नाणेघाट धबधबा पाहण्यासारखी ठिकाणे व माहिती

reverse waterfall naneghat trek in marathi – नाणेघाट हा महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन व्यापारी घाटमार्ग आहे. हा मार्ग जुन्नर आणि कोकण यांना जोडतो. या घाटाची निर्मिती सातवाहन काळात झाली आहे. सातवाहनांच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी नाणेघाट हा एक प्रमुख मार्ग होता.

या घाटातून प्रवास करताना लेणी व धबधबा पाहायला मिळतो. या लेखातून आपण नाणेघाट धबधबा पाहण्यासारखी ठिकाणे (reverse waterfall naneghat trek in marathi) व माहिती जाणून घेणार आहोत.

Table of Contents

नाणेघाट माहिती मराठी (naneghat information in marathi)

नावनाणेघाट
इतर नावेनाना घाट
प्रकारमहाराष्ट्रातील घाटमार्ग
निर्मितीसातवाहन काळात
प्रसिद्धलेणी आणि विरुद्ध दिशेने वाहणारा धबधबा

सातवाहन काळ महाराष्ट्रासाठी सुवर्णकाळ होता असे मानले जाते. कारण या कालखंडात पैठण, जुन्नर, तगर, नेवासे, नाशिक अशी व्यापारी ठिकाणे निर्माण केली. यामुळे फक्त देशांतर्गतच नाही तर परदेशातही व्यापाराला मोठी चालना मिळायची.

याच सातवाहन राजांनी इसवी सन पूर्व पहिल्या शतकात नाणेघाट मार्गाची निर्मिती केली. या घाटाचे एक टोक जुन्नरच्या दिशेला, तर दुसरे कोकणमधल्या मुरबाड तालुक्यात आहे.

नाणेघाटाची लांबी 5 किलोमीटर इतकी आहे. घाटाच्या पायथ्याशी वैशाखरे, प्रधानपाडा आणि पुलू सोनाळे ही गावे आहेत. या गावाच्या जवळून कणिकेर नावाची नदी वाहते. घाटात जकातीसाठी रांजण आहेत, हा टोल संस्कृतीचा सर्वांत जुना पुरावा आढळतो.

आजूबाजूच्या परिसरात काही लेण्या पाहायला मिळतात. या लेण्या सातवाहनांनी तयार केलेल्या असून त्यामध्ये त्यांच्या कुलाची गाथा आढळते. या ठिकाणी काही लेख देखील आढळून येतात, ज्यामध्ये त्यांनी केलेले पराक्रम, यज्ञ आणि दानधर्माची माहिती मिळते.

नाणेघाट धबधबा पाहण्यासारखी ठिकाणे व माहिती (reverse waterfall naneghat trek in marathi)

reverse waterfall naneghat trek in marathi

naneghat trekking point – नाणेघाट धबधबा हा एक वैशिष्ट्यपूर्ण असे पर्यटन स्थळ आहे. हा धबधबा अद्भुत निसर्गाची किमया दाखवून देतो. पृथ्वीवर असणाऱ्या रहस्यमय ठिकाणांपैकी हे एक ठिकाण आहे.

तुम्ही अनेक धबधबे पाहिले असतील त्यांची वाहण्याची दिशा डोंगरावरून खाली असते, पण नाणेघाट धबधबा चक्क उलट्या दिशेने वाहतो. त्यामुळे तो उलटा धबधबा म्हणून जगभर प्रसिद्ध आहे.

या धबधब्यातील पाणी वरच्या दिशेने वाहते. हा धबधबा नेहमी धुक्यात लपलेला असतो. दरीतून सोसाटय़ाचा वारा वाहू लागला, की हा धबधबा उलटा फिरू लागतो. हे अद्भुत दृश्य पाहून मन अचंबित आणि प्रसन्न होते.

हा धबधब्यातील पाणी उंचीवरून खाली येण्याऐवजी वर जाते. यामुळे या धबधब्याला उलटा धबधबा म्हणून ओळखले जाते. नाणे घाटातील धबधब्याचं पाणी इतर धबधब्यासारखं खाली पडतं, पण खालून येणाऱ्या वाऱ्याचा दाब हा प्रचंड असतो.

त्यामुळे नाणेघाटातील धबधब्यातील पाणी पुन्हा वर जायला लागते. येथे खालच्या दरीत नाणे फेकले, तरी ते हवेच्या दाबामुळे पुन्हा वरती येते. हे खास दृश्य पाहण्यासारखी लाखो पर्यटक येथे येतात.

नाणेघाट विषयी माहिती मराठी (naneghat reverse waterfall marathi)

जर तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल, तर नाणेघाट ट्रेक (naneghat trek) हे तुमच्यासाठी योग्य ठिकाण आहे. या ट्रेकिंगसाठी 3 तासांचा वेळ लागतो. नाणेघाट घाटाची चढाई (naneghat trek difficulty level) थोडी अवघड आहे.

भैरवगड येथून फक्त 5 किलोमीटर अंतरावर असून माळशेज घाट 13 किलोमीटर अंतरावर आहे. नाणेघाट ट्रेकिंग करताना या दोन्ही निसर्गरम्य आणि साहसी ट्रेकिंगचा आनंद घेता येईल.

जर तुम्ही नाणेघाटाबरोबर, माळशेज घाट व भैरवगड या ठिकाणी भेट देणार असल्यास येथे राहण्यासाठी रिसॉर्ट (naneghat resort) पर्याय उपलब्ध आहे. या ठिकाणी महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ तसेच झुणका भाकरी आणि मिसळपाव हे देखील मिळतात.

नाणेघाटाला भेट देण्यासाठी पावसाळा ऋतू सर्वोत्तम आहे.

जुन्नर पासून अंतर (naneghat from junnar)28 कि.मी
मुरबाड पासून अंतर (naneghat from murbad)92 कि.मी

तसे तुम्ही जुन्नर किंवा मुंबई यापैकी तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने येऊ शकता. कल्याण हे जवळील रेल्वे स्टेशन आहे, येथून बस, खासगी गाड्या उपलब्ध आहेत. जुन्नर पासून बस, खासगी गाड्या आणि इतर वाहने देखील उपलब्ध आहे.

नाणेघाट धबधबा व्यतिरिक्त येथे सातवाहन काळात कोरलेल्या लेण्या आणि गुहा पाहायला मिळतात. येथील गुहांमध्ये ब्राम्ही भाषेतील लेख (naneghat inscription) आहेत. या गुहांमध्ये सातवाहनांचे वंशजांचे पुतळे आहेत.

टोल संस्कृती सर्वांत जुना पुरावा या घाटात पाहायला मिळतो, एक मोठा रांजण. या रांजनात जुन्या काळी जमा केलेली जकात ठेवण्यात यायची, असे म्हंटले जाते.

सारांश

या लेखातून आपण नाणेघाट धबधबा पाहण्यासारखी ठिकाणे (reverse waterfall naneghat trek in marathi) व माहिती जाणून घेतली आहे. बाकी या पावसाळ्यात नाणेघाट धबधबा आणि घाटाची ट्रेकिंग करण्यासाठी योजना बनवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

नाणेघाट कोणत्या जिल्ह्यात आहे ?

नाणेघाट पुणे जिल्ह्यात आहे. जुन्नर तालुक्यातील जाणारा नाणेघाट हा महाराष्ट्रातील एक अतिशय प्राचीन मार्ग आहे. हा मार्ग कोकण आणि पुणे यांना जोडतो.

नाणेघाट शिलालेखात कोणत्या राजाच्या कर्तृत्वाचे वर्णन आहे ?

नाणेघाट शिलालेखात सातवाहन राजाच्या कर्तृत्वाचे वर्णन आहे.

नाणेघाट धबधबा का प्रसिद्ध आहे ?

नाणेघाट धबधबा प्रसिद्ध आहे, कारण हा धबधबा इतर धबधब्यांप्रमाणे न वाहता तो उलट्या दिशेने वाहतो.

नाणेघाट गुहांमध्ये कुणाचे पुतळे आहेत ?

नाणेघाट गुहांमध्ये सातवाहन राजांचे पुतळे आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
1. सिमुक सातवाहन
2. भायल
3. सातकर्णी
4. राणी नयनिका
5. हकुसिरी अथवा हकुश्री
6. कुमार सातवाहन अथवा वेदिश्री सातवाहन
7. महारठी त्रिनकयीर अथवा त्रिणकवीर

पुढील वाचन :

  1. ताम्हिणी घाट पाहण्यासारखी ठिकाणे व माहिती
  2. महाराष्ट्रातील सुहाना सफर माळशेज घाट माहिती
  3. आंबोली घाट पाहण्यासारखी ठिकाणे व माहिती
  4. दिवेआगर पर्यटन माहिती मराठी

Leave a Comment