कोण होते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन?

DR. Sarvepalli Radhakrishnan Information In Marathi – भारत ही संतांची, शूरांची, वीरांची, महापुरुषांची भूमी आहे. या भूमीमध्ये अनेक महापुरुष जन्माला आले. या सर्वांनी भारत मातेचे नाव उज्वल केले आहे. कोणी आपल्या शिक्षणातून, कुणी आपल्या कर्तुत्वामुळे तर कुणी युद्धाच्या पराक्रम भूमीमध्ये पराक्रम साध्य करून भारत मातेचे नाव उज्वल केले आहे.

आज देखील आपण अशा एका महापुरुषाबद्दल जाणून घेणार आहोत त्यांचे नाव आहे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन. आतापर्यंत तुम्ही त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेतल्या असतील. 5 सप्टेंबर हा दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसानिमित्ताने साजरा केला जातो. या दिवशी सर्व देशभरात शिक्षक दिन साजरा केला जातो.

आपल्या गुरुप्रती सद्भावना व्यक्त करत असतात. गुरूंना नमन करत असतात. आपल्या गुरुविषयी असलेली भावना मांडण्यासाठी हा दिवस अनेक जण गुरूंना समर्पित करत असतात.

या लेखातून आज आपण डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (DR Sarvepalli Radhakrishnan Information In Marathi) यांच्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन माहिती मराठी (Sarvepalli Radhakrishnan Information In Marathi)

DR Sarvepalli Radhakrishnan Information In Marathi
संपुर्ण नाव सर्वेपल्ली राधाकृष्णन
जन्म5 सप्टेंबर 1888 (तामिळनाडू भारत)
व्यवसायराजकारणी, तत्त्वज्ञ, प्राध्यापक
राजकीय पक्षभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सन्मानितभारतरत्‍न (इ.स. 1954)
शिक्षक दिन म्हणून त्यांचा जन्मदिवस साजरा केला जातो.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. या वर्षी म्हणजेच 5 सप्टेंबर 2023 रोजी त्यांची 48 वी जयंती साजरी करण्यात येणार आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आधुनिक शिक्षण पद्धतीच्या मार्गावर नेण्यासाठी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा महत्त्वाचा वाटा उचलला होता. त्यांनी त्यांच्या व्यवसायिक जीवनाची सुरुवात एक शिक्षक म्हणूनच केली होती.

प्रत्येकाला चांगला उपदेश करणे. प्रत्येकाला चांगल्या गोष्टी सांगणे हे त्यांच्या स्वभावामध्येच होते. शिक्षक असण्यासोबतच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन एक चांगले मार्गदर्शक, महापुरुष आणि राजकीय नेता म्हणून देखील उत्कृष्ट होते. यांच्या अंगी असलेल्या या सर्व गुणांमुळेच 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो.

Related – 5 सप्टेंबर रोजीच शिक्षक दिन का साजरा केला जातो?

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1988 रोजी तामिळनाडूमधील तिरुतनी गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सर्वपल्ली विरास्वामी आणि आईचे नाव सिताम्मा होते. एका ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले सर्वपल्ली राधाकृष्णन लहानपणापासूनच हुशार होते त्यांची तीक्ष्ण व कुशाग्र बुध्दी आणि मनमिळावू स्वभाव सर्वांना आवडायचा. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे वडील महसूल विभागामध्ये कार्यरत होते.

लहानपणापासूनच गरिबी पाचीला पुजलेली असल्याने बाळ सर्वपल्ली यांना फारशा काही सुख सुविधा मिळाल्या नाही. त्यांचे बालपण हलाकीचे गेले परंतु इतके असून देखील सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी गरिबीला कवटाळून बसले नाही.

गरीबीवर मात करण्याचे संस्कार त्यांना लहानपणापासूनच आई-वडिलांकडून मिळाले होते. परिस्थिती हलाखीची असताना देखील सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपले शिक्षण अगदी मन लावून पूर्ण केले.

