President Of India Information In Marathi – भारताचे राष्ट्रपती हे केंद्रीय कार्यकारी मंडळाचे आणि केंद्रीय कायदेमंडळाचे घटक असतात. राष्ट्रपती हे भारतीय संघटनेचे कार्यकारी अधिकारी असतात. राष्ट्रपती हा भारताचा प्रथम नागरिक असून घटनेने त्याला सर्वक्षेत्रात अग्रतेचा मान दिला आहे.
या लेखात आपण भारताचे राष्ट्रपती माहिती मराठी (president of india information in marathi) सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
भारताचे राष्ट्रपती माहिती मराठी (president of india information in marathi)

विषय | राष्ट्रपती |
समावेश | केंद्रीय कार्यकारी मंडळ |
निवड | अप्रत्यक्ष पद्धत (कलम 54 नुसार) |
कार्यकाल | 5 वर्ष (कलम 56 नुसार) |
president of india information in marathi – कलम 52 नुसार घटनेने राष्ट्रपती पदाची निर्मिती होत असते. म्हणून राष्ट्रपतींना घटनात्मक प्रमुख असे म्हणतात. कलम 53 (1) नुसार राष्ट्राची सर्व कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींकडे असते.
भारताचा राष्ट्रपती होण्यासाठी कलम 58 मध्ये पात्रता निकष दिले आहेत. या कलमानुसार भारताचे राष्ट्रपती होण्यासाठी भारतीय नागरिकत्व असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराचे वय 35 वर्ष पूर्ण पाहिजे. यासोबतच उमेदवारास लोकसभेतून निवडून येण्याची पात्रता आवश्यक असते.
कलम 59 नुसार राष्ट्रपतीपदाचा उमेदवार संसद किंवा घटक राज्याचा विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहात सभासद नसला पाहिजे, जर तो उमेदवार संसद किंवा घटक राज्याच्या विधीमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सभासद म्हणून आढळून आला तर त्याचे पहिले सदस्यत्व संपुष्टात येते.
राष्ट्रपतीची निवड कोणत्या पद्धतीने होते (presidential elections india information in marathi)
presidential elections india information in marathi – राष्ट्रपतींची निवड अप्रत्यक्ष पद्धतीने निर्वाचक गणांच्या सदस्यांमधून होत असते. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे (लोकसभा व राज्यसभा) यातील निवडून आलेले सदस्य आणि घटक राज्यांच्या विधानसभांची निवडून आलेले सदस्य मतदान करतात.
जम्मू काश्मीर, दिल्ली आणि पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे निवडून आलेले सदस्य देखील राष्ट्रपतींच्या निवडणुकीत सहभागी होतात.
राष्ट्रपतींच्या निवडणूकीत 776 खासदार आणि 4120 आमदारांच्या मतांचे मूल्य 10,98,882 इतके आहे.
संविधानाच्या कलम 56 नुसार राष्ट्रपतींचा कार्यकाल पाच वर्ष असतो. त्यानंतर उमेदवार हा पुन्हा कितीही वेळा निवडणूक लढवू शकतो.
राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारास भारतीय रिझर्व बँकेत 15,000 अनामत रक्कम जमा करावी लागते. राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पदाची शपथ देतात. या शपतेत संविधान व कायद्याचे जतन करणे व जनतेच्या कल्याणास वाहून घेणे याचा समावेश असतो.
राष्ट्रपतीपदासाठी निवडुन आलेल्या उमेदवारास भारताच्या एकत्रित व संचित निधीतून वेतन आणि भत्ते दिले जातात. यानुसार पाच लाख रुपये दरमहा आणि भत्ते दिले जातात. सुरुवातीला राष्ट्रपतींचे वेतन (president salary india) हे दीड लाख रुपये दरमहा होते, पण 1 फेब्रुवारी 2018 रोजी त्यांच्या वेतनात बदल होऊन पाच लाख रुपये दरमहा करण्यात आले.
राष्ट्रपतींचे अधिकार आणि कार्य माहिती मराठी (president rights and duties information in marathi)
president rights and duties information in marathi – भारताचे सर्व कार्यकारी अधिकारी राष्ट्रपतींकडे असतात. भारत सरकारचा संपूर्ण शासकीय कारभार राष्ट्रपतीमार्फत चालतो. भारताच्या केंद्र शासनाने केलेले सर्व करार हे राष्ट्रपतींनी केले आहेत असे मानले जाते.
president appointed to – राष्ट्रपती भारताच्या महत्वाच्या व्यक्तींच्या नेमणुका करतात. त्या पुढीप्रमाणे.
- पंतप्रधान
- मंत्रिमंडळ
- भारताचे महालेखापाल
- भारताचे महान्यायवादी
- वित्त आयोग
- लोकपाल
- निर्वाचन आयोग
- भाषा आयोग
- घटक राज्याचे राज्यपाल
- रिझर्व बँकेचे गव्हर्नर
- केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य
- केंद्रशासित प्रदेशांचे चीफ कमिशनर
- सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश
- दिल्ली आणि पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांची नेमणूक
राष्ट्रपती हे भारताच्या तिन्ही सेनादलांचे सरसेनापती असतात. ते तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांच्या नेमणुका करतात. शत्रू राष्ट्रांचे युद्ध घोषित करण्याचा आणि युद्धसमाप्तीनंतर घोषणा करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो.
राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय कोणत्याही विधेयकाचे कायद्यात रूपांतर होत नाही. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर झालेले एखादे विधेयक अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाते. राष्ट्रपती हे विधेयक मंजूर करू शकतात किंवा नाकारू शकतात अथवा संसदेकडे फेरविचारासाठी पाठवू शकतात.
काही महत्वाच्या विधेयकांना पूर्व परवानगी देण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे, ते पुढीलप्रमाणे
- नवीन राज्य तयार करण्यासंबंधीचे विधेयक
- एखाद्या घटक राज्याची सीमारेषा बदलण्याचे विधेयक
- अर्थविधेयक
- राज्याच्या व्यापाराच्या स्वातंत्र्यावर मर्यादा आणणारे विधेयक
राष्ट्रपतींना क्षमादानाचा अधिकार (president pardoning power) आहे. यालाच राष्ट्रपतींचा माफीचा अधिकार किंवा दयेचा अधिकार असे म्हणतात.
वार्षिक वित्तीय विवरणपत्र (वार्षिक बजेट) राष्ट्रपतींची संमती घेऊनच संसदेत सादर केले जाते. महापूर, दुष्काळ, युद्ध परिस्थितीत आकस्मिक निधीतून पैसे खर्च करण्यासाठी राष्ट्रपतींची पूर्वपरवानगी आवश्यक असते.
भारताचे राजदूत व उच्चयुक्त यांची पदेशात नियुक्ती राष्ट्रपती मार्फत केले जाते. परराष्ट्रांशी विविध करार करणे आणि त्या कराराची अंमलबजावणी करणे, याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. आंतरराष्ट्रीय संमेलन आणि परिषदा यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व राष्ट्रपतींना करावे लागते.
एखाद्या किंवा काही घटक राज्यात घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाल्यास राष्ट्रपती राज्यपालांच्या सल्ल्यानुसार त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू (president rule) करू शकतात.
युद्ध, बाह्य आक्रमण किंवा शस्त्र उठाव यामुळे देशाच्या एखाद्या प्रदेशात संरक्षणाचा धोका निर्माण झाल्यास राष्ट्रपती कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी (national emergency) जाहीर करू शकतात.
भारताचे राष्ट्रपती आणि कार्यकाल यादी (president of india list from 1947 to 2022)
राष्ट्रपती | कार्यकाल |
---|---|
डॉ. राजेंद्र प्रसाद | 26 जानेवारी 1950 ते 13 मे 1962 |
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन | 13 मे 1962 ते 13 मे 1967 |
डॉ. झाकीर हुसेन | 13 मे 1967 ते 3 मे 1969 |
डॉ. वराह व्यंकट गिरी (कार्यकारी) | 20 मे 1969 ते 20 जुलै 1969 |
न्या. महंमद हिदायतुल्ला (कार्यकारी) | 20 जुलै 1969 ते 21 ऑगस्ट 1969 |
डॉ. वराह व्यंकट गिरी | 24 ऑगस्ट 1969 ते 24 ऑगस्ट 1974 |
फक्रुद्दीन अली अहमद | 24 ऑगस्ट 1974 ते फेब्रुवारी 1977 |
बी.डी. जत्ती (कार्यकारी) | 11 फेब्रुवारी 1977 ते 25 जुलै 1977 |
डॉ. नीलम संजीव रेड्डी | 25 जुलै 1977 ते 25 जुलै 1982 |
ग्यानी झैलसिंग | 25 जुलै 1982 ते 25 जुलै 1987 |
राधास्वामी व्यंकटरमण | 25 जुलै 1987 ते 25 जुलै 1992 |
डॉ. शंकरद्याल शर्मा | 25 जुलै 1992 ते 25 जुलै 1997 |
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम | 25 जुलै 1997 ते 25 जुलै 2002 |
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम | 25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007 |
श्रीमती प्रतिभाताई पाटील | 25 जुलै 2007 ते 25 जुलै 2012 |
प्रणव मुखर्जी | 25 जुलै 2012 ते 25 जुलै 2017 |
रामनाथ कोविंद | 25 जुलै 2017 ते 25 जुलै 2022 |
द्रौपदी मुर्मू | 25 जुलै 2022 |
सारांश
आजच्या या पोस्टमध्ये आपण भारताचे राष्ट्रपती माहिती मराठी (president of india information in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली.भारताचे राष्ट्रपती माहिती मराठी (president of india information in marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हे होते. डॉ. राजेंद्र प्रसाद हे सलग दोन वेळा राष्ट्रपती पदावर राहिलेले पहिले आणि एकमेव व्यक्ती आहेत.
भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण होते ?
भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती झाकीर हुसेन हे होते.
भारताचे दुसरे मुस्लिम राष्ट्रपती कोण होते ?
भारताचे दुसरे मुस्लिम राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद हे होते.
भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?
भारताचे पहिले शिक्षक राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग हे होते.
भारताचे पहिले दलित राष्ट्रपती कोण होते ?
भारताचे पहिले दलित राष्ट्रपती कोचेरिल रामन नारायणन (के. आर नारायणन) हे होते.
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या ?
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या होत्या.
भारताचे राष्ट्रपती बनलेले पहिले वैज्ञानिक कोण होते ?
भारताचे राष्ट्रपती पहिले पहिले वैज्ञानिक डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम हे होते.
भारतातील बिनविरोध निवडून आलेले पहिले व भारताचे सर्वात तरुण राष्ट्रपती कोण होते ?
भारतातील बिनविरोध निवडून आलेले पहिले व भारताचे सर्वात तरुण राष्ट्रपती एन. एस. रेड्डी होते.
भारतातील अपक्ष निवडून आलेले पहिले राष्ट्रपती कोण होते ?
भारतातील अपक्ष निवडून आलेले पहिले राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी हे होते.
भारतातील सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले राष्ट्रपती कोण होते ?
भारतातील सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद होते.
भारतातील सर्वात कमी मतांनी निवडून आलेले राष्ट्रपती कोण होते ?
भारतातील सर्वात कमी मतांनी निवडून आलेले राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी होते.
भारताचे राष्ट्रपती पद भूषवलेले उपराष्ट्रपती कोण आहेत ?
भारताचे राष्ट्रपती पद भूषवलेले सहा उपराष्ट्रपती आहेत. ते पुढीलप्रमाणे.
1. डॉ. एस. राधाकृष्णन
2. डॉ. झाकीर हुसेन
3. व्ही. व्ही. गिरी
4. आर. वेंकटरामन
5. डॉ. शंकर दयाल शर्मा
6. डॉ. के. आर. नारायणन
राष्ट्रपती राजवट म्हणजे काय ?
राष्ट्रपती राजवट म्हणजे राज्य सरकारचे निलंबन आणि थेट केंद्राची राजवट लागू करणे.
पुढीलपैकी चार कारणाने राष्ट्रपती राजवट लागू होते.
1. संविधानानुसार राज्यात सरकार स्थापन झाले नसेल तर.
2. स्थापन झालेले सरकार संविधानानुसार काम करत नसेल तर.
3. सरकारला स्पष्ट बहुमत मिळाले नसेल तर किंवा मिळवलेले बहुमत गमावले तर.
4. केंद्राने दिलेल्या निर्देशांकांची राज्य सरकारला अंमलबजावणी करत नसेल तर.
सर्वात जास्त राष्ट्रपती राजवट कोणत्या राज्यात लागू झाली ?
सर्वात जास्त राष्ट्रपती राजवट मणिपूर राज्यात लागू झाली.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट किती वेळा लागली ?
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट तीन वेळा लागली.