old marathi natak mahiti marathi – नाटक हा मराठी साहित्यप्रकार आहे, नाटक म्हणजे काय तर ऐतिहासिक, पौराणीक, काल्पनिक प्राणी, पक्षी, जिवंत किंवा मृत याची भूमिका रंगमंचावर मांडणे आणि त्यातून मनोरंजन आणि शिकवण मिळते.
इ.स.पू. दोनशे ते इ.स.दोनशे या चारशे वर्षांच्या दरम्यान केव्हातरी संस्कृत नाट्यलेखनापासून ते नाट्यप्रयोगाची सर्व माहिती देणारा नाट्यशास्त्र हा ग्रंथ रचला गेला. भरत हा नाट्यशास्त्राचा कर्ता समजला जातो.
महाराष्ट्र राज्य तर नाट्यवेडा प्रदेश म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र राज्याला नाटकाची प्राचीन आणि समृद्ध परंपरा लाभली आहे.
विष्णुदास भावे यांनी पौराणिक नाटकांची सुरुवात केली. त्यांना मराठी रंगभूमीचे जनक मानले जाते. अण्णासाहेब किर्लोस्कर हे संगीत रंगभूमीचे जनक मानले जातात. पंडित भास्करबुवा बखले यांनी महाराष्ट्र राज्यास नाट्यसंगीताची देणगी दिली. इसवी सन 1861 मध्ये वि. ज. कीर्तने यांनी लिहिलेले थोरले माधवराव पेशवे हे मुद्रित स्वरूपात संहिता असणारे पहिला मराठी नाटक आहे.
या लेखात आपण प्रसिद्ध मराठी नाटक माहिती (old marathi natak name list) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
हा लेख जरूर वाचा – कलामहर्षी बाबूराव पेंटर मराठी माहिती (baburao painter information in marathi)
प्रसिद्ध मराठी नाटक माहिती – old marathi natak marathi mahiti
मराठी नाटक साहित्यात पुरुष नाटककार तीनशेहून अधिक आहेत अंक स्त्री नाटककार साठपेक्षा अधिक आहेत.
old marathi natak name list – महाराष्ट्र राज्यातील सुरुवातीच्या काळातील नाटककार याची नावे पुढीप्रमाणे…
- वामनराव जोशी
- मामा वेररकर
- प्र. के. अत्रे (केशवकुमार)
- वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)
- वि. दा. सावरकर
- मालतीबाई बेडेकर
old marathi natak name list – महाराष्ट्र राज्यातील जुन्या काळातील नाट्यकलावंत यांची यादी पुढीलप्रमाणे…..
- नारायण श्रीपाद राजहंस (बालगंधर्व)
- मास्टर कृष्णराव
- गोविंदराव टेंबे
- गानसूर्य केशवराव भोसले
- गणपतराव जोशी
- चिंतामण कोल्हटकर
- गणपतराव बोडस
old marathi natak name list – महाराष्ट्र राज्यातील आधुनिक नाटककार यादी पुढीलप्रमाणे….
- वसंत कानेटकर
- विजय तेंडुलकर
- पुरुषोत्तम दारव्हेकर
- पु. ल. देशपांडे
- श्री. ना. पेंडसे
- बाळ कोल्हटकर
- दिवाकर (शंकर काशिनाथ गर्गे) यांनी 46 नाट्यछटा लिहिल्या आहे.
old marathi natak name list – महाराष्ट्र राज्यातील बाल रंगभूमी नाटककार यादी पुढीलप्रमाणे….
