Navnath Name List In Marathi – मित्रांनो, हिंदु धर्मात असलेला नाथपंथ भारतातील मुख्य संप्रदायापैकी एक आहे. या पंथाचे उपास्य दैवत शिव असून दत्तात्रेय यांना महत्वाचे स्थान आहे. भारतात आणि महाराष्ट्रात ह्या पंथाला विशेष स्थान आहे.
भारतातील विविध धर्मपंथांशी नाथपंथाचा कोणत्यातरी स्वरूपात संबंध आलेला दिसून येतो. या लेखात आपण नवनाथ नावे व ठिकाण (Navnath Name List In Marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
नवनाथांची नावे व ठिकाण माहिती (Navnath Name List In Marathi)

नाथपंथ हा भारतातील एक शैव संप्रदाय असून नाथ म्हणजे रक्षणकर्ता किंवा स्वामी होय. नाथ संप्रदायाची दीक्षा घेतल्यानंतर व्यक्ती आपल्या नावानंतर नाथ हा शब्द जोडू शकतो. ह्याचा उगम शिव ह्याच्यापासून साधारण आठव्या ते बाराव्या शतकात झाला, अशी मान्यता आहे.
त्र्यंबकेश्वर हे नाथसंप्रदायाचे महत्वाचे स्थान मानले जाते. या ठिकाणी गुरू गोरक्षनाथांनी नऊ नाथांना व 84 सिद्धांना उपदेश केला. हे उपदेश केलेले ठिकाण म्हणजे अनुपम शिळा होय.
नवनारायणांची नावे (Navnath 9 Names In Marathi) – नवनाथ संप्रदायातील नाथांची संख्या ही नऊ असून ते नारायणाचे अवतार आहेत, अशी मान्यता आहे. त्यामुळे सृष्टीला अलोकिक स्वरूप प्राप्त होते. या नवनाथांची यादी, मूळ अवतार आणि त्यांचे गुरू पुढीलप्रमाणे आहेत.
नवनाथ नावे | मूळ अवतार | गुरू |
---|---|---|
मच्छिंद्रनाथ | कविनारायण | दत्तात्रेय |
गोरक्षनाथ | हरिनारायण | मच्छिंद्रनाथ |
गहिनीनाथ | करभंजन नारायण | गोरक्षनाथ |
जालिंदरनाथ | अंतरिक्ष नारायण | दत्तात्रेय |
कानिफनाथ | प्रबुद्ध नारायण | जालिंदरनाथ |
भर्तरीनाथ | द्रुमिल नारायण | दत्तात्रेय |
रेवणनाथ | चमस नारायण | दत्तात्रेय |
नागनाथ | आविर्होत्र नारायण | दत्तात्रेय |
चरपटीनाथ | पिप्पलायन नारायण | दत्तात्रेय |
नवनाथांचा जन्म कसा झाला (Navnath Birth Story In Marathi)
नाथ संप्रदायात नऊ नाथ होऊन गेले. यातील पहिले नाथ श्री मच्छिंद्रनाथ असून यांना नाथ संप्रदायाचे संस्थापक म्हणून ओळखले जाते. तर चरपटीनाथ हे नवनाथांपैकी शेवटचे नाथ आहेत. चला तर मग, जाणुन घेऊयात नवनाथांचा जन्म कसा झाला ?
मच्छिंद्रनाथ जन्म कथा मराठी (yogi machindranath birth story)
एका दिवशी शिवपार्वती कैलासावर बोलत बसले होते. त्यावेळी पार्वती देवीने शंकराला मला अनुग्रह द्यावा, अशी मागणी केली. शंकराने ही विनंती मान्य केली. पण देवीला अनुग्रह देण्यासाठी एक शांत स्थान हवे होते, यासाठी शिवपार्वती यमुना नदीच्या काठावर आले.
यमुना नदीच्या तीरावर शंकराने पार्वतीला अनुग्रह दिला. पण नदीत असणाऱ्या पाण्यामध्ये एक मासळीच्या पोटी कविनारायण गर्भस्वरूपात होते. त्यांनी शंकराचा हा सर्व उपदेश ऐकला. शंकराने पार्वतीला या उपदेशाचे सार काय? असा प्रश्न केला, तेव्हा कविनारायण मध्येच बोलले सगळं काही ब्रह्मस्वरुप आहे.
तेव्हा शंकराच्या लक्षात आले, की कविनारायण मासळीच्या पोटात आहेत. यावर महादेव म्हणाले, की तू अवतार घेतल्यावर बद्रीकाश्रमास ये. तेथे मी तुला दर्शन देईल. अश्या प्रकारे मच्छिंद्रनाथ माशाच्या पोटी जन्माला म्हणून त्याचे नाव मत्स्येंद्रनाथ ठेवले.
संबंधित – मच्छिंद्रनाथ यांच्याविषयी माहिती मराठी
गोरक्षनाथ जन्म कथा मराठी (gorakhnath birth story)
मत्स्येंद्रनाथ प्रवास करताना चंद्रगिरी गावी आले. एका बाईला त्यांनी पुत्र प्राप्तीसाठी भस्म दिले. काही वर्षांनी परतीचा प्रवास करताना ते तिच्या घरी आले आणि सरस्वतीबाईला तुझा मुलगा कुठे आहे, अशी विचारणा केली.
यावर ती कुठला मुलगा बाबा, असं म्हणाली. यावर मी भस्म दिले होते ते वाया जाणार नाही, असे नाथ म्हणाले. यावर ती स्री म्हणाली की, मी ते भस्म उकिरड्यात टाकले होते. यानंतर मस्त्येंद्रनाथ तिथे गेले व अलख निरंजन, हरीनारायणा बाहेर ये, असे म्हणताच उकिरड्यातून बारा वर्षांचा मुलगा बाहेर आला.
अशा प्रकारे प्रकट झाले गोरक्षनाथ आहे. मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षनाथांना तीर्थटनासाठी बरोबर नेले.
गहिनीनाथ जन्म कथा मराठी (gahininath birth story)
कनकगिरी गावात मच्छिंद्रनाथाने गोरक्षाला संजीवनी मंत्र दिला. यानंतर गोरक्षनाथ या मंत्रांचा जप करीत असताना गावातील काही मुले चिखलाचा गोळा त्याच्याकडे घेऊन आले व आम्हाला गाडी करून द्या, असे म्हणाले. परंतु गोरक्षणे गाडी नाही करता येणार, असे सांगून मुलांना मानवी पुतळा तयार करून दिला.
हा मातीचा पुतळा तयार करताना तो संजीवनी मंत्राचा जप करत होता. पुतळा तयार होताच करभंजन नारायनाने त्यात प्रवेश केला त्यामुळे चिखलाचा पुतळा जिवंत झाला. हे पाहून मुले घाबरली, गोरक्षनाथही गडबडला. तेवढ्यात मच्छिंद्रनाथ तेथे आले. त्यांनी घडलेला प्रकार समजून घेतला.
यानंतर दोघांनी त्या मुलाला उचलले आणि एका जोडप्याला दिले. या दोघांनी ते बाळ घेतले आणि मच्छिंद्रनाथच्या सांगण्यावरून त्याचे नाव गहिनीनाथ ठेवले.
जालंदरनाथ जन्म कथा मराठी (jalandhar birth story marathi)
पुढे पांडवकुळात हस्तिनापूरच्या राजाने सोमयज्ञ केला. यज्ञातील विभूती घेण्यासाठी राजाने यज्ञकुंडात हात घातला. यावेळी त्याच्या हाताला बाळ लागले. राजाने त्याला कुंडाबाहेर काढले व राणीकडे घेऊन गेले. अशा प्रकारे अग्नीने दिलेल्या या मुलाचे नाव जालंदरनाथ असे ठेवले.
कानिफनाथ जन्म कथा मराठी (kanifnath birth story in marathi)
बद्रीकाश्रमात शंकर, अग्निदेव व जालिंदरनाथ बोलत असताना शंकर म्हणाले ते पहा जालिंदर, एक मोठा हत्ती आहे. त्याच्या कानात प्रब्रुद्ध नारायणाने जन्म घेतला आहे.
नंतर ते तिघेही हिमालयात गेले. जालिंदरनाथांनी मोठ्याने हाक दिली हे प्रब्रुद्धनारायणा! तेव्हा एक सोळा वर्षाचा मुलगा हत्तीच्या कानातून बाहेर आला, याचे नाव कानिफनाथ असे ठेवले.
भर्तरीनाथ जन्म कथा मराठी (bharthari birth story in marathi)
भर्तरीनाथांच्या जन्माचे रहस्य अजूनही उलगडलेले नाही. पण असे म्हणतात, की एकदा उर्वशीचे अनुपम सौंदर्य पाहून सूर्याचा वीर्यपात झाला. त्या वीर्याचा एक भाग कौलिक ऋषीच्या भिक्षापात्रात पडला. यामध्ये द्रुमिल नारायणाने प्रवेश केला आणि यातूनच भर्तरीनाथाचा जन्म झाला.
रेवणनाथ जन्म कथा मराठी (revannath katha marathi)
ब्रह्मदेवाचे वीर्य रेवा नदीच्या तीरावर पडले. यातून एक मुलगा जन्मास आला. रेवा नदीकाठी सापडला म्हणून त्याचे नाव रेवणनाथ ठेवले.
वटसिद्ध नागनाथ (vatsidh nagnath story marathi)
ब्रह्मदेवाचे वीर्य एका सर्पिणीने भक्ष केले. यामुळे तिच्या पोटी अग्निहोत्र नारायणाने प्रवेश केला. या सर्पिणीने अंडे घातले. या अंड्यातून एक मूल बाहेर आले. वडाच्या ढोलीत जन्मला त्याचे नाव वटसिद्ध नागनाथ असे ठेवण्यात आले.
चरपटीनाथ जन्म कथा मराठी (charpatinath birth story marathi)
एकदा पार्वतीच्या विवाहप्रसंगी सर्व देवलोक जमले होते. पार्वतीच्या सौंदर्याला पाहून ब्रह्मदेवाचे वीर्यपतन झाले. ते ब्रह्मदेवाने टाचेने रगडले. त्यामुळे त्याचे दोन भाग झाले.
एका भागाचे साठ हजार वालखिल्य ऋषि उत्पन्न झाले. दुसरा भाग मात्र नदीत वाहत जाऊन एका कुशास अडकला. त्यात पिप्पलायण यांनी प्रवेश केला आणि यातून एका बालकाचा जन्म झाला. याचे नाव चरपटीनाथ होय.
नवनाथांची समाधी स्थळे माहिती मराठी (navnath samadhi places in marathi)
भगवान विष्णुंच्या आज्ञानुसार, कलियुगात भक्ती, योग, साधना, तपस्या याचा प्रभावी प्रसार करुन, मानवाला मार्गदर्शन करून शेवटी नाथांनी अवतार कार्य संपवून संजीवनी समाध्या घेतल्या. नवनाथांची समाधी स्थळांची माहिती (navnath samadhi places in marathi) पुढीलप्रमाणे आहे.
नवनाथांची नावे | समाधी स्थळ |
---|---|
मच्छिंद्रनाथ | सावरगाव, बीड |
गोरक्षनाथ | मांजरसुंबा अहमदनगर |
गहिनीनाथ | चिंचोली, बीड |
जालिंदरनाथ | यावलवाडी, बीड |
कानिफनाथ | मढी, अहमदनगर |
भर्तरीनाथ | हरंगुळ, परभणी |
रेवणनाथ | विटेगाव, सांगली |
नागनाथ | वडवळ, लातूर |
चरपटीनाथ | गुप्त भ्रमण चालू आहे, असे मानले जाते. |
हा लेख वाचा – महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय माहिती
सारांश
मित्रांनो, आशा करतो की नवनाथ विषयी माहिती देणारा हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जर हा लेख तुम्हाला आवडला असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.
विशेष विनंती – या लेखात मांडलेली माहिती उपलब्ध स्रोतांद्वारे घेतलेली आहे, त्यामुळे यात काही सुधारणा/शंका असल्यास नक्की कळवा.