26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मराठी माहिती

Republic Day Information In Marathi – प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता असणे होय. मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की भारत देशावर अनेक साम्राज्याची सत्ता होती. यातीलच एक म्हणजे ब्रिटीश सरकार होय. या ब्रिटिश सरकारने भारताला 150 वर्ष गुलामीत ठेवले. भारतातील थोर क्रांतिकारकांनी अनेक बलिदान देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले.

15 ऑगस्ट 1947 हा तो दिवस भारत देश स्वतंत्र झाला. आता यापुढे देशाचे नेतृत्व कोणत्या साम्राज्याकडे नसून प्रजेकडे राहतील, या उद्देशाने भारतभर प्रजा हीच राजा असा कायदा आणणे आवश्यक होते.

असा कायदा आणण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस जगातील 60 देशांच्या घटनेचा विचार करून भारतीय संविधान या सर्वोच्च कायद्याची निर्मिती झाली. या कायद्याअंतर्गत भारतात 26 जानेवारी 1950 पासून लोकशाही पद्धतीने राज्यकारभार करण्यास सुरुवात झाली.

भारतीय संविधानामुळे देशात हुकूमशाही संपून लोकशाहीची प्रस्थापना झाली. यामुळे हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो.

या लेखातून आपण 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाची माहिती (Republic Day Information In Marathi) सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मराठी माहिती (Republic Day Information In Marathi)

republic day information in marathi

मित्रांनो, 26 जानेवारी हा दिवस भारताचा राष्ट्रीय सण (National Day Of India) आहे. या दिवसाला प्रजासत्ताक दिवस (Republic Day) असेही म्हंटले जाते.

प्रजासत्ताक म्हणजे (Republic Day Meaning In Marathi) प्रजेची सत्ता असणारे राज्य होय आणि ज्या दिवशी या सत्तेची स्थापना झाली तो दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिवस.

मित्रांनो, ब्रिटिश सरकारने 150 वर्ष भारतावर राज्य केले. पण आपण त्या अगोदरचा विचार केला तर असे लक्षात येईल की, मोजकी काही शतके सोडली तर भारतावर परप्रांतीयांनी राज्य केले.

असो, आपल्या वीर क्रांतिकारक आणि महान नेत्यांनी जीवाचे प्राण गमावत आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. 15 ऑगस्ट 1947 हा तो दिवस जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली.

देश स्वतंत्र झाल्यानंतर भारत देशाचे कायदे हुकूमशाही स्वरूपाचे नसून लोकशाही स्वरूपाचे राहतील, या उद्देशाने कायदा निर्माण करण्याची मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने केली होती.

यापूर्वी इसवी सन 1934 मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी पहिल्यांदा भारत देशासाठी संविधान सभा बनविण्याची कल्पना दिली होती.

इसवी सन 1946 साली भारताचे संविधान तयार करण्यासाठी घटना समितीची स्थापना करण्यात आली. या सभेत सुरुवातीला 296 सदस्य होते, भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यात फेरबदल होऊन 299 झाली.

9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक झाली. पुढे 2 दिवसांनी डॉ.राजेंद्रप्रसाद यांची घटना समितीचे अध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली.

13 डिसेंबर रोजी जवाहरलाल नेहरुंनी घटनासमितीत मांडलेल्या उद्देशपत्रिकेच्या आधारे घटनेचे प्रास्ताविक तयार करण्यात आले. या प्रास्ताविकेच्या आधारावर घटनेची निर्मिती करण्यात आली.

घटना समितीने संविधान निर्मितीच्या कामांसाठी 8 मुख्य समित्या व 13 उपसमित्यांची रचना केली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 299 सदस्यांना विविध कामे वाटुन देण्यात आली. ती पुढीलप्रमाणे,

  1. घटना समितीने राज्यघटना तयार करणे
  2. देशासाठी कायदे तयार करणे
  3. भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला अनुमोदन देणे
  4. भारताचा राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रगान स्विकृत करणे
  5. पहिल्या राष्ट्रपतींची निवड करणे आणि निवडणुका होईपर्यंत तात्पुरती संसद म्हणुन कार्यभार पाहणे ही कामे केली.

मसुदा समिती ही घटना निर्मितीतील मुख्य समिती होती. या समितीत सात सदस्य होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते. इतर समित्यांनी केलेल्या तरतुदींचा विचार करुन घटनेचा मसुदा तयार करण्याचे काम मसुदा समितीने केले.

त्यांनी इसवी सन 1948 मध्ये घटनेचा पहिला मसुदा सादर केला. यांनतर या जनतेने मसुद्यात सुधारणा सुचविण्यासाठी आठ महिने वेळ दिला. पुढे ऑक्टोबर 1948 मध्ये जनतेची मते, सुचना, टीका विचारात घेऊन घटनेचा दुसरा मसुदा सादर करण्यात आला. दुसऱ्या मसुद्यातील विषयावर चर्चा होऊन नोव्हेंबरमध्ये तिसरा अंतीम मसुदा घटना समितीत मांडण्यात आला.

अंतिम मसुद्यातील प्रत्येक कलम विचारात घेऊन वर्षभरात एकुण तीनदा वाचन झाले. यावेळी एकुण 7563 सुधारणा सुचविल्या गेल्या, त्यापैकी 2473 सुधारणांवर घटना समितीत प्रत्यक्ष चर्चा घडुन आली.

26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेच्या मसुद्याचा ठराव संमत करण्यात आला. 299 पैकी उपस्थित असणाऱ्या 284 सदस्यांनी राज्यघटनेवर सह्या केल्या.

24 जानेवारी 1950 रोजी पुन्हा एकदा घटना समितीने राज्यघटनेवर सर्वांच्या स्वाक्षऱ्या करून घटनेचा अंमल 26 नोव्हेंबर 1950 पासुन सुरु केला. यांनतर घटना समिती संपुष्टात आली.

भारतीय संविधान लागू झाल्यापासून भारत सरकार कायदा 1935 व 1947 आणि त्याचे सर्व पुरक कायदे रद्द करण्यात आले.

प्रजासत्ताक दिनाविषयी माहिती मराठी (Republic Day Information In Marathi)

भारतीय संविधानाला 26 नोव्हेंबर रोजीच संविधान सभेत मंजूरी मिळाली होती. यानुसार 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस झाला असता. पण 26 जानेवारी 1930 रोजी काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्याची घोषणा दिल्या होता. या आठवणीच्या पार्श्वभुमीवर 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू करण्यात आले.

जगातील महसत्ता असणाऱ्या अमेरिकेचे संविधान चार महिन्यात निर्माण केले होते. पण भारताचे संविधान निर्माण करताना 2 वर्षे, 11 महिने आणि 18 दिवसांचा कालावधी लागला.

याचे कारण म्हणजे भारताचे संविधान लिहिताना जगातील जवळपास 60 देशांच्या घटनांचा विचार केला गेला. यानुसार भारतीय संविधान जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.

संविधान निर्मिती वेळेस घटना समितीने 11 सत्रात एकूण 166 दिवस काम केले. ते मसुदा समितीने 141 दिवस काम केले. यासाठी 63 लाख 96 हजार 729 रुपये इतका खर्च आला.

भारतीय राज्यघटनेचे मुळ प्रत प्रेमबिहारी नारायण रायजादा उर्फ सक्सेना यांनी लिहिली. घटनेच्या प्रत्येक पानावर नंदलाल बोस यांच्या नेतृत्वाखाली आकर्षक नक्षीकाम करण्यात आले आहे.

बिओहर राममनोहर सिन्हा यांनी घटनेच्या प्रास्ताविकाचे नक्षीकाम केले आहे. हिंदीतील मुळ प्रत वसंत वैद्य यांनी लिहिली आणि त्यावर नंदलाल बोस यांनी नक्षीकाम केले.

भारतीय संसदेच्या लायब्ररीत हेलियम पेटीमध्ये भारतीय संविधानाची इंग्रजी आणि हिंदी भाषेत लिहिलेली मुळ प्रत सुरक्षित ठेवण्यात आली आहे. या प्रती देहारादुन येथे छापण्यात आल्या होत्या.

भारत हा प्रजासत्ताक देश आहे कारण भारत देशातील सरकार, राज्यव्यवस्था आणि एकूणच राज्यकारभार संविधानानुसार चालतो.

26 जानेवारी या दिवशी भारतरत्न, पद्मभुषण, किर्तीचक्र अश्या पुरस्काराने नामांकित व्यक्तीला गौरविण्यात येते.

सारांश

या लेखातून आपण 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मराठी माहिती (Republic Day Information In Marathi) जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

प्रजासत्ताक म्हणजे काय ?

प्रजासत्ताक दिन म्हणजे नेमके काय हे बहुतांश लोकांना लक्षात येत नाही. तर मित्रांनो, प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता असणे. प्रजासत्ताक या शब्दाला लोकशाही हा समानार्थी शब्द होऊ शकतो.

प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो ?

26 जानेवारी 1950 रोजी भारत देशातील प्रचलित असलेले भारत सरकार 1935 व 1947 कायदे आणि त्याचे सर्व पुरक कायदे रद्द करून नवीन संविधानानुसार प्रजेचे हित साधणारा कायदा लागू करण्यात आला. या निमित्ताने हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करतात.

26 जानेवारीच्या संचलनाची मानवंदना कोण स्वीकारतो ?

26 जानेवारीच्या संचलनाची मानवंदना देशाचा राष्ट्रपती स्वीकारतो.

26 जानेवारी 2023 कितवा प्रजासत्ताक दिन आहे ?

26 जानेवारी 2023 या दिवशी साजरा करण्यात येणारा 74वा प्रजासत्ताक दिन आहे.

संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते ?

संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद हे होते.

संविधान सभेने घटना समितीच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली ?

संविधान सभेने घटना समितीच्या उपाध्यक्षपदी हरेंद्र कुमार मुखर्जी यांची नियुक्ती केली.

मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?

मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबसाहेब आंबेडकर हे होते.

मसुदा समितीमध्ये एकूण किती सदस्य होते ?

मसुदा समितीमध्ये एकूण सात सदस्य होते.

घटना समितीत एकूण किती सदस्य होते ?

घटना समितीत सुरुवातीला 296 सदस्य होते, भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यात फेरबदल होऊन ही संख्य 299 इतकी झाली.

घटना समितीची पहिली बैठक केव्हा झाली ?

घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली.

घटना समितीचे कामकाज किती दिवस चालले ?

घटना समितीचे कामकाज 2 वर्ष 11 महिने 12 दिवस चालले.

घटना समितीची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली होती ?

घटना समितीची संकल्पना सर्वप्रथम मानवेंद्रनाथ रॉय यांनी मांडली होती.

संविधान सभेची अखेरची बैठक कधी झाली ?

संविधान सभेची अखेरची बैठक 24 जानेवारी 1950 रोजी झाली.

संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते ?

संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार बी. एन. राव हे होते.

भारताच्या संविधान सभेत एकूण महिला सदस्यांची संख्या किती होती ?

भारताच्या संविधान सभेत एकूण महिला सदस्यांची संख्या पंधरा इतकी होती.

सुचवलेले लेख

  1. संविधानाची उद्देशिका म्हणजे काय ?
  2. भारतीय संविधान दिवस मराठी माहिती
  3. भारतीय स्वातंत्र्यदिन माहिती मराठी