सावंतवाडी पर्यटन स्थळे मराठी

Categorized as Blog

महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर असणारे सावंतवाडी हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्हयातील एक तालुका असून या ठिकाणी असणारा रॉयल पॅलेस नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतो.

कोकण किनारपट्टी निसर्गाने नटलेली आहे. या ठिकाणी अनेक निसर्गाची किमया पाहायला मिळते. ही सावंतवाडी सह्याद्री पर्वतरांगावर असून साधारण हीची उंची 2263 फूट इतकी आहे.

आजच्या या लेखातून आपण सावंतवाडी पर्यटन स्थळे आणि तेथील लोक, व्यवसाय, नैसर्गिक आकर्षण आणि बरेच काही जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूयात…

सावंतवाडी मराठी माहिती

नावसावंतवाडी
ठिकाणसावंतवाडी
सिंधुदुर्ग, महाराष्ट्र
प्रसिद्धलाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध
कोकणी समुद्रकिनारा
ग्रेट रॉयल पॅलेस
स्थानिक भाषामराठी, कोकणी
प्रसिद्ध पर्यटन स्थळेअंबोली घाट
मोती तलाव
रघुनाथ बाजारपेठ
यशवंत गड
आत्मेश्वर मंदिर
वेलागर बीच

सावंतवाडी हे गाव साधारणपणे 300 वर्ष जुने आहे, याला सावंत भोसले राजवटीने विकसित केले आहे. असे म्हणतात पूर्वी सावंतवाडी प्रदेश शिवाजी राजे भोसले यांच्या ताब्यात होता. तर इसवी सन 18 व्या शतकातील ग्रेट रॉयल पॅलेस आणि इसवी सन 19 व्या शतकाच्या उत्तरार्धातील लेस्टर गेट सावंतवाडीचा इतिहास सांगतात.

सावंतवाडीच्या पूर्वेस सह्याद्री पर्वतरांगा आणि पश्चिमेस अरबी समुद्र पाहायला मिळतो. इथे दिवसा मध्यम ते जोरदार वारे आणि रात्री हलके वारे अनुभवायला मिळतात. या ठिकाणी काही डोंगर, दऱ्या आणि सपाट भूभाग पाहायला मिळतो. याठिकाणी सपाट भूभागावर लालमाती आणि किनारपट्टीवर वालुकामय माती आढळते.

सावंतवाडीचे हवामान उष्ण आणि दमट आहे. दरवर्षी कोकण किनारपट्टीवर 2500 मिमी ते 4500 मिमी इतका पाऊस पडत असतो. त्यामुळे पावसाळ्यात येथील तापमान 30 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत तर उन्हाळामध्ये तापमान 40 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत होते.

लाखेची हस्तकला, लाकडी खेळणी आणि कृत्रिम फळे बनविण्यासाठी सावंतवाडी ओळखली जाते. सावंतवाडी या ठिकाणी शिल्पग्राम ठिकाण पाहायला मिळते, या ठिकाणी स्थानिक उत्पादक हस्तकलेच्या वस्तू बनवतात आणि विकतात.

यामध्ये प्रामुख्याने गंजिफा कार्ड, दागिन्यांच्या पेट्या, पारंपारिक लाखेची भांडी, बांबूची कलाकुसर, मातीची भांडी, हाताने विणलेल्या पिशव्या आणि पर्सेस या वस्तू असतात. शिल्पग्रामला या ठिकाणी सर्व वस्तू कारागीर आपल्या समोरच घडवतो. या वेळेस त्या कारागिराने कौशल्य पाहायला मिळते.

सावंतवाडी पर्यटन स्थळे मराठी माहिती

या व्यतिरिक्त मोती तलाव हे ठिकाण पर्यटकांना भुरळ घालते. हे ठिकाण सहराच्या मधोमध आहे. या ठिकाणी सुंदर देखावा पाहायला मिळतो. संध्याकाळी मोती तलावाच्या मधोमध रंगीबेरंगी कारंजे पाहता येते.

सावंतवाडीचा रॉयल पॅलेस इसवी सन 1755-1803 मध्ये सावंत भोसले यांनी बांधला आहे. या पॅलेस मध्ये अद्भुत खोल्या, युद्ध शस्त्रे आणि हिरवेगार वातावरण पाहायला मिळते. रॉयल भोसले कुटुंबाची राणी सध्या या पॅलेसमध्ये राहते.

रघुनाथ बाजारपेठ हे भारत देशातील प्रसिद्ध हस्तकला केंद्र म्हणून ओळखले जाते. ही बाजारपेठ साधारणपणें 150 वर्ष जुनी असेल. कोकणी हस्तकलेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी पर्यटक रघुनाथ बाजारपेठेला नक्की भेट देतात.

आंबोली घाट हा बेळगाव आणि गोव्याचा रस्ता जोडतो. कोकणातील पर्यटकांचे आवडीचे ठिकाण म्हणजे अंबोली. निसर्ग पर्यटन म्हणजे काय हे आंबोली घाटात गेल्यावर समजते. याच्या टेकड्या जणू आभाळशी स्पर्धाकरताहेत अस वाटत त्याचरोबर कायम हिरव्यागार असणाऱ्या या दऱ्या पावसाळयात खूप खुलून दिसतात.

तुम्ही जर 2 दिवसाच्या सहलीसाठी येणार असेल, तर आंबोली घाट अतिशय छान ठिकाण आहे. याठिकाणी दाट जंगले, दर्‍या खोर्‍यांचा नयनरम्य देखावा, अमर्याद निसर्गसौंदर्य पाहता येते आणि घनदाट जंगलातून भटकंती करण्याचा आनंद पर्यटकांना घेता येतो.

यशवंतगड जुन्या गोष्टींना उजाळा देण्याचे काम करते. या ठिकाणी इसवी सन 1707 ते 1713 या वेळी मराठ्यांनी यशवंतगड किल्ला बांधला. संपूर्ण किल्ला दाट झाडांनी व्यापलेला आहे. यशवंत गडाच्या माथ्यावर गेल्यावर तुम्ही कोकणी समुद्र किनारा पाहू शकता. या ठिकाणी हलकी थंड हवा असते. या ठिकाणावरून भव्य आणि आकर्षक देखावा पाहायला मिळतो.

आत्मेश्वर मंदिर नावाच्या प्राचीन मंदिरामुळे आत्मेश्वर ताली हे ठिकाण शिवलिंगसाठी प्रसिद्ध आहे. आत्मेश्वर मंदिराला सर्वोच्च धार्मिक महत्त्व लाभले आहे. यानंतर वेलागर बीच सावंतवाडी पासून 39.9 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी किनाऱ्यावर उंट सवारी आणि जल क्रीडा करण्यासाठी सोय केली आहे.

सावंतवाडी खाण्याचे पदार्थ

सावंतवाडी येथील पर्यटन स्थळे जगभरात प्रसिद्ध तर आहेच. कोकण किनारपट्टीवर प्रसिद्ध असलेले तांदूळ, मासे हे या ठिकाणाचे वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ आहे. त्याचबरोबर बांगडा (मॅकरेल), खेकडा ग्रेव्ही आणि तळलेले कोळंबी हे वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ या ठिकाणी मिळतात.

यामध्ये विशेष म्हणजे कोंबडीवडे अर्थात तळलेल्या वड्यांसह ही चिकन करी आहे मिळते. रघुनाथ बाजारपेठेत आगळ, आवळा रस आणि कोकम सरबत हे कोकणी पदार्थ प्रसिद्ध आहे.

दर मंगळवारी सावंतवाडीमध्ये आठवडी बाजार भरतो. या बाजारात काजूचे लाडू आणि फणसापासून बनवलेली उत्पादने मिळतात. या ठिकाणी भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ म्हणजे उन्हाळा आहे.

Related – मोहरी वनस्पती माहिती मराठी

सावंतवाडी येथे कसे पोहचाल?

सावंतवाडी मुंबई गोवा महामार्गाशी जोडलेले आहे. या ठिकाणी तुम्ही स्वतःची गाडी करून किंवा खाजगी आणि लक्झरी बसने येऊ शकता.

याव्यतिरिक्त सावंतवाडीपासून बेळगाव विमानतळ 99 किलोमीटर आहे. चिपी विमानतळ 47 किलोमीटर अंतरावर आहे, दाबोलिम विमानतळ 85 किलोमीटर अंतरावर आहे. विमानसेवेसोबतच या ठिकाणी सावंतवाडी या रेल्वे मार्गाने जाता येते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

सावंतवाडी कोणत्या संस्थान ची राजधानी होती ?

सावंतवाडी संस्थान

रंगीत लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुका कोणता आहे?

रंगीत लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुका सावंतवाडी आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख व्यवसाय कोणते आहे ?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख व्यवसाय पर्यटन, मासेमारी, आंबा, काजू, फणस हे आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ठिकाण कोठे आहे ?

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे महाराष्ट्र राज्यात आहे.

सिंधुदुर्ग किल्ला कोठे आहे ?

सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण बंदराजवळ आहे.

आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे.

आंबा घाट कोणत्या जिल्ह्यात आहे ?

आंबा घाट कोल्हापूर जिल्ह्यात आहे.

सारांश

तर मित्रांनो आशा करतो की, या लेखात तुम्हाला सावंतवाडी पर्यटन स्थळे आणि तेथील खाण्याचे प्रसिद्ध पदार्थ याची सविस्तर माहिती मिळाली असेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉगला बुकमार्क 📑 करायला विसरू नका.