SBI Education Loan information in marathi – सुसंस्कृत, सभ्य आणि सक्षम नागरिक बनण्यासाठी शिक्षण हे महत्वाचे ठरते. आपली ज्ञान व कौशल्ये वाढवण्यासाठी अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत.
बऱ्याच विद्यार्थ्यांना अर्थिक अडचणीमुळे शिक्षण घेण्यात अडथळे येतात. यावर उपाय म्हणून भारतात आणि परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय स्टेट बँकेने शिक्षणासाठी कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
या लेखातून आपण स्टेट बँक ऑफ इंडिया शैक्षणिक कर्ज माहिती (SBI Education Loan information in marathi) सविस्तरपणे समजून घेऊ. यात आपण कर्जासाठी लागणारी कागदपत्रे आणि प्रक्रिया समजून घेणार आहोत.
स्टेट बँक ऑफ इंडिया शैक्षणिक कर्ज माहिती (SBI Education Loan information in marathi)

Student loan ही भारतीय स्टेट बँकेची एक योजना आहे. या योजनेमधून यूजी (Under Graduate), पीजी(Post Graduate), आयआयटी (Indian Institutes of Technology), आयआयएम (Indian Institutes of Management) यासारख्या कोर्सेससाठी 50 लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.
तसेच एमसीए (Masters in Computer Application), एमबीए (Master of Business Administration), एमएस (Master of Science) अशा अभ्यासक्रमांसाठी परदेशातील नामांकित संस्थांमधून शिकण्यासाठी जास्तीत जास्त 1.5 कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.
कर्ज घेतल्यानंतर कर्जाची परतफेड व्याजासह करावी लागते. Education loan sbi अभ्यासक्रम संपल्यानंतर विद्यार्थ्यांना 15 वर्षांच्या कालावधीत कर्जाची परतफेड करण्याचा वेळ दिला जातो.
यासाठी विद्यार्थ्यांना 8.65 टक्के व्याजदर आकारला जातो, तर विद्यार्थिनींना व्याजदरात 0.5 टक्के सूट मिळते. कर्जाची रक्कम 20 लाखांपर्यंत असेल, तर कोणतेही प्रक्रिया शुल्क भरावे लागत नाही. पण कर्जाची रक्कम 20 लाखांपेक्षा जास्त असेल तर, 10,000 रुपयांच्या प्रोसेसिंग फीसह कर भरावा लागतो.
स्टेट बँक शिक्षण कर्ज पात्रता (SBI education loan eligibility)
कागदपत्रे | पर्याय |
---|---|
ओळखीचा पुरावा | मतदार ओळखपत्र, आधार, वाहन चालविण्याचा परवाना किंवा पासपोर्ट |
प्रवेश पत्र | ज्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घ्यावयाचा आहे तेथील प्रवेश निश्चित केल्याचे प्रवेशपत्र |
शैक्षणिक खर्चाचे विवरण | कोर्स फी, राहण्याचा खर्च व इतर खर्च यांचा हिशोब लिखित स्वरूपात |
पत्त्याचा पुरावा | वीज बिल, टेलिफोन बिल, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स |
उत्पन्नाचा पुरावा | 1. सह-कर्जदार/पालक/विद्यार्थ्यांची पगार स्लिप किंवा फॉर्म 16 2. दोन वर्षाचे सह-कर्जदार/पालक/विद्यार्थ्यांचे आयकर विवरण 3. विद्यार्थी व पालक यांचे मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट आणि पॅन कार्ड |
इतर | 1. विद्यार्थी व पालक यांच्या मालमत्ता आणि दायित्वांचे संक्षिप्त विवरण 2. पासपोर्ट आकाराचे छायाचित्र प्रत्येकी 2 |
1. अर्जदारचे नागरिकत्व भारतीय असणे आवश्यक असून, विद्यार्थ्यांचे वय 35 पेक्षा कमी असावे आणि अर्जदार नोकरीला असल्यास त्याचे वय 45 वर्षेच्या आत असावे.
