shikshak din marathi kavita – आपल्या जीवनाला आकार देण्याचे काम आपले शिक्षक, गुरू करीत असतात. त्यांचे आपल्या जीवनात अनेक उपकार असतात. आयुष्याच्या प्रवासात कधी काही संकटे आली, तर त्यातून बाहेर कसे पडायचे ? हे फक्त गुरूच सांगतात. म्हणून तर आपल्या शिक्षकांना जीवनात महत्वाचे स्थान देण्यात येते.
5 सप्टेंबर 1962 या दिवसापासून डॉ. सर्वेपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. या लेखातून आपण शिक्षक दिनानिमित्त कविता मराठी (shikshak din marathi kavita) पाहणार आहोत.
शिक्षक दिनानिमित्त कविता मराठी (shikshak din marathi kavita)

शिक्षक म्हणजे एक समुद्र ज्ञानाचा... पवित्र्याचा.... एक आदरणीय कोपरा प्रत्येक व्यक्तीच्या मनातला शिक्षक म्हणजे अपूर्णला पूर्ण करणारा शिक्षक म्हणजे आपला ज्ञान वाढविणारा शिक्षक म्हणजे आपले जीवन घडविणारा शिक्षक म्हणजे आपल्या तत्त्वातून मूल्य घडवणारा माझ्या तमाम शिक्षक वर्गाला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
शिक्षक कविता मराठी छोटी (shikshak din marathi kavita short)
चिखलातला जन्मही सार्थकी लागावा निसर्गसारखा शिक्षक प्रत्येकाला लाभावा...
शिक्षक दिनानिमित्त कविता मराठी (shikshak din marathi kavita)
‘ओळखलत का सर मला?’ पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन. माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला‘पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणापाठीवरती हात ठेउन, फक्त लढ म्हणा’!
सारांश
आजच्या या पोस्टमध्ये आपण शिक्षक दिनानिमित्त कविता मराठी (shikshak din marathi kavita) पाहिली. जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
शिक्षक म्हणजे काय ?
कोणत्याही प्रकारे आपल्या ज्ञानात भर घालणाऱ्या व्यक्तीस किंवा बाबीस शिक्षक असे म्हणतात. आपल्या जीवनाला एक चांगला आकार देण्यासाठी गुरु महत्त्वाचा असतो गुरूंनाच शिक्षक असे संबोधले जाते.
भारतात पहिला शिक्षक दिन कधी साजरा झाला ?
5 सप्टेंबर 1962 रोजी भारतात पहिला शिक्षक दिन साजरा करण्यात आला. डॉ. राधाकृष्णन सर्वपल्ली यांच्या जन्मदिनी त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला होता यामुळेच या दिवसाला शिक्षक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.
या कविता देखील वाचा :