pandharpur information in marathi – महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणुन प्रसिध्द असणारे पंढरपूर भीमा नदीच्या काठावर वसलेले आहे. या ठिकाणी अनेक हिंदू मंदिरे व अनेक संतांचे मठ आहेत. गोरगरिबांचा देव म्हणून श्री विठ्ठलाची ओळख आहे.
वारकरी संप्रदायाचे मुख्य दैवत म्हणजे विठ्ठल, याला विठोबा, पांडुरंग, विठुराया, पंढरीनाथ म्हणून संबोधिले जाते. विठोबा महाराष्ट्र राज्यातील मराठा, वैष्णव, हिंदू व वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत आहे.
पंढरपूरला पंढरीदेखील म्हंटले जाते. येथील विठ्ठल मंदिर वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. दरवर्षी आषाढी एकादशीला लाखो भाविक भक्त श्री विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी येथे येतात.
या लेखातून आपण महाराष्ट्राचे कुलदैवत असणारे श्री क्षेत्र पंढरपूर देवस्थानाची (pandharpur information in marathi) माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्राचे कुलदैवत – पंढरपूर देवस्थानाची माहिती मराठी (pandharpur information in marathi)

नाव | पंढरपूर |
इतर नावे | पंढरी |
जिल्हा | सोलापूर |
राज्य | महाराष्ट्र |
स्थानिक भाषा | मराठी |
प्रसिध्दी | विठ्ठलाची पंढरी भारताची दक्षिण काशी |
पाहण्यासारखी ठिकाणे | श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर विविध हिंदू मंदिरे अनेक संतांची मठ चंद्रभागा सरोवर |
महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी एक जिल्हा सोलापूर त्यातील पंढरपूर भीमा नदीच्या काठावर वसले आहे. भीमा पंढरपुराजवळून वाहताना चंद्रकोरीप्रमाणे वळण घेते, म्हणून या नदीला पंढरपुरात चंद्रभागा म्हणतात.
चंद्रभागेच्या काठावरच श्री विठ्ठल देवाचे मंदिर आहे. विठोबा हा महाराष्ट्रातील मराठा, वैष्णव, हिंदू ,वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत आहे. कर्नाटक राज्यात देखील हरिदास संप्रदाय विठोबास आराध्य दैवत मानतात.
विठ्ठलमंदिर हे गावातील सर्वात प्रमुख मंदिर असून या मंदिरास एकूण 8 प्रवेशद्वार आहेत. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार हे पूर्वेकडील महाद्वार जेथे संत नामदेवाची नामदेव पायरी आहे. नामदेव पायरीखाली संत नामदेव यांचे पार्थिव शरीर त्यांच्या इच्छेप्रमाणे पुरले आहे.
संत नामदेव पायारीहून मंदिरात प्रवेश केल्यावर 3 लहान कप्प्याचे मुक्ती मंडप आहे. मुक्ती मंडपातून आत गेल्यावर विठ्ठल सभा मंडप आहे. येथून पुढे गेल्यास 16 खांबाच्या आधारावर एक दगडी मंडप उभारलेला दिसतो, यालाच सोळखांब असे म्हणतात.
16 खाम्बापैकी एका खांबाला सोने व चांदीच्या पत्र्यांनी मढविलेले आहे, याला गरुड खांब म्हणुन ओळखले जाते. सोळखांब जवळ असणाऱ्या मोठ्या दगडावर इसवी सन 1208 मधील उल्लेख पाहायला मिळतो.
सोळखांबच्या पुढे चार खांबावर उभारलेले चौखांब आहे. या ठिकाणाहून मुख्य गाभ्यारात प्रवेश केला जातो. मुख्य गाभारा 6 चौरस फुटाचा असून 3 फुट उंचीचा चांदीने मढविलेला कट्टा आहे. ह्या कट्ट्यावर श्री विठ्ठलाची मूर्ती आहे.
मुख्य गाभाऱ्याच्या मागील बाजूस उत्तर पूर्वेला रूक्मिणी मातेचे मंदिर आहे. रूक्मिणी मंदिरात गाभारा, सभा मंडप, हॉल, दर्शनासाठी आत जाण्याची व बाहेर पडणयाची सोय आहे.
पंढपुरात सर्व जाती धर्माच्या भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश मिळून विठ्ठलाच्या चरणी माथा टेकण्याची संधी मिळते. अशी माथा टेकून दर्शन घेण्याची संधी ईतर मंदिरात क्वचितच मिळते.
पद स्पर्श दर्शनासाठी साधारण दिवशी 2 ते 3 तास लागतात. तर साप्तहिक सुट्टीला किंवा एकादशीच्या दिवशी 4 ते 5 तास लागतात. यात्रा असली तर पद स्पर्श दर्शन घेण्यासाठी जवळपास 36 तास लागतात.
ज्या भक्तांना वेळेअभावी पद स्पर्श दर्शन घेणे शक्य नसते. असे भाविक 25 मिटर लांबून विठ्ठलाचे व 15 मीटर लांबून रुक्मिणीचे मुखदर्शन घेऊ शकतात. मुखदर्शनासाठी जास्तीत जास्त 15 मिनिटाचा कालावधी लागतो.
पंढरपूर पाहाण्यासारखी ठिकाणे (pandharpur darshan in marathi)
पद्मावती मंदिर | काळा मारुती मंदिर |
गोपाळपूर | तुकाराम मंदिर |
अंबाबाई मंदिर | ज्ञानेश्वर मंदिर |
लखुबाई / रूक्मिणी मंदिर | नामदेव मंदिर |
विष्णुपाद | पुंडलिक मंदिर |
गजानन महाराज मंदिर | यमाई तुकाई मंदिर |
व्यास नारायण मंदिर | तांबडा मारुती मंदिर |
लक्ष्मण बाग | राम बाग |
ताकपिठ्या विठोबा |
मुख्य मंदिरात नामदेव पायरी दरवाजातून प्रदेश करून पश्चिम दरवाजाकडून मंदिरातून बाहेर पडताना खालील देव देवतांचे दर्शन होते.
1. नामदेव पायरी – संत नामदेवांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी विठ्ठल मंदिराच्या पायरीशी समाधी घेतली. तसेच संत जनाबाई यांनी सुध्दा याच ठिकाणी समाधी घेतली. यामुळे श्री संत नामदेव यांच्या स्मरणार्थ येथे नामदेव पायरी बांधण्यात आली आहे.
2. गणेश मंदिर – हिंदू धर्मातील सर्वात प्रसिद्ध व सर्वाधिक पूज्य देवतांपैकी एक गणपती. गणेशाची भक्ती मोठ्या प्रमाणावर पसरलेली असल्याने या ठिकाणी अनेक भाविक भेट देतात.
3. दत्त मंदिर – दत्त हे एक योगी असून हिंदू धर्मात त्यांना देव मानले जाते. हिंदू पौराणिकानुसार दत्त, सोम व दुर्वास हे तिघे भाऊ विष्णू, ब्रह्मा व शिव यांचे अवतार मानले जातात.
4. गरुड मंदिर – पौराणिक काळातील मानवासारखा पक्षी असलेल्या गरूडाला हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यामध्ये गरुड हा विष्णूचा वाहन म्हणून ओळखला जातो. परंतु गरुडाला समर्पित मंदिरे भारतात फार दुर्मिळ आहेत.
5. मारुती मंदिर – श्री रामाचा महान भक्त, दास, दूत म्हणून ओळखला जाणारा हनुमान, याची मंदिरे प्रत्येक गावागावात पाहायला मिळतात. हनुमान हा सप्त चिरंजीवांपैकी एक चिरंजीव आहे, म्हणजे तो अजूनही जिवंत आहे, अशी मान्यता आहे.
6. नरसिंह मंदिर – विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार मानले जाणारे श्रीनृसिंह सरस्वती यांचे मंदिर या ठिकाणी आहे.
7. यासोबतच येथे चौरंगी देवी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, राधिका मंदिर, अंबाबाई मंदिर, सत्यभामा मंदिर, काशी विश्वनाथ मंदिर व लक्ष्मी नारायण मंदिर, कान्होपात्रा मंदिर, पाहायला मिळतात.
8. गरुड खांब, एक मुख दत्तात्रय मंदिर, रामेश्वर लिंग मंदिर, कालभैरव मंदिर, काशी विश्वनाथ मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, वेन्कटेश्वर मंदिर, शनी देव मंदिर, नागनाथ मंदिर, गुप्तलिंग मंदिर, खंडोबा मंदिर ही मंदिरे देखील पाहण्यासाठी स्थळे आहेत.
9. पंढरपुरात संत कैकाडी महाराज मठ व संत तनपुरे महाराज मठ आहे. हे मठ पूर्णपणे फिरण्यास 3 तासाहून अधिक वेळ लागतो. मठामध्ये सर्व देव देवतांचे व संतांचे दर्शन घडवणारे सुंदर वास्तू पाहायला मिळतात.
10. तसेच येथे गुजराती देवस्थान असून ते भीमा नदीच्या पलीकडे वसलेले आहे. भक्तांना श्रीनाथजीचे दर्शन घेण्यासाठी नदी पार करून जावे लागते.
पंढरपुर माहिती मराठी (pandharpur mahiti in marathi)
1. पंढरपूर शहराचे जुने नाव पुंडरीकपूर किंवा पांढरी होते, असे म्हंटले जाते. शिवाय काही मध्ययुगीन कानडी शिलालेखांत पंढरपूरचा उल्लेख ‘पंडरगे’ असा केला आहे. पंढरपुराला पंढरी असेही म्हणतात.
2. पंढरपूरला भारताची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. काशी हे हिंदूंना सर्वांत पूज्य असणारे क्षेत्र आहे. कारण दिवोदासाच्या कर्मयोगामुळे काशीमध्ये देवाने वास्तव्य केले, अशी मान्यता आहे.
