Shivrajyabhishek Information In Marathi – छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिवराय अशा अनेक नावांनी ओळखले जातात. इतिहासाची पाने उलगडत असताना शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेचा वापर करून एक बलाढ्य साम्राज्य निर्माण करणारे राजे म्हणून शिवाजी महाराजांचे पहिले स्थान पाहायला मिळते.
शिवाजी महाराज राज्याभिषेक एक ऐतिहासिक घटना होय संपूर्ण भारतात परकीय शत्रूंचा बंदोबस्त करणारे राजा शिवछत्रपती आणि त्यांचा राज्याभिषेक याविषयी माहिती (shivrajyabhishek information in marathi) या लेखात जाणून घेणार आहोत.
Table of Contents
- शिवाजी महाराज माहिती मराठी (shivaji maharaj information in marathi)
- शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा माहिती (shivrajyabhishek information in marathi)
- शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा माहिती (shivrajyabhishek information in marathi)
- शिवशक कालगणना आणि चलन निर्मिती माहिती मराठी (Shivrajyabhishek Information In Marathi)
- शिवाजी महाराज दुसऱ्यांदा राज्याभिषेक सोहळा माहिती (shivrajyabhishek information in marathi)
- शिवराज्याभिषेक महत्व माहिती (importance of shivrajyabhishek in marathi)
- सारांश
- वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
शिवाजी महाराज माहिती मराठी (shivaji maharaj information in marathi)
संपूर्ण नाव | शिवाजीराजे शहाजीराजे भोसले |
वडील | शहाजीराजे |
आई | जिजाबाई |
जन्म | 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी |
मृत्यू | 3 एप्रिल 1680 रायगड |
कार्य | मराठा साम्राज्याचे संस्थापक |
राजव्याप्ती क्षेत्र | पश्चिम महाराष्ट्र, कोकण, सह्याद्री डोंगर रांगांपासून नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून दक्षिण भारतात तंजावरपर्यंत |
राज्याभिषेक | 6 जून 1674 |
ब्रीदवाक्य | ‘प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।’ |
चलन | होन, शिवराई |
पत्नी | 1. सईबाई 2. सोयराबाई 3. पुतळाबाई 4. काशीबाई 5. सकवारबाई 6. लक्ष्मीबाई 7. सगणाबाई 8. गुणवंतीबाई |
उत्तराधिकारी | छत्रपती संभाजीराजे भोसले |
शिवाजी महाराज मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि प्रथम छत्रपती म्हणून ओळखले जातात. भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले.
भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले.
शिवाजी भोसले हे अभिषिक्त राजे नसल्याचे अनेक व्यावहारिक तोटे शिवरायांना व त्यांच्या साथीदारांना जाणवत होते. शिवाजीराजांनी अनेक जमिनींवर स्वामित्व स्थापन केलेले असले आणि अपार धन मिळविले असले तरी; त्यांच्याजवळ मजबूत लष्कर आणि नौदल असले आणि असंख्य सैनिकांवर त्यांचा हुकूम चालत असला तरी सैद्धांतिकदृष्ट्या त्यांची स्थिती ही राजासारखी किंवा सम्राटासारखी नव्हती.
मुघल सम्राटाच्या लेखी ते एक जमीनदार होते; आदिलशहासाठी ते एका जहागीरदाराचे बंडखोर पुत्र होते कोणत्याही राजासोबत समान दर्जाचा दावा ते करू शकत नव्हते. तसेच ज्या लोकांवर त्यांचे राज्य होते त्या लोकांकडून स्वामीनिष्ठेची वा भक्तीची खरीखुरी अपेक्षा राज्याभिषेकाशिवाय करणे चुकीचे होते.
राज्याभिषेकाशिवाय त्यांच्या आज्ञांना किंवा आदेशांना अखिल रयत गांभीर्याने घेईलच असे नव्हते. राज्याभिषेक झालेला नसल्याने कोणत्याही तहावर स्वाक्षरी करणे, विधीवत मार्गाने एखाद्याला जमीन देणे व आपल्या राजकीय सत्तेच्या भविष्याची हमी देणे शक्य नव्हते आपल्या राजकीय निर्मितीला (स्वराज्याला) कायदेशीर मान्यता मिळवून देऊन तिचे अस्तित्व कायम राखण्यासाठी राज्याभिषेक आवश्यक होता.
हा लेख जरूर वाचा – शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांची नावे व माहिती (Names of Shivaji Maharaj bodyguards)
शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा माहिती (shivrajyabhishek information in marathi)

Shivrajyabhishek History Information In Marathi – इसवी सन 1674 मध्ये भारतीय इतिहासातील सर्वात महत्त्वपूर्ण घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक होय. संपूर्ण भारतातील परकीय शत्रूंना धूळ चारणारे करणारे शिवछत्रपती महाराज यांचा 6 जून 1674 मध्ये राज्याभिषेक झाला. हा राज्याभिषेक म्हणजे भारतातील परकीय सत्तांना एक प्रकारे दिला गेलेला इशाराच होय.
परकीय शत्रूवर वचक आणि जरब बसवण्यासाठी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करून घेणे गरजेचे होते म्हणून शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला. राज्याभिषेक झाल्यानंतर संपूर्ण जगात त्यांना छत्रपती ही पदवी मिळाली. भारतात खऱ्या अर्थाने शिवशाहीचा काळ सुरू झाला.
6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला. भारतीय इतिहासात या घटनेकडे खूप महत्वाची घटना म्हणून पाहिले जाते. कारण त्या काळात संपूर्ण भारत परकिय आक्रमणांनी ग्रासला होता आणि एवढ्या मोठ्या शत्रूंना तोंड देऊन छत्रपतींनी आपला राज्याभिषेक केला होता. ही भारतीय इतिहासातील सामान्य गोष्ट नव्हती.
राज्याभिषेक करून राजा ही पदवी धारण करुन भारतातील परकीयांना शह देणे ही त्या काळात खुप धाडसाची कामगिरी छत्रपतींनी केली म्हणून भारतीय इतिहासात या घटनेकडे एक युगप्रवर्तक घटना म्हणून बघितले जाते. राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपतींनी अनेक सुधारणा घडवून आणल्या. परकीय शत्रूंना शह देणारा छत्रपती म्हणून शिवाजी महाराजांकडे बघितले जाऊ लागले.
शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा माहिती (shivrajyabhishek information in marathi)
Shivrajyabhishek Sohala Information In Marathi – भारतातील सर्वात विद्वान पंडित म्हणून मिरविले गेलेले गागाभट्ट हे स्वतःहून छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती ऐकून त्यांची भेट घेण्यास आले होते आणि इथून पुढेच महाराजांच्या राज्याभिषेकाची खरी तयारी सुरू झाली.
गागाभट्टांनी राज्याभिषेकाची संपूर्ण जबाबदारी घेतली. त्या काळात गागाभट्ट काशीतील विद्वान पंडित होते. त्यांनी राजांच्या राज्याभिषेकाची संपूर्ण तयारी केली. गागाभट्ट हे काशीतील विद्वान पंडित होते राज्याभिषेकाचे संपूर्ण ज्ञान त्यांना होते. गागाभट्ट यांनी शिवराज्याभिषेकाचा साठी एक स्वतंत्र ग्रंथ तयार केला होता.
Shivrajyabhishek Information In Marathi – छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक होणार राजा म्हणून राजाला बसण्यासाठी सिंहासन असावे लागते म्हणून छत्रपतींच्या राज्याभिषेकासाठी खास 32 मन सोन्याचे सिंहासन बनवून घेण्यात आले. शिवछत्रपतींना 32 मन सोन्याचे सिंहासन तयार करण्यात आले.
राज्याभिषेक करणे हा एक धार्मिक विधीच आहे. राज्याभिषेक करण्यापूर्वी गागाभट्टांनी शिवराज्याभिषेकासाठी “तुला पुरुष दान विधी” व “राज्याभिषेक प्रयोग”हे दोन ग्रंथ तयार करून घेतले. राज्याभिषेक करण्यापूर्वी आवश्यक कार्य म्हणून छत्रपतींची मुंजा करण्यात आली.
राज्याभिषेक करण्यासाठी महाराजांची सुवर्णतुला करण्यात आली राज्याभिषेकासाठी सुवर्णतुला केली जाते त्यावेळी महाराजांचे वजन 160 पौंड होते. राज्याभिषेकासाठी महाराजांचे त्यांच्या पत्नींसोबत विधिवत विवाह करण्यात आले. राज्याभिषेक सोहळा नऊ दिवस चालला होता.
राज्याभिषेकाची सर्व पूर्वतयारी झाल्यानंतर प्रत्यक्ष 6 जून 1674 हा दिवस उजाडला आणि भारताच्या इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा क्षण आला तो क्षण म्हणजे छत्रपतींचा राज्याभिषेक होय.
सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर गागाभट्टांनी या दिवशी छत्रपतींचा विधीवत असा राज्याभिषेक केला संपूर्ण महाराष्ट्रात तसेच भारतात आहे की ऐतिहासिक क्षण निर्माण झाला.
Shivrajyabhishek Information In Marathi – ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1595 शनिवार दिनांक 6 जून 1674 रोजी सकाळच्या वेळी महाराज सिंहासनारूढ झाले. इतिहासातील एक ऐतिहासिक घटना कित्येक शतकांनी एक हिंदू राजा झाला कित्येक परकीय यांना तोंड देत राज्याभिषेक झाला इतिहासात सुवर्णाक्षरांनी हा क्षण लिहिला गेला.
कोणताही राजा राज गादीवर आल्यानंतर राज्यातील गोरगरीब गरजवंत या सर्वांना दानधर्म दक्षिणा दिली जाते तसेच दानधर्म दक्षिणा छत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या वेळी देण्यात आली. शिवराज्याभिषेकाचा साठी भारत भर ब्राह्मणांना आमंत्रणे पाठवण्यात आली होती. रायगडावर कित्येक पाहुण्यांची राहण्याची सोय करण्यात आली होती.
विदेशी व्यापारी, इंग्रज, परकीय शासक, प्रजा असे सारे लोक राजांच्या राज्याभिषेक वेळी उपस्थित होते. गागाभट्ट व इतर ब्राम्हणांना दक्षिणा म्हणून होन देण्यात आल्या. यावेळी सोळा प्रकारचे महादान करण्यात आले. गरजूंना यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे दान देण्यात आले. छत्रपतींच्या राज्य हे आदर्श राज्य होते राज्यातल्या प्रत्येक गरजवंताला मदत केली जात असे.
हा लेख जरूर वाचा – हरिश्चंद्रगड माहिती मराठी (harishchandragad trek information in marathi)
शिवशक कालगणना आणि चलन निर्मिती माहिती मराठी (Shivrajyabhishek Information In Marathi)
शिवशक ही नवीन कालगणना सुरू झाली. छत्रपतींचा राज्याभिषेक झाल्यानंतर राजांनी शिवशक ही नवीन कालगणना सुरु केली. आजही शिवशक ही कालगणना अस्तित्वात आहे. या कालगणनेमागे राजांचा दूरदृष्टीचा महत्वपूर्ण गुण दिसून येतो.
शिवराज्याभिषेकानंतर महाराजांनी शिवराई व होन या दोन चलनाची निर्मिती केली. शिवराई ही चांदीची नाणी व होन ही सोन्याची नाणी चलनात आणली. राजांनी राज्यकारभाराच्या सोयीसाठी ही चलन निर्मिती केली.
शिवरायांनी राज्याभिषेक झाल्यानंतर राज्यकारभारासाठी मराठी भाषेचा वापर केला. मराठी भाषेस महत्त्व दिले. परकीय भाषा वापरण्यापेक्षा आपली मातृभाषा महाराजांनी राज्यकारभारात वापरली. यातून महाराजांचे भाषा प्रेम दिसून येते.
हा लेख जरूर वाचा – भुदरगड किल्ला माहिती – bhudargad fort information in marathi
शिवाजी महाराज दुसऱ्यांदा राज्याभिषेक सोहळा माहिती (shivrajyabhishek information in marathi)
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक मोठ्या थाटात पार पडला परंतु त्यानंतर थोड्याच दिवसात म्हणजे 17 जून 1674 रोजी राजमाता जिजाऊ यांचा मृत्यू झाला आणि राज्याभिषेक सोहळ्यास गालबोट लागले. रायगडावर असणाऱ्या घोड्यांच्या तबेल्यास आग लागून खूप घोडे मरण पावले. या सर्व घटनांमुळे महाराजांच्या पहिल्या राज्याभिषेकामध्ये काहीतरी त्रुटी राहिल्याचे जाणकारांचे मत झाले.
या सर्व घटनांमुळे निश्चलपुरी महाराजांनी छत्रपतींना दुसरा तांत्रिक राज्याभिषेक करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार महाराजांनी 24 सप्टेंबर 1674 रोजी निश्चलपुरी महाराजांच्या हातून दुसरा तांत्रिक राज्याभिषेक करवून घेतला. अशाप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक पार पडला.