- सुधा करमरकर
- सई परांजपे
- सुलभा देशपांडे
- श्रीरंग गोडबोले
- रत्नाकर मतकरी
- विजया मेहता
- विजय तेंडुलकर
संगीत नाटक | नाटककार |
---|---|
संगीत शाकुंतल | अण्णासाहेब किर्लोस्कर |
संगीत शारदा | गोविंद बल्लाल देवल |
मूकनायक | श्रीपाद कृष्ण कोल्हटकर |
संगीत मानापमान | कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर |
एकच प्याला | राम गणेश गडकरी (गोविंदाग्रज) |
कीचक वध हे नाटक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी लिहिलेला आहे. या नाटकात महाभारतातील घटनावर आधारित आहे. भारतातील तत्कालीन ब्रिटिश राज्य पद्धतीवर टीका करणारे नाटक म्हणून याला ओळखले जाते.
कीचक वध यामध्ये द्रोपती म्हणजे भारत माता, युधिष्टिर म्हणजे मवाळ पक्ष, भिम म्हणजे जहाल पक्ष, कीचक म्हणजे लॉर्ड कर्झन असे रूपक योजना होती.
प्रसिद्ध मराठी नाटक माहिती (old marathi natak name list)
महाराष्ट्र रंगभूमीवर अनेक मराठी नाटके (marathi drama) लिहिली गेली. यातील बहुतांश नाटके खूपच गाजली. यातील काही गाजलेल्या नाटकांची यादी (marathi natak names) मी पुढे देत आहे.
वेणीसंहार नाटक (1857) – भट्टनारायण यांनी लिहलेले वेणीसंहार नाटक संस्कृत भाषेतील आहे. परशुराम पंत गोडबोले यांनी त्याचे मराठीत भाषांतर केले आहे.
वेणीसंहार हे नाटक वीररसप्रधान नाटक आहे. या नाटकात वेणीसंहाराचा प्रसंग, कौरव-पांडव युद्धातील घटना एका विशिष्ट सूत्रात गोवून त्यांचे नाट्यीकरण भट्टनारायणाने मांडले आहे.
हा लेख जरूर वाचा – तमाशा माहिती मराठी
सीता स्वयंवर (1843) – सीता स्वयंवर हे 1843 साली रंगमंचावर प्रथम आलेले नाटक मराठी आधुनिक नाट्यपरंपरेतील पहिले नाटक मानले जाते. आधुनिक मराठी नाटकांचे जनक मानल्या जाणाऱ्या विष्णूदास भाव्यांनी हे नाटक लिहिले व बसवले होते. 5 नोव्हेंबर 1843 रोजी या नाटकाचा पहिला खेळ सांगली संस्थानाच्या राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये झाला.
घाशीराम कोतवाल – घाशीराम कोतवाल हे विजय तेंडुलकर यांनी पेशवाईच्या काळात पुण्याचा कोतवाल राहिलेल्या घाशीराम कोतवाल या व्यक्तिरेखेवर आधारित लिहिलेले मराठी नाटक आहे. 16 डिसेंबर 1972 रोजी हे नाटक रंगमंचावर आले. या नाटकाचे दिग्दर्शन डॉ. जब्बार पटेल, नृत्य दिग्दर्शन कृष्णदेव मुळगुंद तर संगीत दिग्दर्शन भास्कर चंदावरकर यांनी केले होते.
तो मी नव्हेच – तो मी नव्हेच हे आचार्य अत्रे लिखित एक लोकप्रिय मराठी नाटक आहे. ह्या नाटकामधु्न प्रभाकर पणशीकरांनी “लखोबा लोखंडे” ह्या एका बदमाशाची भूमिका अजरामर केली आहे. ही कथा सत्य घटनेवर आधारित होती, व खटला हा बार्शीच्या कोर्टात चालू होता.
साष्टांग नमस्कार हे प्र. के. अत्रे यांनी लिहिलेले विनोदी नाटक आहे.
उद्याचा संसार, घराबाहेर इत्यादी गाजलेली नाटके आचार्य अत्रे यांनी लिहिले आहे.
रायगडाला जेव्हा जाग येते – रायगडाला जेव्हा जाग येते हे वसंत कानेटकरांनी लिहिलेले मराठी नाटक आहे. हे पुस्तक पॉप्युलर प्रकाशनने प्रकाशित केले आहे.
