Shravan Somvar Vrat Katha In Marathi – नमस्कार मित्रांनो, श्रावण हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो त्यावरून याचे नाव श्रावण असे पडले आहे.
हिंदू धर्मानुसार श्रावण हा अतिशय महत्वाचा महिना असून या महिन्यात प्रत्येक सोमवारी भगवान शिव आणि मंगळवारी देवी पार्वतीचा उपवास करतात. मंगळवारच्या उपवासाला मंगळागौरी व्रत म्हणून ओळखले जाते तर सोमवारच्या उपवासाला शिवामूठ म्हटले जाते.
या लेखातून आपण श्रावण सोमवार व्रत कथा मराठी (Shravan Somvar Vrat Katha In Marathi) सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यातून आपण शिवामूठचा वसा कसा मिळाला? याची देखील माहिती घेणार आहोत.
श्रावण सोमवार व्रत कथा मराठी (Shravan Somvar Vrat Katha In Marathi)

मित्रांनो श्रावण महिना चालू झाला, की श्रावण सोमवार मंगळागौरी, नागपंचमी अशा महत्त्वाच्या हिंदू सण आणि उत्सवाची सुरुवात होते. पण बहुतांश वेळा आपल्याला या सणांचे महत्त्व आणि व्रत कथा माहीतच नसते.
यासाठी आपण श्रावण सोमवारी वाहणाऱ्या शिवमूठीचे महत्व सांगणारी कथा समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
एक आटपाट नगर होतं आणि त्या नगराचा एक राजा होता. त्या राजाला चार सुना होत्या, पण त्यातील तीनच आवडत्या तर एक नावडती होती. आवडत्या सुनांना तो राजा चांगल्या वस्तू आणून द्यायचा आणि नावडतीचा उष्ट जेवण, झाडे भरडे नेसायला साडी, राहण्यासाठी गुरांचे घर आणि गुराख्याचे काम द्यायचा.
पुढे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आला आणि त्या नावडत्या सुनाची नागकन्या आणि देवकन्याशी भेट झाली. त्या कुठे जात आहेत अशी विचारणा केल्यावर त्यांनी सांगितलं की ते महादेवाच्या देवळात शिवामूठ वाहायला जात आहेत.
नावडती नेत्यांना विचारलं असं केल्याने काय होते ? उत्तर देत त्यांनी सांगितले की, भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीस जातं, मूलबाळ होतात, नावडती माणसे आवडते होतात, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो.
यानंतर नागकन्या आणि देवकन्याने तिला विचारलं तू कोण ? यावर नावडत्या सुनेने सांगितलं की मी या राज्याच्या राजाची सून आहे. पण सगळे मला नापसंत करतात. यासाठी मी देखील तुमच्यासोबत येते.
असे म्हणून ती नावडती सून देवकन्या व नागकन्याच्या सोबत देवळात गेली.
देवळात गेल्यावर नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या. नावडतीने विचारलं काय बोलताय, यावर उत्तर देत त्यांनी सांगितलं की शिवामुठीचा वसा वसत आहोत. हा वसा वसण्यासाठी मूठभर तांदूळ, सुपारी, फुल आणि दोन बेलाची पान घ्यावी.
Related – हरतालिका उपवासाची माहिती मराठी
यानंतर मनापासून भगवान शिवाची पूजा करावी. हातात तांदूळ घेत म्हण शिवाशिवा देवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरसेवा, मला जे नापसंद करतात, त्यांची आवडती कर देवा. असे त्या नागकन्या आणि देवकन्याने नावडत्या सुनेला सांगितले.
यासोबतच त्यांनी सांगितलं की, संध्याकाळपर्यंत उपास नाही जमलं तर दूध प्यावं, संध्याकाळी अंघोळ करावी. देवाला बैल वहाला आणि कुणाला न बोलता गुपचूप जेवण करावा.
हा वसा पाच वर्षे मनापासून करावा. पहिल्या सोमवारी, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जव आणि पाचव्यास सातू शिवमूठीकरीता घ्यावे.
यानंतर त्या नावडत्या सुनेने सांगितल्याप्रमाणे मनापासून शिवाची पूजा घातली. ज्या देवळामध्ये नागकन्या, देवकन्या आणि ही नावडती सून पूजा करत होत्या. त्या देवळात देव प्रसन्न होऊन, देऊळ सुवर्णाचं करून टाकलं आणि सर्वांना आशीर्वाद दिला.
यानंतर राजाला मोठा आनंद झाला आणि त्याचं नावडतीवर प्रेम वाढले. ज्या सुनामुळे आपल्याला देव प्रसन्न झाला, तिचे आभार मानत आता सर्वजणांची ती लाडकी सून बनली होती.
जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा आपल्या सर्वांनाही होण्यासाठी आणि आपल्या इच्छेनुसार कार्य सिद्धीस जाण्यासाठी श्रावण सोमवारी व्रत ठेवले जाते.
Related – कामिका एकादशी व्रत कथा मराठी
सारांश
तर मित्रांनो अशा करतो की, श्रावण सोमवार व्रत कथा मराठी (Shravan Somvar Vrat Katha In Marathi) हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जर तुम्हाला हे माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.
माहितीचा स्रोत – कथा श्रावण सोमवार शिवामूठीची (मटा)