साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त मराठी साहित्यिकांची नावे

Sahitya Akademi Puraskar list in Marathi – साहित्य अकादमी पुरस्कार हा साहित्यिकाचा सन्मान करण्याकरिता भारत सरकारद्वारे दिला जाणारा पुरस्कार आहे. हा पुरस्कार भारतातील साहित्य क्षेत्रात महत्त्वाचे योगदान करणाऱ्या साहित्यिकांना दिला जातो.

साहित्यिकांमध्ये मानाचे स्थान असणाऱ्या या पुरस्काराचे वितरण दिल्ली येथे होते. यावेळी त्या लेखक किंवा लेखिकेचा पुरस्कार करताना एक लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह दिले जाते.

आजच्या लेखातून आपण 2000 ते 2023 पर्यंत साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त मराठी साहित्यिकांची नावे अणि त्याचे साहित्य (Sahitya Akademi Puraskar list in Marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त मराठी साहित्यिकांची नावे (Sahitya Akademi Puraskar list in Marathi)

Sahitya Akademi Puraskar list in Marathi
नाव साहित्य अकादमी पुरस्कार
प्रकारभारतातील एक साहित्यिक सन्मान
सुरुवातइसवी सन 1955
संकेतस्थळsahitya-akademi.gov.in

भारत सरकार देशातील साहित्यिकांचा गौरव करण्यासाठी विविध पुरस्कार देत असतात, त्यापैकीच एक म्हणजे साहित्य अकादमी पुरस्कार. याची सुरुवात इसवी सन 1955 पासून करण्यात आली.

जर तुम्हाला 1955 ते 2000 साहित्य अकादमी पुरस्कार विजेते पाहायचे असतील, तर येथे क्लिक करा – साहित्य अकादमी पुरस्कार 1955 ते 2000

साहित्य अकादमी पुरस्कार एकूण 24 भाषेतील लिखाण करणाऱ्या साहित्यिकास दिला जातो. या 24 भारतीय भाषा पुढीलप्रमाणे आहेत.

आसामी, इंग्रजी, उर्दू, उडिया, कन्नड, काश्मिरी, कोकणी, गुजराती, डोग्री, तमिळ, तेलुगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, बोडो, मणिपुरी, मराठी, मल्याळम, मैथिली, राजस्थानी, संथाळी, संस्कृत, सिंधी आणि हिंदी इत्यादी.

वर्षलेखक/लेखिकापुस्तकाचे नावसाहित्य प्रकार
2000नामदेव धोंडो महानोर पानझड कविता संग्रह
2001राजन गवसतणकट कादंबरी
2002महेश एलकुंचवार युगान्त नाटक
2003त्र्यं. वि. सरदेशमुख डांगोरा एक नगरीचाकादंबरी
2004सदानंद देशमुखबारोमास कादंबरी
2005अरुण कोलटकरभिजकी वही कविता संग्रह
2006आशा बगेभूमीकादंबरी
2007गो. मा. पवारमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य चरित्र
2008श्याम मनोहर उत्सुकतेने मी झोपलोकादंबरी
2009वसंत आबाजी डहाके चित्रलिपीकविता संग्रह
2010अशोक केळकररुजुवात समीक्षा
2011माणिक गोडघाटे (ग्रेस)वाऱ्याने हलते पान निबंध संग्रह
2012जयंत पवार फिनिक्सच्या राखेतून उठला मोरलघुकथा संग्रह
2013सतीश काळसेकरवाचणाऱ्याची रोजनिशीनिबंध संग्रह
2014जयंत विष्णू नारळीकर चार नगरातले माझे विश्व आत्मचरित्र
2015अरुण खोपकरचलत् – चित्रव्युहसंस्मरण
2016आसाराम लोमटेआलोकलघुकथा
2017श्रीकांत देशमुख बोलावे ते आम्हीकविता संग्रह
2018म. सु. पाटीलसर्जनप्रेरणा आणि कवित्वशोधसमीक्षा
2019अनुराधा पाटीलकदाचित अजूनही कविता संग्रह
2020नंदा खरेउद्याकादंबरी
2021किरण गुरवबाळूच्या अवस्थंतराची डायरीकादंबरी
2022प्रवीण बांदेकरउजव्या सोंडेच्या बाहुल्याकादंबरी
2023संगीता बर्वेपियूची वहीउजव्या सोंडेच्या बाहुल्या

Sahitya Akademi Puraskar In Marathi – साहित्य अकादमी सारखाच म्हणजे भारतीय साहित्याच्या जगात नोबेल पुरस्काराइतकाच सर्वश्रेष्ठ मनाला जाणारा पुरस्कार मराठी भाषेतील साहित्यिकांनी प्राप्त केला आहे. या ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी लेखकांची नावे आपण जाणून घेऊयात.

Relatedमहाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी नाटक माहिती

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी लेखक (dnyanpeeth puraskar list in marathi)

dnyanpeeth puraskar list in marathi
नावज्ञानपीठ पुरस्कार
प्रकारभारतातील एक साहित्यिक सन्मान
सुरुवातइसवी सन 1965

Dnyanpeeth Puraskar In Marathi – ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्याच्या जगात नोबेल पुरस्काराइतकाच सर्वश्रेष्ठ पुरस्कार मानला जातो. याची सुरुवात करण्यामागे रमा जैन यांची प्रेरणा होती. रमा जैन आणि त्यांचे पती साहू शांतिप्रसाद जैन यांनी भारतीय साहित्यिकांच्या गौरवार्थ हा उपक्रम करण्याचे ठरवले.

22 मे 1961 रोजी साहू जैन यांच्या 51 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी स्वतःच्या कौटुंबिक ट्रस्टमधून ज्ञानपीठ पुरस्कार देण्याची घोषणा केली.

वर्षलेखिक/लेखिकापुस्तकाचे नाव
1974विष्णू सखाराम खांडेकर ययाति
1987श्री.विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज)नटसम्राट
2003श्री.विंदा करंदीकरअष्टदर्शने
2014श्री.भालचंद्र नेमाडेहिंदू-जगण्याची समृध्द अडगळ

इसवी सन 1965 साली पहिला ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. त्या वेळी 1920 ते 1958 यादरम्यान प्रकाशित झालेल्या साहित्याचा विचार करण्यात आला होता.

यामध्ये प्रसिद्ध मल्याळी महाकवी गोविंद शंकर कुरूप यांना ओडोक्वुफल (वेळूची बासरी) या महाकाव्याबद्दल प्रथम ज्ञानपीठ पुरस्कार पुरस्कार देण्यात आला.

इसवी सन 1965 ते 2019 पर्यंत एकूण 54 ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आले, पण गौरव 56 साहित्यिकांचा झाला. कारण आत्तापर्यंत पाच वेळा हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे.

हा पुरस्कार सुरू झाल्यापासून सिंधी या भारतीय भाषेतील साहित्यास अद्यापि पुरस्कार मिळाला नाही. तर दहा वेळा हिंदी, कन्नड भाषेला आठ, तर मराठी भाषेला चार वेळा ज्ञानपीठ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

Relatedमराठीतील कवी, साहित्यिक व त्यांची टोपणनावे माहिती मराठी

सारांश

तर मित्रांनो आशा करतो की, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त मराठी साहित्यिकांची नावे (Sahitya Akademi Puraskar list in Marathi) अणि त्यांच्या साहित्याची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल.

यासोबतच आपण ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी लेखक कोण आहेत (dnyanpeeth puraskar list in marathi), याविषयी देखील जाणून घेतले आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्कीच शेअर करा.

Leave a Comment