सौताडा धबधबा माहिती मराठी – sautada waterfall information in marathi

By | September 28, 2022

Sautada waterfall information in marathi – सौताडा धबधबा विंचरणा नदीवर आहे. विंचरणा नदी पाटोदा तालुक्यातील डोंगराळ परिसरात उगम पावते. हा धबधबा सत्तर मीटर उंचीवर आहे. हा धबधबा ज्या दरीतून वाहत जातो, त्या ठिकाणी भगवान राम आणि सीता यांनी महादेवाचे एक मंदिर बनवले आहे. हे मंदिर रामाने बांधल्यामुळे मंदिरास रामेश्वरी असे नाव पडले.

रामेश्वर या प्रसिद्ध मंदिरास भेट देण्यास आणि सौताडा धबधबा पाहण्यासाठी बरेच पर्यटक या ठिकाणी येत असतात. नैसर्गिक वातावरणात येऊन आपले मन अगदी प्रसन्न होते.

या लेखात आपण सौताडा धबधबा माहिती मराठी – sautada waterfall information in marathi जाणून घेणार आहोत.

सौताडा धबधबा माहिती मराठी – sautada waterfall information in marathi

sautada waterfall information in marathi
sautada waterfall information in marathi
नावसौताडा धबधबा
ठिकाणसौताडा
तालुका – पाटोदा
जिल्हा – बीड
स्थानिक भाषामराठी
हवामानसाधारण 18 ते 24 डिग्री सेल्सिअस
जवळील पर्यटन स्थळेकाशीगीरजी महाराज यांची समाधी
चिखली चिंचोली
सौताडा धबधबा माहिती मराठी

1. सौताडा धबधबा बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील गाव सौताडा या ठिकाणी आहे. भगवान शिव यांचे राम आणि सीता यांनी बांधलेले रामेश्वर मंदिर याच परिसरात आहे.

2. श्रावण महिन्यात रामेश्वर मंदिरात दरवर्षी मेळावा आयोजित केला जातो. हा मेळावा मोठ्या जल्लोषात साजरा होतो.

3. सौताडा धबधबा हा एक सुंदर असा नैसर्गिक धबधबा आहे. या ठिकाणी असणारे घनदाट जंगलामुळे हा परिसर अगदी शांततापूर्ण झाला आहे.

4. धबधबा पाहण्यासाठी आणि या शांततापूर्ण परिसरात दिवस घालवण्यासाठी पर्यटक या ठिकाणी येत असतात. तसेच मंदिरात भाविक भक्त येत असतात.

5. राज्यातील अहमदनगर आणि बीड जिल्ह्यांच्या सीमेवर सौताडा धबधबा आहे. हे ठिकाण अहमदनगर आणि बीड जिल्ह्यात प्रसिध्द आहे, त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून पर्यटक या ठिकाणी येत असतात.

6. हा धबधबा साधारण 70 मीटर उंच आहे. या ठिकाणचा परीसर हिरवागार आणि शांत आहे.

7. येथील किमान तापमान 19 डिग्री सेल्सिअस आणि कमाल तापमान 44 डिग्री सेल्सिअस इतके आहे.

8. या ठिकाणी जास्त हिवाळा जाणवत नाही आणि दिवसभर तापमान साधारणपणे 26 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असते.

9. दरवर्षी या ठिकाणी 763 मिमी इतका पाउस होतो. हा धबधबा विंचरणा नदीवर आहे. या नदीचा उगम पाटोदा तालुक्यातील डोंगराळ परिसरात होतो.

10. जर तुम्हाला शांत वातावरणात एक दिवस जगायचा असेल तर, सौताडा धबधबा हे ठिकाण तुमच्यासाठी योग्य आहे.

हा लेख जरूर वाचाचिखलदरा पाहाण्यासारखी ठिकाणे व माहिती

11. या धबधबा आणि रामेश्वर मंदिराव्यतिरिक्त तुम्ही कंकळेेश्वर मंदिर, खंडोबा मंदिर, खजाना विहीर विहीर या ठिकाणाला भेट देऊ शकता.

12. खजाना विहीर या ठिकाणी काही विहीर आहेत. या विहिरीमध्ये पाणी कोणत्याही ऋतूमध्ये अगदी मोठ्या प्रमाणावर असते.

13. या विहिरीतील पाणी नगरपालिका स्थानिक दुष्काळी भागात विस्तारित करते. त्यामुळे येथील गावाचा पाण्याचा प्रश्न सुटतो.

14. खंडोबा मंदिर पूर्व टेकड्यांवर पाहायला मिळते. या मंदिरात हेमाडपंती वैशिष्ट्ये पाहायला मिळतात, मंदिर त्याच्या प्रकाश टॉवर्ससाठी लोकप्रिय आहे.

15. कंकळेेश्वर मंदिर हे मंदिर बीड शहरातील सर्वात जुनी आणि सर्वात सुंदर वास्तू आहे.

सौताडा धबधबा माहिती मराठी
सौताडा धबधबा माहिती मराठी

16. वेरूळच्या लेण्यांचे मंदिर आणि कंकळेेश्वर मंदिर या दोन्ही मंदिराच्या बांधकामात साम्य आढळते.

17. या ठिकाणी महाशिवरात्रीच्या वेळेस अनेक भाविक भक्त एकत्र जमा होतात.

18. बीड जिल्ह्यात प्रसिद्ध असणारे मांसाहारी, शाकाहारी व्यंजन या ठिकाणी उपलब्ध आहेत.

19. या ठीकणी फिरायला येणाऱ्या पर्यटकांची राहण्याची सुविधा केली आहे. सौताडा धबधबापासून जवळच राहण्यासाठी हॉटेल उपलब्ध आहेत.

20. या ठिकाणाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम ऋतू म्हणजे पावसाळा.

21. सौताडा हे ठिकाण मुंबई पासून 340 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यापासून 209 आणि औरंगाबादपासून 213 किलोमीटर अंतरावर आहे.

22. अहमदनगर आणि पोपली हे जवळील रेल्वे स्टेशन आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

सौताडा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे ?

सौताडा धबधबा बीड जिल्ह्यात आहे.

रामेश्वर मंदिर कुठे आहे ?

सौताडा धबधबा ज्या दरीतून वाहत जातो, त्या दरीवरच रामेश्वर मंदिर आहे.

पुण्यापासून बीड किती किलोमीटर आहे ?

पुण्यापासून बीड 209 किलोमीटर आहे.

बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यांची नावे

बीड, किल्ले धारूर, अंबाजोगाई, परळी-वैद्यनाथ, केज, आष्टी, गेवराई, माजलगाव, पाटोदा, शिरूर, वडवणी ही बीड जिल्ह्यातील 11 तालुके आहेत.

बीड जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे ?

बीड जिल्हा सीताफळासाठी प्रसिद्ध आहे.

महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचा जिल्हा कोणता आहे ?

महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचा जिल्हा बीड आहे.

हे देखील वाचा

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण सौताडा धबधबा माहिती मराठी – sautada waterfall information in marathi जाणून घेतली.

त्याचबरोबर या लेखात आपण कंकळेेश्वर मंदिर, खंडोबा मंदिर, खजाना विहीर यांची मराठी माहिती पाहीली आहे.

सौताडा धबधबा माहिती मराठी – sautada waterfall information in marathi तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *