Navra Bayko Nate In Marathi – नमस्कार! या विश्वामध्ये मानव जातीने केलेली प्रगती पाहिल्यानंतर असा विचार मनात येतो की, अशक्य असणाऱ्या गोष्टी देखील माणसाने आपल्या मेंदूच्या मदतीने शक्य करून दाखवल्या. खरोखरच तो एक बुद्धिमान प्राणी आहे हे त्याने सिद्ध करून दाखवले.
अगदी माणसाने चंद्रावर ठेवलेले पहिले पाऊल असो की संपूर्ण पृथ्वीप्रदक्षिणेसाठी केलेला यान प्रयोग असो. या सगळ्यातून त्याच्या आगाध बुद्धिमत्तेची कल्पना आल्या खेरीज राहत नाही.
पण याची दुसरी बाजू भयानक आहे, ती म्हणजे काही साध्या साध्या गोष्टी देखील आज या मानवाला सांगाव्या, समजावाव्या लागत आहेत ही मोठी खेदाची बाब आहे.
अगदी सकाळी उठल्यानंतर काय खावे? काय प्यावे ? दुपारी काय खावे? तसेच दिवसातून किती वेळा खावे? झोप किती घ्यावी? या साध्या साध्या निसर्गतच माहीत असलेल्या गोष्टी देखील आज माणूस पैसे मोजून शिकताना दिसतोय यापूर्वी याची गरज देखील नव्हती .
अर्थात एका बाजूला माणसाने केलेली अपार प्रगती तर दुसऱ्या बाजूला साध्या सरळ आणि सोप्या बाबी देखील त्याला शिकाव्या लागत आहेत. असो आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. आजच्या या गतिमान युगामध्ये माणूस इतका पुढारला की रक्ताची नाती देखील तो विसरायला लागला आहे.
एखाद्या अल्पवयीन मुलामुलीवर घरातील व्यक्तीकडूनच होणारा अन्याय आणि अत्याचार तर दुसरीकडे पतीकडून पत्नीवर होणारा हिंसाचार तर काही ठिकाणी पत्नीकडून पतीची होत असलेली घुसमट, असे कितीतरी प्रश्न नव्याने या कुटुंब व्यवस्थेमध्ये निर्माण होत आहेत.
यासाठी आपण या लेखातून आज नवरा बायकोचे नाते कसे असावे (navra bayko nate in marathi) याविषयावर चर्चा करणार आहोत.
नवरा बायकोचे नाते कसे असावे (Navra Bayko Nate In Marathi)

काही दिवसांपूर्वीची घटना, माझ्या कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्याने नवीनच प्रवेश घेतला. पहिल्याच दिवशी त्याचा आणि माझा परिचय झाला. बोलता बोलता तुला भाऊ किती? बहिणी किती? वडील काय करतात? अशी असा विषय निघाला. पण यावर बोलताना त्याच्या डोळ्यात अचानक पाणी आले.
तो नवीन मित्र म्हणाला, “मी या ठिकाणी कॉलेजला प्रवेश घेण्याअगोदर पुण्याला एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये शिकत होतो, परंतु घरामध्ये आई-वडिलांमध्ये काही महिन्यांपासून खटके उडायला लागले आणि त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.”
मी आणखीन खोलात जाऊन त्याला क्षमा मागून विचारले, की तुझ्या आई-वडिलांमध्ये असे खटके कधीपासून उडायला लागले? तू लहान असल्यापासून की अलीकडे. यावर मित्राने उत्तर दिले की “माझे आई वडील मी लहान असताना, एवढेच काय मी दहावी पास झालो तिथपर्यंत अगदी गोडी गुलाबीने राहत होते. परंतु अचानक त्यांच्यामध्ये काही मुद्द्यांवरून वाद होऊ लागले आणि माझे बाबा आणि आई एकमेकांपासून वेगळे झाले.”
या घटनेने मी आतून हेलावून गेलो आणि त्यांच्यात नेमके दुरावा येण्याचे कारण काय असावे हा भुंगा माझ्या मनात राहून राहून येऊ लागला. असाच विचार करता मनात प्रश्न पडला की, काही दिवसांनी मला देखील माझा जोडीदार असणार आहे मग या बदलत्या काळात माझ्या मित्रावर जी परिस्थिती आली ती परिस्थिती आजच्या अति महत्वकांक्षी तरुण पिढीला अगदी लवकरच येऊ शकते. म्हणूनच नवरा बायकोचे नाते नेमके कसे असावे (Navra Bayko Nate In Marathi) हा प्रश्न मनामध्ये रुंजी घालायला लागला. यावर खूप चिंतन मनन करून काही बाबी माझ्या मनामध्ये आल्या.
नव्याने लग्न करणारे असो की सध्या संसारात असणाऱ्या नवरा बायकोने जर त्यांच्यातील नाते जर पुढील पद्धतीने जपले तर कदाचित कुटुंब उध्वस्त होणार नाहीत. कोणताही दोष नसताना अपत्यांना आई-वडिलांच्या मायेपासून, प्रेमापासून पोरके व्हावे लागणार नाही. चला तर मग नवरा बायकोचे नाते कसे असावे (Navra Bayko Nate In Marathi) नाते कसे असावे याविषयीं सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
नवरा बायकोचे नाते कसे असावे (Navra Bayko Nate In Marathi)

जर कधी वाद झालाच, तर कधी तू मागे फिरावे, तर कधी मी मागे फिरावे,
कशाला कायमचे दुरावे…
तू आग झाली तर, मी पानी बनावे, तू रागात गरम झाली तर मी बर्फ बनावे,
कधी मी एखादा शब्द तिखट बोललो तर तू साखर बनावे नवरा बायकोचे नाते हे असेच असावे…
– नवरा बायको स्टेटस मराठी
असे नाते जर आपण जपले तर खरोखर नवरा बायको एकमेकांना भाग्यवान समजतील परंतु असे होत नाही ना राव. आपल्या मराठीत एक म्हण आहे,
बोलता बोलता कळ आणि धुता धुता मळ
– नवरा बायको चारोळी मराठी
असे काही नवरा बायकोच्या नात्यात होते. अगदी साध्या साध्या बाबी असतात. पण त्यावरून वाद मात्र मोठा होतो. यावर आज आपण सविस्तर माहिती पाहू.
आज आपण दोघे माझ्या मित्राच्या घरी जेवायला जाणार आहे, तू लवकर तयार हो. असे नवऱ्याने सांगताच बायको तयार होते. ती नवऱ्याच्या मित्राकडे जायचे म्हणून छान जीन्स आणि टी शर्ट घालते. हे पाहून नवरा चिडतो.
आपण मित्राकडे जातोय सिनेमाला नाही. दोघांत वादावादी होते. कपडे कोणते घालायचे हा विषय बाजूला राहून दुसरेच विषय निघतात.
सांगण्याचे तात्पर्य एवढेच की, जर ती तयार होण्या आधी पतीने मित्राची फॅमिली कशी आहे? तू कोणते कपडे घालावेत हे जे अगोदर सांगितले असते तर वाद झाला नसता. तसेच पत्नीने देखील मी कोणते कपडे घालू, ड्रेस की साडी? तरी भांडण टळले असते.
मग मित्र आणि मैत्रिणींनो, समजले ना पती पत्नीच्या नात्यात हवा असतो तो मुक्त संवाद आणि तोच सध्या कमी होताना दिसत आहे.
हा संवाद नेमका कमी का झाला? याचे कारण म्हणजे प्रत्येकाच्या हातामध्ये असणारा मोबाईल. आज घरामध्ये असो की कामाच्या ठिकाणी. कोण काय बोलत आहे, कोणत्या विषयावर चर्चा सुरू आहे याकडे सहसा कुणाचे लक्ष नसते. कारण आपण मोबाइल मध्ये व्यस्त असतो.