टिळक आणि आगरकर – टिळक आणि आगरकर यांचे नातेसंबंध व वैचारिक मतप्रवाह यांचे सुरेख मिश्रण या नाटकात पाहायला मिळते.
खोल खोल पाणी, चार दिवस प्रेमाचे, विनाशा कडून विनाशाकडे, साटेलोटे, दुभंग अशी प्रसिद्ध मराठी नाटके रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेली आहे.
वि. वा. शिरवाडकर यांनी नटसम्राट नाटक शेक्सपियरच्या किंग लियर नाटकाच्या आधारावर लिहिले आहे.
नाट्यशास्त्र – नाट्यशास्त्राची निर्मिती भरत मुनींनी प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून केली अशी आख्यायिका सांगण्यात येते. नाट्यशास्त्राच्या निर्मितीचा नेमका काळ ठाऊक नसला तरी इ.स.पू. 400 ते इ.स.पू. 200 च्या दरम्यान ह्याची निर्मिती झाल्याचे कळते. भारतीय नृत्य आणि संगीत यांची मुळे नाट्यशास्त्रात आहेत असे समजतात.
हा लेख जरूर वाचा – विठाबाई नारायणगावकर यांची माहिती मराठी
सारांश
आजच्या या पोस्टमध्ये आपण प्रसिद्ध मराठी नाटक माहिती – old marathi natak name list याविषयी माहिती जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
प्र.के.अत्रे यांच्या विडंबन पर काव्यसंग्रहाचे नाव काय ?
प्र.के.अत्रे यांच्या विडंबन पर काव्यसंग्रहाचे नाव झेंडूची फुले हे आहे.
सम्राट सिंह नाटकाचे लेखक कोण आहेत ?
सम्राट सिंह नाटकाचे लेखक प्रल्हाद केशव अत्रे हे आहेत.
नाट्यशास्त्र ग्रंथ कोणी लिहिला ?
नाट्यशास्त्र ग्रंथ भरत मुनींनी लिहिला.
अभिनव काव्यप्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला ?
अभिनव काव्यप्रकाश हा ग्रंथ रामचंद्र श्रीपाद जोग यांनी लिहिला.
रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक कोणी लिहिले ?
रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक वसंत कानेटकर यांनी लिहिले.
एकच प्याला नाटक कोणत्या प्रकारचे आहे ?
मद्यपान व त्याचे दुष्परिणाम हा विषय घेऊन एकच प्याला हे उद्देशपर नाटक लिहिले आहे.
मती विकार, प्रेम शोधन, मूकनायक ही नाटके कोणाची आहेत ?
मती विकार, प्रेम शोधन, मूकनायक ही नाटके श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेली आहेत.
पु. ल. देशपांडे यांची नाटकांची नावे यादी माहिती (pu la deshpande natak list)
पु. ल. देशपांडे यांची नाटकांची नावे यादी पुढीलप्रमाणे…
1. अंमलदार (नाटक)
2. एक झुंज वाऱ्याशी
3. तीन पैशाचा तमाशा
4. ती फुलराणी
5. तुका म्हणे आता
6. तुझे आहे तुजपाशी
7. नवे गोकुळ
8. पहिला राजा/आधे अधुरे
9. पुढारी पाहिजे
10. भाग्यवान
11. राजा ईडिपस
12. वटवट वटवट
13. सुंदर मी होणार
14. पुढारी पाहिजे
15. वाऱ्यावरची वरात
मी नथुराम गोडसे बोलतोय लेखक कोण आहेत ?
मी नथुराम गोडसे बोलतोय लेखक प्रदीप दळवी हे आहेत.
भारतातील पहिले नाटककार कोण आहेत (who is first marathi natakkar)
भारतातील पहिले नाटककार (first marathi natakkar) विनायक जनार्दन कीर्तने हे आहेत.