शिवराज्याभिषेक महत्व माहिती (importance of shivrajyabhishek in marathi)
शिवराज्याभिषेक हा केवळ एक राज्याभिषेक नव्हता तर भारतातील परकीय शक्तींना तो एक धडकी भरवणारा धडाच होता. भारताकडे कुणीही वाकड्या नजरेने पाहिल्यास त्याला धडा शिकवण्याची ताकद महराजांमध्ये होती म्हणून महाराजांच्या राज्याभिषेकावेळी इंग्रज, फ्रेंच,पोर्तुगीज सर्वजण उपस्थित होते. महाराजांना खुश ठेवण्यासाठी त्यांनी महाराजांना नजराणे भेट दिले होते. यातूनच महाराजांच्या राज्याभिषेकाची परकीय शत्रूंनी किती दखल घेतली होती हे दिसून येते.
महाराजांनी राज्याभिषेक केल्यानंतर हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली भारतात कित्येक शतकांनंतर एक हिंदू राजा झाला होता.एक हिंदूंचे राज्य भारतात निर्माण झाले होते. भारतासाठी ही खूप महत्त्वाची अशी घटना होती. इतिहासात या राज्याभिषेक याला खूप महत्त्व आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले त्यांच्या राज्यात सर्व गोरगरीब श्रीमंतांना एकच न्याय मिळत असे न्यायाच्या बाबतीत भेदभाव केला जात नसे अन्य करणाऱ्यास कठोरात कठोर शिक्षा दिली जाई. महाराजांच्या राज्यात सर्व नियम पाळले जात असे रयतेला वेळोवेळी मदत केली जाईल शिवाजी महाराज स्वतः रायते मध्ये फिरून रयतेची परिस्थिती जाणून घेत असे वेळोवेळी येणार्या संकटांना मात देत महाराजांनी आपल्या रयतेला सुखी आणि समाधानी ठेवले होते म्हणूनच महाराजांचे राज्य हे रयतेचे राज्य होते असे म्हटले जाते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे खऱ्या अर्थाने न्यायाने चालणारे राज्य होते. छत्रपतींनी शत्रूच्या माता-भगिनींना कधीही त्रास दिला नाही. भारतात होऊन गेलेला एकमेव चारित्र्यसंपन्न राजा म्हणजे शिव छत्रपती शिवाजी महाराज होय.
महाराजांच्या राज्यात माता भगिनींचा मान राखला जाई. माता- भगिनी या सर्वात सुरक्षित होत्या. अशा प्रकारे एक युगप्रवर्तक राजा म्हणून छत्रपती यांचा उल्लेख केला जातो. म्हणूनच म्हणावेसे वाटते जय शिवराय!
सारांश
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा खऱ्या अर्थाने भारतातील परकीय सत्ताधीशांना त्यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी महाराजांनी राज्याभिषेक करवून घेतला होता. राज्याभिषेकाच्या निमित्ताने महाराजांची शक्ती सर्व परकीय सत्ताधीशांना दिसून आली महाराजांची दखल सर्व शत्रूंना घ्यावी लागली यातूनच महाराजांच्या शौर्याचे आणि महानतेचे दर्शन घडून येते.
आजच्या या पोस्टमध्ये आपण शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा माहिती (shivrajyabhishek information in marathi) जाणून घेतली.
शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा माहिती (shivrajyabhishek information in marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक कोणाच्या हस्ते झाला ?
शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक गागाभट्ट यांच्या हस्ते झाला.
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला ?
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला.
शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक कोणी केला ?
निश्चलपुरी महाराजांनी शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक केला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकावेळी कोणते नाणे काढले होते ?
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकावेळी होन आणि शिवराई हे नाणे काढले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक समारंभात कोण ब्रिटिश उपस्थित होता ?
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक समारंभात हेन्री ऑक्झेंडेन हा ब्रिटिश उपस्थित होता.
राज्याभिषेक प्रयोग हा ग्रंथ कोणी लिहिला ?
राज्याभिषेक प्रयोग हा ग्रंथ गागाभट्ट यांनी लिहिला.
अतिशय सुंदर माहिती दिली विशेष करून संधर्भ अतिशय महत्वाचे आहेत.
Very very detailed written thanks
अतिशय अभ्यासपूर्ण माहिती आहे. तो सोहळा नेमका कसा पार पडला याची कल्पना यायला मदत झाली.माहिती deep असल्याने ज्ञानात भर पडली.
खूपच सुंदर अश्या भाषेत माहिती असल्याने ज्ञानात चांगलीच भर झाली. ….. धन्यवाद