Sindhutai sapkal in marathi – सिंधुताई सपकाळ यांचे नाव आपणांस माहिती आहेच. या एक समाजसेविका आहेत. हजारो लेकराची आई म्हणून यांनी आपले आयुष्य पणाला लावले. अनेक खडतर प्रसंगाना तोंड देऊन हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे.
यांच्या थोर कार्याची दाखल घेत 2012 साली त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर 2021 रोजी त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
या लेखात आपण सिंधुताई सपकाळ माहिती – Sindhutai sapkal in marathi जाणून घेणार आहोत.
Table of Contents
सिंधुताई सपकाळ माहिती – Sindhutai sapkal in marathi

संपूर्ण नाव | सिंधुताई श्रीहरी सपकाळ |
जन्म | 14 नोव्हेंबर 1947 वर्धा, महाराष्ट्र |
मृत्यू | 4 जानेवारी 2022 पुणे, महाराष्ट्र |
कार्य | सामाजिक कार्यकर्त्या |
पुरस्कार | 2012 – डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार 2021 – पद्मश्री पुरस्कार |
1. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा या ठिकाणी झाला. नको असताना मुलगी झाली म्हणून तिचे नाव चिंधी असे ठेवण्यात आले.
2. त्यांचा वडिलांचे नाव अभिमान साठे आहे, ते गुरे वळायचे काम करायचे. गाव लहान असल्या कारणाने तेथे सुविधांची उपलब्धता कमी होती.
3. यामुळे सिंधूताई यांना घरची गुरे राखायला म्हणून रोज सकाळी बाहेर पाठवायचे आणि त्या शाळेत जाऊन बसायच्या. असे करत त्यांनी मराठी शाळेत चौथीपर्यंत शिक्षण घेतले.
4. सिंधूतई यांचे वय 9 असताना त्यांचा विवाह 26 वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. पुढे त्यांना प्रचंड सासुरवास सहन करावा लागला.
5. अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणे झाली. त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला.
6. दमडाजीने सिंधुताईंच्या पोटातील मूल आपले असल्याचा प्रचार सुरू केला. त्यामुळे श्रीहरी सपकाळ यांच्या मनात सिंधुताई यांच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला आणि पूर्ण दिवस भरलेल्या असताना श्रीहरी यांनी सिंधुताई सपकाळ यांना बेदम मारून घराबाहेर काढले.
7. त्यांनंतर सिंधुताई माहेरी आल्या, पण त्यांच्या आईनेदेखील पाठ फिरवली. पुढे त्यांनी परभणी-नांदेड-मनमाड रेल्वे स्टेशनांवर सिंधुताई भीक मागायला सुरू केले.
8. त्यानंतर स्टेशनवरच्या सगळ्या भिकाऱ्यांना बोलावून त्या मिळालेल्या अन्नाचा काला करायच्या आणि मग सर्व भिकारी एकत्र बसून जेवायचे.
9. दोन दिवस त्यांना भिक मिळाले नाही म्हणून त्यांनी स्मशान भूमी गाठली.
10. याच ठिकाणाहून त्यांच्या आयुष्याला एक वळण मिळाले. मग त्यांनी समाजातील अनाथ मुलांना सांभाळायचे काम करण्याचा निश्चय केला.
हा लेख जरूर वाचा – तमाशा सम्राज्ञी – विठाबाई नारायणगावकर यांची माहिती मराठी
सिंधुताई सपकाळ यांचे कार्य
11. अनाथ मुलांचा सांभाळ करून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी 1994 साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली.
12. आपली कन्या ममता(sindhutai sapkal daughter mamta) हिला दगडूशेठ हलवाई संस्थेकडून शिक्षणासाठी दाखल केले. त्यानंतर त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार देण्याचं काम केले.
13. या संस्थेत लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. राहण्याची आणि जेवणाची सर्व सोय याच ठिकाणी केली जाते. या संस्थेत 1050 मुले राहिलेली आहेत.
सिंधुताई सपकाळ यांनी स्थापन केलेल्या सामाजिक संस्था
- बाल निकेतन हडपसर, पुणे
- सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह, चिखलदरा
- अभिमान बाल भवन, वर्धा
- गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा
- ममता बाल सदन, सासवड
- सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था, पुणे
- परदेशी अनुदान मिळणे सोपे होईल या उद्देशाने त्यांनी मदर ग्लोबल फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली.
सिंधुताई सपकाळ यांना मिळालेली पुरस्कार
पुरस्कार | साल |
---|---|
पद्मश्री पुरस्कार | 2021 |
महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार | 2021 |
पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार | 2012 |
महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार | 2010 |
मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार | 2013 |
आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार | 1996 |
सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशनने दिलेला रिअल हीरो पुरस्कार | 2012 |
दैनिक लोकसत्ताचा सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार | 2008 |
प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार | 2015 |
डॉ. राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार | 2017 |
पुणे विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार | |
सामाजिक सहयोगी पुरस्कार | 1992 |
डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार | |
राजाई पुरस्कार | |
शिवलीला महिला गौरव पुरस्कार |
असे सिंधुताईं सपकाळ यांना सुमारे 750 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. यांच्या थोर कार्याची दाखल घेत 2012 साली त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर 2021 रोजी त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
सिंधुताई सपकाळ यांचे निधन
आयुष्यभर अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे आजचे वय 75 इतके आहे.
रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी त्यांचं निधन झाले. पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. महिना भरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज दिनांक 4 जानेवारी त्याचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
सारांश
या लेखात आपण सिंधुताई सपकाळ माहिती – Sindhutai sapkal in marathi जाणून घेतली आहे. सिंधुताई सपकाळ यांची कामगिरी आणि समजातील योगदान अनन्यसाधारण आहे.
सिंधुताई सपकाळ याच्याबद्दल माहिती – Sindhutai sapkal information in marathi तुम्हाला कशी वाटली, हे आम्हाला नक्की कळवा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
सिंधुताई सपकाळ यांच्या मुलीचे नाव काय आहे ?
सिंधुताई सपकाळ यांच्या मुलीचे नाव ममता असे आहे. तसे पाहिले तर सिंधुताई यांची एकच मुलगी किंवा मुलाची आई नसून त्या हजारो अनाथ लेकराची आई आहे.
सिंधुताई सपकाळ यांचे निधन कशाने झाली ?
सिंधुताई सपकाळ यांचे निधन ह्रदयविकाराच्या झटक्याने झाले.
सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावरील कोणता पाठ कर्नाटक अभ्यासक्रम मध्ये आहे ?
मी वनवासी हे सिंधुताई सपकाळ यांनी लिहिलेल्या पुस्तकातील काही भाग कर्नाटक राज्यात दहावीच्या अभ्यासक्रमात आहे.