विरामचिन्हे माहिती मराठी – punctuation marks information in marathi

punctuation marks information in marathi – विरामचिन्हे म्हणजे वाक्याचा विभाग करून लेखातला अर्थ स्पष्टपणे समजावा म्हणून वापरण्यात आलेले चिन्हे होय. ही चिन्हे सुरुवातीला मराठी भाषेत असणारे ग्रंथांमध्ये वापरली जात नव्हती, पण युरोपमधील इंग्लिश आणि इतर भाषांमध्ये या विरामचिन्हांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत होता. त्यानंतर मराठी भाषेत देखील ही विरामचिन्ह वापरण्याची पद्धत दृढ होत गेली.

या लेखात आपण विरामचिन्हे माहिती मराठी – punctuation marks information in marathi याविषयी जाणून घेणार आहोत. यात आपण प्रामुख्याने विरामचिन्हांचे पाच प्रकार आणि त्यांचा वापर कसा करायचा, याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Table of Contents

विरामचिन्हे माहिती मराठी – punctuation marks information in marathi

punctuation marks information in marathi
विरामचिन्हे माहिती मराठी

marathi viram chinh – विरामचिन्हे हा मराठी व्याकरण मधील एक महत्वाचा घटक आहे. याचा वापर एखादा लेख वाचताना कुठे थांबायचे आणि कोणत्या शब्दावर जोर द्यायचा यासाठी केला जातो. हे विरामचिन्हे वापरून आपण आपल्या मनातील भावना नेमकेपणाने मांडू शकतो.

प्रकारविरामचिन्हे
स्वल्पविराम चिन्ह ,
अर्धविराम चिन्ह;
पूर्णविराम चिन्ह .
प्रश्नचिन्ह?
उद्गारवाचक चिन्ह!
प्रमुख विरामचिन्हे मराठी नावे

स्वल्पविराम चिन्ह (Punctuation Marks) घालण्याचे नियम माहिती मराठी [ , ]

1. जे वाक्य सरळ आहे किंवा वाक्यात विभाग नसले, तर विरामचिन्ह घालण्याची गरज नाही.

2. एखाद्या वाक्यामध्ये जर दुसरे वाक्य किंवा वाक्यांग आले, तर त्या वाक्याच्या किंवा वाक्यांग यांच्या सुरुवातीला किंवा शेवटी विराम चिन्ह पाहिजे.

3. दोन-तीन सरळ वाक्य मिळून एक मोठे वाक्य तयार होते, यामध्ये प्रत्येक सरळ वाक्यानंतर स्वल्पविराम पाहिजे.

4. एकाच प्रकारचे दोन किंवा त्याहून अधिक शब्द वाक्यात असेल, तर त्या प्रत्येक शब्दापुढे विराम चिन्ह द्यावे. परंतु कोणत्याही एका प्रकारचे दोन शब्दांमध्ये उभयान्वयी अव्यय आले तर, त्यामध्ये स्वल्पविराम चिन्ह नको.

5. वाक्याचा सुरुवातीला संबोधन आहे असेल, तर त्याच्यापुढे स्वल्पविराम चिन्ह नको. पण जर वाक्याच्या मध्ये संबोधन आले असेल, तर त्याच्या मागे व पुढे स्वल्पविराम चिन्ह द्यावे.

6. असता, असताना असे शब्द वाक्यात असले तर त्याच्यापुढे कधीकधी स्वल्पविराम चिन्ह द्यावे लागते.

7. संबंधी सर्वनाम आणि ते ज्याच्याशी संबंध दाखवते ते पुरुष वाचक किंवा दर्शक सर्वनाम वाक्यामध्ये आली किंवा त्यांच्यामध्ये दुसरे शब्द आले असतील, तर त्या पुरुषवाचक सर्वनाम आगे किंवा दर्शक सर्वनाम आगे स्वल्पविराम चिन्ह द्यावे लागते.

8. परंतु जर संबंधी सर्वनाम आणि पुरुष वाचक सर्वनाम यांच्यामध्ये दुसरे शब्द नसतील तर पुरुष वाचक सर्वनामामागे स्वल्पविराम चिन्ह नको.

9. आणि, तर, परंतु अशी अव्यय वाक्यामध्ये आली असतील, तर त्या प्रत्येक अव्ययमागे स्वल्पविराम चिन्हे द्यावे लागते.

10. की हे अवयव वाक्यात आले असेल तर त्याच्या संबंध प्रमाणे त्याच्या मागे किंवा पुढे स्वल्पविराम चिन्ह द्यावे लागते.

11. कोणाचे म्हणणे किंवा लेख वाक्यामध्ये घेतला असेल, तर त्या म्हणण्याच्या किंवा वाक्याच्या प्रारंभी स्वल्पविराम चिन्ह पाहिजे.

12. एखाद्या माणसाचे किंवा वस्तूच दोन नामे आली असेल आणि त्यापैकी कोणत्याही नामच दुसरे शब्द जोडले असेल तर त्या प्रत्येक नामाच्या पुढे स्वल्पविराम चिन्ह पाहिजे. परंतु एकाही ना मग दुसरा शब्द जोडला नसेल तर स्वल्पविराम चिन्ह घालण्याचे नाही.

अर्धविराम चिन्ह (semicolon) घालण्याचे नियम [ ; ]

  • ज्यांचात परस्पर जवळ संबंध नाही अशी वेगवेगळी वाक्य किंवा वाक्यांग एक लांब वाक्यात येतात. त्या वेगवेगळ्या वाक्यांचे किंवा वाक्यांगामध्ये अर्धविराम चिन्हे द्यावे लागते.
  • लहान स्वतंत्र वाक्याच्या मध्ये अर्धविराम चिन्ह द्यावे लागते, हे अर्धविरामचिन्ह घालण्या अगोदर दोन वाक्याचा परस्परांशी काहीतरी संबंध असायला हवा.

पूर्ण विराम चिन्ह (full stop mark) घालण्याचे नियम [ . ]

  • स्वतंत्र आणि पूर्ण झालेल्या कोणत्याही वाक्याच्या शेवटी हे चिन्ह घालावे.
  • कधी कधी असे वाक्य येतात की त्यांच्या सुरूवातीला उभयान्वयी अव्यय असते, जेणेकरून त्यांच्या पूर्व वाक्याशी संबंध असतो, तरी पूर्व वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम चिन्ह घालतात.

प्रश्नचिन्ह (question mark) घालण्याचे नियम [ ? ]

  • वाक्यात जर प्रश्न आला असेल तर त्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह घालावे लागते.
  • एखादा वक्ता जेव्हा दुसऱ्याचा प्रश्न सांगतो, पण प्रश्न करणार या शब्दाचा अनुकरण करत नाही तेव्हा त्या प्रश्नाच्या शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचे नसते.

उद्गारवाचक चिन्ह (exclamation mark) घालण्याचे नियम [ ! ]

  • जर वाक्यामध्ये आश्चर्य, आनंद, खेद इत्यादी मनोज धर्माचा उल्लेख केलेला असेल, क्या वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह घालावे लागते.
  • कधी कधी अशी वाक्य असतात, ज्यामध्ये पहिला शब्द हा प्रश्नार्थक असतो. यावेळी या वाक्यांपुढे कोणते चिन्ह वापरावे याचा निर्णय वक्त्याच्या अभिप्रायवरून ठरवायचा असतो. जर वक्त्याला प्रश्न करायचा असेल तर प्रश्न चिन्ह वापरावे, आणि जर मनोधर्म दाखवायचा असेल तर उद्गारवाचक चिन्ह वापरावे.

इतर विरामचिन्हे माहिती मराठी – other punctuation marks information in marathi

प्रकारविरामचिन्हे
संयोग चिन्ह
अपसरण चिन्ह_
विकल्प चिन्ह/
अवतरण चिन्ह
अपूर्ण विरामचिन्ह:
विरामचिन्हे व त्यांची नावे

जेव्हा आपल्याला दोन वाक्यांमध्ये संबंध दाखवायचा असेल, तेव्हा संयोगचिन्हाचा (-) वापर केला जातो.

जेव्हा वाक्यात एखाद्या गोष्टी बाबतीत स्पष्टीकरण द्यायचे असेल तेव्हा अपसारण चिन्हाचा ( — ) वापर करावा लागतो.

जर एखाद्या शब्दाचा समान अर्थ असेल किंवा त्या शब्दाला काही पर्याय द्यायचा असला तर विकल्पचिन्ह (/) वापरले जाते.

जेव्हा एखादा महत्वाचा शब्द किंवा शब्दसमुहाचा उल्लेख करायचा असेल किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचे म्हणने सांगताना एकेरी (“) तसेच दुहेरी (” “) अवतरण चिन्हाचा वापर केला जातो.

एखाद्या वाक्याच्या शेवटी वस्तुची, नावांची यादी किंवा तपशील द्यायचा असेल तेव्हा त्या तपशीलाच्या यादी अगोदर (:) हे अपुर्णविराम चिन्ह वापरले जाते.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये विरामचिन्हे माहिती मराठी – punctuation marks information in marathi जाणून घेतली. त्याचबरोबर विरामचिन्हे मराठी नावे (Viram chinh in marathi) पाहिली आहे.

जर तुम्हाला विरामचिन्हे माहिती मराठी – punctuation marks information in marathi आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

विरामचिन्हे म्हणजे काय ?

विराम म्हणजे विश्रांती. विरामचिन्हे हा मराठी व्याकरण मधील एक महत्वाचा घटक आहे. याचा वापर एखादा लेख वाचताना कुठे थांबायचे आणि कोणत्या शब्दावर जोर द्यायचा यासाठी केला जातो. हे विरामचिन्हे वापरून आपण आपल्या मनातील भावना नेमकेपणाने मांडू शकतो.

मराठी मध्ये एकूण किती विरामचिन्हे आहेत ?

मराठी मध्ये एकूण दहा विरामचिन्हे आहेत.

Leave a Comment