पोलंड देशाची माहिती मराठी

poland facts and information marathi – जगातील सर्वात गतीशील अर्थव्यवस्था असणारा पोलंड हा मध्य युरोपातील देश आहे. येथील राहणीमान, जीवन गुणवत्ता, सुरक्षा, शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्यामुळे हा देश नेहमी जगासाठी चर्चेचा विषय असतो.

या लेखातून आपण पोलंड देशाची माहिती मराठी (poland information in marathi) जाणून घेणार आहोत. यातून आपण पोलंड देशातील आश्चर्यकारक रोचक तथ्य आणि इतर माहिती जाणून घेणार आहोत.

पोलंड देशाची माहिती मराठी (poland information in marathi)

poland facts and information marathi
नावपोलंड
प्रकार मध्य युरोपातील देश
राजधानीवर्झावा
क्षेत्रफळ322,575 km²
लोकसंख्या3.78 कोटी (2021)
अधिकृत भाषापोलिश
राष्ट्रीय चलन पोलिश झुवॉटी (युरो)

पोलंड हा देश युरोप खंडातील नवव्या क्रमांकाचा क्षेत्रफळाने मोठा देश आहे. या देशाची राजधानी आणि सर्वात मोठे शहर वर्झावा हे आहे. पोलंडला सोव्हिएत युनियन पासून 11 नोव्हेंबर 1918 रोजी स्वातंत्र्य मिळाले, म्हणून हा दिवस पोलंड देशाचा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो.

पोलंडच्या पूर्वेला बेलारूस व युक्रेन, पश्चिमेला जर्मनी, दक्षिणेला स्लोव्हाकिया आणि उत्तरेला बाल्टिक समुद्र व रशियाचे कालिनिनग्राद ओब्लास्ट आहे.

1 सप्टेंबर 1939 रोजी जर्मनीने पोलंडवर हल्ला केला, हा हल्ला दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात म्हणून ओळखला जातो. या हल्ल्यात सहा दशलक्ष पोलिश नागरिक युद्धामध्ये मरण पावले.

दुसऱ्या महायुद्धानंतर आर्थिक सहकार्य आणि व्यापार वाढ करण्याच्या उद्देशाने युरोपीय देश एकत्र येऊन युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी या संस्थेची स्थापना केली. जर्मनी हल्ल्यात पोलंड झालेल्या नुकसानातून सावरण्यासाठी 1 जानेवारी 2004 रोजी पोलंडने युरोपियन संघात प्रवेश केला.

यानंतर पोलंडने स्तर उंचावत जगभरात आपले स्थान प्रस्थापित केले. आता युरोपियन संघामध्ये GDP नुसार सहाव्या जगातील सर्वात गतीशील अर्थव्यवस्था म्हणून पोलंडची ओळख आहे.

पोलंड हा एक विकसित देशांपैकी एक असून जगभरात येथील राहणीमान, जीवन गुणवत्ता, सुरक्षा, शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्य याविषयी चर्चा होत असते.

या देशातील लोकांची उच्च जीवनशैली आहे. येथील मानवी विकास दर 0.876 इतका आहे. आर्थिक साक्षरता दर 99.79%. इतका आहे. शिक्षणासोबतच येथील लोक खूप धार्मिक आहेत, कॅथोलिक ख्रिश्चन धर्माचे येथे 85 टक्क्यांहून अधिक लोक आहेत.

पोलंड देशात 16 युनेस्को जागतिक वारसास्थाने असून त्यात 15 सांस्कृतिक स्थळे आहेत. याव्यतिरिक्त येथे अनेक ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत. येथील राष्ट्रीय उद्यान, ऐतिहासिक किल्ले आणि निसर्ग सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करतात.

येथील थंड प्रदेशांमध्ये बीच, फर, ओक, ॲश, एल्म, बर्च, पॉप्लर यासारखे रुंदपर्णी व पानझडी असे वृक्ष आढळतात. पानझडी जंगलांमध्ये रेड हरिण, रानडुक्कर, रो हरीण असे प्राणी वास्तव्य करतात.

डोंगराळ प्रदेशांमध्ये टंड्रा स्वरूपाच्या वनस्पती आहेत. या भागात सूचिपर्णी वृक्षांच्या जंगलांत ब्लॅक ग्राउस, नट, क्रॅकर इ. पक्षी व कार्पेथियन पर्वतात शॅम्वा, माँर्मांट, खार, हॅम्स्टर, यूरोपियन गवा यांसारखे प्राणी आढळतात.

पोलंड देशात गंधक खनिज मोठ्या प्रमाणात असून चॉक, संगमवर दगड, जिप्सम, मीठ, केओलिन, चुनखडक या खनिजांचे मुबलक साठे आहेत.

पोलंड देशाची आर्थिक सुधारणांमागे येथील उद्योगांचा मोठा वाटा आहे. येथील 45 टक्के लोक शेती करतात तर उर्वरित लोकांचा उद्योग क्षेत्रात काम करतात.

