पापुआ न्यू गिनी देशाची माहिती मराठी

Categorized as Blog

Papua New Guinea In Marathi – पापुआ न्यू गिनी हा देश ओशनिया खंडातील देश आहे. हा देश नैऋत्य प्रशांत महासागरात ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला न्यू गिनी बेटाच्या पूर्व भागात व इतर काही छोट्या बेटांवर स्थित आहे. न्यू गिनी बेटाच्या पश्चिम भागात इंडोनेशिया देशाचे पापुआ व पश्चिम पापुआ हे दोन प्रांत वसलेले आहेत. पोर्ट मॉरेस्बी ही पापुआ न्यू गिनीची राजधानी असून देशातील सर्वात मोठे शहर आहे.

या लेखातून आपण आज पापुआ न्यू गिनी देशाची माहिती मराठी (papua new guinea in marathi) जाणून घेणार आहोत. यात आपण पापुआ न्यू गिनी देशाची भाषा, संस्कृती, जीवनशैली, शिक्षण व्यवस्था, प्रशासन अशी बरीच माहिती सविस्तपणे जाणून घेणार आहोत.

पापुआ न्यू गिनी देशाची माहिती मराठी (papua new guinea in marathi)

देश पापुआ न्यू गिनी
राजधानी पोर्ट मॉरेस्बी
सर्वात मोठे शहर पोर्ट मॉरेस्बी
अधिकृत भाषाइंग्रजी , टोक पिसिन , हिरी
लोकसंख्या70,59,653
क्षेत्रफळ462,840 km²
राष्ट्रीय चलनपापुआ न्यू गिनीयन किना
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+675

1. जगातील सर्वाधिक सांस्कृतिक वैविध्य असणारा पापुआ न्यू गिनी हा देश आहे. तसेच जगात सर्वात जास्त ग्रामीण व अदिवासी लोकवस्ती या देशात आहे.

2. आपल्या भारत देशासारखी कृषीप्रधान संस्कृती येथे अस्तित्वात आहे. शेती व्यवसायासोबतच मोठ्या प्रमाणात खाणकाम उद्योग पापुआ न्यू गिनी या देशात केले जाते. त्यामुळे या देशास इसवी सन 2011 साली जगातील सहाव्या क्रमांकाचा झपाट्याने प्रगती देश म्हणून बहुमान मिळाला.

3. इसवी सन 1884 साली पापुआ न्यू गिनी देशाच्या उत्तर भागावर जर्मन साम्राज्याचे तर दक्षिण भागात ब्रिटनची सत्ता होती. इसवी सन 1904 मध्ये ब्रिटनने सत्ता ऑस्ट्रेलियाकडे सुपुर्त केली आणि इसवी सण 1905 मध्ये ब्रिटिश न्यू गिनीचे नाव टेरिटोरी ऑफ पापुआ असे ठेवले गेले.

4. पहिल्या महायुद्धादरम्यान ऑस्ट्रेलियाने जर्मन न्यू गिनीवर कब्जा केला. पुढील अनेक वर्षे पापुआ व न्यू गिनी हे वेगळे प्रशासकीय प्रदेश होते. दुसऱ्या महायुद्धानंतर इसवी सण 1949 साली ह्या दोन प्रांतांचे एकत्रीकरण करून टेरिटोरी ऑफ पापुआ ॲन्ड न्यू गिनी नावाचा प्रदेश स्थापन केला गेला, पुढे या प्रदेशास पापुआ न्यू गिनी असे नाव पडले.

5. अशा प्रकारे 16 सप्टेंबर 1975 रोजी पापुआ न्यू गिनीला ऑस्ट्रेलियापासून स्वातंत्र्य मिळाले.

6. सध्या पापुआ न्यू गिनी राष्ट्रकुल क्षेत्रामधील एक देश आहे. या देशातील अध्यक्षपद ब्रिटनची राणी एलिझाबेथ दुसरीचे यांच्याकडे आहे. राष्ट्रकुल क्षेत्र हे आंतरराष्ट्रीय संघटना असून, विविध सामाजिक, राजकीय व अर्थव्यवस्था असलेले देश एकत्र येऊन समान तत्वे व मुद्दांवर काम करतात.

7. या देशात शेती आणि खाणकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो, असे असले तरीदेखील पापुआ न्यू गिनी अर्थव्यवस्था कमकूवत असून पायाभूत सुविधांचा अभाव आहे.

8. पापुआ न्यू गिनी देश विविधतेचा देश म्हणून ओळखला जातो. या देशात सुमारे 850 भाषा बोलल्या जातात. देशात अनेक धार्मिक समुदाय येथे राहतात. देशातील 18 टक्के लोकसंख्या शहरी भागात तर उर्वरित 82 टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते.

9. अनेक दशकांदरम्यान हा भूभाग युरोपीय शोधकांसाठी पुष्कळसा अज्ञात होता. पण इसवी सन 1884 सालापासून हा देश सर्वज्ञात झाला.

10. पापुआ न्यू गिनी या देशात 600 हून अधिक बेट असून, ही बेटे एकमेकांपासून वेगळे आहेत. यातील बहुतांश बेटे जगाला अज्ञात आहेत.

पापुआ न्यू गिनी माहिती मराठी (papua new guinea mahiti marathi)

11. येथील बेटे एकमेकांशी संपर्कात नसल्याने या ठिकाणी पर्यटकांना भाषेची अडचण निर्माण होते. या देशात 850 भाषा बोलल्या जातात, इतक्या भाषा एखाद्या खंडात देखील बोलल्या जात नाहीत.

12. पापुआ न्यू गिनी देशात जीवनशैलीत ही खूप विविधता आढळून येते. येथील प्रतेक बेटावर वेगळी भाषा आणि वेगळी जीवनशैली पाहायला मिळते.

13. जगातील इतर देशांपेक्षा महिलांविषयी विचित्र नियम आहे. एकीकडे महिलांना त्रास दिला जातो, तर दुसरीकडे मालमत्तेचा अधिकार महिलांकडे आहे.

14. येथील महिलांविषयी वेगळी बाब म्हणजे – इतर देशात विवाह झाल्यानंतर वधू वरच्या घरी नांदायला जात असते. पण पापुआ न्यू गिनी या देशात विवाहानंतर वर हा वधूच्या घरी कायमस्वरूपी वास्तव्यास येतो.

15. पापुआ न्यू गिनी देश समुद्राने वेढलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी 750 हून अधिक प्रजातीचे पक्षी पाहायला मिळतात. पर्यटनासाठी नैसर्गिक सुंदरता असूनही या देशाचा पर्यटन विकास झाला नाही.

16. hooded pitohui नावाचा पक्षी या देशात आढळतो. हा पक्षी अतिशय विषारी आहे. याचा शरीराला विषारी घटक आहे, असे म्हणले जाते. जर या पक्ष्याला कुणी चुकून स्पर्श केला, तर त्याचा मृत्यू होऊ शकतो.

17. न्यू गिनी बेट येथील सर्वात सुंदर बेट आहे. तसे पाहिले तर या देशात असे अनेक बेटे आहेत, ज्याची नैसर्गिक सुंदरता पाहण्यासारखी आहे. पण वाहतूक विकास नसल्याने पर्यटनास अडथळा निर्माण होतो.

18. पापुआ न्यू गिनी देशात मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट्राचार केला जातो. प्रत्येक क्षेत्रात होणारा भ्रष्ट्राचार या देशात गरिबी वाढत चालली आहे.

19. पापुआ न्यू गिनी या देशात सरकारी व्यवस्था खराब असल्याने तेथील विकास होत नाही.

20. अशा या देशात पर्यटनासाठी जाणे योग्य आहे, कारण या ठिकाणी जलचर आणि पक्षी यांच्या विविध प्रजाती पाहायला मिळतात.

Related – तुर्कस्तान देशाची माहिती

सारांश

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण पापुआ न्यू गिनी देशाची माहिती मराठी (papua new guinea in marathi) जाणून घेतली. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

FAQs

पापुआ न्यू गिनी हे पर्यटन क्षेत्र कशासाठी प्रसिद्ध आहे ?

पापुआ न्यू गिनी हा देश 600 हून अधिक बेटावर वसलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्वत्र समुद्राचा वेढा आहे. या ठिकाणी 750 हून अधिक पक्षाच्या प्रजाती आहेत. तर अगणित जलचर प्राणी पाहायला मिळतात.

राष्ट्रकुल म्हणजे काय ?

राष्ट्रकुल परिषद ही एक अशी आंतरराष्ट्रीय संघटना आहे ज्या मार्फत विविध सामाजिक, राजकीय व अर्थव्यवस्था असलेले देश एकत्र येऊन समान तत्वे व मुद्दांवर काम करतात.