प्रॉक्सी सर्व्हर माहिती मराठी

Proxy Meaning In Marathi – इंटरनेटचा शोध हा मानवी युगाच्या विकासातील महत्वाचा टप्पा मानला जातो. याद्वारे आपण विविध माहिती, संदेशाची देवाणघेवाण, मनोरंजन करत असतो. अशा काहीतरी कारणाने आज मोठ्या प्रमाणावर इंटरनेटचा वापर वाढत आहे.

आपल्याला हवी असलेली माहिती इंटनेटच्या माध्यमातून मिळवण्यासाठी सर्च इंजिनमध्ये तिचा शोध घ्यावा लागतो. या शोधातून अनेक वेब पेजेस येतात, या वेबपेजवर क्लिक केल्यास आपल्याला हवी ती माहिती मिळते.

ही Webpages विविध वेबसाईट ने तयार केलेल्या असतात. अश्या अनेक वेबसाईट मिळून नेटवर्क तयार होते. या नेटवर्कस्‌चेचे मिळून बनलेले एक प्रचंड नेटवर्क म्हणजे इंटरनेट होय.

इंटरनेटवर प्रत्येक संगणकासाठी एक विशिष्ट Internet Protocol Address (IP Address) असतो. जसे की, एखादे पत्र आपल्या घराच्या पत्त्याच्या आधारे घरापर्यंत येत असते. अगदी याचप्रमाणे एका विशिष्ट कॉम्प्युटरच्या आयपी ऍड्रेसच्या आधारे इंटरनेटद्वारे माहिती आपल्या कॉम्प्युटर पर्यंत पोहचत असते.

आयपी ॲड्रेस म्हणजे इंटरनेटच्या विश्वातील आपली ओळख असते. ही ओळख व माहिती गोपनीय ठेवण्यासाठी काही विशिष्ट संगणक वापरले जातात. ज्याच्या मदतीने आपली ओळख व माहिती सुरक्षित केली जाते.

हे विशिष्ट संगणक कोणते व ते कसे कार्य करते ? याची माहिती समजून घेण्यासाठी आपण या लेखातून प्रॉक्सी सर्व्हर माहिती मराठी (proxy meaning in marathi) सविस्तरपणे समजून घेऊ.

प्रॉक्सी सर्व्हर माहिती मराठी (proxy meaning in marathi)

proxy meaning in marathi
नावप्रॉक्सी
प्रकारमध्यस्थ सर्व्हर
वापरसायबरसुरक्षा

एखादा देश किंवा प्रदेशातील यूजरसाठी काही वेबसाइट्स ह्या ब्लॉक केल्या जातात, म्हणजे त्यावरील कंटेंट पाहता येत नाही. अश्या वेळेस प्रॉक्सीचा वापर करून त्या ब्लॉक वेबसाईटवरील कंटेंट पाहता येतो. याविषयी सविस्तर माहिती आपण पुढे पाहणारच आहोत.

प्रॉक्सी सर्व्हर हा एक मध्यस्थ सर्व्हर आहे, जो वापरकर्त्याच्या वतीने इंटरनेट स्रोतावरून माहिती मिळवून वापरकर्त्याला देतो. यातून युजरच्या वतीने माहिती घेताना आयपी ॲड्रेस प्रॉक्सीचा जातो. ज्यामुळे युजरची गोपनीय माहिती सुरक्षित राहते.

प्रॉक्सी कार्य कसे करते (how to work proxy server marathi)

इंटरनेट युजर आणि वेबसाईट (माहिती प्रदाता) यामधील मध्यस्थी बनून प्रॉक्सी कार्य करते. साधारणतः युजर जेव्हा काही माहिती शोधतो त्या वेळेस ती माहिती सर्च इंजिनद्वारे युजरला प्राप्त होते. पण या प्रक्रियेत त्याचा आयपी ॲड्रेस हा ट्रॅक केला जाऊन त्याची ओळख करता येते.

ही ओळख लपण्यासाठी प्रॉक्सी युजर कडून येणाऱ्या विनंतीचे स्वतः प्रतिनिधी करून संबंधित वेबसाईटवरून माहिती स्वतः जवळ घेऊन युजरला पाठवले जाते. यादरम्यान वेबसाईटवर ट्रेक केलेला आयपी हा प्रॉक्सीचा असतो.

प्रॉक्सी सर्वर उपयोग माहिती मराठी (benefits of proxy server marathi)

Caching – प्रॉक्सी सर्व्हर आपण वारंवार भेट देत असलेल्या वेब पृष्ठांच्या स्थानिक प्रती डाउनलोड व जतन करतात. यालाच कॅचे (cache) म्हणतात, कॅचे केलेली आवृत्ती नेहमी अद्ययावत बनवते. कॅशिंग (Caching) इंटरनेट गती वाढवण्याची आणि बँडविड्थ वापर कमी करण्यासाठी मदत करते.

Content Filtering – याचा वापर प्रामुख्याने उद्योग व शिक्षण क्षेत्रात केला जातो. जर ऑनलाईन काम असेल असेल तर त्यावर सोशल मीडिया किंवा अन्य वेबसाईटचा वापर प्रतिबंधित करण्यासाठी प्रॉक्सीचा वापर केला जातो.

उदाहरणार्थ. एखादी आयटी कंपनी आहे. त्या कंपनीत काम करणारे कामगार कामाच्या वेळेस सोशल मीडिया किंवा अन्य वेबसाईटचा वापर करू नये यासाठी प्रॉक्सी सर्व्हर लावून फक्त कंपनीला आवश्यक त्या वेबसाईटचे ॲक्सेस दिला जातो.

या सर्वरच्या मदतीने कोणत्याही ब्लॉक वेबसाईटला ॲक्सेस केले जाऊ शकते. कोणत्याही वेबसाईटला ब्लॉक देखील केले जाऊ शकते. जर युजर कोणत्या वेबसाईटचा वापर करू इच्छित नसेल तर तो त्या वेबसाईटला प्रॉक्सी सर्व्हरद्वारा ब्लॉक करू शकतो.

Monitoring – ब्राउझ केलेली सामग्री नियंत्रित करण्यासोबत कर्मचार्‍यांच्या ऑनलाइन वर्तनावर लक्ष ठेवण्यासाठी प्रॉक्सी वापरतात. उदाहरणार्थ, पाठवलेले ईमेल, ते ज्या वेबसाइटशी कनेक्ट होतात आणि चॅट मेसेजची देवाणघेवाण करतात. या माहितीचा मागोवा घेण्यासाठी प्रॉक्सी सर्व्हर वापरले जाते.

Privacy – स्थानिक नेटवर्कमधील वापरकर्ते थेट कनेक्शन तयार करण्याऐवजी प्रॉक्सी सर्व्हरद्वारे बाह्य वेब पृष्ठाशी कनेक्ट होऊ शकतात. अशा प्रकारे, प्रॉक्सी सर्व्हरद्वारे फिल्टर केलेल्या कोणत्याही विनंत्या त्या सर्व्हरवरून येत असल्याचे दिसते आणि तुमच्या अंतर्गत नेटवर्कवरून नाही.

कोणत्याही संस्थेला आपले सर्व्हर हॅक होण्याचा आणि त्यातून DATA चोरी होण्याचा धोका असतो. अशावेळी प्रॉक्सी सर्व्हर बऱ्याच प्रमाणात सुरक्षा प्रदान करण्याचे काम करत असते.

कोणतीही संस्था या सर्वरच्या मदतीने त्यांच्या client आणि server च्या मध्ये होणाऱ्या संवादाला encrypt करू शकते. जेणेकरून कोणीही third party त्या माहितीला ॲक्सेस करू शकणार नाही.

हॅकर्स आपल्या प्रॉक्सी सर्व्हर्स पर्यंत तर पोहचू शकतात परंतु आपल्या मूळ सर्व्हर जिथे आपला सर्व Data साठवलेला असतो, तिथपर्यंत पोहचण्यासाठी त्यांना खूप अडचणी येऊ शकतात. त्यामुळे प्रॉक्सी सर्व्हर हॅकर्स पासून सुरक्षित देतात.

प्रॉक्सी सर्व्हर वापरकर्त्यांना निनावीपणे इंटरनेटशी कनेक्ट होण्यास अनुमती देते, ज्यामुळे इंटरनेट युजर व वेबसाइट याची सुरक्षितता वाढते.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण प्रॉक्सी सर्व्हर माहिती मराठी (proxy meaning in marathi) जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ? हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

प्रॉक्सी सर्व्हर म्हणजे काय ?

प्रॉक्सी म्हणजे प्रतिनिधित्व करणे किंवा दुसऱ्याच्या वतीने कार्य करणे. प्रॉक्सी सर्व्हर हे इंटरनेट युजर आणि वेबसाइट यामध्ये पुलाप्रमाने काम करतात. माहितीची देवाणघेवाण करताना युजरकडून वेबसाइटला विनंती करून स्वतः ती माहिती घेऊन युजरला पाठवतो.

प्रॉक्सी सर्व्हरचा वापर कोणकोणत्या क्षेत्रात होतो ?

प्रॉक्सी सर्व्हरचा वापर शिक्षण, व्यवसाय, मनोरंजन, व्यापार, विज्ञान आणि तंत्रज्ञान अश्या विविध क्षेत्रात होतो.

Leave a Comment