Reading information in marathi – साक्षर जीवन जगत असताना आपण पुस्तके, मासिक, वर्तमानपत्र, परिपत्रक, जाहिरात, निमंत्रण पत्रिका किंवा एखादा मजकूर वाचत असतो.
वाचनाने ज्ञान वाढते, बोलण्याने हजरजबाबीपणा येतो, तर लेखनाने माणूस काटेकोर होतो असे म्हटले जाते. आपण वाचतो ते का आणि कशासाठी, त्याचे महत्त्व काय हे समजले की वाचनाचा वेग वाढण्यास मदत होते आणि वाचनाने फायदेही होतात.
यासाठी आपण या लेखातून वाचन माहिती मराठी (reading information in marathi) जाणून घेणार आहोत. ज्याचा वापर करून आपण वाचानातील चुकीच्या सवयी सुधारू शकेल.
हा लेख जरूर वाचा – वाचन प्रेरणा दिन माहिती मराठी (vachan prerna din mahiti)
Table of Contents
- वाचन माहिती मराठी (reading information in marathi)
- वाचन म्हणजे काय | वाचनाची व्याख्या मराठी (definition of reading in marathi)
- वाचनाचे महत्व माहिती (importance of reading in marathi)
- आठ वाचनाचे घटक माहिती मराठी (8 elements of the reading process)
- वाचनाचे आकलन माहिती मराठी (assessment of reading information in marathi)
- आकलनाचे प्रकार माहिती मराठी (assessment level in marathi)
- वाचनाचे फायदे माहिती मराठी (advantages of reading information in marathi)
- चुकीच्या वाचनसवयी माहिती मराठी (common mistakes in reading)
- चुकीच्या वाचनसवयीचे निराकरण कसे करावे (how to avoid common mistakes in reading)
- सारांश
- वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
वाचन माहिती मराठी (reading information in marathi)

विषय | वाचन |
प्रकार | अध्ययन कौशल्य |
वापर | मजकुराचा आकलन करण्यासाठी |
आपण एखादा मजकूर वाचतो, ते कशासाठी आणि त्याचे महत्व काय हे जर आपणास माहीत असेल की वाचनाचा वेग वाढतो. वाचन आणि लेखन या क्रिया एकमेकांशी इतक्या निगडित आहेत की, एकाशिवाय दुसरी क्रिया करणे अवघड आहे.
वाचनाचे महत्व समजून घेण्यासाठी आपण आधी वाचन म्हणजे काय ? याविषयी माहिती जाणून घेऊ.
वाचन म्हणजे काय | वाचनाची व्याख्या मराठी (definition of reading in marathi)
वाचनाची व्याख्या मराठी (definition of reading in marathi) लिहणाऱ्याच्या हेतूनुसार वाचणाऱ्याला झालेले अर्थाचे आकलन म्हणजे वाचन होय. वाचन करताना मजकुराचा अर्थ कळणे आवश्यक असते. यामुळे वाचनात अक्षरज्ञान, अक्षर आणि आवाज यातील परस्परसंबंध, वाचनाऱ्याचा भाषिक अभ्यास, हेतू इत्यादींचा समावेश होतो.
वाचनाचे महत्व माहिती (importance of reading in marathi)
- वाचनाचे आपल्या जीवनात खूप महत्व आहे. लेखन करण्यासाठी वाचन करता येणे आवश्यक ठरते.
- खूप आणि चिकिस्तक वाचनाने आपल्या अनुभवात भर पडत जाते.
- विविध प्रकारची माहिती आपल्या बुद्धीत संग्रहित राहते. त्याने दृष्टी व्यापक होते.
- स्वतःला आनंद मिळतो तसा दुसऱ्याला देता येतो.
- पुन्हा पुन्हा केलेल्या वाचनाने स्मरणशक्ती वाढीस लागते. विचार किंवा मत निश्चितपणे मांडता येते.
हा लेख जरूर वाचा – इतिहास म्हणजे काय मराठी माहिती (itihas mhanje kay marathi mahiti)
आठ वाचनाचे घटक माहिती मराठी (8 elements of the reading process)
- शब्दबोध – नजर टाकताच शब्द लक्षात यायला हवा.
- वाचनदिशा – डावीकडून उजवीकडे आणि वरून खाली अशी हवी.
- पूर्नदृष्टिक्षेप – कारण नसताना पुन्हा पुन्हा अलीकडील शब्दावर नजर वळवू नये.
- दृष्टीचा आवाका – एकच दृष्टिक्षेपात एकदम दोन तीन शब्द वाचावेत.
- शब्दोचारण – मूक वाचनात मनातल्यामनात मोठ्याने उच्चार करण्याची गरज नाही.
- आकलन – अनावश्यक गोष्टीकडे दुर्लक्ष करून हव्या त्याच गोष्टी समजून घ्याव्यात.
- आस्वादन – शब्दांच्या निरनिराळ्या छटा समजून घेत, आपल्या तयारीप्रमाने, उद्दिष्ट नुसार अनुभवात रममाण होणे.
- शब्दसंग्रह – वाचणाऱ्याजवळ असलेल्या शब्दांच्या साठ्याप्रमाणे त्यांचे बोधन आणि आकलन होते तसेच वेग वाढतो.
वाचनाचे आकलन माहिती मराठी (assessment of reading information in marathi)
वाचनात सर्वाधिक महत्व आकलनास आहे. वाचन प्रक्रियेतील सर्व घटकांकडे व्यवस्थित लक्ष दिल्यास वाचलेल्या मजकुराचे चांगले आकलन होते.
आकलन म्हणजे काय ? |
- आकलन म्हणजे वाचलेल्या मजकुरातील मध्यवर्ती कल्पना किंवा महत्त्वाचा तपशील समजणे.
- आकलन म्हणजे योग्य तो तर्क किंवा अंदाज बांधता येणे.
- आकलन म्हणजे योग्य व योग्य, उचित किंवा अनुचित, आवश्यक अथवा अनावश्यक हे ठरविता येणे.
आकलनाचे प्रकार माहिती मराठी (assessment level in marathi)
1. बोधन पातळी – बोधन म्हणजे लेखकाला जे सांगायचे आहे, ते उचित/योग्य संवेदनेसहित आणि अर्थासहित कळणे. बोधनपातळी वाढण्यासाठी खाली काही महत्वाच्या बाबी विचारात घ्याव्या लागतात.
- चाळणी – पुस्तकाचे मुखपृष्ठ, शीर्षक, अनुक्रमणिका, मांडणी, भाषा, परिशिष्ट, सूची, समारोप वाचून हा मजकूर आपल्या दृष्टीने उपयुक्त आहे का नाही हे ठरवावे.
- वेचक बोधन – निवडलेल्या मजकुरातील महत्वाचे शब्द, मध्यवर्ती शब्दांखाली अधोरेखित करावे. या वेचलेल्या शब्दांना वेचक बोधन म्हणतात.
- सारग्रहण – वाचत असताना थोड्या वेळात महत्वाचे काय आहे ? हे लक्षात येणे म्हणजे सारग्रहण होय.
2. तर्कपातळी – ही आकलनाची दुसरी पातळी आहे. काही वेळा वाच्यार्थ कळून उपयोग नसतो. तर शब्दात आणि वाक्यात दडलेला अर्थ समजणे आवश्यक असते. यासाठी कधीकधी तरी लावणे गरजेचे असतें.
3. मूल्यमापनात्मक आकलन – वाचणारा आपल्या दृष्टीने उपयुक्त काय आहे ? हे ठरवून वाचन करत असतो. मूल्यमापनाचे दंडक वाचणाऱ्याजवळ असते. यामुळे वाचणारा त्याच्या अपेक्षेनुसार निकष लावून वाचीत जातो. या पातळीवरील आकलनास मूल्यमापनात्मक आकलन असे म्हणतात.
5. रसग्रहणात्मक पातळी – लेखकाने लिहलेल्या मजकुराच्या भावनांची आणि संवेदनांची जाणिव स्वतःच्या मनाने अनुभवणे याला रसग्रहणात्मक पातळी म्हंटले जाते.
रसग्रहणात्मक पातळीमधून आपल्याला लेखकांची भूमिका स्पष्टपणे समजते. त्यांच्या भावनांचे आकलन होते. पात्रांचे स्वभाव, लेखकांची शैली, शब्दसौंदर्य आणि अलंकार सौंदर्य समजते. अशा विविध प्रकारांनी होणारे आकलन म्हणजे रसग्रहणात्मक आकलन होय.
हा लेख जरूर वाचा – इतिहासाची शास्त्रीय पद्धत म्हणजे काय (itihasachi shastriya padhat mhanje kay)
वाचनाचे फायदे माहिती मराठी (advantages of reading information in marathi)
- वाचनाने बहुश्रुतता वाढते. अनेक विषयाची माहिती होते. अनेक प्रक्रिया आणि प्रवृत्ती माहित होतात. अनेक लेखकांच्या जीवनविषयक दृष्टिकोन माहित होतात. याचा वापर करून आपण आपल्या जीवनातील शैली किंवा दृष्टिकोन तयार करून आपली आणि समाजाची प्रगती साधू शकतो.
- वाचनाने जिज्ञासापूर्ती होते. आपल्याला अनेक क्षेत्राविषयी कुतूहल वाटत असते. वाचनाने आपल्याला देशोदेशीचा इतिहास, भूगोल आणि संस्कृतीची ओळख करून देतात.
- वाचनाने भाषाकोश समृद्ध होतो. शब्दांचे विविध उपयोग समजतात. शब्दांचा योग्य तो अर्थ, म्हणी, वाक्प्रचार, व्यंगार्थ, वक्योती यांच्या ओळखीने आपली शाब्दिक (भाषिक) क्षमता विकसित होते.
- कल्पनाशक्तीचा विकास होतो.
- वाचन कौशल्य संबंधित इतर कौशल्यांचा विकास होतो. यामध्ये संभाषण, लेखन, टिपण, वकृत्व अशी विविध कौशल्यांचा समावेश होतो.
- सामाजिक, ऐतिहासिक, कथा, कादंबऱ्या, नाटक, भाषांतरित साहित्य, अन्य ललित साहित्य यातून विविध संस्कृती आणि परंपरेची ओळख होते.
चुकीच्या वाचनसवयी माहिती मराठी (common mistakes in reading)
- वाचन करत असताना बरेच जण ओळीवर बोट ठेवून किंवा पेन्सिल ठेवून वाचतात, याने वाचनाचा वेग कमी होऊन आकलन कमी होते.
- बरेच जण मोठ्याने वाचत असतात, पण प्रत्येक वेळी वाचन मोठ्याने करणे हितावह नसते.
- वाचन करत असताना, ओठांच्या, स्वर यंत्राच्या हालचाली करण्यामुळे वाचनाचा वेग कमी होऊन आकलन कमी होते.
- वाचन दिशा नेहमी डावीकडून उजवीकडे असते. त्यासाठी काहीजण वाचताना मान फिरवतात. यामुळे वाचनाचा वेग कमी होऊन आकलन कमी होते.
चुकीच्या वाचनसवयीचे निराकरण कसे करावे (how to avoid common mistakes in reading)
- वाचन करत असताना ओळीवर बोट ठेवणे, जाणीवपूर्वक सोडले पाहिजे. कारण नजरेचा वेग हा हाताच्या वेगापेक्षा नेहमी जास्तच असतो.
- मोठ्याने वाचन केल्यास लक्षात राहते, ही समजूत चुकीची आहे. पण संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, मोठ्याने उच्चार करून किंवा मनातल्या मनात शब्दोच्चार करून दर मिनिटात जास्तीत जास्त 250 ते 300 शब्द वाचता येतात. पण शब्दोच्चार मोठ्याने न वाचता एका मिनिटात 800 शब्द वाचले जातात. म्हणून केवळ नजरेने वाचायला शिका.
- मनातल्या मनात हालचाल न करता वाचण्याचा सराव करा.
- एकच दृष्टिक्षेपात एकदम दोन तीन शब्द वाचण्याचा सराव करावा.
सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण वाचन माहिती मराठी (reading information in marathi) जाणून घेतली आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
वाचन म्हणजे काय ?
आकलनासह केलेले ध्वनीचे उच्चारण म्हणजे वाचन होय. एखादा मजकूर वाचल्यानंतर मजकुरातील तर्क, कल्पना, शब्दार्थ आणि भावार्थ समजून घेणे म्हणजेच आकलन होय.
मूक वाचन म्हणजे काय ?
मनातल्या मनात स्वतःसाठी केलेल्या वाचनाला मूक वाचन असे म्हटले जाते. संशोधनानुसार, या वाचन प्रकारात दर मिनिटात 800 शब्द वाचता येतात. हे वाचन करतांना ओठांच्या हालचाली, उच्चारणासाठी लागणारा वेळ आणि शक्ती खर्च होत नसते.
प्रकट वाचन म्हणजे काय ?
अक्षर ध्वनीच्या मोठ्या आवाजातील उच्चारणाला प्रगट वाचन असे म्हणतात.