पालघर जिल्ह्याची संपूर्ण माहिती

Palghar Information In Marathi – नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत, यापैकीच एक म्हणजे पालघर. विजय नाहटा समितीच्या शिफारशीनुसार 13 जून 2014 रोजी राज्य मंत्रिमंडळात ठाणे जिल्ह्याचे विभाजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुढे 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर हा नवीन जिल्हा तयार करण्यात आला. या लेखातून आपण पालघर जिल्ह्याची संपूर्ण माहिती (Palghar Information In Marathi) जाणून घेणार आहोत.

पालघर जिल्ह्याची संपूर्ण माहिती (Palghar Information In Marathi)

Palghar Information In Marathi
नावपालघर
प्रकार जिल्हा
मुख्यालयपालघर शहर
क्षेत्रफळ5,344 चौकिमी
एकूण तालुके आठ (पालघर, वाडा, विक्रमगड, जव्हार, डहाणू, मोखाडा, तलासरी आणि वसई विरार)
महानगरपालिका वसई विरार
नगरपालिका डहाणू
पालघर
जव्हार
मुख्य नदीवैतरणा
स्थानिक भाषा कोकणी, मराठी
प्रशासकिय विभागकोकण
संकेतस्थळ https://palghar.gov.in/

पालघर जिल्हा हा महाराष्ट्राच्या कोकण प्रदेशाचा उत्तर भाग आहे. पूर्वी हा भाग ठाणे जिल्ह्याचा एक प्रदेश म्हणून ओळखला जायचा. पण 1 ऑगस्ट 2014 रोजी पालघर हा नवीन जिल्हा म्हणून मान्यता मिळाली.

नवीन जिल्ह्याची मान्यता प्राप्त करण्यासाठी जवळपास 25 वर्षे संघर्ष करावा लागला. यानंतर विजय नाहटा समितीच्या शिफारशीनुसार 13 जून 2014 रोजी पालघरला नवीन जिल्हा म्हणून महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

पालघर जिल्ह्याच्या पूर्वेला नाशिक व ठाणे जिल्हा आहे, पश्चिमेस अरबी समुद्र, उत्तरेला गुजरातमधील बलसाड जिल्हा व दादरा नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे. अशा प्रकारे पालघरचे एकूण क्षेत्रफळ 5,344 चैकिमी इतके आहे.

Palghar District Taluka List In Marathi – पालघर जिल्ह्यात पालघर, वाडा, विक्रमगड, जव्हार, डहाणू, मोखाडा, तलासरी आणि वसई विरार असे एकूण आठ तालुके आहेत. वसई विरार ही महानगरपालिका असून या महानगरपालिका अंतर्गत शहरी भागात व्यवस्थापन चालते. तर इतर भागात डहाणू, पालघर आणि जव्हार या नगरपालिका प्रदेशाचे व्यवस्थापन करतात.

Rivers In Palghar District – पालघर जिल्ह्यातील वैतरणा ही मुख्य नदी आहे. पिंजल, सूर्या, दहेर्जा, तानसा आणि दक्षिणेला उल्हास नदीखोरे आहेत. तसेच वांद्री धरण आणि मनोर धरणामुळे जिल्ह्यात पाण्याचा व्यवस्थित पुरवठा होतो.

Tourist Places In Palghar District In Marathi – ठाणे शहरापासून 100 किमी अंतरावर जव्हार हे एक थंड हवेचे ठिकाण आहे, याला पालघरचे महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. या ठिकाणाला 632 वर्षांचा ऐतिहासिक वारसाही लाभलेला आहे. पालघरमधील गावात तुम्हाला सुंदर विला आणि समुद्रकाठांचे घरे पाहायला मिळतील.

जव्हार येथे जुना राजवाडा, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला शिरपामाळ आणि सनसेट पॉइंट तसेच येथील आदिवासींची संस्कृती जवळून पाहावयास मिळते. जव्हार येथे दाभोसा धबधबा पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे, सोबतच कसाऱ्याजवळ विहिगाव धबधबा आहे.

पालघर जिल्ह्यातील वसई येथे चिंचोटी धबधबा आहे. पावसाळ्यात येथे भरपूर पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण असते. हिवाळ्यात येथे सकाळी धुके पडतात आणि हवामान थंड तर उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.

इसवी सन 1739 मध्ये पोर्तुगीजांकडून चिमाजी अप्पांनी वसईचा किल्ला जिंकून घेतला. हा किल्ला पालघरमधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. महाराष्ट्रातील प्रमुख मासेमारी बंदरांपैकी एक पालघर होय. येथील शांत समुद्र किनारे आणि एक्सो-टुरिझम जगभरात प्रसिद्ध आहेत.

यासोबतच इथे अर्नाळा किल्ला, कळवा बीच, माहीम बीच, वाघोबा धबधबा, हिरडपाडा धबधबा, शितळदेवी मंदिर आणि विरारची जीवदानी देवी येथील प्रमुख आकर्षण आहे.

Relatedकोकण प्रशासकीय विभागातील जिल्हे व तालुके

सारांश

आशा करतो की, तुम्हाला पालघर जिल्ह्याची संपूर्ण माहिती (Palghar Information In Marathi) नक्कीच आवडली असेल.

जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्कीच शेअर करा आणि हो जर तुमच्याकडे पालघरविषयी अधिक माहिती असेल तर, आम्हाला कळवा, तुमची माहिती या लेखात समाविष्ट करताना आम्हाला नक्कीच आनंद होईल.

महाराष्ट्र राज्यातील जिल्हे आणि तालुके यामधील पर्यटन स्थळे व माहितीसाठी आमच्या ब्लॉगला बुकमार्क करून ठेवा.

Leave a Comment