3. विठोबा महाराष्ट्र राज्यातील मराठा, वैष्णव, हिंदू व वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत आहे. त्यासोबतच महाराष्ट्र राज्याचे कुलदैवत देखील आहे.
पुंडलिक वरदा हरि विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय…
4. पंढरपूर येथे वर्षातून चार एकादश्यांना चार यात्रा भरतात – चैत्री, आषाढी, माघी व कार्तिकी. यातील आषाढी एकादशीच्या सुमारास 10 ते 15 लाख भाविक पंढरपूरची वारी करण्यासाठी पायी चालत येतात.
5. पंढरपूरचे देवालय व देव अत्यंत पुरातन असून अनेक वेळा या मंदिराची पुनर्बांधणी झाली आहे. येथील प्रथा फार पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत. यातील एक प्रथा म्हणजे इसवी सन 1650 मध्ये हैबतबाबांनी आळंदीहून निघून पंढरपूरला पोहोचणाऱ्या पालखीची प्रथा सुरू केली.
6. विठोबाच्या मूर्तीचे अनेकवेळा स्थानांतर केल्याचे उल्लेख आहेत. मंदिरात विठोबाचे व रुक्मिणीचे अनेक मौल्यवान अलंकार आहेत, पण हे अलंकार विशिष्ट वेळी त्यांना परिधान केले जातात.
7. पंढरपूर हे महाराष्ट्रातील सामान्य माणसाचे श्रद्धास्थान आहे. येथे दरवर्षी गरिबापासून श्रीमंत असे सर्वजण मनोभावे भेट देतात.
8. विशेष म्हणजे विठोबाच्या मूर्तीला स्पर्श करूनच दर्शन घेता येणारी ही एकमेव मूर्ती आहे.
पंढरपूर जाण्याचा मार्ग (how to reach pandharpur)
रस्त्याने | सोलापूरपासुन 72 कि.मी अंतरावर आहे. |
रेल्वेने | मध्य रेल्वेच्या कुर्डुवाडी-मिरज मार्गावर आहे. |
विमानाने | जवळचे विमानतळ – पुणे व कोल्हापूर |
पंढरपूर राहण्याची सोय (best places to stay in pandharpur)
पंढरपूर येथे राहण्यासाठी बऱ्याच सोयी उपलब्ध आहेत. पंढरपूर शहरात अनेक हॉटेल्स आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही मुक्काम करू शकता. हॉटेल्सची बुकिंग तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता.
यासोबतच पंढरपूर येथे अनेक मठ असल्याने भाविक भक्तांना या मठात राहण्याची सोय उपलब्ध केलेली आहे. मठ व्यतिरिक्त इतर विश्रामगृह आहेत. ज्या ठिकाणी तुम्ही मुक्काम करू शकता.
सारांश
आजच्या या पोस्टमध्ये आपण पंढरपूर देवस्थानाची माहिती मराठी (pandharpur information in marathi) जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ? हे कमेंट मध्ये नक्की सांगा.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
पंढरपूरचे जुने नाव काय होते ?
पंढरपूरचे जुने नाव पांडरंगपल्ली असे होते. या नावाचा उल्लेख राष्ट्रकूट राजा अविधेय याने नोव्हेंबर 516 मध्ये जयद्विट्ठ नावाच्या ब्राह्मणास दिलेल्या ताम्रपटात आढळतो.
विठ्ठल कोणाचा अवतार आहे ?
विठ्ठल विष्णू व कृष्ण देवांचा अवतार आहे, असे मानले जाते. विठोबा हा कृष्णाचा द्वापार युगातील दुसरा आणि दशावतारातील नववा अवतार आहे असे मानले जाते. परंतु शास्त्र-पुराणांमध्ये विठ्लाला बौध्य वा बोधराज म्हटले आहे.
(Source – मराठी विकिपीडिया)
विठ्ठलाचे विविध नावे कोणती आहेत ?
विठ्ठलाला बऱ्याच नावाने संबोधिले जाते. ती पुढीलप्रमाणे आहेत.
1. श्री पांडुरंग
2. पंढरीनाथ
3. पांडुरंग
4. पंढरीराया
5. विठाई
6. विठोबा
7. विठुमाऊली
8. विठ्ठल गुरूराव
9. पांडुरंग
10. हरि
पंढरपूरला काय प्रसिद्ध आहे ?
पंढरपूर हे ठिकाण भारतातील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. या ठिकाणी श्री विठ्ठल देवाचे मंदिर असून इतर हिंदू देवतेची मंदिरे आहेत. तसेच येथे अनेक संत महात्म्यांची मठ आहेत.
महाराष्ट्रातील कोणत्या शहराला दक्षिणेची काशी म्हणतात ?
महाराष्ट्रातील पंढरपूर या शहराला दक्षिणेची काशी म्हणतात.
पुढील वाचन :