घरातील लहान लहान मुले देखील त्या मोबाईलरूपी राक्षसाच्या मायाजाळात अडकलेली दिसतात. यातून पती-पत्नी तरी कसे सुटणार? पती असो की पत्नी घरामध्ये आल्यानंतर एकमेकांशी बोलण्यापेक्षा त्या मोबाईल मध्ये आपले तोंड खुपसून बसलेले असतात.
नात्यांमध्ये एक प्रकारचा भकासपणा आणण्याचे काम मोबाईल करताना दिसत आहे. त्या मोबाईलवरून एक शायरी आठवली ,
उगलीयाही निभा रही है, रिश्ते आज कल, जुबा से निभाने, का वक्त कहा है,
सब टच मे बिझी है, लेकिन दिल से कोई टच मे नही है.
– नवरा बायको प्रेम शायरी मराठी
या मोबाईलच्या माध्यमातून दाखवायला लोक एकमेकांच्या जवळ आहेत परंतु मनापासून दुरावलेली आहेत.
पती-पत्नीच्या बाबतीत देखील दुरावा येण्याचे त्यांच्यामध्ये संवाद नसण्याचे सर्वात मोठे कारण आहे ते म्हणजे मोबाईल फोनचा अतिवापर. जर तुम्ही हे नाते जपण्यासाठी एकमेकांना वेळ आणि तुमच्या घरात सुसंवाद असला तर हे नाते अगदी घट्ट बनते.
Related – प्रेम म्हणजे काय असतं कविता
नवरा बायकोचे नाते कसे असावे (Navra Bayko Nate In Marathi)

नाते कोणतेही असो त्या नात्यांमध्ये गरज असते ती विश्वासाची. पती-पत्नी यांच्यात तो नसेल तर संसार कसा होणार?
अलीकडच्या काळात मोबाईल, फेसबुक, इंटरनेट, इंस्टाग्राम यासारख्या डिजिटल माध्यमातून अनेक जण एकमेकांशी जोडले जात आहेत. जुने मित्र मैत्रिणी कितीतरी वर्षांनी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकत्र येताना दिसत आहेत. त्यांच्यामध्ये पुन्हा नव्याने मुक्त गप्पागोष्टी होताना दिसत आहेत.
या गप्पा गोष्टी करताना काहींना आपल्या मर्यादेचे भान असते तर काही मात्र हे भान विसरून अगदी बिनधास्तपणे व्यक्त होताना दिसतात. परंतु हे व्यक्त होणे एखाद्या कुटुंबासाठी घातक देखील ठरु शकते याची जाणीव हवी.
थोडक्यात पती-पत्नीच्या नात्यांमध्ये संशयाचे भूत या प्रसार माध्यमांमुळे तयार होत आहे. यातूनच नवरा बायकोच्या नात्यांमध्ये संशय आणि अविश्वास वाढताना दिसत आहे. परिणामी हीच जोडी मनामध्ये कुडत बसते.
बऱ्याचदा दोघेही आपल्या जोडीदाराचे कोणाशी कसे नाते संबंध आहेत, हे लपून-छपून मोबाईलच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करतात आणि यातूनच अविश्वासाची ठिणगी संसारामध्ये पडते.
या संशयाचे रूपांतर मोठ्या भांडणात होते. कधी कधी तर खास कारण नसताना भांडण घटस्फोटापर्यंत जातात. म्हणूनच नवरा बायको यांचे नाते अगदी प्रांजळ असावे.
आपल्याला आपल्या जोडीदाराची न खटकणारी गोष्ट, अशी चोरून लपून-छपून न पाहता प्रत्यक्ष त्यावर बोलून मार्ग काढावा.