येथील प्रमुख उद्योगांमध्ये खाद्य पदार्थांची निर्मिती, कापड उद्योग, यंत्र उद्योगांमध्ये ट्रॅक्टर, रेल्वे, सिमेंट, पोलाद निर्मिती अशा उत्पादनाचा समावेश होतो. पोलंड देशात मोठ्या प्रमाणावर कच्चामाल आणि कोळशाच्या खाणी आहेत. अशा विविध कारणाने देशातील उद्योग क्षेत्र झपाट्याने वाढत आहे.

पोलंड देशात मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय चालतो. पोलंडच्या उत्तर आणि मध्य प्रदेशात बटाटा आणि गहू हे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

शेती व्यवसायांमध्ये जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय आणि वराह पालन केले जाते. देशातील सुपीक भागात बीट, गहू, फळे आणि फळभाज्या तसेच बटाटे, ओट अशी पिके घेतली जातात.

पोलंड देशातील आश्चर्यकारक रोचक तथ्य (poland facts and information marathi)

1. पोलंड हा छोटा देश नसून, तो युरोपमधील सर्वात मोठ्या देशांपैकी एक इटली आणि यूकेपेक्षा मोठा आहे.

2. पोलानी या जमातीच्या नावावरून या देशाचे नाव पडले आहे. पोलानी म्हणजे खुल्या शेतात राहणारे लोक यावरूनच पोलंड म्हणजे खुल्या शेतात राहणारे लोकांचा देश असे नाव ठेवण्यात आहे.

3. पोलंड देशाने स्वातंत्र्यासाठी 40 वेळा लढा दिला आहे. इसवी सन 1772 ते 1795 या काळात पोलंड जगाच्या नकाशातून गायब झाला.

4. इसवी सन 1853 साली इग्नेसी लुकासिविचने युरोपमधील पहिला आधुनिक पथदिवा (first modern street lamp) शोधून काढला. या दिव्याचा पहिल्यांदा वापर युक्रेनमधील ल्विव्हमध्ये केला गेला.

5. वॉरसॉमध्ये ओल्ड टाउन हे युद्धापूर्वीचे खरे जुने शहर नसून हे पोल्सने बर्नार्डो बेलोटोच्या तपशीलवार चित्रांचा वापर करून युद्धानंतर ते पुन्हा तयार केले. मूळ ओल्ड टाउन शहर 40व्या दशकात झालेल्या बॉम्बस्फोटात बरखास्त झाले होते.

6. दोन वेगवेगळ्या विज्ञानांमध्ये नोबेल पारितोषिक जिंकरी महिला मेरी क्युरी ही फ्रेंच नसून पोलिश होती. पियरे क्युरी नावाच्या फ्रेंच माणसाशी लग्न करण्यापूर्वी तिचे नाव मेरी स्कोलोडोस्का होते. नोबेल पारितोषिक जिंकणारी ती पहिली महिला होती.

7. पोलंडमध्ये समुद्रकिनारे, पर्वत, जंगले, वाळवंट आणि तलाव आहेत. पोलंडमध्ये 16 जागतिक वारसा स्थळे आहेत. यामधे असणारा मालबोर्क हा किल्ला जगातील सर्वात मोठा किल्ला आहे.

8. जर तुम्ही पोलंडमधील एखाद्याच्या घरात किंवा चर्चमध्ये टोपी घालून गेले तर त्यांचा अनादर केला असे मानले जाते.

9. पोलंडमधील लोक वाढदिवसाऐवजी नाव दिवस साजरा करतात. हा दिवस त्यांच्या नावावर असलेल्या संताच्या स्मरणार्थ असतो. प्रत्येक दिवसाशी संबंधित नावे पोलंडमधील सर्व कॅलेंडरमध्ये सूचीबद्ध आहेत.

10. उन्हाळ्यात पोलंड लोक जंगली मशरूमसाठी जंगलात जातात. आपल्या मुलांना विषारी मशरूमपासून खाण्यायोग्य मशरूम वेगळे कसे निवडावे याचे शिक्षण त्यांना दिले जाते.

11. इसवी सन 1275 मध्ये सुरू झालेले Piwnica Swidnicka हे युरोपमधील सर्वात जुने रेस्टॉरंट आहे. तुम्ही या रेस्टॉरंट मध्ये आजही जाऊ शकता.

सारांश

या लेखातून आपण पोलंड देशाची माहिती मराठी (poland information in marathi) जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ? हे आम्हाला नक्की कळवा. बाकी लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

पोलंड देश कोणत्या खंडात आहे ?

पोलंड हा मध्य युरोप खंडातील एक देश आहे. हा देश युरोपातील नवव्या क्रमांकाचा क्षेत्रफळाने मोठा असणारा देश आहे.

पोलंड देशाची राजधानी कोणती आहे ?

पोलंड या देशाची राजधानी आणि सर्वात मोठे शहर वर्झावा हे आहे.

पुढील वाचन :

  1. तुर्की देशाची माहिती (Turkey information in marathi)
  2. पापुआ न्यू गिनी देशाची माहिती मराठी (papua new guinea in marathi)
  3. आशिया खंडातील देश व त्यांच्या राजधानी माहिती मराठी

Leave a Comment