शेअर बाजार मराठी माहिती – व्याख्या, प्रकार व कार्य

By | September 26, 2022

Share market in marathi – देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी व्यापार आणि उद्योग यांचा मोठा वाटा असतो. व्यापार वाढीसाठी आवश्यक ते भांडवल पुरविण्याचे काम बँका, पतसंस्था, सरकारी आणि खाजगी वित्त संस्था करतात. यासोबतच व्यवसायवृद्धीसाठी शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणावर भांडवल जमविले जाते. यामुळे शेअर बाजाराची व्याप्ती आणि महत्व अनन्यसाधारण आहे. यामुळेच स्टॉक मार्केटला अर्थव्यवस्थेचा कणा म्हंटले जाते.

जागतिक पातळीवर शेअर बाजाराची सुरुवात साधारणपणे सोळाव्या शतकात झाली, तर अठराव्या शतकात भारतीय बाजारपेठेत शेअर बाजाराची ओळख झाली.

या लेखातून आपण शेअर मार्केट माहिती – व्याख्या, प्रकार आणि कार्य (share market in marathi) जाणून घेणार आहोत. यात आपण स्टॉक बाजार म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते (what is share market and how it works) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

हा लेख जरूर वाचाडिमॅट अकाउंट म्हणजे काय ?

Table of Contents

शेअर बाजार म्हणजे काय (share market definition in marathi)

Share market in marathi

शेअर म्हणजे भाग आणि मार्केट म्हणजे बाजार ज्याठिकाणी आपण एखादी वस्तू अथवा इतर बाबी खरेदी किंवा विक्री करू शकतो. या दोन शब्दांनी मिळून शेअर बाजार हा शब्द तयार झाला आहे. शेअर बाजाराला भाग बाजार असे देखील म्हंटले जाते.

शेअर बाजार म्हणजे स्टॉक एक्सचेंजवर नोंदणीकृत असणाऱ्या कंपन्यांची हिस्सेदारी खरेदी किंवा विक्री करण्यासाठी उपलब्ध असणारी जागा होय.

कंपन्यांचा हिस्सा खरेदी किंवा विक्री करताना स्टॉक एक्सचेंज मध्यस्ती म्हणून कार्य करतो. आपण स्टॉक एक्सचेंज किंवा स्टॉक ब्रोकर या दोघांकडून स्टॉक खरेदी-विक्री करू शकतो.

स्टॉक एक्सचेंज हे सेकंडरी मार्केट आहे. या ठिकाणाहून केलेल्या व्यवहारात कंपनी आणि गुंतवणूकदाराचा प्रत्यक्ष संबंध येत नाही. कारण कंपनीने त्यांचे शेअर्स प्रायमरी मार्केटमध्ये अगोदरच विक्री केलेले असतात. यालाच आयपीओ (Initial public offering) असे म्हंटले जाते.

हा लेख जरूर वाचागुंतवणूक आणि ट्रेडिंग यातील फरक

शेअर बाजाराचे प्रकार कोणते आहेत (types of share market in marathi)

शेअर बाजाराचे दोन कोणते आहेत. पहिल्या प्रकारास प्रायमरी मार्केट व दुसऱ्या प्रकारास सेकंडरी मार्केट असे म्हणतात. प्रायमरी मार्केट म्हणजे प्राथमिक बाजार होय. एखादी कंपनी स्टॉक एक्सचेंजवर नोंदणी करताना आपले धोरण आणि भांडवल यांचा विचार करून काही ठराविक किमतीवर कंपनीची हिस्सेदारी विक्री करतात.

यासाठी कंपन्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) आणि बॉण्ड्स जाहीर करतात. यातून कंपनी आवश्यकतेनुसार भांडवल जमा करतात त्याबदल्यात गुंतवणूकदारास शेअर्सच्या माध्यमातून त्या कंपनीची हिस्सेदारी मिळते.

सेकंडरी मार्केटमध्ये शेअर्सची ट्रेडिंग केली जाते. ही ट्रेडिंग गुंतवणूकदारामध्ये करण्यात येते, यामध्ये कंपनी आणि गुंतवणूकदार यांचा प्रत्यक्ष संबंध येत नाही. कारण प्रायमरी मार्केटमध्ये कंपन्यांनी आपली हिस्सेदारी विक्री केलेली असते.

शेअर बाजार कसा चालतो (how to work share market in marathi)

एखादी कंपनी जिला व्यापार वाढीसाठी भांडवल पाहिजे असल्यास ती स्टॉक एक्सचेंजवर नोंदणी करतात. एक्सचेंजवर नोंदणीकृत कंपनी म्हणून निवडताना कंपनीला काही अटींची पूर्तता करावी लागते. या अटी देशातील सरकारी निर्देशानुसार केलेल्या असतात. भारतातील स्टॉक मार्केट, एक्सचेंज आणि डिमॅट खात्यावर सेबी (सेक्युरिटीझ अँड बोर्ड एक्सचेंज ऑफ इंडिया) नियंत्रण ठेवते.

स्टॉक बाजारात प्रवेश करताना कंपन्या आपले धोरण आणि भांडवल यांचा विचार करून काही ठराविक किमतीवर कंपनीची हिस्सेदारी विक्री करतात. यासाठी कंपन्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफर जाहीर करतात. यामध्ये खरेदी करणाऱ्या प्रत्येकासाठी शेअर्सची किंमत एकसमान असते.

IPO लिस्टिंगनंतर कंपनी स्टॉक एक्सचेंजवर अधिकृतपणे नोंदणीकृत होते. यानंतर गुंतवणूकदाराकडून कंपनीची हिस्सेदारी खरेदी आणि विक्री केली जाते. यालाच ट्रेडिंग असे म्हणतात.

वाढती मागणी आणि विक्री यावर शेअरची किंमत कमी-जास्त होत राहते, अश्या प्रकारे शेअर बाजार काम करतो.

तुम्हाला पुढील लेख वाचायला आवडेल!

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण शेअर मार्केट माहिती – व्याख्या, प्रकार आणि कार्य (Share market in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

भारतीय शेअर बाजाराची सुरुवात केव्हा झाली ?

भारतीय शेअर बाजाराची सुरुवात इसवी सन 1975 साली झाली.

भारतात पहिला संघटीत शेअर बाजार कोणत्या ठिकाणी अस्तित्वात आला ?

भारतात पहिला संघटीत शेअर बाजार दलाल स्ट्रीट, मुंबई या ठिकाणी अस्तित्वात आला.

मुंबई शेअर बाजाराची स्थापना कधी झाली ?

9 जुलै 1875 रोजी मुंबई शेअर बाजाराची स्थापना झाली.

राष्ट्रीय शेअर बाजाराची स्थापना कधी झाली ?

इसवी सन 1992 साली राष्ट्रीय शेअर बाजाराची स्थापना झाली.

भारतात किती स्टॉक एक्सचेंज आहेत ?

भारतात 24 स्टॉक एक्सचेंज आहेत. यापैकी सर्वात जास्त ट्रेडिंग बॉम्बे स्टॉक एकसचेंज (BSE) व राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज (NSE) यावर केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *