सावित्रीबाई फुले कार्य माहिती मराठी

Savitribai Phule Work In Marathi – नमस्कार मित्रांनो, सावित्रीबाई फुले या एक समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री तसेच भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. सावित्रीबाईचा वारसा फार मोठा आहे. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य अत्यंत आदरणीय मानले जाते.

या लेखातून आपण सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्याची (Savitribai Phule Work In Marathi) माहिती जाणून घेणार आहोत.

सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माहिती मराठी (Savitribai Phule Information In Marathi)

संपूर्ण नावसावित्रीबाई जोतीराव फुले
टोपणनाव ज्ञानज्योती, क्रांतिज्योती
जन्म3 जानेवारी 1831
संघटना सत्यशोधक समाज
प्रमुख स्मारक जन्मभूमी नायगाव
कार्यक्षेत्रसामाजिक आणि शैक्षणिक

सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव येथे झाला. त्यांचे वडील गावचे पाटील होते. वयाच्या नवव्या वर्षी सावित्रीबाईंचा जोतीरावांशी विवाह झाला. पुढे दोघांनी मिळून सामजिक कार्यात मोलाची भूमिका बजावली.

सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ त्यांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले यांचा वारसा फार मोठा आहे. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य अत्यंत आदरणीय मानले जाते.

सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्य माहिती मराठी (Savitribai Phule Work In Marathi)

Savitribai Phule Work In Marathi

Savitribai Phule Contribution In Education – महात्मा ज्योतिबा फुले एक थोर समाजसुधारक होते. त्यांनी समाज सुधारण्यासाठी अनेक सामाजिक कार्य केली. ही सामाजिक कार्य करत असताना मुलींना देखील शिक्षण मिळाले पाहिजे. परंतु हे कार्य करण्यासाठी त्यांना एका महिलेची गरज होती, म्हणूनच महात्मा फुले यांनी सर्वप्रथम सावित्रीबाईना यांना आपल्या घरामध्ये शिक्षण दिले. पुढे त्यांनी पुणे या ठिकाणी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली.

महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी सुरुवात करून दिली. तर समाजातील काही उन्मत्तांचा त्रास सहन करत सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी व्यवस्थितपणे जपली.

एक प्रकारे भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांचे योगदान खरोखरच खूप उल्लेखनीय आहे. भारतातील पहिल्या महिला स्त्री शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंना ओळखले जाते, इतकेच नाही तर पहिल्या महिला मुख्याध्यापका म्हणून देखील त्यांना ओळखले जाते.

शाळेमध्ये अभ्यासक्रम सुनियोजित करून शिकवला तरच तर तो विद्यार्थ्यांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचतो, असे त्यांचे मत होते. यावरून असे म्हणायला हरकत नाही की भारतामधल्या पहिल्या महिला स्त्री शिक्षण तज्ञ सावित्रीबाईच होत्या.

मुलींना शाळेत शिकवताना सावित्रीबाईंना एक गोष्ट लक्षात आली, शालेय शिक्षण बरोबरच स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे. त्यासाठी त्यांनी समाजातील काही क्रूर रूढी परंपरा बंद केल्या. उदा. बाल-जरठ विवाह, सती जाणे, केशवपन करणे इत्यादी.

जोतिरावांनी सुरू केलेले बालहत्या प्रतिबंधक गृह सावित्री बाईंनी व्यवस्थितपणे चालवले. याच ठिकाणी काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले आणि त्याचे नाव यशवंत ठेवले. यावरून तुमच्या लक्षात आले असेलच, सावित्रीबाई बालहत्या प्रतिबंधक गृहातील सर्व अनाथ मुलांना आपलीच मुले मानत.

मित्रांनो, सध्या प्रत्येक शाळेत प्रत्येक विद्यार्थ्यांचा गणवेश सारखा असतो. पण तुम्हाला माहिती आहे का, शाळेमधील विद्यार्थ्यांना एकसारखाच गणवेश असावा, यासाठी सावित्रीबाईंचे योगदान आहे. एकसारखा गणवेश असल्याने, विद्यार्थ्यांमधील श्रीमंत गरीब यासारखा इतर कोणताही भेद निर्माण होत नाही.

आपण सध्या पाहतो की, शाळेमध्ये मुले आणि मुली हे सोबतच शिक्षण घेत आहे पण पूर्वी असे नसायचे. त्यावेळी सहशिक्षण घेण्यावर पुरोगामी विचारांचा प्रभाव असणाऱ्या लोकांनी विरोध केला होता. पण हा विरोध मोडून काढत महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी सहशिक्षण पद्धतीने शिक्षण देणाऱ्या शाळा उभारल्या.

याव्यतिरिक्त त्यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शिक्षणाबरोबर शिक्षणासाठी लागणारे सर्व साहित्य मिळाले मिळावे म्हणून नेटिव्ह वाचनालयाची स्थापना केली.

पूर्वी मुलींना शिक्षण घेऊ दिले जात नव्हते. यासाठी सावित्रीबाईंनी मुलींना दररोज शाळेत येण्यासाठी भत्ता सुरू केला आणि बघता बघता शाळेत मुलींची संख्या वाढू लागली.

काही विद्यार्थी दिवसभर शेतीत काम करत असल्यामुळे त्यांना दिवसा शाळेत जाता येत नव्हते त्यामुळे, या विद्यार्थ्यांची मदत व्हावी म्हणून सावित्रीबाई फुले यांनी रात्रीची शाळा सुरू केली.

Related – महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे स्थापना व ठिकाण

सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य माहिती (Savitribai Phule Work In Marathi)

Savitribai Phule Contribution towards Indian Social Elements – पूर्वी समाजामध्ये जातीभेद प्रचंड प्रमाणात असल्याने अस्पृश्य आणि उच्चवर्णीय लोकांमध्ये मोठी दरी निर्माण झाली होती. ही दरी कमी करण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून, सावित्रीबाईंनी आपल्या अंगणातील विहिर सर्वांसाठी खुली केली. जेणेकरून कोणीही त्या विहिरीवर पाणी भरू शकेल.

पूर्वी बाल-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई.

केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली.

सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण देत असताना मानवतावादी विचारांचा पुरस्कार केला. विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण हे धर्मनिरपेक्ष शिक्षण असले पाहिजे. शिक्षणातून सर्व धर्मांचा आदर केला गेला पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती.

हुंडा देणे व घेणे हे दोन्ही गुन्हे असून त्यामुळेच मुलीच्या वडिलांना अतिशय खडतर जीवन जगावे लागते, वेळप्रसंगी त्यांना आत्महत्या देखील करावी लागते. यावर उपाय म्हणून सावित्रीबाई फुले यांनी हुंडा पद्धतीचा विरोध केला.

सावित्रीबाई खादीच्या वापराला महत्व देत खादीचा प्रसार केला. जास्तीत जास्त लोकांनी खाली वापरावी असे आवाहन त्यांनी केले. यामुळे खादीच्या व्यापाराला प्रोत्साहन मिळाले.

सारांश

तर मित्रांनो, अशा प्रकारे जमेल त्या मार्गाने सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक आणि शैक्षिणक क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली आहे. आशा करतो की, सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य (Savitribai Phule Work In Marathi) हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल.