Raksha bandhan in marathi – रक्षाबंधन बहिण-भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. या सणाला राखीपौर्णिमा, पोवती पौर्णिमा आणि रक्षाबंधन म्हणून ओळखले जाते.
रक्षाबंधन हा सण भारतातील प्रमुख सण असून भारतभर मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. हा सण साधारण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो.
या लेखातून आपण रक्षाबंधन सणाची माहिती मराठी (raksha bandhan in marathi) जाणून घेणार आहोत. यात आपण रक्षाबंधन माहिती आणि महत्त्व, राखीपौर्णिमेचा इतिहास (History Of Rakhi Purnima In Marathi) जाणून घेणार आहोत.
Table of Contents
रक्षाबंधन सणाची माहिती मराठी (raksha bandhan in marathi)

विषय | रक्षाबंधन |
इतर नावे | राखीपौर्णिमा व पोवती पौर्णिमा नारळी पौर्णिमा कजरी-पौर्णिमा |
प्रकार | भारतीय प्रमुख सण |
केव्हा साजरा करतात ? | हिंदूंच्या पंचांगानुसार श्रावण महिन्यामधील पौर्णिमेला |
साजरा करणारे | सर्वजण (भाऊ-बहिण) |
भारतातील सण व उत्सवांपैकी रक्षाबंधन हा सण महत्वाचा आहे. दरवर्षी श्रावण पौर्णिमेला हा सण साजरा करतात. राखी म्हणजे राख अर्थात रक्षण कर व सांभाळ कर असा होतो. दरवर्षी बहिण आपल्या भावाला राखी बांधून त्याच्याकडून रक्षणाचे वचन घेते, अशी प्रथा आहे.
बहिण-भावाचे नाते भांडणाचे, खोडीचे असले तरीदेखील या नात्यात पवित्र प्रेम आणि भावना असते. हे प्रेम जपण्यासाठी आणि नात्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राखीपौर्णिमा जगभर साजरी करण्यात येते.
हा लेख जरूर वाचा – महाराष्ट्रातील सण आणि उत्सव माहिती मराठी (festival of maharashtra information in marathi)
रक्षाबंधन इतिहास माहिती मराठी (rakshabandhan history in marathi)
रक्षाबंधनाची सुरूवात नक्की कुणी आणि केव्हा केली, याची ठोस माहिती उपलब्ध नाही. पण इतिहासात डोकावले तर, आपल्या लक्षात येते की राखीचा खूप जुना इतिहास असून पौराणिक कथा आणि दंतकथा यामध्ये राखीचा उल्लेख केलेला आहे.
पूर्वी देव आणि असुर यांचे युद्ध व्हायचे. यात दानवांची शक्ती अधिक असल्याने देवांचा पराभव व्हायचा. एकदा दानवांचा राजा वृत्रासुर याने इंद्राला युद्ध करण्याचे आव्हान दिले. इंद्राने आपले वज्र उचलले आणि युद्धाला निघाला.
इंद्रदेवाला विजय मिळावा यासाठी पत्नीने विष्णूकडून मिळालेला एक दोरा इंद्राच्या हातावर बांधला. हा दोरा म्हणजेच राखी होय, या राखीने इंद्राला आत्मविश्वास मिळाला आणि इंद्राचे गेलेले वैभव त्याला पुन्हा मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली, अशी हिंदू परंपरेत मान्यता आहे.
राखीचे दाखले पौराणिक कथामध्ये आढळतात. महाभारतात श्रीकृष्णाच्या हाताच्या बोटाला जखम झाल्याने रक्त वाहत होते. यावेळी द्रौपदीने तिच्या साडीची किनार फाडून श्रीकृष्णाच्या बोटाला बांधली यामुळे त्याचा रक्तस्राव थांबवला. तेव्हापासून श्रीकृष्णाने द्रोपदीचे आजीवन रक्षण करण्याचा संकल्प केला, असे महाभारतात सांगितले आहे.
चित्तौढगडची राणी कर्णावती हिने बहादुरशाहपासून आपली रक्षा करण्यासाठी मुघल बादशाह हुमायूला राखी बांधली होती. यामुळे हुमायूने राणी कर्णावतीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची बाजी लावली असे म्हंटले जाते.
रक्षाबंधन महत्व याविषयी माहिती मराठी (raksha bandhan importance in marathi)
श्रावण पौर्णिमेला पुरोहितांनी दिलेले आशीर्वाद हे पवित्र मानण्यात येतात, असे पुराणात सांगितले आहे. श्रावण महिना हिंदू परंपरेत पवित्र मानला जातो. या महिन्यात पडलेल्या पावसाने शेतकरी आनंदित होतो.
बहिण आपल्या भावाला राखी बांधून त्याच्याकडून रक्षणाचे वचन घेते, अशी प्रथा आहे. तसेच पूर्वी धाडसी आणि शूरवीर पुरुष आपल्या आसपासच्या सर्व महिलांचे आणि मुलांचे, वयवृद्ध आणि अपंगांचे रक्षण करत. यासाठी त्याला राखी बांधून आपल्या रक्षणाचे अभय घेतले जात.
मध्ययुगीन काळात भारतावर अनेक परकीय आक्रमणे व्हायची. यामध्ये अनेक मुस्लिम शासक भारतावर स्वारी करून समाजाला नुकसान पोहचवत. यातून महिलांचे संरक्षण व्हावे, या हेतूने त्या रक्षणकर्त्या भावाच्या मनगटावर राखी बांधत असे.
हा लेख जरूर वाचा – कोजागिरी पौर्णिमा माहिती मराठी (kojagiri purnima information in marathi)
सारांश
या लेखातून आपण रक्षाबंधन सणाची माहिती मराठी (raksha bandhan in marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. यात आपण राखीपौर्णिमेचा इतिहास (rakshabandhan history in marathi) आणि रक्षाबंधन महत्व याविषयी माहिती मराठी (raksha bandhan importance in marathi) जाणून घेतले आहे.
हा लेख तुम्हाला कसा वाटला ? जर तुम्हाला हा लेख आवडला असेल, तर तुमच्या मित्रांना नक्कीच सामायिक करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
रक्षाबंधन म्हणजे काय ?
रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस होय. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधून ओवाळते. तसेच आपल्या भावाचा उत्कर्ष व्हावा आणि आपले रक्षण करावे, ही मंगल मनोकामना करते.
रक्षाबंधन कधी आहे ?
हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन साजरी करतात. या वर्षी म्हणजे 2022 साली रक्षाबंधन 11 ऑगस्ट रोजी आहे.