PSI full form in marathi – राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन काम करते. या प्रशासनात काम करणारी अनेक अधिकारी आणि कर्मचारी पद असतात. पीएसआय हे एक पोलिस प्रशासनातील एक महत्वाचे पद आहे. या लेखातून आपण पीएसआय म्हणजे काय (psi full form in marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
Table of Contents
- पीएसआय म्हणजे काय (psi full form in marathi)
- पोलीस उपनिरीक्षक माहिती मराठी (police sub inspector in marathi)
- पोलीस उपनिरीक्षक कर्तव्य माहिती मराठी (police upnirikshak in marathi)
- पोलीस उपनिरीक्षक वेतन माहिती (what is the salary of psi marathi)
- पोलिस उपनिरीक्षक होण्यासाठी पात्रता (psi education qualification in marathi)
- सारांश
- वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
पीएसआय म्हणजे काय (psi full form in marathi)

पीएसआय म्हणजे पोलिस उपनिरीक्षक (police sub inspector) होय. हे एक पोलीस हवालदार पदाच्या वरचे महत्वाचे पद आहे. भारत देशाव्यतिरिक्त आणखी आठ देशात पीएसआय हे पद आहे. पोलीस उपनिरीक्षक अधिकाराच्या वर्दिवर दोन चांदनी (two star) हे चिन्ह असते.
पोलीस उपनिरीक्षक माहिती मराठी (police sub inspector in marathi)
पोलीस उपनिरीक्षक हे पद पोलीस अधिकारी रँक मधील अगदी सुरवातीच पद असून यानंतर पुढे रँक वाढत जातो. पोलीस कर्मचारी आणि वरीष्ठ अधिकारी यांच्यामधील पीएसआय हे पद समन्वय साधण्यासाठी महत्वाचे आहे. यामुळे या पदाला पोलिस खात्यातील महत्वाचा कणा मानला जातो.
पोलीस उपनिरीक्षकाला फौजदार म्हणून ओळखले जाते. वरीष्ठ पोलीस निरीक्षक हे ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून काम करतात. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक काम करतात.
पोलीस ठाण्यात येणाऱ्या तक्रारी, गुन्हे दाखल करणे, पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करणे, समाजकंटकावर लक्ष ठेवणे, बेकायदेशीर उद्योग धंद्यावर रेड मारणे, काही समाजविघाटक घटना घडत असेल तर तात्काळ वरिष्ठांना कळवणे.
तसेच घटनास्थळी जाऊन परिस्थिती हाताळणे आणि वरिष्ठांना माहिती देऊन त्यांच्या आदेशानुसार पुढील कायदेशीर कारवाई करावी लागते.
VIP, मंत्री, विविध प्रकारचे मोर्चे, यात्रा, जत्रा आणि सणाच्या निमित्ताने बंदोबस्त करावा लागतो. गुन्हेगारांवर लक्ष ठेवणे, त्यांच्या हालचाली बाबत माहिती मिळवणे या सर्व गोष्टी करत असताना गुन्ह्याचा तपास करणे.
आरोपींना कायदेशीर अटक करणे, कोर्टात हजर करणे आणि खटले वेळेत निकाली काढणे अशी बरीच कामे पोलीस उपनिरीक्षकाला करावी लागतात.
पोलीस उपनिरीक्षक कर्तव्य माहिती मराठी (police upnirikshak in marathi)
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे तसेच ठाण्यातील येणाऱ्या गुन्ह्यांचा तपास करणे पोलीस अधिकाऱ्यांचे कामे आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मध्ये कलम 64 आणि 66 मध्ये पोलीसांचे कार्यकारी अधिकार व कर्तव्ये सांगितले आहे.
- समन्स बजावणे तसेच अधिपत्र व इतर आदेश तत्परतेने पाळणे. इतर पोलीस अधिकाऱ्यांना वैध आणि वाजवी मदत करणे.
- दखलपात्र अपराधासंबंधी माहिती मिळवणे व ते क्षमतेनुसार रोखणे.
- सार्वजनिक उपद्रव निर्माण होण्यास आळा घालणे. न्यायालयाने प्राधिकृत केले असलेल्या व्यक्तीला विनाविलंब अटक करणे.
- सार्वजनिक ठिकाणी असलेल्या हतबल व असाह्य व्यक्तिस मदत करणे. तसेच सार्वजनिक ठिकाणी असलेल्या नशा केलेल्या आणि वेड्या व्यक्तिना ताब्यात घेणे.
- अटक केलेल्या व्यक्तिस गरज असल्यास उपचार,अन्न पुरवणे. स्त्रिया आणि बालके यांच्याशी वागताना सभ्य आणि सौम्यपणे वागणे.
- आगीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी. तसेच जनतेला अपघात आणि संकटकाळात मदत करावी.
पोलीस उपनिरीक्षक वेतन माहिती (what is the salary of psi marathi)
सर्वसाधारणपणे पोलिस उपनिरीक्षकाला वेतन 38,600 ते 1,22,800 रुपये इतका असतो. या वेतनासोबत पोलिस उपनिरीक्षकाला 4,500 रुपये ग्रेड पे आहे. यासोबत पोलिस उपनिरीक्षकाला वैद्यकीय सेवा, महागाई भत्ता आणि ग्रेड पे सारख्या सुविधा मिळतात.
पोलिस उपनिरीक्षक होण्यासाठी पात्रता (psi education qualification in marathi)
नागरिकत्व | भारतीय |
वय | 19 ते 31 (सर्वसामान्य प्रवर्ग) 19 ते 34 (आरक्षित वर्ग) |
शैक्षणिक पात्रता | मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर |
उंची | पुरुष – 165 सेमी महिला – 157 सेमी |
पुरुष छाती | फुगवून – 84 सेमी न फुगवता – 79 सेमी |
लेखी + शारीरिक चाचणी परीक्षा | पूर्व परीक्षा – 100 मार्क्स मुख्य परीक्षा – 200 मार्क्स मुलाखत – 40 मार्क्स शारीरिक चाचणी – 100 मार्क्स |
पोलिस उपनिरीक्षक होण्यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी प्राप्त करावी लागते. त्यासोबत मराठी भाषेत लिहिता-वाचता येणे आवश्यक आहे.
यासोबतच भारतीय नागरिकत्व असलेला 19 ते 31 वयाचा उमेदवार पोलिस उपनिरीक्षक पदासाठी अर्ज करू शकतो. ही परीक्षा एमपीएससी द्वारे घेतली जाते.
सारांश
या लेखातून आपण पीएसआय म्हणजे काय, त्यांची कामे आणि पगार काय आहेत याविषयीं सविस्तरपणे समजाऊन घेतले आहे. PSI होण्यासाठी काय करावे लागते यावर देखील आपण चर्चा केली आहे. याविषयी तुम्हाला काही शंका असतील तर आम्हाला नक्की कळवा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
पीएसआय म्हणजे काय ?
पीएसआय म्हणजे पोलीस उपनिरीक्षक (police sub inspector) असून पोलीस खात्यातील हे एक महत्वाचे पद आहे.
पोलीस उपनिरीक्षक पात्रता काय आहे ?
पोलीस उपनिरीक्षक परीक्षा ही एमपीएससीद्वारे घेतली जाते. पोलीस उपनिरीक्षक परीक्षा देण्यासाठी एमपीएससीचा अभ्यासक्रम आणि वयोमर्यादेत असलेला भारतीय नागरिकत्वाचा उमेदवार अर्ज करू शकतो.
पुढील वाचन :