Sarvepalli Radhakrishnan Information In Marathi – राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांचे प्राथमिक शिक्षण खेडेगावामध्येच पार पडले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ख्रिश्चन मिशनरी संस्था लुथरन मिशन स्कूल तिरुपती येथे शिक्षण घेतले. यानंतर माध्यमिक हायस्कूल शिक्षण देखील त्यांनी पुढे पूर्ण केले. कला शाखेमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी विविध गोष्टींमध्ये देखील लक्ष देण्यास सुरुवात केली.

लहानपणापासूनच हुशार असल्याने शैक्षणिक क्षेत्रात व शाळेमध्ये देखील त्यांना विविध शिष्यवृत्ती मिळत गेल्या. या सर्व शिष्यवृत्ती चा फायदा त्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये झाला. परिस्थिती गरिबीची असताना देखील शिष्यवृत्तीच्या मदतीने सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी 1918 ते 1921 पर्यंत मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज अन् म्हैसूर विद्यापीठात काही काळ प्राध्यापक म्हणून नोकरी केली. तेथे देखील प्राध्यापक म्हणून सर्वपल्ली यांनी उत्कृष्ट भूमिका बजावली. अनेक विद्यार्थ्यांना ते जवळचे वाटू लागले.

Related – गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी

अनेकांना सर्वपल्ली जणू ज्ञानाचा पेटता दिवाच वाटू लागले. विद्यार्थ्यांच्या समस्या, विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणे हे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे नित्यनेमाचा दिनक्रमच ठरलेला होता.

विद्यापीठामध्ये आपल्या कार्यश्रेणीमुळे उत्कृष्ट सादरीकरण केल्यामुळे मैसूर विद्यापीठाद्वारे उत्कृष्ट तत्वे यांचे प्राध्यापक म्हणून देखील डॉ. रामकृष्ण राधाकृष्णन सर्वपल्ली यांना सन्मानित करण्यात आले होते.

पुणे कोलकत्ता विद्यापीठ मध्ये देखील काही काळ तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून जबाबदारी सांभाळली त्यानंतर आंध्र प्रदेश विद्यापीठ, बनारस विद्यापीठ या दोन्ही देशातील अव्वल क्रमांकावर असलेल्या विद्यापीठाचे कुलगुरू पद देखील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सांभाळले होते.

इसवी सन 1939 मध्ये आंध्र प्रदेश विद्यापीठाने सर्वपल्ली राधाकृष्णन यांना डी. लिट ही पदवी बहाल केली. ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये देखील राधाकृष्णन यांनी काही काळ प्राध्यापक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती. आजही ऑक्सफर्ड विद्यापीठाद्वारे त्यांच्या स्मरणार्थ राधाकृष्णन मेमोरियल बिक्वेस्ट हा पुरस्कार दिला जातो.

भारतीय स्वतंत्र काळात देखील डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाटा होता 1946 ते 1949 यादरम्यान घटना समितीत सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले होते. 1952 ला स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती म्हणून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी पदभार सांभाळला होता. त्यांनी केलेल्या अस्मरणीय कार्य पद्धतीमुळेच भारत सरकार द्वारे त्यांना 1954 मध्ये “भारतरत्न” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते व त्यानंतर १९६२ मध्ये दुसरे स्वतंत्र भारताचे राष्ट्रपती म्हणून देखील पदभार सांभाळले होते.

17 एप्रिल 1975 रोजी डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांनी केलेले कार्य आजही भारतीय जनता स्मरण करते. त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानेच देशभरामध्ये 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिवस म्हणून अगदी जल्लोषात साजरा केला जातो.

Related – शिक्षक दिनानिमित्त कविता मराठी

सारांश

चांगल्या शिक्षकांचा सन्मान हा संस्कृतीचा, सत्याचा आणि ज्ञानाचा सन्मान असतो. कोणत्याही समाजाचा विकास एका आदर्श शिक्षकांमुळे होत असतो. अशी विचारधारा घेऊन डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आयुष्यभर कार्य केले.

आशा करतो की, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची माहिती मराठी (DR. Sarvepalli Radhakrishnan Information In Marathi) हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल.

Leave a Comment