saudi arabia facts and history marathi – सौदी अरेबिया आशिया खंडातील पाचवा तर अरब दुनियेतील दुसरा मोठा देश आहे. मक्का आणि मदिना ही इस्लाम धर्मातील दोन सर्वात पवित्र स्थळे याच देशात आहेत. या देशात आजही राजेशाही सरकार चालते.
या लेखातून आपण सौदी अरेबिया माहिती मराठी (saudi arabia facts and history marathi) याविषयी चर्चा करणार आहोत.
सौदी अरेबिया माहिती मराठी (saudi arabia information in marathi)

नाव | सौदी अरेबिया |
प्रकार | अरब राष्ट्र |
क्षेत्रफळ | 2.15 दशलक्ष km² |
लोकसंख्या | 3.53 कोटी (2021) |
राजधानी | रियाध |
अधिकृत भाषा | अरबी |
राष्ट्रीय चलन | सौदी रीयाल |
सरकार | राजेशाही |
सौदी अरेबिया हा मध्यपूर्वेतील सर्वात मोठा अरब देश आहे. याच्या पूर्वेला कतार, बहारीन, संयुक्त अरब अमिराती व ओमान, पश्चिमेला लाल समुद्र, दक्षिणेला येमेन आणि उत्तरेला जॉर्डन व इराक हे देश आहेत.
येथील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत 84% लोक शहरात राहतात तर बाकीचे उरलेले लोक खेड्यात राहतात. येथील लोकसंख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त लोक मुस्लिम धर्मीय आहेत.
हा देश खनिज तेल असणाऱ्या देशातील यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. या देशात तेलापेक्ष्या पाणी जास्त महाग आहे. तेल आणि गॅस क्षेत्रात काम करण्यासाठी 80% मजूर इतर देशातील आहेत.
रियाध ही सौदी अरेबिया देशाची राजधानी तसेच सर्वात मोठे शहर आहे. या ठिकाणी जगातील सर्वात मोठा उंट बाजार आहे. या बाजारात दररोज शंभर उंटांची खरेदी आणि विक्री होते.
रियाध या ठिकाणी असलेले अल खालीद एअरपोर्ट हे जगातील सर्वात मोठे विमानतळ आहे. तसेच जगातील एकतीसावी सर्वात उंच इमारत रियाध तेथे आहे, तिचे नाव किंगडम सेंटर आहे.
जगातील सर्वात चांगल्या आणि मॉडर्न बँकिंग सेवा सौदी अरेबियामध्ये स्थित आहे. वर्ल्ड बँकेच्या संशोधनानुसार हा देश व्यवसाय करण्यासाठी अनुकूल आहे.
सौदी अरेबिया हा जगातील तिसरा सर्वात मोठा खजूर निर्यातक देश आहे. तसेच हा जगातील चौथा सर्वात मोठा तंबाखू निर्यातक देश असून देशातील कमी वयाच्या लोकांना तंबाखू विकणे अपराध आहे.
सौदी अरेबियात कोणतेही संविधान नसून इस्लाम राजेशाही सरकार चालते व कुराण हा धर्मग्रंथ येथील संविधान आहे. या सरकारकडून स्थानिक लोकांसाठी मोफत आरोग्य सेवा पुरविली जाते.
जगातील सर्वात सुरक्षित देश म्हणून सौदी अरेबिया देशाला ओळखले जाते. या देशात एकही चोर नाही, जर कुणी चोरी करताना पकडला गेला तर येथील नियमानुसार त्याचे हात कापले जातात.
सौदी अरेबिया मनोरंजक माहिती मराठी (saudi arabia facts and history marathi)

इस्लाम धर्माचा संस्थापक मुहंमद पैगंबर ह्याचे जन्मस्थान मक्का या ठिकाणी असून त्यांची कबर मदीना येथे आहे. कुराणानुसार आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करणे मुस्लिम धर्मीय व्यक्तीसाठी बंधनकारक आहे.
जगातील मुस्लिम धर्मीय लोकांचे पवित्र धार्मिक स्थळ मक्का आणि मदिना सौदी अरेबियात आहे. दरवर्षी लाखो लोक हज यात्रेसाठी या ठिकाणाला भेट देतात. यामुळे या देशाला इस्लाम धर्माचे जन्मस्थळ म्हणून ओळखले जाते.
सौदी अरेबियात एकही नदी नसून येथे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. यामुळे येथे वाहतुकीसाठी उंट जास्त प्रमाणात वापरले जातात.
या देशात महिलांची संख्या कमी असून पुरुषांची संख्या जास्त आहे. महिलांना त्यांच्या पतीच्या परवानगीशिवाय जास्त दूरवर प्रवास करता येत नाही. तसेच महिला स्वतःच्या मनाने बँकेत खाते उघडू शकत नाही.
सौदी अरेबिया या देशात व्हेलेंटाईन डे साजरा करत नाहीत. इतकेच नाही तर या दिवशी येथील दुकानदार हृदयाच्या आकाराची कोणतीही वस्तू विकू शकत नाही.
सौदी अरेबियात जगातील सर्वात महाग गाड्या पाहायला मिळतात. कारण येथे जन्मलेला प्रत्येक जण अरबपती असतो. या देशात व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, टेनिस, फुटबॉल हे खेळ खेळले जातात.
या देशात लग्न समारंभ पंधरा दिवस चालतो, लग्न समारंभाची एक वेगळीच पद्धत या देशात पाहायला मिळते. या पंधरा दिवसात करोडो रुपये लग्नावर खर्च होतात.
सारांश
या लेखातून आपण सौदी अरेबिया माहिती मराठी (saudi arabia facts and history marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. हे माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. बाकी लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
सौदी अरेबियाची राजधानी कोणती आहे ?
रियाध ही सौदी अरेबियाची राजधानी आहे. तसेच देशातील सर्वात मोठे शहर म्हणून रियाधला ओळखले जाते.
सौदी अरेबिया हा देश का प्रसिद्ध आहे ?
सौदी अरेबिया हा देश प्रसिद्ध असण्याचे कारण म्हणजे येथील मक्का आणि मदिना, हे दोन्ही इस्लाम धर्मातील पवित्र धर्मस्थळ आहेत. यामुळे जगभरातील मुस्लिम लोक या ठिकाणी यात्रा करण्यासाठी येतात. जगातील सर्वात जास्त तेलाचे भांडार असणारा देश म्हणूनही सौदी अरेबियाला ओळखले जाते. सौदी अरेबियातील श्रीमंती आणि नियमांमुळे हा देश नेहमीच चर्चेत असतो.
सौदी अरेबियात कोणते पीक उत्पादन घेतले जाते ?
सौदी अरेबियात खजुराचे पीक मोठ्या प्रमाणात पिकवले जाते. जगातील तिसरा सर्वात मोठा खजूर निर्यातक देश म्हणून हा देश ओळखला जातो.
पुढील वाचन :