अष्टविनायक मधील सातवा गणपती – ओझरचा विघ्नहर महिती मराठी

Ozar ganpati temple in marathi – ओझर हे गाव पुणे जिल्ह्यातील कुकडी नदीवर वसलेले आहे. येथील श्री विघ्नहर हा अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती आहे. विघ्न म्हणजे कार्यात येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा यापासून विघ्नहर हे नाव गणपतीस पडले, अशी मान्यता आहे.

राजा अभिनंदनने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ मांडला. या यज्ञात विघ्न आणण्यासाठी इंद्रदेवाने विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती केली. विघ्नासूर राक्षसाने राजा अभिनंदनने सुरू केलेले यज्ञ थांबवले. यासोबतच तो इतर यज्ञांमध्ये विघ्न आणायला लागला.

विघ्नासूर राक्षसाला कंटाळून ऋषीमूनींनी विघ्नासूराचा शांत करण्याची गणपतीकडे विनंती केली. त्यानंतर गणपतीने त्याचा पराभव केला. अशा प्रकारे विघ्नासूर राक्षसाने गणपतीपुढे शरणागती पत्करली.

जेथे माझी पूजा होईल तिथं तू यायचं नाही, ही ताकित गणपतीने विघ्नासूरास घातली. यावर विघ्नासूराने गणपतीला एक विनंती केली की तुमची पूजा करताना माझे नाव भक्तांनी घ्यावे तसेच येथे तुम्ही राहावे. ही विनंती गणपतीने मान्य करून तो विघ्नहर या नावाने राहू लागला. अशी प्रसिद्ध आख्ययिका आहे.

या लेखातून आपण अष्टविनायक मधील सातवा गणपती – ओझरचा विघ्नहर मंदिर (Ozar ganpati temple in marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

ओझर गणपती मंदिर माहिती (Ozar ganpati temple in marathi)

Ozar ganpati temple in marathi
विषयओझरचा विघ्नहर
प्रकारअष्टविनायक मधील सातवा गणपती
स्थानिक भाषामराठी
ठिकाणपुणे, महाराष्ट्र
जवळील पाहण्यासारखी ठिकाणेहबशी महाल
येडगाव धरण चौपाटी
जुन्नर किल्ला
भीमाशंकर बुद्ध लेणी

महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीच्या मंदिरांना अष्टविनायक असे म्हणतात. या मंदिरातील मूर्तींना खास महत्त्व आहे यामुळे ही ठिकाणे महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत.

पुणे जिल्ह्यात पाच, रायगड जिल्ह्यात दोन, अहमदनगर जिल्ह्यात एक अशी एकूण आठ मानाची गणपतीची मंदिरे आहेत.

जिल्हेठिकाणेगणपती नावे
पुणेमोरगाव
थेऊर
रांजणगाव
ओझर
लेण्याद्री
मयूरेश्वर
श्री चिंतामणी
महागणपती
श्री विघ्नेहर
श्री गिरिजात्मज
रायगडमहाड
पाली
वरदविनायक
बल्लाळेश्वर
अहमदनगरसिद्धटेकश्री सिद्धिविनायक

ही सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने एकमेकांच्या जवळच आहेत. गणपतीचे भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. ही यात्रा पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त दोन दिवस लागतात.

ओझर मधील श्री विघ्नहर हा अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती मानला जातो. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात.

गणेशाची ही मूर्ती स्वयंभू आहे. या मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम व मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. महाराष्ट्रातील हे मंदिर एक जागृत स्थान म्हणून ओळखले जाते.

इसवी सन 1785 मध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.

विघ्नहर मंदिर ओझर पाहण्यासरखी ठिकाणे (ozar ganpati mandir mahiti)

ओझर हे गाव कुकडी नदीच्या काठावर वसलेले आहे. येथून जवळच असणाऱ्या येडगावात नदीवर एक धरण बांधलेले आहे. धरणाच्या बॅक वॉटरच्या पुढे श्री विघ्नहर मंदिर आहे. या मंदिराच्या आवारात दगडी खांब आहेत.

या ठिकाणी गणपतीची पूर्वाभिमुख मूर्ती सिद्दी आणि रिद्धी यांच्यासह प्रवेशद्वारात शास्त्रीय व भित्तिकामासह दिसते. या मंदिरात दुपारी महापूजा व संध्याकाळी महाआरती होत असते.

येथील वातावरण अगदी शांत व अध्यात्मिक असल्याने मंदिराचा परिसर आनंदमय झाला आहे. या वातावरणाला व गणपतीचे दर्शन घेण्यासाठी असंख्य भाविक येथे भेट देत असतात.

मंदिराभोवती बरीच दुकानं आहेत. जवळच एक तलाव आहे. या तलावात बोटिंगची सोय करण्यात आलेली आहे. बोटिंगची मजा घेण्यासाठी बरेच पर्यटक या क्षेत्राला भेट देतात.

येडगाव धरण चौपाटी पॉईंट आहे. हबशी महाल, जुन्नर किल्ला, भीमाशंकर बुद्ध लेणी, लेण्याद्री गणपती व लेण्याद्री बुद्ध लेणी हे जवळील पर्यटन स्थळे आहेत.

ओझरचा गणपती माहिती (ozar vighnahar ganpati mandir mahiti)

ओझर या ठिकाणी वर्षभर उष्ण व कोरडे हवामान असते. येथील सरासरी तापमान 19 अंश सेल्सिअस ते 33 अंश सेल्सिअस इतके असते. पण एप्रिल आणि मे महिन्यात येथील तापमान 42 अंश सेल्सिअसच्या वरती जाते.

येथे हिवाळा अगदी तीव्र स्वरूपात जाणवतो. हिवाळ्याच्या दिवसात येथील तापमान दिवसा 26 अंश सेल्सिअस तर रात्री 10 अंश सेल्सिअस असे असते.

ऑगस्ट ते फेब्रुवारी महिना मंदिराला भेट देण्याचा उत्तम काळ आहे. या महिन्याच्या दरम्यान येथे अनेक सण साजरे केले जातात. तसे मंदिर दररोज सकाळी 5 ते रात्री 10:30 पर्यंत दर्शनासाठी उघडे असते.

ओझर गणपती मंदिर जाण्याची व राहण्याची सोय (ozar ganpati temple in marathi)

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यापासून 8 किलोमीटर अंतरावर ओझर गाव आहे. येथे जाण्यासाठी जुन्नर बस स्थानकापासून कॅब व इतर गाड्या भाड्याने मिळतात. याशिवाय महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी वापरून गणपती मंदिरात जाता येते.

मंदिराच्या जवळ अनेक निवासस्थाने आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही राहू शकता. अनेक रिसॉर्ट व हॉटेल्स देखील उपलब्ध आहेत. येथील प्रत्येक हॉटेल्स व रिसॉर्टमध्ये महाराष्ट्रीयन खाद्य पदार्थ मिळतात.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण ओझर गणपती मंदिर माहिती (Ozar ganpati temple in marathi) जाणून घेतली. यात आपण मंदिरात पाहण्यासारखी ठिकाणे (best places to visit ozar ganpati) याविषयी माहिती जाणून घेतली.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली ? हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

विघ्नहर हे नाव गणपतीस का पडले ?

विघ्न म्हणजे कार्यात येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा यापासून विघ्नहर हे नाव गणपतीस पडले, अशी मान्यता आहे.

अष्टविनायक मधील विघ्नहर गणपती देऊळ कुठल्या तालुक्यामध्ये आहे ?

अष्टविनायक मधील विघ्नहर गणपती देऊळ जुन्नर तालुक्यामध्ये आहे. जुन्नर तालुका महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात आहे.

पुढील वाचन :

  1. वज्रेश्वरी मंदिर माहिती मराठी
  2. अष्टविनायक गणपतीची नावे व माहिती
  3. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज मंदिर माहिती
  4. महाराष्ट्राचे कुलदैवत – पंढरपूर देवस्थानाची माहिती

Leave a Comment