Partner types in business marathi – मागील लेखात आपण भागीदारी संस्था म्हणजे काय, त्याचे प्रकार, वैशिष्ट्ये व माहिती जाणून घेतली. या लेखातून आपण भागीदारांचे विविध प्रकार किती व कोणते आहेत (Partner types in business marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
भागीदारांचे विविध प्रकार किती व कोणते आहेत (Partner types in business marathi)

साधारणपणे भागीदारांचे आठ प्रकार पडतात. हे प्रकार भागीदारी संस्थेत असलेले भागीदार व्यवस्थापनात कशाप्रकारे सहभागी होतात ? यावरून भागीदारांच्या प्रकाराचे वर्गीकरण केले जाते.
1. सक्रिय भागीदार – भागीदारी संस्थेच्या दैनंदिन व्यवस्थापनात व भागीदार सहभागी असतो त्याला सक्रिय भागीदार असे म्हणतात. व्यवसायामध्ये होणारे सर्व व्यवहारांना हा भागीदार जबाबदार असतो. अशा भागीदारांना नफ्याव्यतिरिक्त वेतन सुद्धा दिले जाते.
2. निष्क्रिय भागीदार – व्यवसायामध्ये सर्व भागीदारांना सक्रिय भाग घेणे शक्य नसते. त्यामुळे सर्व भागीदार व्यवसायाच्या दैनंदिन व्यवस्थापनात प्रत्यक्ष सहभाग घेत नाहीत. अशा भागीदारांना निष्क्रिय भागीदार असे म्हणतात. या भागीदाराने करार झाल्याप्रमाणे व्यवसायात भांडवल गुंतवलेले असते. म्हणून हा भागीदार जरी सक्रिय नसला तरी देखील याची जबाबदारी अमर्यादित असते.
3. नामधारी भागीदार – ज्या व्यक्तीचा भागीदारी संस्थेच्या संबंधित व्यवसायामध्ये चांगले नावलौकिक असेल, अशा व्यक्तीला भागीदारी संस्थेचा भागीदार म्हणून घेतले जाते. या व्यक्तीच्या नावलौकिकाचा फायदा भागीदारी संस्थेला व्हावा हा प्रमुख उद्देश असतो.
नामधारी भागीदाराकडून भांडवल घेतले जात नाही. तसेच हा भागीदार व्यवस्थापनात भाग घेत नाही. पण भागीदारी संस्थेची कर्ज चुकते करते वेळेस या भागीदाराला जबाबदार धरले जाते.
4. अज्ञान भागीदार – ज्या भागीदाराचे वय अठरा वर्षापेक्षा कमी असते अशा भागीदाराला अज्ञान भागीदार म्हणतात. भागीदारी संस्था स्थापन करण्यासाठी करार करावा लागतो. हा करार करत असताना कायद्याने व्यक्ती सज्ञान असणे आवश्यक आहे म्हणजे त्याचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असणे गरजेचे असते.
पण काही वेळेस इतर भागीदारांनी संमती दर्शवली तर अज्ञान भागीदार म्हणून व्यक्तीला घेता येते. अज्ञान भागीदाराला अठरा वर्षानंतर व्यवसायाची अमर्यादित जबाबदारी सांभाळावे लागते. पण जोपर्यंत त्याचे 18 वयवर्षे पूर्ण होत नाही तोपर्यंत तो व्यवसायाच्या नुकसानाला जबाबदार नसतो.
5. नकार देण्याचा अधिकार नसलेला भागीदार – एखादी व्यक्ती एखाद्या भागीदारी संस्थेचा भागीदारी नसून आपल्या वागण्यातून बोलण्यातून लिखाणातून किंवा कृतीतून सबंधित संस्थेचा भागीदार असल्याचा भास निर्माण करतो. अशा भागीदारास नफा देण्याचा अधिकार नसलेला भागीदार म्हणतात.
हा भागीदार व्यवसायात प्रत्यक्ष भाग घेत नाही. तसेच याला कसले अधिकार नसतात. पण एखाद्या गैरसमजामुळे हा व्यक्ती संस्थेचा भागीदार असेल असे समजून केले गेलेल्या व्यवहारात काही नुकसान झाले तर ते फेडण्यासाठी या भागीदाराला जबाबदार धरले जाते.
6. तोतया भागीदार – एखाद्या व्यक्तीला इतर व्यक्ती जर एखाद्या भागीदारी संस्थेचा भागीदार समजत असतील आणि ही गोष्ट समजून देखील ती व्यक्ती त्यांना नकार देत नसेल तर अशा व्यक्तीस तोतया भागीदार असे म्हणतात.
या भागीदारास कसलेही अधिकार नसतात. अशा भागीदारामुळे जर भागीदारी संस्थेत नुकसान झाले, तर याला जबाबदार धरले जाते.
7. नफ्यातील भागीदार – जो भागीदार भागीदारी संस्थेच्या व्यवसायातील फक्त नफ्याचा भागीदार होतो म्हणजे व्यवसाय संस्थेला जर तोटा झाला तर त्यामध्ये हा वाटेदार होत नाही. अशा भागीदार असण्यासाठी भागीदार असे म्हणतात.
हा भागीदार व्यवसायामध्ये आपले भांडवल लावतो, पण व्यवस्थापनात भाग घेत नाही. भांडवल संस्थेचे कर्ज फेडण्या वेळेस हा भागीदार जबाबदार धरला जातो.
8. आभासी भागीदार – एखादा भागीदार भागीदारी संस्थेतून निवृत्त झाल्यानंतर भागीदारी संस्थेच्या व्यवस्थापनातून आपले भांडवल काढून घेत नाही अशा भागीदारास आभासी भागीदार असे म्हणतात. संस्थेचे कर्ज फेडण्यासाठी याला जबाबदार धरले जाते.
सारांश
आजच्या या पोस्टमध्ये आपण भागीदारांचे विविध प्रकार कोणते आहेत (Partner types in business marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ? हे कमेंट मध्ये नक्की सांगा.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
अज्ञान भागीदार म्हणजे काय ?
ज्या भागीदाराचे वय अठरा वर्षापेक्षा कमी असते, अशा भागीदाराला अज्ञान भागीदार म्हणतात.
भागीदारी म्हणजे काय भागीदारांचे विविध प्रकार सांगा.
सर्वांतर्फे एकाने किंवा काहींनी अथवा सर्वांनीच चालवलेल्या व्यवसायातील नफ्याचे आपापसात वाटणी करण्याची ज्या ज्या व्यक्तींनी ठरवले आहे, अशा सर्व व्यक्तींच्या परस्पर संबंधाला भागीदारी असे म्हणतात.
भागीदारांचे आठ प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.
1. सक्रिय भागीदार
2. निष्क्रिय भागीदार
3. नामधारी भागीदार
4. अज्ञान भागीदार
5. नकार देण्याचा अधिकार नसलेला भागीदार
6. तोतया भागीदार
7. नफ्यातील भागीदार
8. आभासी भागीदार
असे भागीदाराचे अनेक प्रकार असतात.
पुढील वाचन :