भागीदारी संस्था म्हणजे काय – प्रकार, वैशिष्ट्ये व माहिती

By | December 3, 2022

Partnership information in marathi – भागीदारी संस्था हा वाणिज्य संघटनेचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. सुरुवातीला व्यवसायाची पूर्ण जबाबदारी एकाच व्यक्तीने स्वीकारल्यामुळे एकल व्यापारी संस्था निर्माण झाली. पण हवे पर हळूहळू वाढत असल्याने एकल व्यापाऱ्याला बरेच मर्यादा जाणवू लागल्या. जसे की, यंत्रसामग्री कच्चामाल भांडवल आणि व्यवस्थापन यावर नियंत्रण ठेवणे.

यातून मार्ग काढण्यासाठी एकाच व्यापाऱ्यांकडून पगारी नोकर ठेवण्याची सुरुवात झाली. या नोकरांना पगार तर मिळत असे पण त्यांचा स्वतःचा व्यवसाय नसल्यामुळे ते मनपूर्वक काम करत नसे.

जर पगारी नोकरांना व्यवसायाच्या मालकीत समावेश करून घेतले तर ते मनपूर्वक काम करतील, या आशेने भागीदारी संस्थेची निर्मिती झाली.

या लेखातून आपण भागीदारी संस्था म्हणजे काय, त्यांचे प्रकार, वैशिष्ट्ये व माहिती (Partnership information in marathi) जाणून घेणार आहोत.

Table of Contents

भागीदारी संस्था म्हणजे काय व्याख्या मराठी (partnership defination in marathi)

Partnership information in marathi

सर्वांतर्फे एकाने किंवा काहींनी अथवा सर्वांनीच चालवलेल्या व्यवसायातील नफ्याचे आपापसात वाटणी करण्याची ज्या ज्या व्यक्तींनी ठरवले आहे, अशा सर्व व्यक्तींच्या परस्पर संबंधाला भागीदारी असे म्हणतात.

वरील भागीदारीचे व्याख्या भारतीय भागीदार कायदा 1932 नुसार आहे. यामध्ये व्यवसाय शब्द वापरला असून या शब्दाचा अर्थ वस्तूच्या खरेदी विक्री मधून संपत्ती निर्माण करणे होय.

भागीदारी व्यवसायाच्या मालकांना भागीदार (partner) असे म्हणतात. त्या सर्वांनी मिळून चालवलेल्या संस्थेला भागीदारी संस्था (partnership firm)असे म्हणतात. तर या संस्थेला दिलेले नाव म्हणजे Firm’s Name होय.

भागीदारी संस्थेमध्ये कमीत कमी दोन व जास्तीत जास्त वीस व्यक्ती असणे अपेक्षित असते. जर यापेक्षा संख्या कमी व अधिक असेल तर तिला भागीदारी संस्था म्हणता येत नाही. जर दोन पेक्षा कमी असेल तर तिला एकल व्यापारी म्हणता येईल आणि 20 पेक्षा अधिक असेल तर तिला एक कंपनी संस्था म्हणून नोंदणी करावी लागेल.

भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये माहिती मराठी (features of partnership firm marathi)

1. करारातून निर्मिती – भागीदारी संस्था स्थापन करण्यासाठी दोन किंवा अधिक व्यक्तींची गरज असते. या व्यक्ती एकत्र आल्यावर त्यांच्यात व्यवसायासंबंधी तोंडी किंवा लेखी करार होतो. अशाप्रकारे भागीदारीची निर्मिती व्यवसायाच्या केलेल्या करारातून होत असते.

2. सभासद संख्या – वरीलप्रमाणे भागीदारी संस्था निर्मितीसाठी कमीत कमी दोन व जास्तीत जास्त वीस व्यक्ती असणे आवश्यक असते. जर या नियमात व्यवसाय येत नसेल तर ती भागीदारी संस्था होऊ शकत नाही.

3. नफ्याची/तोट्याची वाटणी – व्यवसायाचा मुख्य उद्देश म्हणजे नफा मिळवणे हा असतो. भागीदाराच्या झालेल्या करारानुसार प्रत्येक भागीदारास ठरल्याप्रमाणे नफा वाटून दिला जातो. जर व्यवसायात तोटा झाला असेल, तर करारानुसार प्रत्येक भगिदारस त्याचा वाट्याचा तोटा सहन करावा लागतो.

4. भागीदारी संस्था मालकी – एकल व्यवसायात व्यवसायाचा मालक एकच असतो. तसेच भागीदारी संस्थेमध्ये व्यवसायाचे मालक हे सर्व भागीदार असतात.

5. भागीदारांमधील प्रतिनिधित्व – अनेक भागीदार असल्यामुळे व्यवसायाचे नियोजन करण्यासाठी सर्वांच्या मतानुसार एक भागीदार निवडला जातो, जो आपल्या व्यवसायाचे आणि भागीदारांचे प्रतिनिधित्व करून व्यवहार करेल.

