Radhanagari wildlife sanctuary information in marathi – राधानगरी वन्यजीव अभयारण्य हे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्वात पहिले अभयारण्य आहे. या अभयारण्यास दाजीपूर अभयारण्य म्हणून ओळखले जाते. गवे आणि सात वर्षांतून एकदा फुलणारी कारवी वनस्पती हे राधानगरी अभयारण्याचे प्रमुख आकर्षण आहे.
राधानगरी अभयारण्य हे रानगव्यांसाठी प्रसिद्ध असून या ठिकाणी एकूण 35 प्रकारचे वन्यप्राणी आणि 235 प्रकाराचे पक्षी आढळतात. तसेच या ठिकाणी 1800 प्रकारच्या वनस्पती आहेत. यापैकी 1500 पेक्षा जास्त फ़ुलझाडांच्या प्रजाती आहे आणि 300 वनस्पती या औषधी आहेत.
आज आपण या लेखात राधानगरी वन्यजीव अभयारण्य मराठी माहिती – radhanagari wildlife sanctuary information जाणून घेणार आहोत. यामध्ये आपण राधानगरी पाहण्यासारखी ठिकाणे आणि राधानगरी वन्यजीव मराठी माहिती (radhanagari maharashtra marathi) जाणून घेणार आहोत.
Table of Contents
राधानगरी वन्यजीव अभयारण्य मराठी माहिती – radhanagari wildlife sanctuary information

नाव | राधानगरी वन्यजीव अभयारण्य |
इतर नावे | दाजीपूर वन्यजीव अभयारण्य |
ठिकाण | राधानगरी, कोल्हापूर महाराष्ट्र |
प्रकार | अभयारण्य |
प्रसिध्द | रानगवे |
जवळील पर्यटन स्थळे | रंकाळा तलाव शालिनी पॅलेस पन्हाळा किल्ला गगनबावडा |
महाराष्ट्र राज्यातील एकूण 36 जिल्हे त्यापैकी एक कोल्हापूर जिल्हा, या जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात हे अभयारण्य आहे. इसवी सन 1958 यावर्षी अभयारण्याची स्थापना करण्यात आली. यावेळेस अभयारण्याचे नाव दाजीपूर वन्यजीव अभयारण्य असे ठेवण्यात आले होते. त्यानंतर ते बदलून सध्या राधानगरी वन्यजीव अभयारण्य असे केले आहे. UNESCO या संस्थेने या ठिकाणाला 2012 साली जागतिक पर्यटन स्थळ म्हणून दर्जा दिला आहे.
भारतातील पहिले मातीचे धरण आणि गुळाची आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर या ठिकाणी आहे. त्याचबरोबर कोल्हापूर हे ठिकाण मराठा साम्राज्यातील तिसरी राजधानी म्हणून ओळखले जाते.
याव्यतिरिक्त मराठी चित्रपटसृष्टीचे माहेरघर, जगप्रसिद्ध कोल्हापूरी चप्पल, तांबडा-पांढरा रस्सा, आणि कुस्ती यासाठी कोल्हापूर जिल्हा ओळखला जातो.
राधानगरी अभयारण्य पाहण्यासारखी ठिकाणे माहिती मराठी
राधानगरी अभयारण्य मुख्यतः रानगवे यासाठी प्रसिद्ध असून या ठिकाणी एकूण 35 प्रकारचे वन्यप्राणी आणि 235 प्रकाराचे पक्षी आढळतात. तसेच या ठिकाणी 1800 प्रकारच्या वनस्पती आहेत. यापैकी 1500 पेक्षा जास्त फ़ुलझाडांच्या प्रजाती आहे आणि 300 वनस्पती या औषधी आहेत.
सदर्न बर्डविंग हे भारतातील सर्वांत मोठे फुलपाखराची प्रजात आहे. याचा आकार साधारणपणे 140 ते 190 मिमी इतका आहे. ग्रास ज्येवेल हे भारतातील सर्वांत लहान फुलपाखराची प्रजात आहे. याचा आकार साधारणपणे 15 ते 22 मिमी इतका आहे.
दाजीपूर अभयारण्यातील काजवा हा महत्त्वाचा कीटक आहे, दरवर्षी मे महिन्यात वळीव पाऊस सुरू झाला की, काजवी दिसू लागतात. ही काजवे प्रामुख्याने हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर आणि अर्जुन या झाडावर आढळतात.
राधानगरी नेचर क्लबच्या दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात काजवा महोत्सवाचे आयोजन करते या वेळेस या काजव्याचे निसर्गरम्य सौंदर्य पाहायला मिळते.
या ठिकाणी काजव्यांच्या महोत्सव सारखाच फुलपाखरू महोत्सव साजरा करण्यात येतो. हा महोत्सव 2015 पासून राधानगरी नेचर क्लबद्वारे आयोजित केला जातो. या वेळी फुलपाखरांच्या विविध प्रजाती पाहायला मिळतात.
होले, दयाल, कोतवाल, पिंगला, पोपट असे अनेक पक्षी अभयारण्यात पाहायला मिळतात. त्याचबरोबर पट्टेरी वाघ, लहान हरीण, गेळा (पिसोरी), बिबळ्या, गवा, सांबर, भेकर, डुक्कर, रानकुत्रा, अस्वल, शेकरु, रानमांजर, उदमांजर, ससा, लंगूर असे विविध प्रकारचे वन्यप्राणी पाहायला मिळतात.
या ठिकाणी गव्यांचा कळप आढळतो. रानगवे हे राधानगरी वन्यजीव अभयारण्याचे प्रमुख आकर्षण आहे. यासोबतच हरिण, सांबर, चितळ यांचे कळप पाहायला मिळतात. येथील जंगलात साळींदर, अस्वले, साप, नाग आढळून येतात.
राधानगरी धरण विषयी माहिती मराठी
राधानगरी धरण महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. या तलावाला लक्ष्मी तलाव म्हणून ओळखले जाते. भोगावती या नदीवर राजर्षी शाहू महाराज यांनी राधानगरी धरण बांधले आहे. भोगावती नदी ही सीना नदीची उपनदी आहे. या धरणाच उंची 38.41 मीटर तर लांबी 1037 मीटर इतकी आहे.
या धरणातून पाण्याचा विसर्ग होण्यासाठी 7 दरवाजे बनवले आहेत. हे दरवाजे स्वयंचलीत आहेत. भारतरत्न एम. विश्वेश्वरय्या यांनी या दरवाजाची रचना केली.
महाराष्ट्रातील एक अतिशय भक्कम धरण म्हणून राधानगरी धरण ओळखले जाते. या धरणातून आजूबाजूच्या गावातील पाण्याची गरज भागवली जाते. या धरणाच्या पाण्यातून 4.8 मेगा वॅट इतकी वीजनिर्मिती केली जाते.
राधानगरी धरण पाहण्यासारखी ठिकाणी माहिती मराठी
राधानगरी धरण राजर्षी शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी भोगवती नदीवर बांधले. धरण पूर्ण भरल्यानंतर स्वयंचलित दरवाजे आपोआप उघडतात. या धरणाशेजारीच काळम्मावाडी धरण आहे. या परिसरात बाग विकसित केली आहे. जंगल भ्रमंतीसाठी या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होते.
राधानगरी अभयारण्य जवळील पर्यटन स्थळे माहिती मराठी
रंकाळा तलाव – या तलावाला कोल्हापूरची रंकाळा चौपाटी म्हणून ओळखले जाते. प्राचिन काळी या ठिकाणी दगडाची खाण होती. आठव्या ते नवव्या शतकात या ठिकाणी भूकंप होऊन खाण संपून तलावाची निर्मिती झाली. अभयारण्यापासून रंकाळा तलाव 53 किलोमीटर अंतरावर आहे.
शालिनी पॅलेस – हा पॅलेस रंकाळा तलावाच्या पश्चिमेकडे आहे. या ठिकाणी पाम झाडे पाहायला मिळतात, तसेच हिरव्यागार आणि सुंदर बाग येथे पाहायला मिळतात. या पॅलेसचे नाव राजकुमारी शालिनी राजे यांच्यावरून ठेवले आहे. हा पॅलेस राधानगरी अभयारण्यापासून 48 किलोमीटर अंतरावर आहे.
पन्हाळा किल्ला – पन्हाळ्याला पर्णालदुर्ग म्हणून ओळखले जाते. भारत सरकारने या किल्ल्याला 2 जानेवारी 1954 या दिवशी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. हा किल्ला राधानगरी अभयारण्यापासून 66 किलोमीटर अंतरावर आहे.
गगनबावडा – गगनबावडा हे कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्याचे मुख्य गाव म्हणूूून ओळखले जाते. या ठिकाणी गगनगिरी महाराजांचा मठ आहे. या गडाची निर्मिती भोजराजाच्या काळात झाली आहे. गगनबावडा या परिसरात पळसंबे गावाजवळ डॉ. डी.वाय.पाटील साखर कारखाना आहे.
राधानगरी वन्यजीव अभयारण्य फिरण्यासाठी प्रत्येकी 50 रुपये आकारले जातात.
राधानगरी वन्यजीव अभयारण्य कसे पोहचाल ?
राधानगरी वन्यजीव अभयारण्य कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी या तालुक्यात आहे. हे ठिकाण राष्ट्रीय महामार्गाला जोडले असून या ठिकाणी रेल्वे, विमान आणि रस्ता या मार्गाने जाता येते.
जवळील रेल्वे आणि विमान स्टेशन कोल्हापूरचे आहे. कोल्हापूरपासून राधानगरी 60 किलोमीटर अंतरावर आहे.
सारांश
आजच्या या पोस्टमध्ये आपण राधानगरी वन्यजीव अभयारण्य मराठी माहिती – radhanagari wildlife sanctuary information in marathi जाणून घेतली.
त्याचबरोबर राधानगरी वन्यजीव अभयारण्य आणि राधानगरी धरण, त्याचबरोबर राधानगरी जवळ असणारी पर्यटन स्थळे पाहिले आहेत.
राधानगरी वन्यजीव अभयारण्य मराठी माहिती – radhanagari wildlife sanctuary information in marathi तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.
तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल
- कलामहर्षी बाबूराव पेंटर मराठी माहिती – baburao painter information in marathi
- सावंतवाडी मराठी माहिती – sawantwadi information in marathi
- नरसोबाची वाडी माहिती मराठी – narsobachi wadi information in marathi
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
अभयारण्य म्हणजे काय ?
अभय म्हणजे भीती नसते आणि अरण्य म्हणजे जंगल यांच्या संयोगातून अभयारण्य हा शब्द तयार झाला आहे. याचा अर्थ असा होतो, की असे जंगल ज्या ठिकाणी जीवास धोका पोहचणार नाही. अभयारण्यात विविध प्रकारची प्राणी, पक्षी आणि वनस्पती, त्याचबरोबर संपुष्टात येणाऱ्या बाबींचे संवर्धन करण्यात येते.
महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य कोणते आहे ?
महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य राधानगरी (दाजीपूर) वन्य जीव अभयारण्य आहे.
चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगली जिल्ह्यात आहे.
दाजीपूर अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे ?
दाजीपूर अभयारण्य राधानगरी तालुक्यात आहे.