भारतातील खनिज तेल माहिती मराठी

Petroleum Information In Marathi – लॅटिन भाषेतील petra ज्याचा अर्थ खडक किंवा खनिज आणि oleum ज्याचा अर्थ तेल असा होतो, या शब्दापासून पेट्रोलियम म्हणजेच खनिज तेल या शब्दाची निर्मिती झाली आहे.

खनिज तेलापासून पेट्रोल, डिझेल, केरोसीन, बेन्झिन, व्हॅसलीन, मेण, प्लॅस्टिक आणि लुब्रिकँट्स ही उपउत्पादने मिळतात. खनिज तेल आणि त्याची उत्पादने यांना एकत्रितपणे काळे सोने (Black Gold) म्हणतात.

वालुकाश्म आणि चुनखडक हे खनिज तेलाचे मुख्य उगमस्थान समजले जाते. सध्याच्या काळात संपूर्ण जगात खनिज तेलाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. यामुळे दिवसेंदिवस याची मागणी वाढत आहे.

या लेखातून आपण खनिज तेल माहिती मराठी (Petroleum information in marathi) जाणून घेणार आहोत.

खनिज तेल माहिती मराठी (Petroleum information in marathi)

Petroleum information in marathi
विषयखनिज तेल
प्रकारद्रवरूप इंधन
वापरइंधन
मुख्य घटकपेट्रोल आणि डिझेल

खडकात आढळणाऱ्या नैसर्गिक तेलाला खनिज तेल म्हणतात. यामध्ये मृत्तिका, काही खनिजे, धातू इत्यादी कमी प्रमाणात असतात.

अशा तेलाची वाफ करून व मग ती थंड करून द्रव पदार्थ मिळविण्याच्या क्रियेने शुद्धीकरण करून त्यापासून पेट्रोल, डिझेल, रॉकेल आणि जळणासाठी वापरण्यात येणारा वायू मिळवला जातो. म्हणून या तेलाला कच्चे तेल (क्रूड ऑइल) असेही म्हणतात.

खनिज तेल हे जमिनीच्या पोटातून मिळवतात. खडकात वायूच्या, द्रवाच्या किंवा घन स्वरूपात खनिज तेल आढळतात.

खनिज तेल हे साधारण पंकाश्म, शेल, वाळूकाश्म व चुन खडक यामध्ये भूभागामध्ये सुमारे 1000 ते 3000 मीटर खोलीवर सापडते. या तेलाचा रंग हिरवा किंवा तपकिरी असतो.

पेट्रोलियमपासून विमानाचे पेट्रोल, डिझेल, केरोसीन, नॅफ्था, वंगण आणि डांबर बनवले जातात. त्यांचा उपयोग इंधन म्हणून तसेच रंग, जंतुनाशके, सुगंधी द्रव्य आणि कृत्रिम धागे तयार करण्यासाठी देखील केला जातो.

Related – अभ्रक खनिजाची माहिती

नैसर्गिक वायू मराठी माहिती (natural gas information in marathi)

natural gas information in marathi

जमिनीतून मिळणाऱ्या खनिज वायूला नैसर्गिक वायू किंवा जीवाश्म इंधन असे म्हणतात. हा वायू अत्यंत ज्वलनशील असतो त्यामुळे याचा वापर इंधन म्हणून करतात.

नैसर्गिक वायूचा मिथेन हा मुख्य घटक असतो. नैसर्गिक वायू रंगहीन आणि गंधहीन असतो. या वायूमध्ये 90 ते 95 टक्के मिथेन तर 5 ते 10 टक्के इतर वायू असतात.

भारतात दरवर्षी लोकसंख्येबरोबरच तेल, नैसर्गिक वायू आणि कोळशासारख्या इंधनांची मागणी देखील वाढत आहे. जागतिक स्तरावरील एकूण ऊर्जा वापराच्या 25 % वाटा नैसर्गिक वायूचा आहे.

साधारणपणे खनिज तेलाच्या ठिकाणी नैसर्गिक वायूचा साठा असतो. भारतात नैसर्गिक वायूचे 700 दशकोटी घ.मी इतके साठे आहेत. यामधे सर्वाधिक बॉम्बे हाय क्षेत्र या ठिकाणी, राजस्थानमधील नागौर व बारसिंगसौर, गुजरातमधील अंकलेश्वर व खंबायतचे आखात, आसाम आणि पंजाबमध्ये नैसर्गिक वायूचे मोठे साठे आहेत.

भारत देशात एकूण 23 तेल शुद्धीकरण प्रकल्प आहेत. यापैकी 18 सार्वजनिक, 3 खासगी तर 2 संयुक्त तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे.

Related – हवेतील वायू माहिती

खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचा वापर (uses of petroleum and natural gas marathi)

खनिज तेल आणि नैसर्गिक वायू वाहतुकीसाठी इंधन म्हणून वापरले जाते. वाहतूक इंधनांमध्ये गॅसोलीन/पेट्रोल, डिझेल, लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (LPG), जेट इंधन आणि सागरी इंधन यांचा समावेश होतो.

कार, ​​मोटारसायकल, हलके ट्रक आणि बोटींमध्ये पेट्रोल वापरले जाते. डिझेलचा वापर ट्रक, बस, ट्रेन, बोटी आणि जहाजे यामध्ये इंधन म्हणून केला जातो. जेट विमाने आणि काही प्रकारचे हेलिकॉप्टर केरोसीनवर चालतात.

आपल्या घरात वीज निर्माण करण्यासाठी इंधन म्हणून याचा वापर करतात. घरात वापरणारे डिटर्जंट, व्हॅसलीन, मेण आणि इतर वस्तू पेट्रोलियमपासून बनवले जातात.

कारखाने आणि मशीन्स चालवण्यासाठी, खत निर्मितीसाठी कच्चा माल आणि प्लास्टिक तयार करण्यासाठी देखील याचा उपयोग केला जातो.

पेट्रोकेमिकल उत्पादनांचा वापर ऑटोमोटिव्ह, कृषी, कापड, बांधकाम, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल, घरगुती वस्तू, वैद्यकीय उपकरणे, पॅकेजिंग आणि फार्मास्युटिकल अशा विविध उद्योगांमध्ये दैनंदिन वापराच्या वस्तूंचे संपूर्ण स्पेक्ट्रम तयार करण्यासाठी केला जातो.

वीजनिर्मिती करण्यासाठी पेट्रोलियम मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. जीवाश्म इंधन ऊर्जा केंद्र वीज निर्मितीसाठी पेट्रोलियम किंवा नैसर्गिक वायू वापरते. कोळसा हा वीज निर्मितीचा प्रमुख स्त्रोत असला, तरीही अनेक देशांच्या ऊर्जा मिश्रणात तेलापासून वीजनिर्मिती केली जाते.

तेलावर चालणारे ऊर्जा प्रकल्प पर्यावरणीय प्रदूषण करतात. तेलावर चालणारे वीज प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते.

खनिज तेलापासून मिळविलेले वंगण घर्षण कमी करण्यासाठी सर्व प्रकारच्या वाहनांमध्ये आणि औद्योगिक मशीनमध्ये वापरले जाते.

खनिज तेल क्रीम्स आणि टॉपिकल फार्मास्युटिकल्सच्या निर्मितीमध्ये वापरले जाते. उच्च पीक उत्पादन घेण्यासाठी कीटकनाशके वापरली जातात, ही कीटकनाशके तयार करण्यासाठी पेट्रोलियमचा वापर होतो.

रासायनिक खते, कृत्रिम फायबर, सिंथेटिक रबर, नायलॉन, प्लास्टिक, कीटकनाशके, परफ्यूम आणि रंग बनविण्यासाठी खनिज तेल वापरले जाते.

Related – दगडी कोळसा माहिती

सारांश

या लेखातून आपण खनिज तेल माहिती (Petroleum information in marathi) मराठीत जाणून घेतली. यात आपण खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचा वापर कशासाठी होतो, याविषयी सर्व माहिती जाणून घेतली आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

भारतात खनिज तेलाचा साठा कोणत्या राज्यात प्रथम सापडला ?

इसवी सन 1865 मध्ये खनिज तेलाचा साठा आसाम राज्यात प्रथम सापडला. आसाममधील मारघेरिटाच्या माकुम नामदा परिसरात पहिल्यांदा तेल सापडले.

भारतात खनिज तेलाच्या खाणी कोठे आहेत ?

भारतात खनिज तेलाच्या खाणी आसाम, गुजरात आणि महाराष्ट्र राज्यात आहेत.
1. आसाम – दिग्बोई, नहरकटिया, रुद्रसागर, नुनमती, लकवा, मोरान हुगरिजान
2. गुजरात – खंबायत, अंकलेश्र्वर, कोयाली, कलोल, नवगाव, ओलपाड
3. महाराष्ट्र – मुंबई हाय आणि भसीन

भारतात सर्वात जास्त खनिज तेलाचे उत्पादन कोणत्या ठिकाणी होते ?

भारतात सर्वात जास्त खनिज तेलाचे उत्पादन आसाम आणि गुजरात या ठिकाणी होते.

नैसर्गिक वायूचे सर्वात जास्त उत्पादन कोठे होते ?

नैसर्गिक वायूचे सर्वात जास्त उत्पादन बॉम्बे हाय क्षेत्रात होते.

नैसर्गिक वायूचा मुख्य घटक कोणता आहे ?

नैसर्गिक वायूचा मुख्य घटक मिथेन हा आहे.

Leave a Comment