6. व्यवसाय निर्मिती – भागीदारी संस्था स्थापन करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे व्यवसाय करणे हा असतो व यात झालेला नफा वाटून घेणे. म्हणून भागीदारी संस्था स्थापन झाले की, कोणत्या ना कोणत्या व्यवसायाची सुरुवात होते.

7. व्यवसाय नियंत्रण – भागीदारी संस्थेमध्ये सर्व भागीदारांना व्यवसायावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार असतो पण ते सर्व जणांना शक्य नसते. यामुळे सर्वांच्या निर्णयानुसार एक किंवा दोन भागीदार दैनंदिन व्यवस्थापनात सहभागी होतात, त्यांना व्यवस्थापकीय भागीदार असे म्हणतात.

8. अमर्यादित जबाबदारी – भागीदारी संस्थेवर असलेले कर्ज चुकते करण्याचे सर्व भागीदारांची जबाबदारी असते. हे कर्ज फेडत असताना आपली स्वतःची वैयक्तिक मालमत्ता देखील विकावी लागते. अशा अमर्यादित जबाबदारीमुळे सर्व भागीदार व्यवसायाकडे जास्त लक्ष देतात आणि त्यातून चांगला नफा मिळवण्यासाठी प्रयत्न करतात.

भागीदारीचे प्रकार माहिती मराठी (Partnership types in marathi)

भागीदाराचे प्रमुख दोन प्रकार आहेत. पहिला सर्वसाधारण भागीदारी आणि दुसरा मर्यादित भागीदारी.

1. सर्वसाधारण भागीदारी – हा प्रकार भारतामध्ये लोकप्रिय असून जास्त प्रमाणात या भागीदाराचा वापर केला जातो. या भागीदारीचे देखील तीन उपप्रकार पडतात.

अ) इच्छेनुसार भागीदारी – या भागीदारीच्या करारामध्ये कोणत्याच कालावधीचा उल्लेख नसून, भागीदारांची इच्छा असेपर्यंत ही संस्था चालवली जाते. एखाद्या भागीदारास संस्था बंद करायची असली, तर तशी नोटीस सगळ्या भागीदारांना पाठवून ही संस्था लगेच बंद करू शकतो. यासाठी कमीत कमी 14 दिवस आधी पूर्व सूचना द्यावी लागते.

ब) ठराविक काळासाठी भागीदारी – या प्रकारात काही ठराविक काळासाठी भागीदारी केली जाते. हा कालावधी पूर्ण झाल्यावर भागीदारी संस्था बंद केली जाते.

क) विशिष्ट भागीदारी – एखादे विशिष्ट प्रकारचे काम करण्यासाठी जर भागीदार एकत्र आले असेल तर त्याला विशिष्ट भागीदारी असे म्हणतात. ते काम पूर्ण झाल्यावर भागीदारी संपुष्टात येते.

उदाहरणार्थ. एखाद्या कंपनीचे हिशोब तपासण्यासाठी ऑडिटर यांनी केलेली भागीदारी. कंपनीचा हिशोब तपासून पूर्ण झाल्यावर ही भागीदारी संपुष्टात येते.

2. मर्यादित भागीदारी – हा भागीदारीचा प्रकार इंग्लंडमध्ये असून भारतात अस्तित्वात नाही. यामध्ये भागीदारी संस्थेची कर्ज फेडण्याची एकाला सोडून सर्व भागीदारांची जबाबदारी असते. ज्या भागीदाराला कर्ज पेरण्यातून सूट मिळते त्याला मर्यादित भागीदार असे म्हणतात.

अशा मर्यादित भागीदाराला संस्थेच्या व्यवस्थापनात भाग घेण्याचा अधिकार नसतो.

याउलट भागीदारी संस्थेतील एका भागीदाराला अमर्यादित जबाबदारी असते. म्हणजे संस्थेचे कर्ज फेडण्यासाठी भागीदारी संस्थेची मालमत्ता कमी पडली तर त्याला खाजगी मालमत्तेतून भरपाई करून द्यावी लागते.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण भागीदारी संस्था म्हणजे काय – प्रकार, वैशिष्ट्ये व माहिती (Partnership information in marathi) जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ? हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

भागीदारी म्हणजे काय ?

सर्वांतर्फे एकाने किंवा काहींनी अथवा सर्वांनीच चालवलेल्या व्यवसायातील नफ्याचे आपापसात वाटणी करण्याची ज्या ज्या व्यक्तींनी ठरवले आहे, अशा सर्व व्यक्तींच्या परस्पर संबंधाला भागीदारी असे म्हणतात.

भागीदारी संस्था म्हणजे काय ?

व्यवसायाच्या मालकांना भागीदार असे म्हणतात. त्या सर्वांनी मिळून चालवलेल्या संस्थेला भागीदारी संस्था (partnership firm)असे म्हणतात.

पुढील वाचन :

  1. व्यापार म्हणजे काय ?
  2. ग्राहकांचे अधिकार स्पष्ट करा.
  3. अर्थशास्त्राची व्याख्या मराठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *