ऑनलाईन पद्धतीने जीएसटी नोंदणी कशी करावी ?

By | January 26, 2023

online gst registration process marathi – जीएसटी ही भारतातील करप्रणाली आहे. याची सुरुवात 1 जुलै 2017 रोजी झाली. या करप्रणाली अंतर्गत वस्तू आणि सेवांवर 0%, 5%, 12%, 18% आणि 28% असे दर ठरवण्यात आले आहे.

जीएसटीचा फुल्ल फॉर्म गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असा होतो. भारतात वस्तू आणि सेवा पुरवणाऱ्या व्यक्ती किंवा व्यवसायांना जीएसटी नोंदणी करावी लागते.

जर तुम्ही व्यावसायिक किंवा विक्रेते असाल आणि ऑनलाईन जीएसटी नोंदणी कशी करावी याविषयी माहिती शोधत असाल, तर हा लेख तुमच्यासाठी महत्वाचा आहे.

GST म्हणजे काय ?

सुरुवातीला वस्तू आणि सेवा यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर आकारला जायचा. आयकर, मालमत्ता, भेटवस्तू, संपत्ती आणि महानगरपालिकावर प्रत्यक्षपणे कर आकारला जायचा.

अप्रत्यक्ष करामध्ये एकूण 17 कर भरावा लागायचा. यात उत्पादन, विक्री, कस्टम आणि वीएटी इत्यादी कर भरावे लागत असे.

हे दोन्ही कर भरताना प्रदेशानुसार वस्तूंच्या किंमतीत बरीच तफावत जाणवत होती. यासाठी भारतात 1 जुलै 2017 पासून संपूर्ण देशात एकच कर लागू करण्यात आला.

यानुसार सर्व वस्तू आणि सेवा यांची विक्री, हस्तांतर, वस्तुविनिमय, भाड्याने देणे किंवा आयात व्यवहारांवर जीएसटी लागू करण्यात आली.

जीएसटी नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे (GST registration documents list in marathi)

जीएसटी नोंदणी व्यवसायाच्या वार्षिक उलाढालीवर आधारित असते. मागील आर्थिक वर्षात 40 लाखांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या वस्तूंच्या पुरवठ्यात गुंतलेल्या व्यवसायांसाठी ही नोंदणी करावी लागते.

वस्तू आणि सेवा विक्रेत्यासाठी ही मर्यादा 20 लाख रुपये इतकी आहे. ईशान्येकडील आणि डोंगराळ राज्यांसाठी 10 लाख रुपये इतकी मर्यादा आहे.

जीएसटी नोंदणीसाठी खालील कागदपत्रे आवश्यक असतात.

 • पॅन कार्ड आणि आधार कार्ड
 • नवीनतम बँक खाते स्टेटमेंट किंवा रद्द केलेला चेक
 • निगमन प्रमाणपत्र/व्यवसाय नोंदणीचा पुरावा
 • वैध व्यवसाय पत्त्याचे पुरावे
 • डिजिटल स्वाक्षरी
 • संचालक/प्रवर्तक यांचे छायाचित्र
 • ओळखीचा व पत्ता पुरावा
 • अधिकृत स्वाक्षरीकर्त्याकडून अधिकृतता पत्र/बोर्ड ठराव

ऑनलाईन पद्धतीने जीएसटी नोंदणी कशी करावी (online gst registration process marathi)

online gst registration process marathi

Step 1 – https://www.gst.gov.in/ या लॉगिन पोर्टलला भेट द्या. ‘सेवा’ टॅबवर जाऊन ‘नोंदणी’ अंतर्गत ‘नवीन नोंदणी’ पर्यायावर क्लिक करा.

Step 2 – यांनतर एक फॉर्म ओपन होईल. यात योग्य माहिती भरा. यावेळी सामान्य करदाता, अनिवासी करपात्र व्यक्ती, राज्य, जिल्हा, व्यवसायाचे नाव, पॅन, ई-मेल आणि मोबाइल नंबर अचूकतेने प्रविष्ट करून प्रोसीड वर क्लिक करा.

Step 3 – यांनतर तुमच्या ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबरवर एक OTP येईल, आलेला OTP ची पडताळणी करून प्रोसीड वर क्लिक करा.

Step 4 – यानंतर तुम्हाला तात्पुरता संदर्भ क्रमांक (TRN) मिळेल.

Step 5 – आता GST ऑनलाइन लॉगिन पेजवर जा. करदाते अंतर्गत ‘आता नोंदणी करा’ पर्यायावर क्लिक करा. यावेळी TRN वापरून प्रोसीड वर क्लिक करा.

Step 6 – यानंतर तुमच्या ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबरवर OTP येईल. OTP पडताळणी करून तुम्ही अर्ज संपादित करू शकता आणि संबंधित कागदपत्रे अपलोड करू शकता.

Step 7 – इलेक्ट्रॉनिक सत्यापन कोड (EVC) किंवा ई-साइन पद्धत किंवा कंपन्यांसाठी डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र (DSC) वापरून तुमचा अर्ज सबमिट करा.

Step 8 – अर्ज सबमिट केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांकावर अर्ज संदर्भ क्रमांक (ARN) पाठवले जाते. या क्रमांकाचा वापर करून तुम्ही अर्जाची स्थिती तपासू शकतात.

सारांश

या लेखातून आपण ऑनलाईन पद्धतीने जीएसटी नोंदणी कशी करावी (online gst registration process marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. याविषयी तुमचे काही प्रश्न असतील, तर आम्हाला नक्की कळवा. तुमच्या प्रश्नाची उत्तरे देताना आम्हाला नक्कीच आनंद होईल.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

नवीन जीएसटी नोंदणी करण्यासाठी किती फी लागते (New GST registration fees)

जर तुम्ही स्वतः नवीन जीएसटी नोंदणी केली काहीच फी लागत नाही. सरकारकडून ही सेवा विनामूल्य असते. पण तुम्ही एखाद्या CA किंवा करदात्याकडून नोंदणी केली तर तुम्हाला त्यांची फी द्यावी लागेल.

जीएसटी कुणी आणि कसा भरायचा असतो?

ज्या व्यावसायिकांची एका वित्तवर्षातील उलाढाल 40 लाखांच्या वर झाली असेल त्या व्यावसायिकांनी जीएसटी नोंदणी करून घेणे अनिवार्य आहे. नोंदणीकृत व्यावसायिकाला त्यांच्या वस्तु आणि सेवा पुरवठ्यावर ठराविक दराने कर वसूल करून, विहित मुदतीत विवरणपत्रे दाखल करून तो कर सरकारी तिजोरीत जमा करावा लागतो. जीएसटी नोंदनी नसणाऱ्या व्यापाऱ्यास ग्राहकाकडून जीएसटी वसूल करण्याचा अधिकार नसतो .

पुढील वाचन :

 1. सीजीएसटी, एसजीएसटी आणि आयजीएसटी माहिती
 2. मुदत ठेव आणि आवर्ती ठेव माहिती मराठी
 3. पैसा म्हणजे काय माहिती मराठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *