पुस्तकाची आत्मकथा मराठी निबंध

Categorized as Blog

नमस्कार मित्रांनो, तुमच्या, माझ्या, आपल्या सर्वांच्या आयुष्यातील महत्वाचा घटक म्हणजे पुस्तक. अक्षरांची ओळख ते अगदी आयुष्यभर ही पुस्तके आपल्याला साथ देतात. या लेखातून आपण पुस्तकाची आत्मकथा मराठी निबंध पाहणार आहोत. यामध्ये पुस्तक जर बोलके असते, तर त्यांनी आपल्याशी कसा संवाद साधला असता, याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे.

पुस्तकाची आत्मकथा मराठी निबंध

नमस्कार माझ्या प्रिय वाचक मित्रांनो, ओळखलंत का, अहो मी तुमच्या सर्वांचे लाडके पुस्तक. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की रोज तुम्ही मला वाचणारे आज माझे शब्द कसे ऐकत आहात? तुम्हाला माझे शब्द ऐकू येत असेल तर चांगलेच आहे. इतके दिवस तुम्ही मला वाचत आहात परंतु आज मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे आहे.

माझे काही शब्द तुम्हाला ऐकवायचे आहे, तर तुम्ही ऐकाल ना… मी आशा करतो की, तुम्ही माझे म्हणणे ऐकून घ्याल आणि माझ्या भावना समजून देखील घ्याल.

मी म्हटले तर एक पुस्तक आहे. मी म्हटले तर एक रद्दी आहे. मी म्हटले तर कागदांचा ढिगारा आहे. मी म्हटले तर ज्ञानाचा स्त्रोत आहे. मी म्हटले तर रिकामा टाईमपास देखील आहे, असे वेगवेगळे विशेषण अलंकार लावून तुम्ही माझा विचार देखील करू शकतात.

आज तंत्रज्ञान विकसित झालेले आहे, याचा मला आनंद तर आहे. परंतु मला आजही भूतकाळातले दिवस आनंदाने आठवतात. एक काळ असा होता की प्रत्येक व्यक्ती मला हातामध्ये घेण्यासाठी उत्सुक असायचा परंतु आता काळ बदललेला आहे.

आता पुस्तकांऐवजी प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलेले आहेत. त्या मोबाईल मध्ये असलेल्या वेग वेगळ्या एप्लीकेशनच्या मदतीने अनेकजण वेगवेगळे डिजिटल पद्धतीने छापले गेलेले पुस्तक वाचत असतात.

पण कोणत्याही कारणाने का होईना तुम्ही पुस्तक वाचत आहात, याचा मला आनंदाच आहे. परंतु तुम्ही कधीतरी ग्रंथालयामध्ये देखील फेरफटका मारत रहा. मला तुमची आठवण देखील येत असते. मी तुमचा श्वास जरी असलो तरी तुम्ही माझे प्राण आहात. तुमच्यासारख्या सुज्ञ वाचकांमुळेच मी जिवंत आहे आणि माझ्यामुळे तुम्ही जिवंत आहे, असे म्हणायला हरकत नाही.

माझी आत्मकथा सांगताना मला काही तुम्हाला ज्ञानामृत द्यायचे नाहीये, कारण की तुम्ही सारे सुज्ञ आहात. मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे, मी पुस्तक जरी असलो तरी तुमच्यासाठी ज्ञानाचा भंडार आहे हे लक्षात असू द्या.

आजचे वातावरण लक्षात घेता मला विविध धर्म पंथ जाती वर्गांमध्ये विभागले जात आहे, तसे अजिबात करू नका. मी गरिबासाठी जसे ज्ञानाचे साधन आहे तसेच श्रीमंत वर्गासाठी देखील ज्ञानाचे साधन आहे.

मला जात-धर्म-पंथ नाही. मी सर्वांसाठी फक्त ज्ञानामृत देणारा एक घटक आहे. माझ्या अंगावर आजही वेगवेगळ्या शब्दांनी ठसे उमटविले जातात.

आज माझा वाचक वर्ग सुज्ञ झालेला आहे, असे असले तरी तो कुठे ना कुठे भरकटलेला आहे. याची जाणीव देखील मला होत आहे, म्हणूनच आपण काय वाचत आहोत. त्या वाचनातून काय शिकत आहोत याची खबरदारी देखील बाळगायला हवी.

आपल्या बुद्धीवर आपल्या गुणवत्तेवर कोणी नियंत्रण मिळवणार नाही, याची काळजी प्रत्येकाने स्वतः घ्यायला हवी. पुस्तक वाचल्याने ज्ञान मिळते परंतु ते ज्ञान कुठे वापरायचे त्याचा योग्य उपयोग कसा करायचा हे देखील तुम्हाला समजायला हवे.

शेवटी तुम्हा सर्वांना माहितीच आहे, वाचाल तर वाचाल आणि म्हणूनच शक्य तितके मला म्हणजेच माझ्या वेगवेगळ्या पुस्तकांना वाचण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचा मेंदू परिपक्व होईल.

तुमच्या मेंदूवर कुणीच नियंत्रण करणार नाही एक वेळ अशी येईल की तुम्ही जगावर नियंत्रण कराल तेही कोणत्याही चुकीच्या मार्गाने नाहीतर तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर.

वाचक मित्रांनो तुम्ही वाचत नाही, अशी माझी अजिबात तक्रार नाही. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वेगवेगळ्या माध्यमांच्या मदतीने तुम्ही काही ना काही वाचत असतात मग तो गुड मॉर्निंगचा मॅसेज का होईना पण तुम्ही वाचता याचा मला आनंद आहे परंतु हातामध्ये पुस्तकं असू द्या.

पुस्तकांमुळे तुम्हाला जगामध्ये कसे वावरायचे आहे याचे ज्ञान मिळेल ते पुस्तकामुळेच. तुमचे व्यक्तिमत्व उजळून निघेल. अनेक साधु संत, विद्वान, समाज सुधारक, क्रांतिकारक, शास्त्रज्ञ यांच्या सानिध्यात मला राहण्याचे भाग्य लाभले होते.

अनेकांनी तर मला कोळून प्यायले आहे असे म्हणायला देखील हरकत नाही. आता वेळ तुमची आहे तुम्हाला देखील माझ्या मदतीने जगावर सत्ता गाजवायची आहे.

जगामध्ये कल्याण, उत्कर्ष, प्रगती समाजातील दिन दलितांची सेवा कशी करता येईल. विश्वामध्ये ज्ञानाचा दिवा कशाप्रकारे प्रज्वलित करता येईल याचा विचार तुम्हाला करायचा आहे म्हणूनच मला तुमची काळजी देखील आहे आणि मला तुमचा आधार देखील आहे.

मला फक्त एवढेच सांगायचं आहे की तुम्ही ज्ञानी आहात. तुम्ही सुज्ञ आहात आणि तुम्ही एक उत्तम मनुष्य देखील आहात आणि म्हणूनच मला तुम्हाला हे दोन शब्द सांगायचे आहेत.

मी आशा करतो की, माझे म्हणणे तुम्ही मनावर घ्याल आणि काय वाचावं किंवा काय वाचू नये याची काळजी तुम्ही नक्की घ्याल.

संबंधित – वाचन म्हणजे काय?

सारांश

आशा करतो की, तुम्हाला पुस्तकाची आत्मकथा मराठी निबंध आवडला असेल. जर तुम्हाला कोणत्याही विषयावर आत्मकथा, निबंध किंवा भाषण हवे असेल, तर आम्हाला कळवू शकता. आम्ही लवकरात लवकर संबंधित विषयावर लेख प्रसिद्ध करू. बाकी दररोज अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉगला बुकमार्क 📑 करायला विसरू नका.