वैयक्तिक बजेट म्हणजे काय ?

By | February 4, 2023

Personal Budget In Marathi – मित्रांनो, आपण बजेट म्हणजे अर्थसंकल्प होय. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, येणाऱ्या आर्थिक वर्षात आपल्याकडे किती पैसे जमा होण्याचा अंदाज आहे आणि यातले किती पैसे, कुठे खर्च करायचे याची लेखी स्वरूपात केलेली योजना होय.

अर्थसंकल्प फार किचकट, गंभीर, डोक्यावरून जाणारी गोष्ट नसली तरीदेखील आर्थिक क्षेत्रात याला महत्वाचे मानले जाते. चांगला अर्थसंकल्प आपल्या आर्थिक विकास करण्यास हातभार लावत असतो.

जर तुम्ही वैयक्तिक बजेट कसे करावे (personal budget in marathi) याविषयी माहिती शोधत असाल, तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.

वैयक्तिक बजेट म्हणजे काय (Personal Budget In Marathi)

Personal Budget in Marathi

बजेट हा इंग्रजी शब्द मूळ फ्रेंच Bougette (लहानशी थैली) ह्या शब्दावरून आला आहे. बजेट आपल्या आर्थिक नियोजनाची blueprint असते, त्यामुळे त्याला अर्थसंकल्प असेही म्हणतात.

Budgeting Meaning in Marathi – आपल्या आर्थिक मर्यादेनुसार जमाखर्चाचा केला जाणारा हिशोब म्हणजे अर्थसंकल्प होय. हा संकल्प सरकार, व्यापार, व्यक्तिगत अशा सर्वच पातळीवर केला जातो.

प्रत्येक व्यक्तीला किंवा संघटनेला अर्थसंकल्पाची आखणी करून आपल्या खर्चाचे व उत्पादनाचे नियोजन करावे लागते.

वैयक्तिक बजेट ही एक आर्थिक योजना आहे ज्याद्वारे भविष्यातील वैयक्तिक उत्पन्न, खर्च-बचत आणि कर्ज परतफेडीसाठी वर्षाच्या अगोदरच नियोजन केले जाते. घराचे बजेट तयार होणारा खर्च, उत्पन्नाचे स्त्रोत आणि वैयक्तिक कर्जाचा विचार केला जातो.

तुम्ही चांगले वैयक्तिक बजेट कसे बनवाल (how to make a good budget plan)

वैयक्तिक बजेट हे सहसा कुटुंबातील खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मदत व्हावी यासाठी तयार केले जातात. बजेट तयार केल्याने आर्थिक खर्चावर नियंत्रण ठेवण्यास अधिक मदत मिळते. तसेच पैशांची बचत व गुंतवणूक करणे सोपे होते.

संबंधितपैसा म्हणजे काय माहिती मराठी

जे लोक स्वतःच्या पैशाचे बजेट करतात ते सहसा आर्थिक स्थैर्य प्राप्त करतात. वैयक्तिक बजेट तयार करण्यासाठी पुढील बाबी विचारात घेतल्या जातात.

  1. आपल्या कुटुंबातील एकूण उत्पन्नाचे स्त्रोत कोणते आहेत ?
  2. मागील आर्थिक वर्षात किती खर्च झाला होता ?
  3. या वर्षातील संभाव्य खर्च किती असेल ?

50/30/20 Rule In Marathi – चांगले वैयक्तिक बजेट बनविण्यासाठी 50/30/20 पद्धतीचा अवलंब करा. यामध्ये तुमच्या एकूण उत्पन्नापैकी 50% मूलभूत गरजा, 30% इच्छा आणि 20% बचतीसाठी विचार केला जातो.

कुटुंबातील एकूण उत्पन्नाचे स्त्रोत किती व कोणते आहेत, हे लक्षात घेऊन आपल्या मूलभूत गरजांची यादी करावी. या यादीत कोणतेही व्यर्थ खर्च नसावेत याची खात्री करा.

विमा, टॅक्स, मुलांच्या शाळेचा खर्च, सण उत्सव, घरभाडे, प्रवास खर्च, लाईटबील, रिचार्ज अश्या सर्व खर्चाचे अहवाल तयार करा.यानंतर येणाऱ्या वर्षात आर्थिक उद्दिष्ट ठरवून त्यासाठी आवश्यक साधने व त्यासाठी लागणारा संभाव्य खर्च लिहून काढा.

उदा. आपत्कालीन निधीसाठी बचत करणे, घर खरेदी करणे, व्यवसाय सुरू करणे इत्यादी.आता तुम्हाला उरलेल्या पैश्याची गुंतवणूक करण्यासाठी योजना आखायची आहे.

संबंधितशेअर बाजारात यशस्वी व्यापारी कसे व्हावे ?

यासाठी तुम्ही शेअर बाजार, म्युचुअल फंड योजना, रिअल इस्टेट, फिक्स्ड डिपॉझिट सारखे अनेक उपलब्ध पर्यायांची यादी करा.

उत्पन्नाचे स्त्रोत, खर्च आणि गुंतवणुकीची यादी तयार झाल्यावर स्वतःच्या हिशोबाने यातून कमी महत्वाचे खर्च कमी करावेत.

लक्षात ठेवा, वैयक्तिक बजेट बनविताना आपल्या बजेटची दुसऱ्या कुणाच्या बजेटशी तुलना करू नये.

सारांश

मित्रांनो, आपण बजेट म्हणजे काय याविषयी सविस्तर चर्चा केली आहे. अर्थसंकल्पामुळे पैश्याची चणचण भासत नाही, त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने अर्थसंकल्प तयार करणे आवश्यक आहे.

बजेट आणि इतर कोणत्याही आर्थिक विषयाची सविस्तर माहितीसाठी आमच्या ब्लॉगला भेट द्या. धन्यवाद….

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

कौटुंबिक बजेट म्हणजे काय?

तुमच्या कुटुंबाची उद्दिष्टे आणि गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेला आर्थिक संकल्प म्हणजे कौटुंबिक बजेट होय.

बजेट तयार करताना आधी कोणत्या खर्चाचे नियोजन करावे ?

बजेट तयार करताना आधी मूलभूत खर्चाचे नियोजन करावे.
उदा. रेशन सामान, गॅस बिल, कपडे, घरभाडे, आरोग्य विमा, शाळेचा खर्च इत्यादी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *