शहामृग पक्षी माहिती मराठी

Categorized as Blog

ostrich bird information in marathi – जगातील आकाराने सर्वात मोठा पक्षी म्हणजे शहामृग होय. हा पक्षी साधारणपणे आफ्रिकेतील वाळवंटी प्रदेशात आढळतो. मोठ्या आकारामुळे त्याला उडता येत नाही, पण तो ताशी 65 किमी वेगाने धावू शकतो.

शहामृगाच्या पायाला दोन बोटे आणि एक तीक्ष्ण नख असतो, याच्या मदतीने तो सिंहासारख्या प्राण्याला ठार करू शकतो. या लेखातून आपण शहामृग पक्षी माहिती मराठी (ostrich bird information in marathi) सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

शहामृग विषयी माहिती मराठी (shahamrug information in marathi)

नावशहामृग (Ostriches)
शास्त्रीय नाव स्ट्रुथिओ कॅमेलस
प्रकारपक्षी
आढळआफ्रिका खंड

जगातील सर्वात मोठा पक्षी म्हणजे शहामृग होय. याचे वजन जास्तीत जास्त 150 कि.ग्रॅ पर्यंत असून उंची 2.5 मी इतके असते. आकाराने मोठा असल्याने त्याला इतर पक्षांप्रमाणे उडता येत नाही. पण तो 65 किलोमीटर ताशी वेगाने पळू शकतो.

शहामृग या पक्ष्याच्या सहा उपजाती आहेत. त्या पुढीलप्रमाणे,

अरेबियन शहामृगआफ्रिकन शहामृग
उत्तरेतील शहामृगमसाई शहामृग
स्पाट्‌झी शहामृगसोमाली शहामृग

shahamrug mahiti marathi – शहामृगाची मादी नरापेक्षा थोडी लहान असते. डोके लहान आणि पसरट असते. डोळ्यांचा रंग तपकिरी असून डोळ्यांभोवती काळे पट्टे असतात. विशेष म्हणजे त्यांची दृष्टी अतिशय तीक्ष्ण असते, त्यामुळे त्यांना लांबवरचे दिसते.

चोच आखूड व रुंद असते. पायाला एक मोठे आणि दुसरे लहान असे दोन बोटे असून, त्यांना टोकदार नखे असतात. याचा उपयोग तो शास्त्राप्रमाणे संरक्षणासाठी आणि शिकारीसाठी करतो.

नर पक्षाच्या शरीरावर काळी पिसे आणि आखूड पंख तसेच शेपटीवर पांढरे पिसे असतात. मादी भुरकट तपकिरी रंगाची असून तिचे डोके, मान व पायांवर तुरळक पिसे असतात.

शहामृग पक्षी नेहमी झेब्रा, काळवीट यांच्या आसपास हिंडत असतात. या सर्वांचा सिंहासारखा शत्रू जवळ येताच तो इतरांना सावध करतो.

साधारणपणे शहामृग पक्षी धान्याच्या बिया, फळे, वेली, झुडपाची पाने आणि रसाळ वनस्पती खातात. तसेच ते लहान प्राणी देखील खातात.

shahamrug uses in marathi – शहामृगाच्या कातडीपासून बूट, पट्टे, पिशव्या आदी वस्तू तयार केल्या जातात. तसेच त्यांच्या पिसांचा वापर टोप्या आणि पोशाख यांची सजावट करण्यासाठी केला जातो.

शहामृग पक्षी माहिती मराठी (ostrich bird information in marathi)

दक्षिण आफ्रिकेतील नांबिया देशात जुन्या शहामृगाचे जीवाश्म सापडले त्यामुळे शहामृगाचे मूळ निवासस्थान आफ्रिका मानले जाते.

प्राचीन काळी राजस्थान आणि मध्य प्रदेशात शहामृगाच्या अस्तित्वाचे पुरावे सापडले आहेत. यावरून असे सिद्ध होते की, प्राचीन काळी भारतात देखील शहामृग पक्षी राहत असतील.

शहामृगाचे डोळे त्याच्या मेंदूपेक्षा आकाराने मोठे असतात. त्याच्या मेंदूचे वजन 40 ग्रॅम तर फक्त एका डोळ्याचे वजन 60 ग्रॅम इतके असते.

शहामृग इतर पक्ष्याप्रमाणे उडू शकत नाही पण ते त्यांच्या मजबूत पायांनी झेप घेऊन 10 फूट अंतर कापू शकतात. तसेच ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने धावू शकतात जीवन संकटाच्या परिस्थितीत ते ताशी 65 किलोमीटर वेगाने धावू शकतात.

शहामृगाच्या पायाला 18 सेमी लांबीची फक्त दोनच बोटे असतात. या बोटात अतिशय तीक्ष्ण नखे असतात. त्यांच्या पायाचा आकार एखाद्या प्राण्याच्या खुरासारखा दिसतो.

शहामृग हा आक्रमक पक्षी नाही, पण स्वतःच्या बचावासाठी तो प्राणघातक हल्ला करू शकतो. त्याला हल्ला इतका खतरनाक असतो की, सिंह, बिबट्यासारखे प्राणघातक शिकारीही त्याच्या पायाच्या हल्ल्यामुळे मरतात.

शहामृग हे पक्षी कळपाने राहतात, याच्या कळपात जास्तीत जास्त 50 जण असतात. या कळपाचे नेतृत्व एक मादी शहामृग करत असते.

शहामृग विविध प्रकारची हिरवीगार झाडे, झाडांचे खोड, फळे आणि फुले खातात. त्यामुळे त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राहते. त्यामुळे तो बरेच दिवस पाणी न पिता जगू शकतो.

पृथ्वीवर आढळणाऱ्या इतर पक्ष्यांच्या तुलनेत शहामृग हा सर्वात मोठा पक्षी आहे. पूर्ण विकसित प्रौढ शहामृगाची उंची सुमारे 9 फूट असू शकते. यातील निम्मी उंची त्याच्या मानेची असते.

जगातील सर्वात मोठे अंडे शहामृग (shahamrug egg) पक्षाचे असते. यांच्या अंड्याचा आकार 150 मिमी लांब आणि 125 मिमी व्यास असतो.

शहामृगाचा प्रजनन काळ (shahamrug reproduction period) मार्च किंवा एप्रिल महिन्यात सुरू होतो आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला संपतो. नर शहामृग 4 वर्षात प्रजननासाठी तयार होतात. तर मादी शहामृग नरापेक्षा 6 महिने आधी परिपक्व होतात.

हे पक्षी आयुष्यभर माणसांप्रमाणे सतत पुनरुत्पादन करू शकतात. तसेच माणसांप्रमाणे नर आणि मादी दोघे मिळून त्यांच्या पिल्लांची काळजी घेतात.

शहामृग पक्षाच्या एका कळपातील सर्व माद्या एका खड्ड्यात 15 ते 60 अंडी आढळतात. सर्व माद्या दिवसा आळीपाळीने अंड्यावर बसतात आणि रात्री नर अंड्यांवर बसतो.

शहामृगांच्या कळपातील सर्व माद्या एकाच घरट्यात अंडी घालतात. या अंड्यांतून प्रत्येक मादी स्वतःची अंडी ओळखू शकते. यातून जन्मलेली पिल्ले खूप वेगाने वाढतात. जन्म झाल्यानंतर पिल्ले एका तासातच त्यांच्या मातापित्यांबरोबर चालतात.

ही पिल्ले एका महिन्यानंतर कळपासोबत फिरतात. तीन-चार वर्षांत या पिलांची पूर्ण वाढ होते. शहामृगाचे सरासरी आयुर्मान 40 ते 45 वर्षांचे असते.

Ostrich uses in marathi – शहामृग पक्ष्यापासून अंडी, मांस, त्वचा आणि पंख मिळवले जातात. अंडी आणि मांस खाण्यासाठी वापरतात. तर त्याच्या त्वचेपासून विविध गोष्टी बनवल्या जातात. उदा. बूट, पट्टे, पिशव्या इत्यादी. शहामृग पक्षाच्या पंख सजावट करण्यासाठी वापरतात.

Related – जैवविविधता जपणे का आवश्यक आहे?

सारांश

या लेखातून आपण शहामृग पक्ष्याची माहिती मराठी (ostrich bird information in marathi) सविस्तरपणे जाणून घेतली आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.

FAQs

शहामृग साधारण किती वर्ष जगते ?

शहामृग साधारण 40 ते 45 वर्ष जगते.

सर्वातमोठी अंडी घालणाऱ्या पक्षाचे नाव सांगा .

शहामृग या पक्ष्याचे अंडे सर्वात मोठे असते. या अंड्याचे वजन 1.5 किलोग्रम इतके असून अंड्याचा आकार 150 मिमी लांब आणि 125 मिमी व्यास असतो.

शहामृग पक्षाचा रंग कसा असतो ?

नर शहामृगाच्या शरीरावर मऊ काळी पिसे असून शेपटी पांढऱ्या रंगाची आणि डोळे तपकिरी रंगाचे असतात. मादी शहामृग पक्षाचा रंग फिकट तपकिरी असतो.

शहामृग पक्षाचे उंची आणि वजन किती असते ?

शहामृग पक्षी आकाराने जगातील सर्वात मोठा पक्षी म्हणून ओळखला जातो. याची उंची सुमारे 9 फूट असून त्यापैकी तीन फूट फक्त मान असते. एका प्रौढ शहामृगाचे वजन दीडशे किलोच्या आसपास असते.

शहामृग पक्षाचा वेग किती असतो ?

शहामृग पक्षी जास्तीत जास्त ताशी 65 किलोमीटर या वेगाने पळू शकतो.

शहामृग पक्षी काय खातो ?

शहामृग पक्षी साधारणपणे धान्याच्या बिया, फळे व झुडपाची पाने, वेली व रसाळ वनस्पती तसेच लहान प्राणी खातो.