शिवाजी महाराजांची राजमुद्रा व त्याचा अर्थ

Shivaji Maharaj Rajmudra In Marathi – एखाद्या दस्तऐवजाचा अधिकृतपणा दर्शविणारे राजचिन्ह म्हणजे राजमुद्रा होय. पूर्वी प्रत्येक राजा त्यांच्या स्वतंत्र राजमुद्रा निर्माण करत असत. शहाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न आपल्या मुलात म्हणजेच शिवाजी महाराज यांच्यात पाहिले.

छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांना शहाजीराजांनी स्वतंत्र राजमुद्रा तयार करून दिली.

शहाजी राजांच्या राजमुद्रेत एक गहन अर्थ लपलेला असून, हा अर्थ सर्वांनी जाणून घेणे गरजेचे आहे. यासाठी या लेखातून आपण शिवाजी महाराजांची राजमुद्रा व त्याचा अर्थ माहिती मराठी (shivaji maharaj rajmudra meaning in marathi) जाणून घेणार आहोत.

शिवाजी महाराजांची राजमुद्रा व त्याचा अर्थ माहिती मराठी (shivaji maharaj rajmudra in marathi)

Shivaji maharaj rajmudra in marathi
विषयशिवाजी महाराजांची राजमुद्रा
प्रकारसाम्राज्याचे राजचिन्ह
निर्मितीशहाजी भोसले
मूळ भाषासंस्कृत

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता ।।

शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।

ever-increasing like the crescent-moon, the kingdom of Shivaji, son of Shahaji, will always seek the welfare of the people.

वरील राजमुद्रा शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या साम्राज्याची राजमुद्रा बनविली. यासाठी संस्कृत भाषेचा वापर करण्यात आला आहे.

प्रतिपदेचा चंद्र जसा कले कलेने वाढत जातो व साऱ्या विश्वात वंदनीय होतो, त्याप्रकारे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल व ही राजमुद्रा फक्त लोकांच्या कल्याणासाठी चमकेल, असा शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा अर्थ.

मुद्रेतला प्रत्येक शब्द विचारपूर्वक मांडण्यात आला असून, या मुद्रेतून महाराजांचे भविष्यातील ध्येय आणि हेतू निश्चित झाले आहेत.

शहाजीचा पुत्र प्रतिदिनी वृद्धिंगत होणारं राष्ट्र निर्माण करणार आहे हे ध्येय आहे आणि राष्ट्रनिर्माण हे स्वसुखासाठी नसून प्रजेच्या हितासाठी असल्याने ही मुद्रा विश्ववंद्य होईल हा हेतू स्पष्ट केला आहे. हे कार्य करणारा माझा पुत्र शिवाजी आहे आणि जगाच्या कल्याणासाठी त्याचे राज्य आहे असा विश्वास गांजलेल्या, दु:खी, कष्टी जनतेच्या मनात या राजमुद्रेद्वारे निर्माण केला आहे.

हा लेख जरूर वाचामराठा साम्राज्याचा सहावा राजा – राजाराम दुसरा भोसले (Rajaram II of Satara in marathi)

श्री महादेव

श्री तुळजाभवानी

शिवनृप रूपेणोर्वीमय

तीर्णोयःस्वयं प्रभु र्विष्णूः

एषा तदिय मुद्रा

भुबळ्यस्याभयप्रदा जयति।।

वरील राजमुद्रा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर बनवली होती. याचा अर्थ असा की, शिवरायांच्या रूपामध्ये पृथ्वीवर अवतीर्ण झालेले हे स्वतः श्री विष्णुच आहेत. ही त्यांची मुद्रा संपूर्ण भूतलाला अभय देणारी आहे. तिचा जयजयकार असो!

छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे लेखन संपवत असताना शेवटी एक मुद्रा उमटवत असत, यामुळे लेखन संपले आणि केलेले लेखन बनावट नाही याची खात्री होत.

मर्यादेयं विराजतेही

ही मुद्रा जवळपास सर्व लोकांना माहिती आहे. काही दिवसांपूर्वी शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर असलेले एक पत्र समोर आले होते. पण या पत्राची सत्यता तपासताना त्यात पत्राच्या शेवटी एक शिरोरेषा नव्हती. त्यामुळे हे पत्र बनावट असल्याचे समोर आले होते.

सारांश

या लेखातून आपण शिवाजी महाराजांची राजमुद्रा व त्याचा अर्थ माहिती मराठी (shivaji maharaj rajmudra meaning in marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल, तर तुमच्या मित्रांना नक्कीच सामायिक करा.

Related – शिवराज्याभिषेक सोहळा माहिती

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणत्या भाषेत आहे ?

शिवाजी महाराजांची राजमुद्रा संस्कृत भाषेत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणी तयार केली ?

छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा शहाजी महाराजांनी तयार केली.

शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा कोणी तयार केली ?

शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा शहाजीराजे यांनी तयार केली.

शिवाजी महाराजांच्या राजमुद्रा यातून कोणता संदेश दिला आहे ?

शिवाजी महाराजांच्या राजमुद्रा यातून पुढील संदेश दिला आहे. तो असा…

प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृद्धिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे.