खडक म्हणजे काय माहिती मराठी (Rock information in marathi)

Rock information in marathi – खडक नैसर्गिक साधनसंपत्तीचा महत्वाचा घटक आहे. दगडापासून मातीपर्यंत सर्व पदार्थांचा समावेश खडकामध्ये केला जातो. खडकात अनेक मूलद्रव्ये खनिजे-मिश्र स्वरूपांत असतात. त्यापासूनच आपल्याला हवे असलेले धातु आणि अधातु निर्माण केले जातात. खडकांचे उपयोग त्यांच्या गुणधर्म आणि वैशिष्ट्यांच्या आधारे ठरवला जातो.

या लेखातून आपण खडक म्हणजे काय माहिती मराठी (Rock information in marathi) जाणून घेणार आहोत. त्यासोबतच खडकांचे महत्व, प्रकार आणि उपयोग याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

खडक म्हणजे काय माहिती मराठी (Rock information in marathi)

Rock information in marathi
नाव खडक
समानार्थी शब्द दगड
पाषाण
प्रकारडोंगराचा तुकडा किंवा निसर्गातील एक घटक
प्रमुख उपयोगखनिजे मिळवण्यासाठी

खडकाला म्हणजे पाषाण किंवा दगड होय. हे दगड लाव्हापासून बनलेले असते. यामध्ये लाव्हापासून बनलेल्या कठीण रूपातील पदार्थ असतात. लाव्हा रस घट्ट झाला की त्यापासून डोंगराची निर्मिती होते. खडक हा डोंगराचा भाग असतो.

खनिजाच्या मिश्रणालासुध्दा खडक म्हणून ओळखले जाते. या दगडात खनिजांचे मिश्रण आढळून येतात. यामध्ये सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नशिअम व लोह यांचे प्रमाण जास्त असते. महाराष्ट्र राज्यात बेसाल्ट खडकाचे पठार आहे. हे पाषाण अतिशय कठीण स्वरूपाचे आणि काळ्या रंगाचे असतात.

हा लेख जरूर वाचाभूमी मराठी माहिती (land information in marathi)

खडकांचे प्रमुख तीन प्रकार कोणते माहिती मराठी (types of rock formations in marathi)

खडकांच्या निर्मितीनुसार प्रमुख तीन प्रकार पडतात. यातील पहिला प्रकार म्हणजे अग्निजन्य खडक, दुसरा प्रकार म्हणजे गाळाचे किंवा जलजन्य खडक आणि तिसरा प्रकार म्हणजे रूपांतरित खडक होय.

हा लेख जरूर वाचालोखंडाची माहिती मराठी (iron information in marathi)

#1 अग्निजन्य खडक

भूगर्भात तापलेला लाव्हा थंड झाल्यावर त्याचे अतिशय कठीण स्वरूपाच्या पाषाणात रूपांतर होते. या रूपांतरित पाषणाला अग्निजन्य खडक असे म्हणतात. या प्रकारच्या खडकांना बेसाल्ट खडक म्हणून देखील ओळखले जाते. महाराष्ट्र राज्यात बेसाल्ट या काळ्या पाषाणाचे पठार आहे.

अग्निजन्य खडकाचे दोन उपप्रकार पडतात.

1. अंतर्निर्मित अग्निजन्य खडक

ज्यालामुखी प्रक्रियेदरम्यान ज्या वेळेला शिलारसाचे पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली घनीभवन होते, त्यावेळेस तेथे निर्माण होणाऱ्या खडकांना अंतर्निर्मित अग्निजन्य खडक असे म्हणतात. उदा. ग्रेनाइट, गब्रो

2. बहिनिर्मित अग्निजन्य खडक

या प्रक्रियेत लाव्हारस भूपृष्ठावर पसरल्यानंतर त्याचे घनीभवन होते . त्यापासून निर्माण होणाऱ्या खडकांना बहिनिर्मित अग्निजन्य खडक.

उदा. महाराष्ट्र पठारावरील बेसाल्ट खडक.

#2 गाळाचे खडक

नदी, हिमनदी , वारा इत्यादी कारकामुळे खडकाचे अपक्षरण होते, त्यापासून तयार झालेल्या गाळ वाहत जातो. सखल भागात या गाळाचे थारावर थर साचतात. त्यामुळे वरच्या थरांचा खालच्या थारावर प्रचंड दाब पडतो व गाळाच्या खडकांची निर्मिती होते.

उदा. वाळूचा खडक, चुनखडी, शेल

#3 रूपांतरित खडक

तप्त लाव्हारसाचा परिणाम होऊन, तसेच भू- हालचाली होत असताना पडलेल्या दाबामुळे मूळ खडकांतील अग्निज किंवा गाळाच्या स्फटिकांचे पुन्हा एकदा स्फटिकीकरण घडून येते. त्याचे स्वरूप व गुणधर्म बदलून रुपांतरित खडकांची निर्मिती होते. खडकांचा रंग व स्फटिकांचा आकार बदलतो.

उदा. नीस, संगमरवर, स्लेट, फरशीचा दगड इत्यादी.

हा लेख जरूर वाचाअभ्रक खनिज माहिती मराठी (mica information in marathi)

खडकाविषयी विशेष माहिती (rock interesting facts in marathi)

1. खडकाला दगड, पाषाण, शिला असेही म्हणतात. दगड अतिशय कठीण स्वरूपाचे असतात ते काही खडक मऊ स्वरूपाचे असतात.

2. राजस्थानमध्ये जयपूरजवळ लाल रंगाचा वाळूचा खडक आढळतो. हा एक प्रकारचा गाळाचा खडक आहे. हाच खडक वापरून दिल्ली येथील लालकिल्ल्याचे बांधकाम केले आहे. हा खडक अतिशय मऊ असल्याने त्यावर नक्षीकाम करता येते.

3. आग्रा येथील ताजमहाल संगमरवर या खडकापासून बनविलेला आहे. संगमरवर हे चुनखडीचे रूपांतरित खडक आहे.

4. आपल्या महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाणात बेसाल्ट खडक आढळतो. तर कोकण किनारपट्टीच्या भागात जांभा खडक आढळतो.

सारांश

या लेखातून आपण खडक म्हणजे काय माहिती मराठी (Rock information in marathi) जाणून घेतली आहे. यात आपण खडक म्हणजे काय ? खडाकाचे प्रकार आणि निर्मिती कशी होते ? याची माहिती देखील आपण जाणून घेतली.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली ? हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

अग्निजन्य खडकांचे वैशिष्ट्ये कोणती आहेत ?

अग्निजन्य खडकांचे वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
1. हे खडक कठीण व एकजिनसी असतात.
2. हे खडक वजनाने जड असतात.
3. यामध्ये जीवाश्म आढळत नाही.

स्तरित खडक कोठे आढळतो ?

गाळाच्या खडकांना स्तरित खडक असे म्हणतात. हे खडक पाण्याचे स्रोत जसे की नदी, तलाव, समुद्र या ठिकाणी आढळतो.

रूपांतरित खडकांचे वैशिष्ट्ये कोणती ?

रूपांतरित खडकांचे वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
1. या खडकांत जीवाश्म आढळत नाहीत.
2. तसेच हे खडक कठीण आणि वजनाला जड असतात.

मूळ खडक कशाला म्हणतात ?

भूगर्भात तापलेला लाव्हा थंड झाल्यावर त्याचे अतिशय कठीण स्वरूपाच्या पाषाणात रूपांतर होते. या रूपांतरित पाषणाला मुळ खडक असे म्हणतात. मुळ खडक म्हणजेच अग्निज आणि अग्निजन्य खडक होय.

चुनखडक हा कोणत्या खडकाचा प्रकार आहे ?

चुनखडक हा स्तरीत खडकाचा प्रकार आहे. याचा रूपांतरित खडक संगमरवर आहे.

ग्राफाईट हा कोणत्या खडकाचा प्रकार आहे ?

ग्राफाईट हा रूपांतरित खडकाचा प्रकार आहे.

अग्निजन्य खडक कसे तयार होतात ?

ज्वालामुखीच्या उद्रेक दरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस आणि भूपृष्ठावर लाव्हारस थंड होत जाऊन त्यांचे घनिभवण होते. यातूनच अग्निजन्य खडक तयार होतात.