Prem Mhanje Kay Asta Kavita Lyrics – नमस्कार मित्रांनो, आज आपण जरा वेगळाच विषयावर बोलणार आहोत. प्रेम, तुमच्या माझ्या आयुष्यातील एक जिव्हाळ्याचा विषय ☺️ खर तर प्रेमाचे बंध हे संपूर्ण आयुष्यभरासाठी असतात म्हणून तर जगात प्रेमाशिवाय कोणीही जगू शकत नाही.
कारण प्रेम ही एक अशी भावना आहे जिला शब्दात व्यक्त करता येत नाही, ती फक्त अनुभवता येते आणि ज्याने ही अनुभवली आहे त्याचे जीवन आनंदमय बनत जाते.
प्रेम म्हणजे काय ? हे एका ओळीत सांगणे फारच अवघड आहे. कारण प्रेम ही एक सुंदर भावना आहे, जी फक्त अनुभवता येते आणि ही भावना एका हृदयातून जन्माला येते आणि दुसऱ्याच्या हृदयाला स्पर्श करते.
या लेखातून मी तुमच्यापुढे कवी मंगेश पाडगावकर लिखित प्रेम म्हणजे काय असतं (Prem Mhanje Kay Asta Kavita) यावर आधारित कविता सादर करणार आहे. या कवितेतून त्यांनी अगदी मोजक्या शब्दात प्रेम म्हणजे काय याचा उलगडा केला आहे.
प्रेम म्हणजे काय असतं कविता (Prem Mhanje Kay Asta Kavita Lyrics)

कवितेचे नाव | प्रेम म्हणजे प्रेम असतं |
कवीचे नाव | मंगेश पाडगावकर |
साहित्य प्रकार | कविता |
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं ! काय म्हणता ? या ओळी चिल्लर वटतात? काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात ? असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे ! तरीसुद्धा तरीसुद्धा, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं ! मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं; उर्दुमधे इश्क म्हणून प्रेम करता येत; व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं; कोन्वेंटमधे शिकलात तरी प्रेम करता येतं ! सोळा वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात, जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लगतात ! आठवतं ना ? तुमची आमची सोळा जेव्हा, सरली होती, होडी सगळी पाण्याने भरली होती ! लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो, होडी सकट बूडता बूडता वाचलो होतो ! बुडलो असतो तरीसुद्धा चाललं असतं; प्रेमानेच अलगद वर काढलं असतं ! तुम्हाला ते कळलं होतं, मलासुद्धा कळलं होतं ! कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं ! प्रेमबीम झूट असतं म्हणणारी माणसं भेटतात, प्रेम म्हणजे स्तोम नुसतं मानणारी माणसं भेटतात ! असाच एक जण चक्क मला म्हणाला, “आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही; पाच मुलं झाली तरी प्रेमबीम कधीसुद्धा केलं नाही ! आमचं काही नडलं का? प्रेमाशिवाय अडलं का?” त्याला वाटलं मला पटलं ! तेव्हा मी इतकंच म्हटलं, “प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं !” तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने, एक चॉकलेट अर्धं अर्धं खाल्लं असेल गोडीने ! भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासन् तास फिरला असाल, झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल ! प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं, प्रेम कधी भांडतंसुद्धा ! दोन ओळींची चिठीसुद्धा प्रेम असतं, घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं ! प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !
या कविता तुम्हाला वाचायला आवडेल
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
मंगेश पाडगावकरांनी कोणता कविता संग्रह लिहिला आहे ?
मंगेश पाडगावकरांनी अनेक कविता संग्रह लिहिले आहेत. यापैकी सलाम या कविता संग्रहासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्याची इतर काव्यसंग्रह पुढीलप्रमाणे आहेत.
कबीर, उत्सव, उदासबोध, आनंदाचे डोही, आनंदऋतू, चांदोमामा, गिरकी, गझल, काव्यदर्शन, कविता माणसाच्या माणसासाठी, त्रिवेणी, तृणपर्णे, तुझे गीत गाण्यासाठी, जिप्सी, छोरी, मीरा,भोलानाथ, भटके पक्षी, बोलगाणी, धारानृत्य, वेड कोकरू, वात्रटिका, राधा, मोरू, मुखवटे, शोध कवितेचा, शर्मिष्ठा, शब्दवेड कोकरू, क्षणिका, सूरदास, सूर आनंदघन, सुट्टी एक्के सुट्टी इत्यादी.
मंगेश पाडगावकर यांच्या ललित निबंधाच्या संग्रहाचे नाव काय आहे ?
मंगेश पाडगावकर यांच्या ललित निबंधाच्या संग्रहाचे नाव द काॅज हे आहे.
सलाम या कवितासंग्रहाचे कवी कोण आहेत?
सलाम या कवितासंग्रहाचे कवी मंगेश पाडगावकर हे आहेत.