reseller hosting business startup guide marathi – इंटरनेटचा वापर दिवसेंदिवस वाढतच आहे, त्यामुळे सर्वच व्यावसायिक आपल्या व्यवसायाला ऑनलाईन करत आहेत. म्हणजेच त्यांच्या व्यवसाय किंवा संस्थेची वेबसाइट तयार करत आहेत.
ही वेब होस्टिंग व्यवसाय करण्यासाठी चांगली संधी आहे. जर तुम्ही वेब होस्टिंग व्यवसाय कसा सुरु करावा (what do you need to start a reseller business marathi) याविषयी माहिती शोधत असाल, तर हा लेख तुमच्यासाठीच आहे.
या लेखात आपण वेब होस्टिंग व्यवसाय कसा सुरु करावा (reseller hosting business startup guide marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
पुनर्विक्रेता वेब होस्टिंग म्हणजे काय (what is reseller web hosting mahiti)

पुनर्विक्रेता वेब होस्टिंग हा एक वेब होस्टिंगचाच प्रकार आहे. सामाईक किंवा क्लाउड होस्टिंगमध्ये वेबसाईट तयार करणारा स्वतःची वेबसाईट सर्व्हरवर होस्ट करू शकतो. तर पुनर्विक्रेता वेब होस्टिंग दुसऱ्यांसाठी म्हणजेच वेबसाईट तयार करणाऱ्यांसाठी होस्टिंग सेवा पुरवते.
reseller hosting is used for mahiti – अनेक कंपनी, ब्रँड, छोटे-मोठे व्यवसाय, ब्लॉगर्स आणि इतर संस्था इंटरनेटवर येण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे पुनर्विक्रेता वेब होस्टिंग व्यवसाय करणे फायद्याचे ठरू शकते.
पुनर्विक्रेता वेब होस्टिंग विक्रेता ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार वेब होस्टिंग म्हणजेच ऑनलाईन जागा उपलब्ध करून देतो.
वेब होस्टिंग व्यवसाय कसा सुरु करावा (reseller hosting business startup guide marathi)
1. योग्य प्रेक्षक वर्ग निवडा (select right audience) – कोणताही व्यवसाय करण्यासाठी ग्राहक म्हणजेच प्रेक्षक ठरवणे महत्त्वाचे असते, तसेच तुम्हाला वेब होस्टिंग व्यवसाय सुरु करताना तुमचा ग्राहक कोण असेल ? याविषयी संशोधन करावे लागेल.
एकदा तुम्ही तुमचा अपेक्षित प्रेक्षक वर्ग निवडला की, त्यानुसार तुम्ही व्यवसायाची उद्दिष्टे आणि धोरण ठरवू शकता.
2. योग्य होस्टिंग कंपनी निवडा (Choosing the right parent resellers company) – ग्राहक वर्गाची निवड केल्यानंतर वेळ येते, योग्य होस्टिंग कंपनी निवडण्याची. बाजारात अनेक मोठमोठ्या कंपन्या आहेत, ज्या रिसेलर प्लॅन विक्री करतात.
अशा विविध कंपन्याचे संशोधन करून, त्यांचे प्लॅन आणि वैशिष्ट्यांची तुलना करून तुम्हाला हवा तो प्लॅन निवडावा. हा प्लॅन निवडताना प्लॅनची किंमत, सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन, ग्राहक समर्थन आणि ऑर्डर व्यवस्थापन अश्या वैशिष्ट्य कडे लक्ष देणे गरजेचे आहे.
3. भांडवल निश्चित करा (determine capital structure) – व्यवसाय प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी भांडवल गरजेचे आहे. यासाठी तुमची अपेक्षित गुंतवणूक आणि खर्च निश्चित करा. यासोबतच बॅकअप प्लॅन बनवा.
तुम्ही ग्राहकांना देणारे प्लॅन आणि त्यातून नफा कसा मिळेल, याचा अभ्यास करायला हवा. नफा कमावण्यासाठी योग्य संशोधन करून व्यवसायाचा मुख्य उद्देश आणि प्लॅन तयार करा.
4. पुनर्विक्री करण्यासाठीचे प्लॅन तयार करा (reseller hosting plans) – तुमच्या ग्राहकांना वेब होस्टिंग सेवा देताना कोणकोणत्या सुविधा देणार आहात आणि त्याची किंमत काय असेल ? याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
याला व्यवसायाची ब्ल्यू प्रिंट देखील म्हणतात. यात व्यवसायाचे स्वरूप, उद्दिष्ट, मार्केटिंग प्लान, उत्पादन विक्री आणि त्यातून नफा मिळवण्यासाठी संशोधनात्मक माहिती असते.
वेब होस्टिंग पुनर्विक्री करण्यासाठीचे प्लॅन तयार करताना तुमच्या स्पर्धकांकडे लक्ष द्या. त्यांचे प्लॅन आणि ऑफर्स तपासून तुमचे प्लॅन बनवा. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तुम्ही तोट्यात जाणार नाही, याची काळजी घ्या.
5. व्यवसायाची जाहिरात करा ( business advertising) – मार्केट रिसर्च, व्यवसाय प्लॅन आणि भांडवल निश्चित केल्यानंतर, व्यवसायाची जाहिरात सुरू करा. तुमच्या व्यवसायाच्या नावाने डोमेन नेम खरेदी करून चांगली वेबसाईट तयार करा.
व्यवसायाच्या नावाने सोशल मीडिया जसे की फेसबुक, इंस्टाग्राम अश्या विविध सोशल नेटवर्कवर खाते उघडून तुमच्या व्यवसायाविषयी जाहिरात करा.
तुमच्या ग्राहक वर्गापर्यंत तुमच्या ऑफर्स पोहचवा, यातूनच तुम्हाला ग्राहक मिळणार आहेत. यानंतर पुरेसा ग्राहक मिळाल्यावर तुम्ही ईमेल पाठवणे सुरू करू शकता. तसेच ईमेल मार्केटिंग, ब्लॉग आणि व्हिडिओ तयार करू शकता.
सारांश
या लेखातून आपण पुनर्विक्रेता वेब होस्टिंग व्यवसाय कसा सुरु करावा (reseller hosting business startup guide marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. जर तुमच्या काही शंका असतील, तर आम्हाला नक्की कळवा, तुमच्या प्रश्नाचे उत्तर देताना आम्हाला नक्कीच आनंद होईल.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
भारतात पुनर्विक्रेता वेब होस्टिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी किती भांडवल लागते ?
भारतात पुनर्विक्रेता वेब होस्टिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी कमीत कमी 10 हजार रुपये भांडवल लागू शकते. तुमचा अपेक्षित ग्राहक वर्ग आणि जाहिरात तसेच कर्मचारी नुसार ही रक्कम कमी जास्त होऊ शकते.
पुनर्विक्रेता वेब होस्टिंग खरेदी करण्यासाठी कोणत्या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक असते ?
पुनर्विक्रेता वेब होस्टिंग खरेदी करण्यासाठी पुढील गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक असते.
1. Reseller Hosting Account
2. Refund policy
3. Free WHM & cPanel
4. 24×7 Expert Support for Hosting Resellers
5. Softaculous Installer
6. CDN & Network Security
7. Powerful Hardware & meticulous design
8. Free Hosting Migration
9. Billing & Customer Automation
10. Easy Setup & Integration
पुढील वाचन :