ravan information in marathi – मित्रांनो, तुम्हाला रावण हे नाव काही नवीन नाही, रावण हा लंकेचा राजा होता. त्याला रावण हे नाव भगवान शंकरांनी दिले होते. एक विद्वान पंडित आणि शिवाचा भक्त म्हणून रावणाला आजही ओळखले जाते.
त्याचे जीवन फक्त ऐकण्यासाठी नाही तर ते समजून घेण्यासारखे आणि अभ्यासण्यासारखे आहे. यासाठी आज आपण या लेखात रावण माहिती मराठी (ravan information in marathi) जाणून घेणार आहोत.
रावणाचा जीवन परिचय मराठी (ravana biography in marathi)

रावण विश्रवा ऋषी व कैकसीचा मुलगा होता. रावणाला वडिलांकडून ज्ञान व आईकडून दैत्य शक्ती जन्मतःच प्राप्त झाली होती. आजपर्यंतचा भगवान शंकराचा सर्वात महान भक्त (greatest shiva bhakt) म्हणून रावणाची ओळख आहे.
ravan other name in marathi – रावणाला रुद्राक्ष, मेलुहेश, लंकेश, प्रजापती, लँकेशवर, काल, अहिरावण, मातंग, गिरधारी, गिरलिंग, मानस, कलिंग, मर्दन, कलांकेश्र्वर या नावाने ओळखले जाते.
ravana siblings names marathi – रावणाला कुबेर, विभीषण, कुंभकर्ण, अहिरावण, खर और दूषण हे सहा भाऊ आणि शूर्पणखा व कुंभिनी या दोन बहिणी होत्या. यातील कुंभकर्ण, विभिषण, शूर्पणखा ही रावणाची सख्खी भावंडे होते.
मंदोदरी ही रावणाची पत्नी असून इंद्रजीत, अक्षयकुमार, अतिकाया, देवांतक, नरांतका, त्रिशिर, प्रहस्त ही रावणाची मुले होती.
रावण साम्राज्य माहिती मराठी (kingdom of ravana marathi)
कुबेर हा लंकाधिपती रावणाचा सावत्र भाऊ होता. याने वर्षानुवर्षे ब्रह्मदेवाची उपासना केल्याने प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने त्याला अमरत्व, लंकेचे राज्य आणि पुष्पक विमान दिले. पुढे रावणाने त्याच्यावर स्वारी करून लंका आणि पुष्पक विमान मिळवले.
यानंतर रावणाने लंकेचे राज्य यशस्वीपणे चालवले. सर्व प्रजा, ऋषीमुनी आणि इतर जनता रावणावर खूश होते. जगाच्या इतिहासात भव्यदिव्य व्यक्तिमत्त्व असणाऱ्या यादीत रावणाचे नाव नक्कीच आहे.
रावणाने अनेक विषयांत प्राविण्य मिळवले होते. चार वेद आणि सहा उपनिषदे याचे संपूर्ण ज्ञान रावणाकडे होते. यासोबतच तो उत्तम आयुर्वेदाचार्य होता. यामुळे तर त्याला महाज्ञानी म्हंटले जाते.
रावण हा भगवान शंकराचा परमभक्त म्हणून ओळखला जातो. शंकरानेच रावणाला नाव दिले अशी मान्यता आहे. यासोबतच दशानंद ब्रह्मदेवाचा भक्त होता. त्याने ब्रह्मदेवाची तपस्या करून अनेक वरदान मिळविले होते. अगदी अमर होण्याचे वरदान मागितले आणि मिळविले देखील.
लंकाधिपती रावणाने ब्रह्मदेवाची तपस्या करून अमर होण्याचे वरदान मागितले. यावेळी त्याने स्वतःचे 9 वेळा शिर कापून ब्रह्मदेवाला समर्पित केले. यावर ब्रह्मदेव रावणाची तपश्चर्या व आंतरिक इच्छेवर होऊन एका अटीवर अमरत्व देऊन टाकले.
ब्रह्मदेवाने रावणाला अमृताची एक कुपी दिली. ही कुपी त्याच्या नाभीच्या खाली ठेऊन हिचे रक्षण करण्यास सांगितले. ही कुपी सुरक्षित असेल तोपर्यंत कोणत्याही कारणाने रावणाचा मृत्यू होणार नाही असे हे वरदान होते.
पण रावणाकडून एक चूक झाली ती म्हणजे, त्याने कुपीचे गुपित रहस्य बिभिषणला सांगितले. याचा परिणाम तुम्हा सर्वांना माहीतच आहे.
रावण विषयी रोचक तथ्य मराठी (ravana interesting facts marathi)
रावणाचे वडील ऋषीमुनी तर आई दैत्य कुळातील असून त्याला आठ भावंडे होती. रावणाने आपल्या परिवाराचा आणि प्रजेचा चांगला सांभाळ केला. रावण साम्राज्यात प्रत्येकाकडे सोन्याची भांडी होती अशी मान्यता आहे.
रावण आयुर्वेद, राज्यशास्त्र, ज्योतिषशास्त्र ह्या विषयांत तज्ज्ञ होता. यासोबतच त्याला संगीताची आवड असून तो एक चांगला वीणावादक होता.
जगातील अत्यंत भव्यदिव्य व्यक्तिमत्त्व असणारा रावण एक महान शिवभक्त होता. तसेच त्याने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून अमरत्वाचे वरदान मिळविले.
रावण विद्वान पंडित असून त्याने बऱ्याच क्षेत्रातील ज्ञान मिळविले होते. त्याच्या ज्ञानाची जाण भगवान रामाला होती. म्हणून राम रावणाला नेहमी आदराने महाब्राह्मण संबोधित असे.
तसेच रावण आणि रामाच्या युद्धात रावण मृत्युशय्येवर पडला असताना रामाने त्याला अभिवादन करून लक्ष्मणाला जीवनाचे गुपित आणि त्याची महानता समजून घेण्याची आज्ञा केली.
परिवारासाठी काहीही करणारा, वेद, उपनिषदे, शस्त्रविद्या, आयुर्वेद, राज्यशास्त्र, ज्योतिषशास्त्र, एक महान तपस्वी, शिवभक्त, त्या काळातील सर्वात धनवान आणि शक्तिशाली प्रजेचे हित जपणारा राजा म्हणून रावणाला ओळखले जाते.
रावण माहिती मराठी (ravan information in marathi)
दहा विद्वतापूर्ण बुद्धिमत्तांचा ठेवा असणाऱ्या रावणाने लंकेचे राज्य अत्यंत यशस्वीपणे चालवले. एक प्रभावी राजा म्हणून त्याचे नाव अजरामर आहे. त्यामुळे श्रीलंकेत आजही त्याची पूजा केली जाते.
श्रीलंकेबरोबरच इतर प्रांतात रावणाची पूजा केली जाते. शिवलिंगासह रावणाच्या अनेक कलाकृती थायलंडमध्ये आहेत. भारतात आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान या राज्यातील काही भागात रावणाची पूजा करतात.
भारतात आंध्रप्रदेश येथील कोळी समाज रावणाची पूजा करतो. मध्यप्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील रावणग्राम क्षेत्रात कान्यकुब्ज ब्राह्मण समाज रावणाला देव मानतात. उत्तर प्रदेशांतील कानपूरमध्ये रावणाचे मंदिर आहे. येथे दसऱ्याच्या दिवशी रावणमूर्तीची पूजा केली जाते.
सारांश
या लेखातून आपण रावण माहिती मराठी (ravan information in marathi) जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्कीच कळवा. बाकी लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.
महत्वाची टीप – वरील माहिती गुगल आणि विकिपीडियावरील उपलब्ध माहितीवरून घेण्यात आली आहे. यात काही बदल असल्यास आम्हाला जरूर कळवा. रावण विषयी अधिक माहिती तुमच्याकडे असेल तर आम्हाला कळवा, ती माहिती या लेखात समाविष्ट केली जाईल.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
रावणाचे पूर्ण नाव काय आहे ?
रावणाचे पूर्ण नाव दशनान विश्रवा मढवी हे आहे. रावणाच्या आईचे नाव कैकासी व वडिलांचे नाव विश्रवा हे होते.
रावणाला किती तोंड होते ?
रावणाला दहा तोंड होते, असे म्हटले जाते. पण रावणाची विद्वता 10 पंडिता इतकी होती म्हणून त्याला दशमुखी हे नाव पडले होते. पण शरीराने तो सर्वसामान्य असून त्याला एकच तोंड होते.
रावणाला किती भाऊ होते ?
रावणाला कुबेर, विभीषण, कुंभकर्ण, अहिरावण, खर आणि दूषण असे सहा भाऊ होते.
रावणाला किती बहिणी होत्या ?
रावणाला शूर्पणखा आणि कुंभिनी या दोन बहिणी होत्या.
रावणाला किती बायका होत्या ?
रावणाला मंदोदरी व धनमालिनी या दोन बायका होत्या.
रावणाला किती मुले होती ?
रावणाला इंद्रजीत, अक्षयकुमार, अतिकाया, देवांतक, नरांतका, त्रिशिर, प्रहस्त ही सात मुले होती.
पुढील वाचन :