पर्यावरणाचे महत्व माहिती मराठी – paryavaran in marathi

By | April 12, 2023

Paryavaran in marathi – पर्यावरणाचे महत्व अनन्यसाधारण आहे. पर्यावरण आणि मानव यांचे नाते अतूट आहे. पर्यावरणात सर्व जीवांचा समावेश होतो.

सजीवांच्या नैसर्गिक परिसरास पर्यावरण असे म्हणतात.

शिलावरण, जलावरण, जीवावरण व वातावरण या घटकांनी मिळून पर्यावरण बनले आहे. यामध्ये हवा, जमीन, पाणी, सर्व सजीव-निर्जिव, पर्जन्यमान, उंची, तापमान इत्यादी सर्वांचा समावेश होतो.

यापैकी मानव प्रजात झपाट्याने विकास करत आहे. मागील काही शतकापासून मानव आपले जीवन आनंदमय करण्यासाठी अनेक नवनवीन प्रयोग करत आहे. त्यातील काही प्रयोगांमुळे पर्यावरणातील घटकात बदल होत आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे.

आज आपण पर्यावरणाचे महत्व – paryavaran in marathi आणि पर्यावरण समस्या व उपाय मराठी जाणून घेणार आहोत.

Table of Contents

पर्यावरणाचे महत्व माहिती मराठी – paryavaran in marathi

paryavaran in marathi
paryavaran in marathi
नावपर्यावरण
ठिकाणपृथ्वीग्रह
प्रकारनैसर्गिक साधनसंपत्ती
समावेशसर्व सजीव सृष्टी
इतर निर्जीव घटक
विशेष दिवसपर्यावरण दिन – 5 जून
पर्यावरणाचे महत्व माहिती मराठी – paryavaran information in marathi

1. पर्यावरण हे सर्व सजीव सृष्टीचे घर म्हणून ओळखले जाते. यात निर्जिव घटकांचा देखील समावेश होतो.

2. सर्व सजीव ज्यामधे प्राणी, पक्षी आणि इतर घटक यांना स्वतःची मूलभूत गरजा भागवण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहवे लागते.

3. त्यामुळे आपण नैसर्गिक साधनसंपत्ती जपून वापरली पाहिजे.

4. नैसर्गिक साधनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्या कारणाने, पर्यावरणचे कधीही भरून न येणारे नुकसान होत आहे.

5. परिणामी सजीव सृष्टीवर घातक परिणाम होत आहे.

पर्यावरण कार्यपद्धती मराठी माहिती

6. नैसर्गिक साधनसंपत्ती वाचवणे हे आजच्या काळातील सर्वांत मोठे आव्हान आहे.

7. हे संसाधन दिवसेंदिवस कमी होत आहे. याचे कारण सतत वाढत चाललेली लोकसंख्या, त्यामुळे वाढत चाललेले औद्योगिकीकरण आणि त्यात मानवी जीवन सुखमय व्हावे यासाठीचे प्रयोग दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे.

8. या सर्व कारणांनी नैसर्गिक साधनांचा मर्यादेबाहेर वापर होत आहे त्यामुळे जल, वायू, ध्वनी, अंतराळ आणि माती यांचे इत्यादींचे प्रदूषण होत आहे.

9. यामुळे अनेक पर्यावरणीय समस्यांनी यांनी जगभर गंभीर स्वरूप धारण केले आहे.

8. त्यामुळे सजीवांचे अस्तित्व संपत चालले आहे, त्यात मानवी प्रजातीचेही अस्तित्व धोक्यात आले आहे.

9. यासाठी आपण पर्यावरणाच्या संरचनेचे, स्वरूपाचे आणि त्याच्या विविध घटकांची माहिती घेणे गरजेचे आहे.

10. त्यामुळे आपण प्रत्येकाने एक जागरूक आणि जबाबदार नागरिक बनणे गरजेचे आहे.

10. याची सवय लहानपापासूनच व्हावी म्हणून सर्व शालेय स्तरावर पर्यावर हा विषय अभ्यासला जात आहे.

पर्यावरणशास्त्र – environment information in marathi

11. सजीव आणि निर्जीव घटकांचा परस्पर अंतर्गत असणाऱ्या संबंधांचा अभ्यास करणे, म्हणजे पर्यावरणशास्त्र होय.

12. यामध्ये प्रामुख्याने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, अभियांत्रिकी, भूगोल ,तंत्रज्ञान , अर्थशास्त्र , समाजशास्त्र, नीतिशास्त्र, इतिहास, कला यांचा समावेश होतो.

13. यामध्ये पर्यावरणाचा अभ्यास करणे आणि पर्यावरणीय समस्यांचे निराकरण करणे हा मुख्य उद्देश आहे.

14. पर्यावरणशास्त्रात खालील घटकांवर जास्त भर दिला जातो.

  • पर्यावरण वर आधारित आव्हाने याविषयी संवेदनशीलता आणि जाणीव याबद्दल माहिती.
  • पर्यावरणाची आव्हाने याबद्दल आकलन व ज्ञान माहिती
  • नैसर्गिक साधनसंपत्ती टिकवण्यासाठी उपाययोजना
  • पर्यावरणीय समस्या कमी व्हावी म्हणून नियोजन
  • पर्यावरणीय कार्यक्रमांत सहभाग घेणे

प्रदूषणाचे प्रकार माहिती मराठी

प्रदूषण मुख्यतः वायुप्रदूषण, जलप्रदूषण आणि ध्वनीप्रदुषण असे तीन प्रकार पडतात. याव्यतिरिक्त मृदा आणि नैसर्गिक साधनसंपत्ती यांचे प्रदूषण यांचा समावेश होतो.

वायुप्रदूषण माहिती मराठी – वायु प्रदूषण म्हणजे काय, तर हवेमध्ये झालेले भौतिक, जैविक किंवा रासायनिक बदलामुळे सजीवाच्या आरोग्याला, सुरक्षेला आणि कल्याणला हानी पोहचते. यालाच वायुप्रदूषण असे म्हणतात.

वायुप्रदूषण विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लेख वाचा >> air pollution information in marathi

जलप्रदूषण माहिती मराठी – मानवी कृत्याने पाण्याच्या मूलभूत गुणधर्मात काही बदल होऊन ते पिण्यायोग्य राहत नाही. या पाण्याचा वापर मानवी आणि इतर सजीवांच्या आरोग्यासाठी घातक ठरतो. यालाच जलप्रदूषण असे म्हणता येईल.

जलप्रदूषण विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लेख वाचा >> water pollution information in marathi

ध्वनी प्रदुषण माहिती मराठी – मानवनिर्मित उपकरणांचा आणि इतर मार्गाने मोठा आवाज निर्माण होतो. परिणामी आपल्या ध्वनी ऐकण्याच्या क्षमतेवर घातक परिणाम होतो. यालाच आपण ध्वनी प्रदुषण असे म्हणू शकतो.

मृदा प्रदूषण माहिती मराठी – नैसर्गिक पद्धतीने मातीची धूप होणे अथवा कारखाने किंवा रासायनिक खतांमुळे मातीची सुपीकता कमी होत जाते, परिणामी ती माती पीक उत्पादन घेण्यास सक्षम राहत नाही. यालाच आपण मृदा प्रदूषण असे म्हणू शकतो.

नैसर्गिक साधनसंपत्तीचा अतिवापर हे एक प्रदूषण आहे. मानव विकास करत असताना नैसर्गिक साधनसंपती मोठ्या प्रमाणावर वापरत आहे. यामुळे पृथ्वीवर काही प्रमाणावर ही साधनसंपती संपुष्टात येत आहे. यामध्ये खनिजसंपती, औषधी वनस्पती, वृक्षतोड यांचा समावेश होतो.

पर्यावरणावर परिणाम करणारे घटक

15. पर्यावरणावर प्रामुख्याने दोन घटक परिणाम करतात, ज्या मधील पहिला घटक सजीव आणि दुसरा घटक निर्जीव आहे.

16. सजीवांमधील आंतरक्रिया पर्यावरणावर परिणाम करतात.

17. दिवसेंदिवस वाढत असलेली लोकसंख्या, त्यामुळे वाढत चाललेले शहरीकरण आणि यासाठी होत असणारे जंगलतोड यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा साठा संपत आहे.

18. दिवसेंदिवस वाढत चाललेले जंगलतोडीमुळे जंगलात राहणाऱ्या वन्यजीवांचे हाल होत आहे.

19. त्यामुळे वन्यजीवांचे साखळी विस्कळीत होत आहे. यात काही प्रजाती नष्ट झाल्या आहेत.

20. त्याचबरोबर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर औद्योगीकरण केले जात आहे, या औद्योगिकीकरणात जल प्रदूषण, वायू प्रदूषण, आणि ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे.

21. याच्या व्यतिरिक्त नैसर्गिक आपत्तींमुळे पर्यावरणाचे नुकसान होते. यामध्ये प्रामुख्याने भूकंप, चक्रीवादळ, वणवा, ढगफुटी, दुष्काळ यांचा समावेश होतो.

पर्यावरण समस्या व उपाय मराठी (paryavaran pradushan in marathi information)

पर्यावरणाचे संवर्धन काळाची गरज
पर्यावरणाचे संवर्धन काळाची गरज
समस्याकारणउपाय
जलप्रदूषण1.वाढत्या औद्योगिकरणामुळे
पाण्याच्या साठ्यामध्ये कचरा आणि निरुपयोगी पदार्थ टाकणे.
2. पाण्याचा योग्य वापर न करणे.
3. रासायनिक कचरा पाण्यात सोडणे
रासायनिक कचरा आणि कारखान्यातून होणारे दूषित पाण्याचे योग्य विल्हेवाट लावली.
वायुप्रदुषण1. फटाके फोडणे.
2. कारखान्यातील दूषित वायू हवेत सोडणे.
3. टाकाऊ पदार्थ जाळणे.
1.कारखान्यातील दूषित पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे
2. टाकाऊ पदार्थांचा पुनर्वापर करणे.
3. फटाक्यांचा मर्यादित वापर करावा
ध्वनिप्रदूषणलाऊडस्पीकरचा वापर करणे लाऊडस्पीकरचा वापर आटोक्यात आणणे.
पर्यावरण समस्या (paryavaran pradushan in marathi information)

22. वरील तक्त्यामध्ये काही मूलभूत पर्यावरणीय प्रदूषण – समस्या आणि उपाय मांडले आहेत.

23. कचरा काच, प्लास्टिक, धातू आणि बॅटरी यांना कचऱ्यात वेगवेगळे टाकावे.

24. शक्य असेल तितके टाकाऊ वस्तूंपासून पूर्णवापर करावा.

25. झाडे लावा झाडे जगवा, हा उपक्रम राबविले पाहीले.

26. जंगलतोड आटोक्यात आणण्यासाठी विशेष लक्ष द्यावे.

27. आपल्याकडून नैसर्गिक साधनसंपत्ती योग्य वापर होईल, याची खबरदारी घ्यावी.

28. सौऊर्जा वर आधारीत साधनांचा उपयोग करावा.

29. पेट्रोल, डिझेल सारखे इंधन जपून वापरली पाहिजे.

30. अनधिकृत बांधकामांविरुद्ध आवाज उठवला पाहिजे.

31. पर्यावरण समतोल काळाची गरज आहे, यासाठी विशेष उपक्रम राबवणे.

32. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष खुपचं उपयुक्त आहेत. जर आपल्याला पर्यावरण समतोल राखायचा असेल तर, वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे.

जागतिक पर्यावरण दिन घोषवाक्य

निसर्गाशी मैत्री करूया, जीवन अधिक सुंदर करूया.

वृक्ष आहेत पर्यावरणाचे आभूषण, यामुळे कमी होते प्रदुषण.

निसर्ग माझी माता, मीच तिचा रक्षणकर्ता.

पर्यावरण वाचेल तर जग वाचेल.

झाडे लावा, झाडे जगवा. भविष्य वाचवा, जीवन फुलवा.

paryavaran project information in marathi

paryavarn mahiti marathi language – शाळेत असताना आपल्याला पर्यावरण वर आधारित एक प्रकल्प करायला लावत असे. या प्रकल्पात पर्यावरण विषयी माहिती – paryavarn vishay mahiti द्यावे लागत असे. या प्रकल्पामध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा प्रकल्प म्हणजे झाडे लावा झाडे जगवा होय.

पर्यावरण प्रकल्प प्रस्तावना – यामध्ये आपण जो प्रकल्प सादर करणार आहे, त्याविषयी थोडक्यात माहिती असते. जशी की प्रकल्पाचे नाव, प्रकल्पाची उद्दिष्टे, प्रकल्पाचे विषय.

पर्यावरण वर आधारित करण्यात येणारे काही प्रकल्पाचे नाव (environment project in marathi) – ध्वनी प्रदूषण प्रकल्प, जलसुरक्षा प्रकल्प मराठी, पर्यावरण व्यवस्थापन, पर्यावरण प्रकल्प निरीक्षण मराठी, वायू प्रदूषण समस्या आणि उपाय प्रकल्प मराठी, निसर्ग आपला मित्र प्रकल्प मराठी, पृथ्वी वाचवा पृथ्वी जगवा इत्यादी.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो ?

5 जून जागतिक पर्यावरण दिन या वर्षापासून साजरा केला जातो.

पहिली जागतिक पर्यावरण परिषद कोठे भरली ?

पहिली जागतिक पर्यावरण परिषद स्टॉकहोम या ठिकाणी भरली होती.

पर्यावरणावर कार्य करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कोणती ?

पर्यावरणावर कार्य करण्यासाठी अनेक राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय संस्था आहेत.
त्यापैकी पहिल्या पाच अंतरराष्ट्रीय पर्यावरणीय संस्था 1. IUCN – इंटरनॅशनल युनिअन फॉर कंझर्वेशन ऑफ नेचर
2. IPCC – इंटरगव्हर्न्मेंटल पॅनेल ऑन क्लायमेंट चेंज
3. UNEP – संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम

पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता कोणापासून मिळते ?

पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता सूर्यापासून मिळते.

भारतात पर्यावरण संरक्षण कायदा कधी करण्यात आला ?

भारतात पर्यावरण संरक्षण कायदा इसवी सन 1986 साली करण्यात आला.

पर्यावरण संरक्षण कायद्यात किती अध्याय आहेत ?

पर्यावरण संरक्षण कायद्यात 26 अध्याय आहेत.

पर्यावरण उद्दिष्टे मराठी

पर्यावरणाच्या विविध घटकांना प्रदूषणमुक्त ठेवणे. मानवाला प्रदूषणाच्या परिणामांपासून वाचविणे. अवक्षय होत असलेल्या सजीवांना संरक्षण देणे. पर्यावरणाचा दर्जा राखला जावा ही पर्यावरण व्यवस्थापनाची उद्दिष्टे आहेत.

पर्यावरण स्वरूप व व्याप्ती

पर्यावरणाची व्याप्ती खूप मोठी आहे. मानवनिर्मित आणि प्राकृतिक अश्या सर्व ठिकाणी पर्यावरण सामावलेले आहे.

उद्योगामुळे पर्यावरणावर कोणकोणते परिणाम होऊ शकतात ?

हल्ली वाढत चाललेली उद्योग हे पर्यावरणावर परिणाम करणारा मुख्य घटक आहे. उद्योग ज्या ठिकाणी विकसित होतात, त्या ठिकाणी शहरीकरण वाढत जाते. त्याने जंगलतोड वाढत आहे. तसेच औद्योगिक कारखान्यात तयार होणारे रासायनिक कचरा पाण्यात सोडला जातो. त्याने मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होते. कारखान्यातील दूषित हवा वातावरणात मिसळली जाते, त्याने वायूप्रदुषण होत आहे. उद्योग ज्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणची जमीन नापीक होत जाते. अश्या प्रकारे उद्योगामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

प्राकृतिक पर्यावरण म्हणजे काय ?

पर्यावरण म्हणजे काय (paryavaran manje kai) तर सजीवांच्या नैसर्गिक परिसरास पर्यावरण असे म्हणतात. पृथ्वीच्या भू-भागावर सजीव किंवा निर्जीव घटक नैसर्गिकरित्या निर्माण होतात त्याला नैसर्गिक पर्यावरण किंवा प्राकृतिक पर्यावरण असे म्हणतात.

पर्यावरण व्यवस्थापन म्हणजे काय ?

नैसर्गिक साधनसंपत्ती योग्य वापरून समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केले गेलेले व्यवस्थापन म्हणजे पर्यावरण व्यवस्थापन आहे.

आर्थिक पर्यावरण म्हणजे काय आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा.

पर्यावरणीय धोरणांच्या आर्थिक प्रभावाचा अभ्यास करणे म्हणजे आर्थिक पर्यावरण होय. आर्थिक पर्यावरण वर जैविक आणि अजैविक घटक परिणाम करतात.

पर्यावरण आणि आरोग्य विषयाचे महत्व

पर्यावरण म्हणजे जीवन आणि जीवन म्हणजे पर्यावरण. कारण पर्यावरणाचा एक घटक म्हणजे मानव. त्यामुळे पर्यावरण नाही तर जीवन नाही.

पर्यावरणाचे घटक कोणते ?

शिलावरण, जलावरण, जीवावरण व वातावरण या घटकांनी मिळून पर्यावरण बनले आहे. यामध्ये हवा, जमीन, पाणी, सर्व सजीव-निर्जिव, पर्जन्यमान, उंची, तापमान इत्यादी सर्वांचा समावेश होतो.

पर्यावरणाचे कोणते वेगवेगळे घटक मानवी आरोग्यावर परिणाम करतात ?

पर्यावरणाचे विविध घटक मानवी आरोग्यावर परिणाम करतात. पर्यावरणात काही बदल झाला की तापमान, ऊन, वारा, पाऊस, हवामान यांचा समतोल बिघडतो. परिणामी गंभीर समस्या जाणवतात.

तुमच्या परिसरातील पर्यावरणीय समस्या स्पष्ट करा.

औद्योगिकक्षेत्रात राहत असल्याने येथील नैसर्गिक साधनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणत वापर होत आहे. आजूबाजूचा परिसर दूषित होत आहे. पाणी दूषित होते. जमीन नापीक बनत चालली आहे. तापमान वाढत चाललेले आहे. शहरीकरण वाढत असल्याने जंगलतोड मोठ्या प्रमाणात होत आहे.

प्रदूषणाचे प्रकार किती आणि कोणते आहेत ?

प्रदूषणाचे प्रकार तीन आहेत.
1. जल प्रदूषण
2. वायूू प्रदूषण
3. ध्वनी प्रदुषण

हे देखील वाचा

पर्यावरण निष्कर्ष – सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण पर्यावरणाचे महत्व माहिती मराठी – paryavaran in marathi जाणून घेतली.

पर्यावरण माहिती (environment in marathi) मराठीत आपण पर्यावरण म्हणजे काय (paryavaran mhanje kay) याविषयी माहिती जाणून घेतली. याबरोबरच पर्यावरणीय समस्या व उपाय पाहिले आहेत. त्याचबरोबर प्रदूषणाचे प्रकार माहिती मराठी , पर्यावरणीय समस्या कश्या पद्धतीने कमी करता येईल ? याविषयी माहिती जाणून घेतली.

पर्यावरणाचे महत्व माहिती मराठी – environment information in marathi तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

जर तुम्हाला (paryavaran vishay mahiti) माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

One thought on “पर्यावरणाचे महत्व माहिती मराठी – paryavaran in marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *