सलिम अली राष्ट्रीय उद्यान माहिती मराठी – salim ali national park information in marathi

salim ali national park information in marathi – सलिम अली महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात असणारे पर्यटन स्थळांपैकी एक आहे. या उद्यानास जैवविविधता असलेले ठिकाण म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी झाडांवर किलबिलाट करणाऱ्या पक्ष्यांच्या सुंदर दृश्य पाहायला मिळतात.

या उद्यानाची निर्मिती सलीम अली यांनी केली असून यांना भारताचा पक्षीप्रेमी (birdman of India) म्हणून ओळखले जाते. यामुळेच या उद्यानाला डॉ. सलीम अली जैवविविधता उद्यान (Dr. Salim Ali Biodiversity Park bird sanctuary in maharashtra) म्हणून देखील ओळखले जाते.

महाराष्ट्रातील पक्षी अभयारण्य माहिती मराठी या लेखात आपण या विषयी थोडी माहिती जाणून घेतली होती. या लेखात आपण सलीम अली राष्ट्रीय उद्यान माहिती मराठी – salim ali national park information in marathi याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

Table of Contents

सलीम अली राष्ट्रीय उद्यान माहिती मराठी – salim ali national park information in marathi

salim ali national park information in marathi
सलिम अली राष्ट्रीय उद्यान माहिती मराठी
नावडॉ. सलीम अली राष्ट्रीय उद्यान
ठिकाणयेरवडा पुणे
महाराष्ट्र
प्रकारपक्षी अभयारण्य
प्रसिद्धजैवविविधता
जवळील पर्यटन स्थळेभिगवण पक्षी अभयारण्य

पुणे जिल्ह्यातील मुठा नदीच्या काठी 22 एकरात डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य आहे. या अभयारण्यास देशी – विदेशी पक्षांचे घर म्हणून ओळखले जाते. जवळपास 130 हून अधिक पक्षांच्या प्रजाती या ठिकाणी पाहायला मिळतात.

या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पक्ष्याचा वावर असल्याने, पुण्यातील उद्योजक वाडिया यांनी सतराव्या शतकात ही जमीन पक्षी अभयारण्यासाठी पुणे महानगरपालिकेला दान केली.

या उद्यानाचे नाव डॉ. सलीम अली यांच्यावरून ठेवले आहे. यांना भारतातील आद्य पक्षिशास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी म्हणून ओळखले जाते.

भारतात ब्रिटिश राजवट असताना यांनी भारतातील पक्ष्यांचा आढळ, त्यांच्या सवयी, पक्ष्यांच्या विविध जाती आणि जातींमधील विविधता यांचा बारकाईने अभ्यास केला. यामुळे यांना (bird man of India) म्हणून गौरवण्यात आले. यांच्या पक्षी निरीक्षक कार्याने भारतात पक्षी निरीक्षक बनण्याची परंपरा सुरू झाली.

डॉ. सलीम अली माहिती मराठी – salim ali information in marathi

salim ali information in marathi
डॉ. सलीम अली माहिती मराठी

सलीम मोईझुद्दीन अली यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1896 रोजी मुंबईच्या खेतवाडीमध्ये झाला. लहानपणापासूनच पक्ष्यांविषयी माहिती मिळवायचा छंद होता, या छंद जोपासण्यासाठी त्यांनी जर्मनीमध्ये जाऊन पक्षिशास्त्राचे प्रशिक्षण घेतले.

त्यानंतर काही काळ इंग्लंड मध्ये नोकरी करून भारतात परतले. या वेळी ते आणि त्यांच्या पत्नी तेहमिना अली अलीबागच्या किहीमजवळ वास्तव्यास होते. या ठिकाणी त्यांनी सुगरण या पक्षांच बारकाईने निरीक्षण केले, आणि बीएन्‌एच्‌एस’च्या जर्नलमध्ये सुगरण पक्षी यावर प्रदीर्घ शोधनिबंध लिहिला.

या शोधनिबंधातून त्यांना पक्षीशास्त्रज्ञ म्हणून नावलौकिक प्राप्त झाला. यानंतर त्यांनी केरळ, कच्छ, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशच्या सरहद्दीमध्ये जाऊन त्यांनी पक्ष्यांच्या नोंदी केल्या. तसेच त्यांनी पक्ष्यांचे वर्तन, त्याच्यांत हवामानानुसार होणारे बदल, स्थलांतराच्या सवयी, विणीचे हंगाम यावर मोठ्या प्रमाणावर माहिती गोळा केली.

त्यांनी लिहिलेल्या हँडबुक ऑफ बर्ड्‌स ऑफ इंडिया ॲन्ड पाकिस्तान (पिक्टोरियल गाईड) या दहा खंडी पुस्तकामुळे सलिम अली यांनी केलेल्या सूक्ष्म निरीक्षणांची अचूकता समजते.

डॉ. सलिम अली यांचा जन्मदिवस पक्षी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याव्यतिरिक्त त्यांना पुढील पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. डॉ सलीम अली : भारतीय पक्षी-शास्त्रज्ञ यांचे जीवनच‍‍‍रित्र वीणा गवाणकर यांनी लिहिले आहे.

डॉ. सलिम अली यांना मिळालेले पुरस्कार

पुरस्काराचे नाववर्ष
पद्मभूषण1958
ब्रिटिश पक्षितज्ज्ञ संघाचे राष्ट्रीय पदक1967
द जॉन सी. फिलिप्स पदक1969
पद्मविभूषण1976
ऑर्डर ऑफ गोल्डन आर्क, हॉलंड1986

सलीम अली राष्ट्रीय उद्यान पाहण्यासारखी ठिकाणे (salim ali rashtriya udyan tourism Places)

या उद्यानात अनेक प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात. यामध्ये काही पक्षी स्थानिक आहेत तर बरेसचे पक्षी स्तलांतरीत आहेत.

विणकर बेरी (सुगरण) – सुगरण हा चिमणीच्या आकाराचा लहान पक्षी आहे. याचा रंग पिवळ्या असतो आणि हा पक्षी त्याच्या घरटी बांधण्याच्या कलेसाठी ओळखला जातो. डॉ सलीम अली यांनी सुगरण या पक्ष्याचा बराच अभ्यास आहे. या पक्षावर आधारित त्यांनी एक शोधनिबंध लिहला आहे. हा पक्षी तुम्हाला या अभयारण्यात पाहायला मिळतो.

सुगरण पक्षी घरटे कुठे बांधतो ?

शत्रू पक्षी आणि सापांपासून संरक्षण व्हावे म्हणून प्रामुख्याने सुगरण काटेरी बाभळीच्या किंवा उंच झाडावर घरटे तयार करते.

भारतात सुगरण पक्षाच्या किती प्रजाती आढळतात ?

भारतात सुगरण पक्षाच्या चार प्रजाती आढळतात.

याचबरोबर 24 इंच आकाराचा धनचिडी(Indian Grey Hornbill) पक्षी या ठिकाणी पाहायला मिळतो. धनचिडीच्या चोचीवर शिंगासारखे जाड आवरण असते, त्यामुळे त्याला शिंगचोचा असेही म्हंटले जाते.

खंड्या ज्याला इंग्रजीत किंगफिशर असे म्हंटले जाते. या पक्षाचे आवडीचे खाद्य मासा आहे. या पक्ष्यांच्या जगभरात साधारण 90 हून अधिक प्रजाती आहे. या उद्यानात तुम्ही खंड्या पक्ष्याला भेट देऊ शकता.

या उद्यानात तुम्ही जलचर आणि स्थलांतरित पक्षी पाहायला मिळतात. यात तुम्ही Common Coot, बगळा (Intermediate Egret), आकाराने बदकाएवढा असतो – हळदी कुंकू पक्षी (Spot-billed Duck), चक्रवाक (Ruddy Shelduck), हा एक बदक मधील प्रजाती (Garganey Duck), गडवाल (Gadwall), काळा अवाक(Red-naped Ibis), टिटवी (Red-wattled Lapwing), शिकारी (Predators), घार (Black Kite), वेडा राघू पक्षी (Green Bee-Eater), स्वर्गीय नर्तक (Blue Flycatcher and Paradise Flycatcher) हे पक्षी पाहायला मिळतात.

हळद्या (Indian Golden Oriole) , सूर्यपक्षी – शिंजीर (Sunbirds), कोकीळ (Koels), भारद्वाज (Greater Coucal), निशाचर पक्षी (Nocturnal Birds), पिंगळा (Spotted Owlet) असे पक्षी या ठिकाणी आढळतात.

सलीम अली पक्षी अभयारण्य जवळील पर्यटन स्थळे

भिगवण पक्षी अभयारण्य पुणे (bhigwan bird sanctuary pune) जिल्ह्यातील पर्यटन स्थळ आहे. महाराष्ट्राचे भारतपूर म्हणून भिगवण ओळखले जाते.

भिगवण पक्षी अभयारण्यात मानवनिर्मित तलाव आहे, ज्यामुळे हे जलचर पक्ष्यांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे, या तलावाच्या किनाऱ्यावर फ्लेमिंगोची प्रमुख प्रजाती आढळून येते. त्याचबरोबर बरेच स्थानिक पक्षी देखील या ठिकाणी आढळतात.

सलीम अली पक्षी अभयारण्य कसे पोहचाल ?

सलिम अली पक्षी अभयारण्य पुणे जिल्ह्यातील येरवडा या ठिकाणी आहे. या ठिकाणी येण्यासाठी तुम्ही रस्ते, रेल्वे, विमान या मार्गाचा वापर करून येऊ शकता.

जवळील रेल्वे स्टेशनपुणे स्टेशन (संगमवाडी मार्ग)
जवळील विमान स्टेशनपुणे आंरराष्ट्रीय विमानतळ
जवळील बस स्टेशनयेरवडा

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण सलिम अली राष्ट्रीय उद्यान माहिती मराठी – salim ali national park information in marathi जाणून घेतली. त्याचबरोबर सलिम अली यांच्या विषयी माहिती मराठी (salim ali information in marathi) जाणून घेतली आहे.

सलिम अली राष्ट्रीय उद्यान माहिती मराठी – salim ali national park information in marathi तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

सलीम अली पक्षी शास्त्र व नैसर्गिक इतिहास केंद्र कोठे आहे ?

सलीम अली पक्षी शास्त्र व नैसर्गिक इतिहास केंद्र तामिळनाडू मधील कोइंबतूर या ठिकाणी आहे. याची स्थापना इसवी सन 1990 साली झाली. या केंद्राचे संक्षिप्त नाव साकोन (SACON) असे आहे. त्याचबरोबर या नैसर्गिक इतिहास केंद्राचे https://www.sacon.in/ हे एक संकेतस्थळ आहे.


डॉक्टर सलीम अली यांचे आत्मचरित्र कोणी लिहिले ?

डॉक्टर सलीम अली यांचे आत्मचरित्र वीणा गवाणकर यांनी लिहिले आहे.


पक्षी तज्ञ म्हणून कोणत्या लेखकाची ख्याती आहे ?

पक्षी तज्ञ म्हणून डॉ. सलिम अली या लेखकाची ख्याती आहे.

Leave a Comment