जर आपला जोडीदार आपल्यापासून लांब जातोय, तो लांब जाण्यामागे केवळ त्याला दोष न देता आपल्या जोडीदाराच्या आपल्याकडून असणाऱ्या इच्छा, आकांक्षा आपण पूर्ण करत आहोत का? याचा देखील विचार करायला हवा.
जर आपल्या लक्षात आले की आपल्या जोडीदाराकडून नकळतपणे काही चुका होत आहेत. अशावेळी समंजसपणे अगदी एकांतात एकमेकांशी या विषयावर बोलायला हवे.
आपल्या या पती-पत्नीच्या नात्याची सुरुवात अर्थात संसाराची सुरुवात किती सुरेख होती आणि आपण आज अशा विघातक वळणावर का आलेलो आहोत? हे सर्व आपण ठरवून बदलायला हवे.
एका हिंदी गाण्याप्रमाणे मन बदलायला हवे,
सजना… सजना…ओ सजना
मै तेरी, तू मेरा
दुनिया से क्या लेना, अब तो तुझे हर सुख है देना…
– नवरा बायको प्रेम शायरी मराठी
असं म्हणून मी तुझा, तू माझी अशी भूमिका नाते तुटत असताना जर पती-पत्नी यांनी घेतली, तर नवरा बायकोचे नाते एका जन्मात काय सात जन्मात देखील कोणीच तोडू शकणार नाही.
पती-पत्नीच्या नात्यामध्ये येणाऱ्या चढउतारांविषयी एक बाब नक्की असते. ती म्हणजे, ज्याप्रमाणे एखाद्या हरीण सुगंधी कस्तुरीच्या शोधामध्ये त्या मनमोहक सुगंधाने वेडे होऊन संपूर्ण जंगलामध्ये उर फुटेपर्यंत धावते आणि अखेर शेवटी धावून दावून उर फुटणार अशावेळी आपले तोंड आपल्या पायामध्ये खूपसते. त्यावेळी त्या हरणाच्या लक्षात येते, की ज्या सुगंधाच्या शोधात मी धावत होतो तो सुगंध तर माझ्याच बेंबीमध्येच आहे.
या छोट्याशा गोष्टीतून पती-पत्नी यांना खूप मोठा बोध घेता येईल. तो म्हणजे अमुक व्यक्ती माझ्या जीवनात असती तर मी खूप सुखी झालो असतो किंवा मी खूप सुखी झाले असते. असे म्हणणे त्या हरणासारखे आहे.
या जगात परिपूर्ण असा कोणीच नसतो आणि आपण जोडीदाराच्या बाबतीमध्ये नेमक्या याच चुका करतो. परिपूर्णतेच्या अपेक्षा करतो आणि आपल्या पदरामध्ये पडते ती निराशा. म्हणूनच आपला जोडीदार आहे तसा त्याचा स्वीकार करणे हे नवरा-बायकोचे नाते टिकण्यासाठी अतिशय गरजेचे आहे.
Related – मैत्री म्हणजे काय मराठी लेख
नवरा बायकोचे नाते कसे असावे (Navra Bayko Nate In Marathi)

एखादा माणूस आपल्याला पाहता क्षणी मोहात पाडतो. पण म्हणतात ना, दुरून डोंगर साजरे अर्थात दूरवरून डोंगर बघताना त्याच्यावरील दुरून दिसणारे ढगांचे दृष्य, झाडे, ती हिरवळ अगदी मनाला मोहिनी घालत असतात. परंतु आपण डोंगर चढून गेल्यानंतर प्रत्यक्षात त्या ठिकाणी जातो त्यावेळेस मात्र तो मनमोहकपणा जो दुरून दिसत होता जवळ गेल्यानंतर दिसत नाही.
आपण नीट समजून घेतले तर आपल्या लक्षात येईल की आपण आपल्या संसाराची गाडी चालवताना अशा अनेक बाबी आपल्यासमोर दूरच्या डोंगरांसारख्या येतील की, आपल्याला असे वाटेल की अमुक व्यक्ती माझ्या जीवनात असती तर मी जगातील सर्वात सुखी व्यक्ती असते किंवा असतो.
परंतु या जगामध्ये परिपूर्ण असे कोणीच नसते. म्हणून भगवंताने आपल्याला जो आपला जोडीदार दिलेला आहे तो आपल्यासाठी अतिशय योग्य आहे. ही भूमिका मनामध्ये ठेवणे अतिशय गरजेचे आहे. बऱ्याच जणांना हे जमत नाही.
एकमेकांच्या चुका काढल्या जातात. यातूनच वाद होतात. एकमेकांची मने दुखावली जातात आणि या गोष्टी नवरा बायकोच्या नात्यांमध्ये मिठाचा खडा बनुन जातात. नवरा बायको यांचे नाते एकमेकांना आहे, तसे आहे त्या परिस्थितीत स्वीकारणारे असावे.
अहो! अजून काय सांगू कधी गंमत म्हणून नवऱ्याने लवकर उठावे आणि छान चहा, कॉफी बनवून आपल्या पत्नीला बेड टी द्यावा तिच्या चेहऱ्यावर निर्माण झालेले हास्य तुम्ही कधीच विसरणार नाही.
कधी एखादी छान भाजी बनवावी, तर कधी कामावरून घरी जाताना आजपर्यंत नेला नसेल तर एक गजरा न्यावा आणि तिच्या केसात मळावा.
पत्नीने कधी तरी नवरा थकून भागून कामावरून थकून भागून आला तर घरात पाऊल टाकताच छान स्माइल द्यावी की आपल्या नवऱ्याचा सारा ताण निघून जाईल. कधीतरी गंमत म्हणून रात्री झोपताना नवरत्न तेल घ्यावे आणि छान मसाज करावे. कधीतरी नवऱ्याच्या आवडीची भाजी बनवावी? पण भाजी काय केली, विचारताच न आवडणारी भाजी केली असे सांगून, जेवणात मात्र आवडीची भाजी वाढावी.
थोडक्यात,
आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे…
असे वातावरण मनाने होणार नाही तर ठरवून करावे लागेल.
अहो कॉलेजात असताना कुणावर इम्प्रेशन मारण्यासाठी जे जे करतो ते सगळे आपल्या जोडीदारासोबत करावे. बघा संसार असा फुलेल की क्षणभर नवरा-बायको एकमेकांपासून दूर राहणार नाहीत.
अजून काय सांगू, बायकोला कधी तरी बायको म्हणून न वागवता प्रेयसी म्हणून वागवावे. तर बायकोने देखील माझा नवरा माझा सजणा आहे प्रियकर आहे असे राहावे. इतके साधे आणि सरळ आहे.
सारांश
असे असावे नवरा बायकोचे नाते (Navra Bayko Nate In Marathi) एकमेकाना समजून घेणारे, वेळप्रसंगी एकमेकावर रागावणारे, तितकेच गोडी गुलाबीने राहणारे. पण आपला सुखी संसार तुटणार नाही यासाठी दोघेही काळजी घेणारे, असे नाते असावे पतीपत्नीचे.
कधी चुकलो मी, कधी चुकशील तू, कधी चिडली तू, कधी संतापलो मी,
तर राणी तू एक पाऊल मागे जा, मी दोन पाऊले मागे जाईन,
कारण का तर, आपल्याला आपले, पती पत्नीचे गोड नाते, तोडायचे नाही तर टिकवायचे आहे.
– पती पत्नीचे (नवरा बायको) नाते कविता मराठी
चला आपली रजा घेतो, पुन्हा भेटू अशाच एका छान विषयाला घेऊन. आजचा नवरा बायकोचे नाते कसे असावे (Navra Bayko Nate In Marathi) हा लेख कसा वाटला हे नक्की कळवा.