत प्रदूषणाच्या वाढत्या पातळीबद्दल जागरूकता करणे गरजेचे ठरते.
हवेतील प्रदूषक त्वचा, शरीरातील फुफ्फुस, हृदय आणि मेंदूला नुकसान पोहोचवू शकतात. तसेच हवा प्रदूषण पावसावर देखील घातक मारा करते. यामुळे प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे.
राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण थीम (National Pollution Control Day Theme)
यासाठी कोणतीही विशिष्ट थीम नसून पर्यावरण समतोल राखला पाहिजे, हेच या दिवसाचे उद्दिष्ट आहे. यासाठी सर्वजण एकत्र येऊन जागरूक राहून पृथ्वीचे रक्षण करावे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
भोपाळ वायू दुर्घटना केव्हा झाली ?
2 आणि 3 डिसेंबर 1984 रोजी भोपाळ वायू दुर्घटना झाली.
भोपाळ गॅस दुर्घटना मध्ये किती लोकांचा मृत्यू झाला ?
भोपाळ गॅस दुर्घटना मध्ये जवळपास 20, हजार लोकांचा मृत्यू झाला आणि पाच लाख लोक जखमी अथवा अपंग झाले.
पुढील वाचन