2. IIT, IIM, ISB, किंवा ज्या कोर्ससाठी प्रवेश घ्यायचा आहे, त्या संबंधित कोर्ससाठी शिक्षण संस्थेत प्रवेश मिळवलेला असावा.
3. या कर्जासाठी विद्यार्थ्याने सुरक्षा म्हणून तारण ठेवणे आवश्यक आहे. हे तारण फक्त कर्जाची रक्कम सात लाखापेक्षा जास्त असेल तरच लागू होते.
स्टेट बँक ऑफ इंडिया शैक्षणिक कर्ज योजना (SBI Education Loan Scheme)
योजना | रक्कम | व्याजदर |
---|---|---|
SBI विद्यार्थी कर्ज | 7.5 लाखांपेक्षा कमी | 8.65% |
SBI विद्यार्थी कर्ज | 7.5 लाख ते 20 लाख | 8.65% |
SBI स्कॉलर कर्ज | 40 लाखांपर्यंत | 6.85 – 8.15% |
अर्धवेळ अभ्यासक्रम | 7.5 लाखांपर्यंत | 8.65% |
SBI कौशल्य कर्ज | 1.5 लाखांपर्यंत | 8.15% |
SBI ग्लोबल एड-व्हंटेज | 20 लाख ते 1.5 कोटी | 8.65% |
संपार्श्विक शिक्षण SBI टेकओव्हर | 10 लाख ते 1.5 कोटी | 8.65% |
स्टेट बँक ऑफ इंडिया शैक्षणिक कर्जाचा अर्ज कसा करावा (how to apply sbi education loan)
स्टेट बँक ऑफ इंडिया शैक्षणिक कर्जाचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करण्यासाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळ वर जाऊन शैक्षणिक कर्जाचा पर्याय निवडून “आता अर्ज करा” यावर क्लिक केल्यावर विंडो विद्या लक्ष्मी वेबसाइटवर पुनर्निर्देशित केले जाईल.
यानंतर आपले सर्व तपशील प्रविष्ट करून आपली नोंदणी करा. शेवटी कर्जासाठी अर्ज करा. बँकेचा प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधेल.
यानंतर आपल्याशी संपर्क करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर बँक अधिकारी येऊन कागदपत्रे पडताळणी करतात. त्यानंतर तुम्हाला एकदा बँकेत जाऊन कागदपत्राची पूर्तता करावी लागते.
यानंतर अर्ज व त्यातील माहिती तपासून अर्ज स्वीकारला जातो.
सारांश
आजच्या या पोस्टमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया शैक्षणिक कर्ज माहिती (SBI Education Loan information in marathi) पाहिली. ही पोस्ट कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
शैक्षणिक कर्जाचे प्रकार किती व कोणते आहेत ?
शैक्षणिक कर्जाचे प्रकार दोन असून ते पुढीलप्रमाणे आहेत.
1. देशांतर्गत शैक्षणिक कर्ज (Domestic Education Loan) – देशांतर्गत शिक्षण घेण्यासाठी आपल्याला हे लोन मिळते. याची एक महत्त्वाची अट म्हणजे शिक्षण घेण्यासाठी तुम्ही देशाबाहेर जाऊ शकत नाही. पण देशाच्या अंतर्गत तुम्ही कोणत्याही राज्यात व जिल्ह्यात शिक्षण घेऊ शकता. देशांतर्गत शैक्षणिक कर्जाचे व्याजदर हे कमी असते.
2. विदेशी शैक्षणिक कर्ज (Abroad Education Loan) – तुम्ही कोणत्याही देशात शिक्षण घेण्यासाठी जाऊ शकता. विदेशी शैक्षणिक कर्जाचे व्याजदर हे देशांतर्गत दिलेल्या व्याजदरापेक्षा जास्त असते.
स्टेट बँक ऑफ इंडिया शैक्षणिक कर्जाची परतफेड करण्यासाठी किती वर्षाची मुदत असते ?
स्टेट बँक ऑफ इंडिया शैक्षणिक कर्जाची परतफेड करण्यासाठी 15 वर्षाची मुदत असते.
पुढील वाचन :