Paithan tourist places in marathi – पैठण ही संत एकनाथ महाराज या संताची कर्मभूमी आहे. महाराष्ट्र राज्याची एकेकाळी राजधानी म्हणून ओळख असलेले पैठण शहर देशातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. या लेखातून आपण पैठण येथील पाहण्यासारखी ठिकाणे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
पैठण माहिती मराठी (paithan in marathi)

नाव | पैठण |
तालुका | पैठण |
जिल्हा | औरंगाबाद |
स्थानिक भाषा | मराठी |
प्रसिद्ध पर्यटन स्थळे | संत एकनाथ महाराज समाधी मंदिर जायकवाडी धरण नागघाट |
महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी औरंगाबाद जिल्ह्यातील गोदावरीच्या काठावर वसलेला एक तालुका म्हणजे पैठण होय, गोदावरीला दक्षिण काशी म्हणून पण ओळखले जाते.
पैठण शहर सातवाहन राजाची राजधानी होती. या ठिकाणी महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधरस्वामी हे काही काळ वास्तव्यास होते.
पैठण या ठिकाणाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा मिळालेला आहे. या ठिकाणी विठ्ठलभक्त एकनाथ महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणून या शहरास ओळखले जाते. महाराजांचे समाधी मंदिर प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.
तसेच जायकवाडी धरण आणि ज्ञानेश्वर उद्यान या ठिकाणी देखील पर्यटक भेट देत असतात. जगप्रसिद्ध पैठणी साडीचे उत्पादन आणि विक्री पैठण या शहरात मोठ्या प्रमाणावर केली जाते.
पैठण पाहाण्यासारखी ठिकाणे (Paithan tourist places in marathi)
संत एकनाथ महाराज समाधी मंदिर – हे पैठणमधील मुख्य मंदिर आहे. अनेक भाविक भक्त एकनाथ महाराजांचा दर्शनास येत असतात. एकनाथ षष्ठी, एकादशी, दीपावली या दिवशी मोठ्या संख्येने भाविक महाराजांच्या दर्शनास येतात.
एकनाथ महाराजांचा वाडा म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण समाधी मंदिराचा काही अंतरावर आहे. मुख्यतः हे एकनाथ महाराजांचे निवास स्थान आहे.
सातवाहन राजांच्या महालाच्या खाणखुणा, कोरीव खांब वगैरे असणाऱ्या या प्रासादाच्या आवारात एक विहीर आहे. या विहिरीला शालिवाहनाची विहीर म्हणतात.
गोदावरी नदीवरील जायकवाडी हे धरण पैठण जवळच आहे. महाराष्ट्रातील मोठ्या धरणांपैकी हे प्रसिद्ध धरण आहे. या जलाशयास नाथसगर असे नाव दिले आहे. नाथसागर पर्यटकांचे खास आकर्षण आहे.
नागघाट हे अतिशय सुंदर असे ठिकाण गोदावरी नदीच्या काठावर आहे. येथेच संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद वदविले होते. तसेच येथे सिद्ध वरूण पेशवे गणपती, हनुमान मंदिर, नाग देवता मंदिर, नागेश्वर व इन्द्रेश्वर महादेव मंदिर आहेत. नागपंचमीनिमित्त या ठिकाणी मोठ्या संख्येने उत्सव साजरा होतो.
दिगंबर जैन मंदिर हे पैठणमधील प्रसिद्ध धार्मिक ठिकाण असून अतिशय पवित्र क्षेत्र आहे. देशाचा कानाकोपऱ्यातून लांब ठिकाणांहून जैन बांधव व धार्मिक लोक येथे भेट देतात.
पैठण धरण माहिती मराठी (paithan dam information in marathi)
जायकवाडी धरण विषयी माहिती असेलच, हे धरण आशिया आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण पैठण या ठिकाणी आहे. या धरणाची लांबी 60 किमी आणि रुंदी 10 किमी आहे. एकदा जर हे धरण संपूर्ण भरले, की दोन वर्षे शेतीच्या पाण्याची सोय होते आणि चार वर्ष पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होते. त्यामुळेच या धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्र असे म्हणतात.
जायकवाडी धरणाला नाथसागर असे देखील म्हणतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण म्हणजे जायकवाडी धरण. या धरणावर महाराष्ट्र राज्यातील 5 जिल्हे अवलंबून आहेत. ते पुढीलप्राणे – औरंगाबाद, बीड, जालना, परभणी आणि नांदेड
मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी जायकवाडी धरण खूप मोठी भूमिका बजावतो कारण या धरणावर वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, पैठण आणि जालना या सारख्या मोठ्या औद्योगिक वसाहती अवलंबून आहे.
या ठिकाणी अनेक प्रकारचे पक्षी आढळतात ज्यामध्ये बऱ्यासच्या प्रजाती स्तलांतरित आहेत. जायकवाडी जलाशयामधे 30 विविध आकाराचे बेट तयार केले आहेत. या ठिकाणी साधारणतः 200 पक्ष्याचा प्रजातीचा किलबिलाट आहे, यातील बहुतांश प्रजाती या स्थलांतरीत आलेले असतात.
हा लेख जरूर वाचा – जायकवाडी धरण विषयी माहिती (biggest dam in maharashtra)
पैठणला कसे जायचे (How to reach paithan)
पैठण हे शहर औरंगाबादपासून 50 किलोमीटर अंतरावर गोदावरीकाठी वसले आहे. पैठणला जाण्यासाठी रस्ते, रेल्वे आणि विमानसेवा उपलब्ध आहे.
जवळील बस स्थानक | पैठण |
जवळील रेल्वे स्थानक | औरंगाबाद (50 किलोमीटर) |
जवळील विमानतळ | चिखलठाणा (37 किलोमीटर) |
सारांश
या लेखातून आपण पैठण पाहाण्यासारखी ठिकाणे (tourist places in paithan mahiti marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ? हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
पैठण ही कोणत्या संताची कर्मभूमी आहे ?
पैठण ही एकनाथ महाराज या संताची कर्मभूमी आहे.
महाराष्ट्रातील पैठण येथील प्रसिद्ध उत्पादन कोणते ?
महाराष्ट्रातील पैठण येथील प्रसिद्ध उत्पादन पैठणी साडी होय. पैठणी साडी जगभरात प्रसिद्ध आहे.
औरंगाबाद पासून पैठण किती किलोमीटर आहे ?
औरंगाबाद शहरापासूनपासून पैठण 50 किलोमीटर अंतरावर आहे.
संत एकनाथ महाराजांची कोणती रचना विशेष लोकप्रिय आहे ?
संत एकनाथ महाराजांची एकनाथी भागवत ही रचना विशेष लोकप्रिय आहे.
संत एकनाथांचा पहिला ग्रंथ कोणता आहे ?
संत एकनाथांचा पहिला ग्रंथ चतुःश्लोकी भागवत हा आहे.