जाणून घ्या नोएडा ट्विन टॉवर्स पाडण्याचे कारण

By | September 29, 2022

noida twin towers demolition reason marathi – ट्विन टॉवर ही इमारत कुतुब मीनारपेक्षाही उंच आहे. ही इमारत 32 मजली आहे. भारतात पहिल्यांदाच एवढी मोठी इमारत पाडली जाणार आहे. या लेखातून आपण ट्विन टॉवर ही 32 मजली इमारत पाडण्यामागे नेमकं काय कारण आहे? आणि हे प्रकरण कोर्टापर्यंत कसं गेलं याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

ट्विन टॉवर माहिती मराठी (twin towers in india mahiti)

noida twin towers demolition reason marathi
नावट्विन टॉवर
प्रकारइमारत
ठिकाणनोएडा
उत्तर प्रदेश
उंची100 मीटर
मजले32

23 नोव्हेंबर 2004 या दिवशी नोएडा प्राधिकरणाने एमराल्ड कोर्टसाठी सेक्टर-93A मध्ये असलेला भूखंड क्रमांक-4 वर 9 मजल्यांचे 14 टॉवर बांधण्यास परवानगी दिली.

यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच 29 डिसेंबर 2006 रोजी परवानगीत सुधारणा करण्यात आली. नोएडा प्राधिकरणाने सुधारणा करून सुपरटेकला 9 ऐवजी 11 मजल्यापर्यंत फ्लॅट बांधण्याची परवानगी दिली.

यासोबतच टॉवर्सची संख्याही वाढवण्यात आली. सुरूवातीला 15 आणि नंतर त्यांची संख्या 16 होती. 2009 मध्ये त्यात पुन्हा वाढ करण्यात आली. 26 नोव्हेंबर 2009 रोजी नोएडा प्राधिकरणाने पुन्हा 17 टॉवर बांधण्याची योजना मंजूर केली. त्यानंतरही ही परवानगी वाढतच गेली.

ट्विन टावर मालक कोण आहे (twin towers owner in noida)

ट्विन टावर मालक आ.रके अरोरा हे आहेत. एमराल्ड कोर्ट प्रकल्पात ट्विन टॉवर्स बनवणारी कंपनी सुपरटेक लि. ही एक गैर-सरकारी कंपनी आहे. 7 डिसेंबर 1995 रोजी कंपनीची स्थापना झाली.

आर.के अरोरा हे सुपरटेकचे संस्थापक आहेत. त्यांनी त्यांच्या 34 कंपन्या स्थापन केल्या आहेत. इसवी सन 1999 मध्ये, आरके अरोरा यांच्या पत्नी संगीता अरोरा यांनी सुपरटेक बिल्डर्स अँड प्रमोटर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची दुसरी कंपनी सुरू केली.

आतापर्यंत सुपरटेकने नोएडा, ग्रेटर नोएडा, मेरठ, दिल्ली-एनसीआरसह देशभरातील 12 शहरांमध्ये रिअल इस्टेट प्रकल्प सुरू केले आहेत. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने या वर्षी कंपनीला दिवाळखोर घोषित केले. कंपनीवर सध्या सुमारे 400 कोटींचे कर्ज आहे.

ट्विन टावर नोएडा पाडण्याचे कारण (noida twin towers demolition reason marathi)

2 मार्च 2012 रोजी टॉवर क्रमांक 16 आणि 17 साठी पुन्हा सुधारणा करण्यात आली. या दोन टॉवरला 40 मजल्यापर्यंत परवानगी होती. त्यांची उंची 121 मीटर निश्चित करण्यात आली होती. त्याच वेळी, दोन टॉवरमधील अंतर देखील नऊ मीटर ठेवण्यात आले होते, तर ते 16 मीटरपेक्षा कमी नसावे.

सुपरटेकला 13.5 एकर जमीन देण्यात आली, यातील प्रकल्पाच्या 90 टक्के किंवा सुमारे 12 एकरचे बांधकाम 2009 मध्येच पूर्ण झाले. 10 टक्के क्षेत्र ग्रीन झोन म्हणून दाखवण्यात आले. 2011 पर्यंत दोन नवीन टॉवर उभारण्याच्या बातम्या येऊ लागल्या.

12 एकरात जेवढे बांधकाम झाले तेवढेच दोन गगनचुंबी इमारतींच्या माध्यमातून 1.6 एकरात एफ.ए.आर करण्याचे काम जोरात सुरू होते. 12 एकरात 900 कुटुंबे राहतात असा अंदाज लावता येतो, तेवढीच कुटुंबे 1.6 एकरमध्ये स्थायिक होण्याच्या तयारीत होती.

फ्लॅट खरेदीदारांनी 2009 मध्ये RW तयार केले. या RW ने सुपरटेक विरुद्ध कायदेशीर लढाई सुरू केली. ट्विन टॉवर्सच्या बेकायदेशीर बांधकामाबाबत RW ने सर्वप्रथम नोएडा प्राधिकरणाकडे दाद मागितली.

प्राधिकरणात कोणतीही सुनावणी न झाल्याने आरडब्ल्यूने अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली. 2014 मध्ये उच्च न्यायालयाने ट्विन टॉवर्स पाडण्याचा आदेश दिला होता.

या लढतीत यूबीएस तेओतिया, एसके शर्मा, रवी बजाज, वशिष्ठ शर्मा, गौरव देवनाथ, आरपी टंडन, अजय गोयल यांनी प्रमुख भूमिका बजावल्या.

ट्विन टावर नोएडा का केस सुप्रीम कोर्ट का गेली (Noida twin towers case in supreme court)

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सुपरटेकने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयात सात वर्षांच्या लढ्यानंतर 31 ऑगस्ट 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. सुप्रीम कोर्टाने तीन महिन्यांत ट्विन टॉवर पाडण्याचे आदेश दिले.

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, सेक्टर-93 ए येथील सुपरटेक एमराल्ड कोर्टचे जुळे टॉवर आज दुपारी 2:30 वाजता पाडण्यात येणार आहेत. 32 मजली इमारत आणि 29 मजली निळसर टॉवर 3500 किलो स्फोटके ठेवून तारांना जोडले गेले आहेत. या इमारती अवघ्या 9 ते 12 सेकंदात जमीनदोस्त होतील.

टॉवर पाडण्यासाठी किती खर्च येईल (supertech twin towers demolition cost)

200 कोटींहून अधिक खर्च करून बांधण्यात आलेले ट्विन टॉवर पाडण्यासाठी सुमारे 20 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही रक्कमही बिल्डरांकडूनच वसूल केली जाणार आहे.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये जाणून घ्या नोएडा ट्विन टॉवर्स पाडण्याचे कारण (noida twin towers demolition reason marathi) जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ? हे आम्हाला नक्की कळवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

नोएडा ट्विन टॉवर्स पाडण्याची वेळ काय आहे ?(twin tower noida demolition date and time)

नोएडा ट्विन टॉवर्स आज दुपारी म्हणजेच 28 ऑगस्ट 2022 रोजी 2.30 वाजता पाडणार आहे.

नोएडा ट्विन टॉवर्स किती मजली आहे ?(twin tower noida floors)

नोएडा ट्विन टॉवर्स 32 मजली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *